पाण्याचं सीमोलंघन आणि तिसर महायुद्ध

पाण्याचं सीमोलंघन  आणि तिसर महायुद्ध

                              शीर्षक वाचून मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील ना ? काय अर्थ आहे ह्या शीर्षकाचा ?हो पण हे खर आहे ! मागच्या काही दिवसातल्या घटना पाहता  हेच म्हणण योग्य आहे . आज दसरा म्हणजे  सीमोलंघन करायचा दिवस .ह्या वर्षी पाऊस  म्हणावा तेवढा झाला नाही . धरण  सुद्धा कोरडी पडायला लागली आहेत. आणि त्यामुळे भंडार दऱ्या तून पाणी जायकवाडी ला सोडायचा निर्णय घेण्यात आला .
दोन दिवसापूर्वी सोडलेले पाणी कदाचित दसऱ्याच्या शुभ दिनी  सीमोलंघन करून जायकवाडी ला पोहचेल सुद्धा
आणि तिथल्या जनतेला थोडा तरी आधार मिळेल . पण वरून जरी पाण्याचा प्रश्न सुटला आहे अस वाटत असलं  तरी ,प्रश्न आत्ता कुठ निर्माण झालेत हे मात्र तितकचं खर .  भंडार दऱ्या तून पाणी सोडण्यावरून तेथील जनतेने केलेला विरोध पाहता पाण्याचा हा प्रश्न भलताच पेटणार आहे अस वाटायला लागलं आहे .
आत्ता पर्यंत ज्याची केवळ शक्यता वाटत होती ती गोष्ट म्हणजे - तिसर महायुद्ध पाण्यासाठी होईल अस वाटत होत , त्या गोष्टीची सुरवात बहुतेक सुरु झाली आहे महाराष्ट्रातल्या ह्या "पाणी "पतान  . पण हि तर
सुरवात झाली आहे आणि त्याच्या झळा सुद्धा लागायला लागल्या आहेत .
                             आता हे झाले से प्रश्न . प्रश्न वाचून आणि भविष्यातल्या ह्या गोष्टीचा परिणाम ह्यांचा विचार करायला गेलं तर मेंदूच पाणी वव्हायला लागेल . इतका हा प्रस्न बिकट व्हायला सुरवात झली आहे .
पण जसे प्रश्न आहेत तशी उत्तरं पण आहेतच कि --त्यातला एक तात्पुरता विचार करायचा म्हटला तर एका दुष्काळी भागाला  पाणी देण्या वरून जो विरोध होतो आहे तो कमी , कमी म्हणण्यापेक्षा बंद झाला पाहिजे .
पण काही झाल तरी स्वताची भरलेली घागर कुणी दुसर्याला दयायला कसा बारा तयार होईल (तहानलेल्याला पाणी द्यावं हि आता आपली जुनी संस्कृती झाली आहे , कोण करतच नाही तो  विचार ). म्हणून काही तरी ठोस उपाय योजना करायला हवी आहे . आणि ह्यावर कायमचा ठोस उपाय म्हणजे "नद्या -जोड प्रकल्प ".
                             ज्या विषयावर वर्षानुवर्षे केवळ चर्चा झाल्या त्या विषयाची पूर्तता करण्याची वेळ सुरु झाली आहे . नाहीतर ह्यापुढे आणखी पाणी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण पण किती दिवस सरकारच्या नावानी बोट मोडत बसणार आहोत ,किती दिवस दुष्काळी package  साठी आंदोलनं  आणि पाण्यासाठी "हंडा " मोर्चा ह्यासारखे फ़क़्त मोर्चे काढत राहणार आहोत ? त्यापेक्षा ह्या "नद्या जोड प्रकल्पा " विषयी आवाज उठवणार आहोत? ह्या प्रकल्प मुळे देशातल्या साऱ्या नद्या एकमेकींशी जोडल्या जातील. आणि त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग एका विशिष्ट प्रांता साठी न होता सार्या देशाला किंबहुना दुष्काळी भागाला होऊ शकतो.तेव्हा ह्या अश्या प्रकल्पांना विरोध न करता त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे .
नाहीतर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी पाण्यासाठी आपण एक्मेंकांच्या जीवावर उठू. म्हणून म्हणतो जागे व्हा
आणि पुन्हा बनवा आपल्या ह्या भारत भूमीला "सुजलाम -सुफलाम ". आणि सारी भांडण  विसरून करूया पुन्हा एकदा  "सीमोलंघन"

-----------------------------------------------------------------------------------प्रफुल्ल शेंडगे 

शायरी

दुनिया के  भीड़  में  हम ,
इसलिए  नहीं  भागते
क्योंकि ,डर लगता  है  कही
हात तुम्हारा, हमसे छुट ना जाये !!

-प्रफुल्ल शेंडगे 

पुणेरी "पाट्या" ते पुणेरी "पार्ट्या"

पुण्यनगरी  म्हणून ओळख असलेल शहर म्हंजे  पुणे .

पुणे !! असं म्हटलं की लागलीच डोळ्यासमोर उभ राहत ते पुण्याचा  वैभवशाली इतिहास , तिथली माणस पुण्याबद्दल (जास्तच )अभिमान असलेली, तिथला शनिवारवाडा ,सिंहगड  इ.,त्याच बरोबर तिथली संस्कृती , आणि आणखी एक महत्वाच म्हणजे "पाट्या " खास पुणेरी शैलीतल्या .
पुण्यातल्या ह्या इरसाल पाट्या म्हणजे पुणेकरांचा अभिमान च आहे .  अगदी मोजक्या शब्दात समोरच्याला काहीतरी शिकवणाऱ्या त्या पाट्या ! अगदी घराच्या दरवाज्यापासून ते five स्टार हॉटेल च्या बाहेर हि दिसून येतात ह्या पुणेरी पाट्या .

पण आजकालच्या काही वर्षात पुण्याच्या ह्या "पाट्या" पेक्षा  पुणे " पार्ट्या " मुळे  ओळखू लागलं आहे .
विद्येचे माहेरघर असणार्या ह्या पुण्यात अनेक विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात . त्यांच्यात असतो तारुण्याचा तो सळसळता उत्साह . आणि मग सर काही विसरून सुरु होतात त्या "ओल्या पार्ट्या ", कधी सिंहगडाच्या पायथ्याशी , तर कधी एखाद्या हॉटेलात . हे सार काही विशी -पंच्विशित्लीच मुल मुली करताहेत अस हि नाही तर ८वी , १०वी मधली मुल हि करू लागली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार करत कोण तर त्या मुला मुलींची पालकच . केवढी हि भीषण अवस्था . हाच का तो आपला पुरोगामीपणा ? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात लोकांनी एकत्र याव ह्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले , आणि आजकाल एकत्र येण्यासाठी "पार्ट्या " कराव्या लागतात . पण काय होत ह्यातून साध्य ?  कसली होते विचारांची देवाण -घेवाण . हे सार  चित्र काही एकट्या पुण्यातलं नाही तर साऱ्या छोट्या -मोठ्या शहरा मध्ये सुरु आहे . का होत असेल अस .. विचार करा  उत्तर आपोआपच मिळेल ..कारण सुरुवात स्वतः पासूनच होते .

                                                                                                           -प्रफुल्ल शेंडगे



ALL -IS -WELL ???

रोजच वाहतात इथे पाट आमच्या रक्ताचे
दाही दिशी हि मिळत नाही पाणी दोन थेंबाचे

स्वतःच्या भाकरीसाठी करावा लागतो जागर
उपाशी पोटी द्यावी लागते पोट भर ढेकर

चार भिंती उभारल्या पण त्याला मिळेना छप्पर
असल्या फाटक्या नशिबाचे कुणावर फोडावे खापर

अर्धी नेली माणस आमची swine -flue च्या साथीन
शिंगरू मरतंय आमचं पाठीवरच्या ओझ्यान

आमचाच पैसा तो, धावतोय  "त्या "गोऱ्यांच्या  खिशात
आम्ही मात्र आजही जगतोय काळोखाच्या वेषात

विस्कटलेल्या आयुष्यात कशाचाच बसेना मेळ
तरी जो-तो म्हणतोय     ALL     IS     WELL


                                                              -प्रफुल्ल शेंडगे .

कॉलेज

असे गेलो होतो आपण सारे मिसळूनी ,
दंगा, मजा ,मस्ती अन अभ्यासात बुडुनी

अश्या कश्या आठवणी कॉलेज देवून जाते,
कधी आसू ,आणि  हसू ओठांवरी देते

मन सारे गेले बघ यिथेच गुंतुनी
राहिले ते दिस फ़क़्त ,तुझ्या माझ्या मनी

तुझ्या जगातून आम्ही हरवू का रे ?
काही वर्षांनी पुन्हा आठवू का रे ?



कातरवेळी आम्ही  कधी येवू  मनामध्ये
येयील   का पाणी तेव्हा, तुझ्या डोळ्यामध्ये ?


                                                 -TO ALL  MY  FRIENDS 

उंबरठा

नको न ग, नको न ग आये
पाठवू मला तू सासरला
नाय जायचं मला कुठ
सोडून तुझ्या पदराला

आंगणात पण कधी सोडली नव्हतीस
एकटी तुझ्या पोरीला
मग कशी बांधतेस आज मला
दुसऱ्याच्या गोठ्यातल्या दोरीला

त्या घरी ,कुणाला सांगू मनातल
असताना मी खुशीत
अन रडताना डोक ठेवू कुणाच्या ग कुशीत?

फिरवील का कुणी तिकड
तुझ्यावाणी मायेचा हात
देयील का कुणी बाबांवणी
पाठीवर ,शाबासकीची थाप

तुला बी दिस ना का
 माझ्या  डोळ्या मधलं  पाणी
भेटतील का उंबऱ्यात "त्या"
नाती आपल्या माणसावाणी ?

पोरे ,डोळ्यातल्या पाण्यान  तुझ्या
पापण्या माझ्या भिजल्यात
सुखात पाहण्या साठी तुला
म्हणून अजून नाय निजल्यात

चार दिवसात तू बी जाशील
तिकडल्या माणसात मिसळून
जाशील माझ्यावानी तू बी
स्वताच्या माहेराला विसरून
  

अविष्कार

पहिल्यांदा पाहिलं तुला
आणि चक्रावूनच गेलो
मग सारख पाहत तुला
तुझ्या मध्येच हरवून गेलो

दोन शब्दही न लिहिणारा मी ,
तुझ्या साठी चार ओळी लिहू लागलो
चेहरयामध्ये  तुझ्या ,
माझ्या स्वप्नातल्या परीला पाहत राहिलो

मदिरा हून हि नशिले,
तुझे मादक डोळे
गोरे पान गाल तुझे जणू
कापसाचे बोळे.

शिल्पकाराच्या शिल्पाहूनही ,
रेखीव तुझ्या भुवया
बाभळीच्या देठाहून ,
तुझी नाजूक काया 
 

जेव्हा उडतात तुझे
वाऱ्यावरती केस रेशमी
वाटत खेळावं त्यांच्याशी
बेभान वर बनुनी मी

ठेवतेस "त्याना" हळूच सावरून
कानामागे दडवून
व्हाव वाटत ,कान मला
आणि पहाव तुला जवळून

आकाशातला चंद्रही ,तुझ्या
चेहऱ्याकडे पाहून उजळतो
कोरीव ओठांचा गुलाबी रंग
गुलाब पाकल्यानाही लाजवतो

वाटत प्रत्येक क्षणी ,
तू आहेस चमत्कारांचा भांडार
माझ्यासाठी घडवलेला देवाने
खास अन सुंदरसा अविष्कार ...  

...पुन्हा आठवण

                                     तुझ्या सारखी मला ही येतेय ,
                                      क्षणा-क्षणाला तुझी आठवण 
                                     डोळ्यातलं पाणी  ठेवतोय आडवून 
                                     कोरून त्यात गोड दिवसांची साठवण 



                                      दररोज पत्र लिहिण्याचा तुला
                                        मी प्रयत्न करत असतो 
                                      पण विरहातल्या ओल्या शब्दांनी 
                                      कागद तो नेहमीच भिजून फाटतो 



                                      डोंगराच्या आडून सूर्यही हळूच 
                                          पाहतो माझ्याकडे वाकून 
                                      किरणांसंगे पाठवून देतो 
                                     तुझ्या आठवणींची शिदोरी बांधून



                                       दिवसाच्या भर उन्हात 
                                      तुझाच विचार करत बसतो 
                                      रात्रीच्या अंधारात ही तुलाच पाहत 
                                      ओल्या पापण्यांनी मी निजतो 



                                       बेचैन मन तुझ करून जातंय 
                                       बेचैन माझ्या  सुध्धा मनाला
                                       नको आणू डोळ्यातून आसू 
                                        आहे माझी शपथ तुला



                                    माहितेय ,डोळे लावून बसली असशील 
                                                 पाहत माझी वाट ,
                                         येयील मी  ,तुझ्याकडे लवकरच 
                                        सांगतो ,तुझ्या डोक्यावर ठेवून हात .