दिल , दोस्ती , दिल्लीवारी ...





           ऑफिस च्या कामानिमित्त दिल्लीला जायचा योग आला , मी आणि आणि आणखी  ३ जन जायचं ठरल होत , तशी हि माझी पहिलीच दिल्ली वारी होती बाकीचे आधी जावून आले होते त्यामुळे माझ्या मनात दिल्ली विषयी अधिक कुतहूल होत ... शनिवारी मुंबई सेंट्रल  वरून आम्ही मुबई राजधानी मधून आमचा प्रवास सुरु केला , माझ्यासाठी ते तिघे तसे नवीन होते कारण माझ ऑफिस आणि त्याचं ऑफिस वेगळ्या ठिकाणी होत , फोन वर तास बोलन व्हायचं पण प्रत्यक्षात जास्त बोलन झाल नव्हत , ट्रेन मध्ये आमच्या थोड्या बहुत  गप्पा झाल्या , तशी ओळख वाढायला लागली , दुसर्या दिवशी सकळी ०८:३० च्या सुमारस आम्ही नवी दिल्ली स्टेशन वर पोहचलो ...


       थंडीचा महिना असल्याने हवेत बराच गार वरा वाहत होता , घामाच्या थारोळ्यात जगणारे आपण मुंबईकर आपल्याला ह्या असल्या कडक थंडीची कधी सवयच नसते, तिथूनच टैक्सीने आम्ही हॉटेल च्या दिशेने प्रवास केला , स्टेशन ते हॉटेल मधल्या प्रवासाची कहाणी तशी रोचक आणि हसायला लावणारी असली तरी तीची आठवण आमच्या चौघातच दडून राहिलेली आहे , रविवार चा दिवस असल्याने आम्ही फ्रेश होवून बाहेर फिरायला जायचा बेत आखला आणि त्याप्रमाने तयारी करून सुमारे साडेबारा - एक च्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडलो , विचारपूस करत करत आम्ही एका छानश्या हॉटेल मध्ये जावून नॉन-वेज जेवानावर ताव मारला आणि तिथूनच कुतुबमिनार च्या दर्शनासाठी निघालो , दुपारची वेळ असली तरी सूर्यदेवांच दर्शन दुर्लभ होत , अर्ध्या तासात आम्ही कुतुब मिनार परिसरात पोहचलो , तिथ जावून एकदा त्या कुतुबमिनार ला डोळे भरून पाहिलं आणि आम्ही  सगळेच फोटोग्राफर च्या आत्म्यात प्रवेश केल्यासारखं फोटो काढायला लागलो , कधी ह्या अंगेल ने तर कधी त्या , कधी ती पोज तर कधी सेल्फि, ना-ना पद्धतीने फोटो काढून आम्ही आमचा दौरा पुढे सरकवला , आणि तिथूनच जवळ असलेल्या "इंडिअन हेंडीक्राफ्ट  इम्पोरीम ” मधील बनवलेल्या कलाकुसरी पाहण्यात मग्न झालो , तिथल्या सार्या बनवलेल्या कलाकृती पाहून इंडिया गेट ला जाण्यासाठी आम्ही ऑटो मध्ये बसलो , ऑटो वाला थोडा विचित्रच वागत होता , निट उत्तरच देत नव्हता मग रिक्षा मीटर चा दर विचारून आम्ही , आम्ही नाही मी त्याला जो त्रास (त्रास म्हणजे काही छळल नाही )  दिला त्यने तर तो आणखीनच खवळला , त्याला प्रत्यके किलोमीटर चा दर माहित होता कि नाही माहित नाही पण मीटर १४ हजारच आहे ते पक्क माहिती होत , तेच तो वारंवार सांगत होता , आणि त्याला विचारल कि इंडिया गेट किती लांब आहे तर त्याच उत्तर ठरलेल "मुझे नही पता ” त्याच्या ह्या उत्तराने आम्ही हैरान झालो  आता मात्र आम्ही विचार केला तशी ही  बाहेर थंडी कडाक्याची होती त्यामुळे इंडिया गेट ला जायचा प्लान रद्द करावा , आणि त्याप्रमाणे आम्ही रिक्षा मध्येच थांबवून  आमचा मोर्चा पुन्हा हॉटेल कडे वळवला, हॉटेल वर पोहचलो आणि आम्ही आमच्या-आमच्या रूम मध्ये जावून हिटर लावून बसलो , रात्रीच जेवण रूम वरच मागवलं , दिवसभरचा थकवा आणि दुसर्या दिवशी ऑफिसला लवकर निघायचं म्हणून आम्ही लवकरच झोपून गेलो .

   दुसर्या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास हॉटेल मधून निघून आम्ही आमच आयुष्य मेट्रो च्या त्या रंगीबेरंगी रंगात  रंगवून घेतलं , निळ्या , लाल आणि  पिवळ्या लाईन मधून प्रवास करून ऑफिस गाठल जावू लागल , संध्याकाळी ६ ला आम्ही ऑफिस मधून बाहेर पडायचो , त्यावेळी बराच अंधार  झालेला असायचा आणि गारवा हि तितकाच त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही ऑफिस मधून थेट हॉटेल वर आलो  आणि हॉटेल च्या कॅन्टीन मध्ये जावून बसलो , गरम गरम चहा आणि मिरची भजी  ची आर्डर  दिली , थोद्या वेळानी वेटर मिरची  भजी घेवून आला तेव्हा मात्र आमचा असा हशा पिकला कि हॉटेल मधले सारेच आमच्या कडे पहायला लागले होते ,पण आमच हसू काही थांबायचं नाव घेयीना , कारण मिरची भाजी चा आम्ही बांधलेला अंदाज वेगळा होता आणि पुढ्यात आलेली ती मिरची भजी वेगळीच , सिमला मिरचीची त्यात भरलेला कांदा आणि कोबी , पण चव लाजवाब होती , चहा भजी संपली तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या , इकडच्या तिकडच्या , आमच्या मैडम ने सांगितलेले त्यांच्या आयुष्यातले अनुभव , गोष्टी , त्या वर होणारा आमचा हास्यकल्लोळ  सगळच लय भारी, सुमारे १:३०- २ तास गप्पा चालू होत्या , हॉटेल मधले सगळे कर्मचारी आमच्या कडे पाहत होते , म्हणून तिथून उठून आम्ही जेवणाच्या हॉटेल मध्ये गेलो , तिथेही तोच धुमाकूळ , जेवण आटपून ११:३० ला आम्ही आपापल्या रूम वर गेलो , नंतर च्या दिवशी ऑफिस वरून काहीही झाल तरी फिरायला जायचा असा बेत आखला आणि ऑफिस वरून खरेदी करायला बेंगाली मार्केट गाठलं , तिथल्या एका स्वीट च्या दुकानात , एक-एक करत आम्ही कित्येक पदार्थ त्याच्या कडून मागून घेत होतो , आणि खात होतो , कधी मी , कधी दुसर कोणीतरी चव बघायला एक एक पदार्थ मागत होतो , आणि जो चांगला वाटला तो पदार्थ खरेदी पण केला , आता मात्र चैट खायचा होता , एका स्थानिकाणे सांगितल होत कि UPSC भवन जवळच्या प्रभू चैट  वाल्याजवलचा चाट फेमस आहे म्हणून आम्ही ऑटो ने तिथे गेलो पण आम्ही पोहचेपर्यंत ते दुकान बंद झाल होत , पण त्या दिवशी आम्ही चाट खायचाच असा निश्चयच केला होता  म्हणून तिथून पुन्हा आम्ही बेंगाली मार्केट मध्ये आलो आणि आमचा चाट  खायचा निश्चय एकदाचा काय तो पूर्ण केला आणि तिथून पुन्हा हॉटेल च्या दिशेनी आमची स्वारी निघाली , टी थेट होटल रूम वर जावूनच थांबली .

    पुन्हा सकाळी तेच ऑफिस ला जायच रूटीन , आज आमचा दिल्लीतला शेवटचा दिवस होता , रात्री च्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु करणार होतो , ऑफिस मधून सुटल्यावर आम्ही थोड शॉपिंग करायला गेलो ,शॉपिंग  करून हॉटेल मध्ये जावून पुन्हा एकदा चहा आणि त्या मिरची भजी बरोबर उथप्पा चा आस्वाद घेउन ९ च्या सुमारास हॉटेल मधून नवी दिल्ली स्टेशन गाठलं , ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरु झाला , सकाळी उठून जे येयील त्या स्टेशन वर उतरून तिथला एखादा पदार्थ आणि चहा घेण सुरु झाल , गप्पा  , मजा- मस्ती , आठवणी ह्या सार्यांसोबत  प्रवास पुढे सरकत होता , जस जस आम्ही मुंबईच्या जवळ जवळ येत गेलो तस तस दिल्ली ची आठवण अधिक गडद होत जात होती , माहित नाही हि फ़्क़्त माझीच परिस्थिती होती कि बाकी सार्यांचीही , पण जो तो आपल्या परीने आठवणी मनात दाटवून ठेवत होता हे मात्र नक्की....दर वेळच्या प्रवासाप्राने ह्या प्रवासाने हि मला खूप काही दिल होत , आठवणींसोबत मला मिळाले होते २ मित्र ते हि माझ्या सारखेच वेडे , आणि आमच्या पेक्षा मोठ्या असून हि आमच्यात रमणाऱ्या आणि गोष्टी शेअर करणाऱ्या मैडम.
                ह्या दिलवाल्या शहरात फिरून , दोस्ती हि मिळाली आणि एक अविस्मरणीय दिल्लीवारी हि घडली . बघुया पुन्हा कधी ह्या दिल्लीच दर्शन होतय ते.

प्रफुल्ल शेंड्गे

अज्ञान सुख




अज्ञानात सुख असत अस म्हणतात , खरंच !, खरच आहे ते.  जेव्हा मला तिच्या विषयी काहीच माहित नव्हत तेव्हा हि  मी तिच्या स्वप्नात रमायचो , तिचा विचार करत राहायचो , कधी भेटेल , कधी बोलोल ह्याचे तर्क लावत बसायचो   , कधीतरी ती माझी होईल हि आशा सोबत घेवून फिरायचो , पण जेव्हा तिची नि माझी ओळख झाली , जेव्हा  तीच मन माझ्या पुढ्यात उलगडत गेल तेव्हा मात्र थोडासा हिरमोडच झाला "सपना तुटा है तो दिल कभी जलता है , हा थोडा दर्द हुवा पर चलता है    " अशीच काहीशी अवस्था झाली होती माझी , म्हणजे मी काही तिला प्रपोज  करून तिच्या कडून मला नकार वगैरे मिळाला नव्हता , आणि विचारात काही विसंगती  हि नव्हती आमच्या ,गुण-दोष , ग्रह -तारे अस काहीच नाही , तिला मी आवडलो कि नाही हा तर फार लांबचा विषय होता कारण तिच्या काळजात कुणा दुसर्याचाच चेहरा होता, स्पष्ट कधी सांगितल नाही तिने पण तिच्या बोलण्यात , वागण्यात आणि डोळ्यातही "तो" दिसत होता .. आणि ते काय म्हणतात ना पजेसिवनेस  वगैरे , अगदी तसं वाटायचं मला त्या क्षणी पण तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने , स्माईल ने मि सारच विसरून जायचो  , एकतर्फी का होईना पण प्रेम होत ना माझ तिच्यावर , आणि मला तिला खुश पाहायचं होत , माझ्यामुळे किंवा दुसर्या कुणामुळे काहीच फरक पडत नाही .

तू नसलीस जरी सोबत माझ्या , मी तुझ्या नेहमीच सोबत राहील 
हसून एकदा आरशात पहा , ओठांवर तुझ्या मीच दिसत राहीन ,
वाटलच कधी  बोलाव माझ्याशी, एक हाक फ़्क़्त  मनातून दे 
भासला एकांत कधी तर ,आपल मानून  एकदा , हात माझा हातात घे. 
 

-प्रफुल्ल शेंडगे 
(काल्पनिक कथा )
blog address :- http://prafulla-s.blogspot.in

20 मिनिट





आज जरा घाईच झाली .... आधी उठायला उशीर झाला आणि मग ऑफिस ला जायची तयारी ... घाई-घाईत कस तरी रेल्वे स्टेशन गाठलं ... ८:४० ची लोकल पकडायचीच असा निर्धार करून पाऊले पुढे टाकत होतो .... त्यात सकाळीच एवढ उकडत होत कि स्टेशन वर पोहचेपर्यंत पूर्ण शर्ट घामाने ओलाचिंब भिजला होता ...जस स्टेशन च्या पायर्या उतरल्या तोच गाडीने निघण्याचा आवाज दिला .. मग काय... पुन्हा धावत-धावत कसाबसा डब्यात प्रवेश केला ... आधीच डब्बा मानसानि फुल झाला होता .. बसायला जागाच उरली नव्हती ... म्हणून दरवाजाच्या बाजूला जावून उभा राहिलो ... गाडीने वेग धरला होता ... मंद वाहणारा वारा गाडीच्या वेगाने सुसाट वहायला लागला होता होता .... आणि तो जेव्हा माझ्या ह्या भिजलेल्या शरीराला स्पर्श करत होता तेव्हा अगदी गारेगार वाटायला लागल .. पुढच्या स्टेशन वर आणखी माणस डब्ब्यात चढली ... माणसांच्या गर्दीतून दरवाज्यातून बाहेर पाहन मुश्कील झाल ... आणि मी डब्यातच इकडे तिकडे नजर फिरवायला लागलो. बाजूलाच लागून लेडीज डब्बा होता दोन्ही डब्ब्यानच्या  मध्ये फ़्क़्त एक जाळी होती ... अगदी कही सेकांदापुर्ती त्या जाळी  पलीकडे माझी नजर गेली होती तोच दरवाज्यात उभ्या असलेल्या एका चेहऱ्याकडे माझ लक्ष वेधलं गेल ... एका हाताने हैंडल पकडलेल , पोटावर अडकवलेली बैग तर दुसर्या हाताने वारयाने विस्कटनार्या केसांना सावरायचा प्रयत्न करणारी ती ... तो मदमस्त वाहणारा वारा तिची जणू छेड़च काढत होता कि काय असा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता ... ४-५ वेळा केसांना सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने केसांना लावलेली पिन काढून तोंडात पकडली , गाडीच्या वेगासोबत स्वताला सावरत तिने सारे विस्कटलेले केस गोळा केले आणि त्यांचा बुचका बांधून मागे घट्ट बांधून ठेवले ... मग पुन्हा बैगमध्ये  हात घालून इअरफोन्स काढून गाणी ऐकायला लागली ... मध्येच गाणी ऐकताना डोळे बंद करून गान गुणायला लागायची मग पुन्हा कुणी पाहत तर नाहीये ना ते पाहून पुन्हा गाण्यच्या धुंदीत अडकून जायची ... मी तिच्याकडे पाहतच राहिलो होतो ... पण कधी माणसाच्या चढण्या-उतरण्याच्या गर्दीत ती माझ्या नजरेसमोरून हरवून जायची पण फ़्क़्त काही सेकांदापुर्तीच ... एका मागून एक स्टेशन जात होते ... अशाच एका स्टेशन वर जाळीच्या पलीकडून तिने मला पाहिलं ... बहुतेक मी तिच्या कडे पाहतोय हे कलाल  कि काय ? ... मी न  पाहिल्यासारख नजर फिरवून घेतली तेव्हा कलाल गाडी माझ्या स्टेशन वरून निघाली होती ... मी घाईने उतरण्याचा प्रयत्न करायला लागलो पण गाडीने वेग धरला होता ... आता पुढच्या स्टेशन वर उतरून पुन्हा मागच्या स्टेशन ला जाण्यावाचून पर्याय नव्हता ... स्टेशन यायला थोडा वेळ होता म्हणून हळूच चोरून पुन्हा तिला पहायला लागलो .. पण ती तिच्या जागेवर दिशेनासी झाली ... बहुतेक तिला बसायला सीट  मिळाली असावी... पुढच्या स्टेशन वर मी उतरलो आणि दुसरी गाडी पकडायला निघलो तोच ती माझ्या समोर उभी होती ... काही क्षणांसाठी माझा श्वास थांबला ... तोच तिने मला विचारल "अंधेरी इस्ट कोणत्या बाजूला आहे  ?”... मी स्वप्नात तर नाही ना अस  मला वाटयला लागल होत आणि दुसर्याच क्षणी स्वताला सावरत मी तिच्या प्रश्नच उत्तर दिल ... मग तिने थैंक्स म्हणत दिलेली स्माइल ने तर मी अर्धा घायाळ झालो .... आणि मी तिथून निघालो ... मनात विचारांचं चक्र घेवुनच ... ह्या २० मिनिटांच्या प्रवासात मला ती आवडली होती ... प्रेम कि आकर्षण ? माहित नाही

पण आजकाल तिच्या साठी  रोज  मी मुद्दाम एक स्टेशन पुढे जातोय ...आणि ऑफिस  सुटल्यावर हि तिच्याच स्टेशन वरुण गाडी पकडतो ... दिसते रोज मला आजही ती, पण पुन्हा बोलन मात्र झाल नाही ...  मीच बोलेन म्हणतोय एकदा तिच्याशी पुन्हा ...  बोलू ना ?

-प्रफुल्ल शेंड्गे

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा    २० मिनिट भाग -2      २० मिनिट भाग -३         २० मिनिट -भाग 4

तिची डायरी-भाग 2

 

पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा...तिची डायरी- भाग 1

 मुलगी ,बहिन, मैत्रीण , बायको ,  आई अशा अनेक टप्प्यात स्त्रीच आयुष्य जरी विभागल असलं तर तीच प्रेम कुठल्याच टप्प्यावर कुणासाठीच विभागल जात नाही , प्रत्येकाला आनंदी , सुखी ठेवत तीच जगन चालू असत ... डायरीच्या ह्या पुढच्या पानात दडलंय असंच एक अनोख नात


दिनांक :- २९ -०१ -२०१२ 
कॉलेज पूर्ण झाल होत , आमच प्रेम आजही फुलत चालाल होत , मोबाइल  वर बोलन , मेसेज करण अस सारख चालू असायचं , घरातल्यांपासून लपून-छपून सार काही पुढे सरकत होत ... पण आज आईला कळालच ... मोबाइल वर त्याच्याबरोबर चैट करत होते तोच आई बोलली "फार दिवसापासून मी बघतेय तुझ काहीतरी वेगळच चालू आहे , सारख त्या मोबाइल वर असतेस , मोबाइल मध्ये बघून हसत असतेस , काय चाललय तुझ ?” आईच हे बोलन ऐकून मी घाबरले , आई आज थोडी जास्तच कडक वागत होती ... मग मलाही तिला त्याच्या बद्दल सांगाव लागल , मी आईला त्याच्या बद्दल , आमच्या प्रेम बद्दल सांगितल , माझ हे बोलन ऐकून आईच्या चेहऱ्यावर टेंशन आल होत ... पण मी तिला त्याच्या चांगुलपणाचे दाखले देवून पटवत होते कि तो किती चांगला आहे ... आईने माझ पूर्ण म्हणन ऐकून घेतल , पण ती त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हती.. म्हणून मी तीच  त्याच्याशी मोबाइल वर बोलन करून दिल ... त्याच्या सोबत बोलल्यावर मात्र तिलाहि त्याच्या स्वभावाबद्दल थोडी फार कल्पना आली होती ... तिच्या चेहर्यावरच थोड टेंशन कमी झाल असल तरी बहुतेक बाबांना कस सांगायचं हाच विचार तिझ्या मनात चालला असावा ... पण आईशी सार काही शेअर करून मन हलक झाल होत ...


दिनांक :- ०८ -०३ -२०१२ 
आज रात्री जेवताना बाबांनी माझ्या लग्नाचा विषय काढला , ते आईला बोलत होते "आता मुल बघायला सुरु केल पाहिजे हिच्या लग्नासाठी ”, त्याचं हे बोलन ऐकून मी आणि आई आम्ही दोघी हि एकमेकींकडे बघत होतो .. पण दोघीनंही बाबाना सार काही सांगायची हिम्मत होत नव्हती ... तोच आईने मुद्दाम विषय काढून हसत मला म्हणाली "काय शोधू दे ना मुलगा  ?, का शोधलायस तूच आधी ?” आईच्या ह्या प्रश्नांवर काय उत्तर देवू मला कलाल नाही मी हळूच बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला लागले होते तर बाबा आधीच माझ्या कडे बघत माझ्या उत्तराची वाट पाहत होते ... त्यांच्या  नजरेला नजर भिडवण्याची माझी हिम्मत होत नव्हती मी तशीच नजर झुकवून जेवत राहिले ... थोडा वेळ पूर्ण शांतता पसरली ... तोच बाबांनीही तोच प्रश्न केला ... तस बाबांचं आणि माझ फार जमायचं , त्यांच्याशी मी दिलखुलास बोलायचे पण आज मात्र बाबांच्या आवजाने माझ्या हृदयाची धडधड वाढवली होती.... मी चोरून हळूच आईकडे पाहत होती आणि आई मला सांगून टाक अस नजरेने सांगत होती .... आणि मी मन घटत करून "हो ” एवढंच बोलले तोच बाबांनी दुसरा प्रश्न विचारला "हो चा अर्थ काय काढू ? मुल बघायची कि ....” बाबांचं बोलन मध्येच तोडत आई ने बोलायला सुरुवात केली ... तिने बाबांना माझ्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल सांगायला सुरुवात केली ... मी तशीच नजर झुकवून बसले होते ... आईच सांगून झाल तस मी नजर वर करून पाहिलं तर बाबांनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि परत जेवायला लागले पण बोलले काहीच नाहीत ... मी हि पटापटा माझ जेवण आटपून माझ्या खोलीत येवून बसले ... झोपायची वेळ झाली पण अजून पर्यंत बाबा ह्या विषयावर काहीच बोलले नाहीत .


दिनांक :- ०९ -०३ -२०१२
आज सकाळी पण बाबा माझ्याशी काहीच न बोलता ऑफिस ला निघून गेले ... आज पर्यंत कधी अस माझ्याशी न बोलता राहिले नव्हते .... माझ्या मनात हि वेगवेगळे विचार घोळत राहिले ... आईला विचारल "काही बोलले का बाबा तुझ्याशी ?”  आई ने नकारार्थी मान हलवली ... पण मला धीर देत म्हणाली "काळजी करू नकोस तू , मी बोलते त्यांच्याशी ऑफिस  मधून आल्यावर ”...माझा अख्खा दिवस काय होईल आणि बाबांच्या मनात काय चालू असेल ह्याच विचारात गेला ... संध्याकाळी बाबा घरी यायची वेळ झाली , मी मुद्दाम त्या वेळी माझ्या खोलीत जावून बसले होते ... फ्रेश झाल्यानंतर बाबा चहा पीत होते तोच आईने पुन्हा विषय काढून  त्यांना विचारल ... आईचा बोलण्याचा आवाज आला म्हणून मी माझ्या खोलीच्या दारात उभ राहून माझी बोट क्रॉस करून  त्याचं बोलन ऐकायला लागले .... आईने बाबांना विचारल :”काय झाल ? काल पासून काहीच बोलत नाही आहात ? ” बाबांनी उत्तर दिल "काय बोलू मी ? आणि बोलून काय उपयोग ”... “अहो , काय बोलू म्हणजे ? तुमच काय म्हणन आहे आपल्या मुलीने घेतलेल्या निर्णया वर ?”.... ह्यावेळी बाबांचा आवाज थोडा नरम आणि काळजीग्रस्त वाटायला लागला होता ... बाबा आईला सांगत होते "हि तीच आपली मुलगी आहे ना ... जी लहानपणी .... लहानपणी काय काल परवाचीच गोष्ट ... नर्स नि माझ्या हातात तिला सोपवली होती  ...तो गोंडस , निरागस चेहऱ्याची बाहुली पाहून मला झालेला आनंद आज हि मला आठवतोय ... तिनी टाकलेलं पाहिलं पाउल , उच्चारलेला पहिला शब्द आजही स्पष्ट आठवतोय ... मला घोडा बनवून त्यावर बसून रपेट मारणारी , तर रात्री माझ्या कुशीत डोक ठेवून निजणारी , बाहुली साठी हट्ट करणारी , शाळेत घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारी आपली मुलगी एवढी मोठी झाली ? स्वतःचा निर्णय स्वता घेण्याएवढी ? आता हिला ह्या बाबाची गरज नाही लागणार ना ?,  विसरेल ना आता हि मला नी तुला ? आता आपल्यापासून दूर जाणार ना ? ह्याच विचाराने मी शांत होतो , जर मी काही बोलायला गेलो असतो तर मी तिच्याशी काही बोलायला गेलो असतो तर मी माझ्या भावनांना आवरू शकलो नसतो म्हणून गप्प राहणंच पसंद केल , आणि जर तिचा हा निर्णय पण योग्य असेल तर मी नेहमी सारखा तिच्या सोबतच असणार आहे  ” त्यांच्या ह्या बोलण्याने मला माझे अश्रू अनावर झाले होते ... दरवाजाच्या आडून मी बाहेर निघून त्यांच्या समोर आले ... आई आणि बाबांचे दोघांचे हि डोळे अश्रुने ओले झाले होते ... त्यांच्या ह्या अश्रुना पाहून मी स्वताला थांबवू शकले नाही ... मी बाबांच्या जवळ जावून त्यांच्या मांडीवर डोक ठेवून मी हि रडायला लागले होते ... बाबांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला ... आणि आई आमच्या दोघांकडे पाहत होती ... मी माझा हुंदका आवरत त्यांना म्हणाली कि "मी तुम्हाला सोडून जाणार नाही कुठ ” तोच बाबा म्हणाले मग त्या मुलाला नाही म्हणून सांगू दे ना ? हे ऐकून मी झटकन वरती  त्यांच्या कड़े पाहिल तर आई-बाबा माझ्याकडे बघून हसत होते ...आणि मी माझ लाजन त्यांच्या पासून लपवायचा अयशस्वी प्रयत्न करत होते....

-प्रफुल्ल शेंड्गे

तुमच्या प्रतिक्रया फेसबुक किंवा prafulla21pan@gmail.com  ईमेल वर कळवा 

तिच्या मनाच्या कप्प्यातुन...

             

          मला काही तशी वाचायची ख़ास सवय नाही पण मनात लिहिल्या गेलेल्या त्याच्या आठवणी आज हि मी रोज वाचत राहते ... इंजीनियरिंग च्या सेकंड इअर ला आमच्या क्लास मध्ये काही नवीन चेहरे दाखल झाले होते ... तो हि त्या नवीन चेहर्या मधला एक .... शांत , स्वतच्याच विचारात मग्न, पुस्तकी किडा असाच , मुलींशी तर फारच कमी बोलायचा ... असच पहिली सेमिस्टर संपली पण ह्या सहा महिन्यात कधीही त्याच्याशी थेट बोलता आल नाही , मी त्याच्या आणि माझ्या मित्रांच्या माध्यमातून त्याच्याशी असाइनमेंट आणि प्रोग्रामिंग बद्दल त्याच्याशी बोलायला सांगायचे... पण एक दिवस आला ज्या दिवशी त्याच्या बद्दल मला काही कलाल , आमच एक ट्रेनिंग चालू होत , त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीनी मला सांगितल कि तो तुझ्याकडेच पाहतो आहे सारखा ... मी तिला म्हटल "तो कशाला बघेल माझ्याकडे , तो तर किडा आहे , पुस्तकी किडा ” आणि मी हसायला लागले पण माझ मलाच राहवल नाही आणि मी खरच तर तो माझ्या कडे बघत नाही न म्हणून त्याच्या कडे हळूच पाहिलं ... बघून सौम्य धक्काच बसला , खरच तो माझ्या कडेच पाहत होता .. मी जाणूनबुजून न पहिल्यासारख करत होते , काय कराव मला हि काळात नव्हत ... एकदा असच ट्रेनिंग संपल्यावर पार्किंग एरिया मधून माझी स्कूटी काढत होती तेव्हा एक बाईक माझ्या अंगावर पडायला लागली ... कुणास ठावूक पण तो त्या वेळी कुठून आणि कसा आला आणि ती बाईक पडण्यापासून थांबवली ... मला काहीच समजल नाही एवढ सगळ एकदम अचानक घडल .. मी तशीच घाईघाई ने तिथून निघून गेले , नंतर लक्षात आल मी त्याला थैंक्स पण नाही म्हटल, काय विचार करत असेल तो माझ्या बद्दल असा विचार करतच मी झोपून गेले . 



            दुसर्या दिवशी ट्रेनिंग च्या वेळेला पुन्हा मी त्याच्या कडे पाहिलं , आज हि तो तसाच मग्न होवून माझ्या कडेच पाहत होता ...मनातून मलाच अवघडल्या सारख वाटत होत ..म्हणून त्याच्याशी बोलून थैंक्स बोलायची हिम्मत माझ्यात झाली नाही म्हणून मी माझ्या मैत्रिणीला माझ्याकडून थैंक्स म्हणायला सांगितल ...दिवसमागून असेच दिवस निघून जात होते ... आमच्या सेकंद इअर च्या पहिल्या सेमिस्टर चा रिजल्ट आला ... तो पूर्ण क्लास मध्ये पहिला आला होता ... म्हणून त्याला क्लास चा CR बनवला गेला ... कधी कधी टीचर त्याला क्लास मध्ये हजेरी घ्यायला सांगयचे आणि हा पट्ठा माझा रोल नंबर आला कि माज्याकडे बघून स्माईल द्यायचा , त्याच्या ह्या अश्या वागण्याने माझे सगळे मित्र-मैत्रिणी आता मला त्याच्या नावाने चिडवायला लागले होते , पण मला त्याच्या बद्दल अजून अस काही वाटत नव्हत... एकदा असच मी क्लास मध्ये असाइनमेंट लिहित बसले होते तो माझ्या जवळ आला अणि मला नम्बर विचारला मी पण लगेच माझा मोबाईल नंबर सांगायला सुरुवात केलि तोच त्याने मला थाम्बवल अणि म्हणाला मोबाईल नम्बर नाही रोल नंबर ....माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसायला लागल्या अणि तो तसाच माझ्याकडे बघत राहिला , मी अशी कशी वागले कुणास ठावुक ?...जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आमच्या क्लास ची पिकनिक गेली तेव्हा त्याच्याशी बोलायची पहिली संधी मिळाली ... आता अधून मधून त्याच्याशी बोलन सुरु झाल होत ... पण एवढ जास्त हि नाही फ़्क़्त हाय आणि बाय एवढच बोलायचा ... मी आमच्या ग्रुप मध्ये बसली असली तरी तो फ़्क़्त मलाच हाय आणि बाय करायचा , त्यामुळे सगळ्यांना अजूनच मला चिडवायची संधी मिळत होती , पण मला ह्या वर काय प्रतिक्रिया द्यावी ते मलाच कळत नव्हत... असच एके दिवशी त्याने माझ्या मैत्रिणीकडे एक निरोप सांगितला कि त्याला मला भेटायचं आहे एकांतात , थोड बोलायचं होत म्हणे त्याला ... त्याच्या ह्या निरोपाने माझा श्वास गरम झाला , आणि मनात थोडी भीती दाटली , मी जायला तयार नव्हती आणि म्हणून त्याला भेटन टाळल... माझ्या घरचे थोडे कडक होते अशा गोष्टीत बहुतेक ह्याच गोष्टीची भीती माझ्या मनात जास्त होती .... आणि त्यामुळे अधून मधून जे बोलायचो ते हि बंद झाल .... 




           अस महिनाभर आम्ही एकमेक्नाशी काहीच बोललो नाही , त्यामुले तो उदास रहायला लागायचा .असच आम्ही सगळेजन एकत्र बसलो होतो तोच तो तिथे आला , त्याच्या हातात लग्न पत्रिका होती ... ते पाहून माझ्या मनात घालमेल सुरु झाली ... पण ती त्याच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका आहे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला... त्याने मला लग्नाला ये असा खास आग्रह केला.. तेव्हाही मला जावू का नको अस वाटत होत ... पण सार्या मित्रांच्या आग्रहाखातर मी यायला तयार झाले... लग्नात जाण्यासठी मी तयार झाले ... मला तयार झालेलं पाहून सगळे मित्र-मैत्रिणी माझ्याकडे बघून हसायला लागले , मला काही कळल नाही का हसतायेत ते , तर एकाने सांगितल , तू एवढी सुंदर तयार होवून गेलीस तर त्याची तर वाट लागेल , तो तर वेडाच होईल तुला बघून... हे ऐकून पुन्हा सगळे माझ्या कड बघून जोर जोरात हसायला लागले . जेव्हा आम्ही लग्नात पोहचलो तेव्हा मला बघून तो खूप खुश झाला होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्याला झालेला आनंद .... त्याने त्याच्या बहिणीशी माझी ओळख करून दिली तेव्हा तिच्या नजरेत ही मला तीला माझ्या बद्दल खूप काही माहिती आहे अस वाटत होत , ति मला तिच्या आईजवळ घेवून गेली आणि तिच्या कानात काहीतरी सांगू लागली आणि त्यानंतर त्याची आई हि माझ्याशी जे काही खास वागत होती त्याने मी जास्तच अवघडली, पण मनातून ते मला छान वाटत होत मी हळुवारपणे त्याच्या आणि त्यांच्या कड़े ओढली जात होती, माझे सर्व मित्र मला त्याच्या प्रेमळ स्वभावा बरोबर त्याच्या चांगल्या गोष्टी सांगत होते आणि काही वेळासाठी माझ पण मन त्याच्या कडे ओढायला लागल होत .....


          पण त्याच बरोबर एक कटू सत्य माझ्या मनात घोळायला लागल होत ते म्हणजे आमच हे प्रेम शक्य नव्हत , समाजाच्या नियमात आमच प्रेम कधीच जिंकणार नव्हत.... बहुतेक त्याला हि ह्याची जाणीव असावी... प्रेमात पडून दुरावण्यापेक्षा प्रेमात न पडलेलच बर अस मला वाटल , आणि म्हणुनच मी जाणून बुजून त्याच्या प्रेमात पडण्यापासून स्वताला सांभाळत राहिली.... आज इतक्या वर्षात त्याच्याशी ना कधी भेटन झाल ना बोलन पण त्याच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत ..


छुपाना भी नहीं आता,
जताना भी नहीं आता,
हमें तुम्हसे महोब्बत है
बताना भी नहीं आता


माझी अवस्था ही ह्या गाण्यातल्या ओळी पेक्षा काही वेगळी नव्हती...पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात हे माझ्या बाबतीत तरी खर ठरल होत... पण आज हि तो माझ्या मनातल म्हणन ऐकत असेल ह्या आशेने मी माझ्या मनात त्याला त्याच्या वरच्या प्रेमाची कबुली देत असते ....

तिची डायरी


          प्रेम कथा तर तुम्ही खूप ऐकल्या , पाहिल्या , वाचल्याही असतील ... प्रेमावरच्या कविताही तितक्याच ... पण त्यातल्या बर्याचशा कविता मुलांच्या नजरेतून लिहल्या गेलेल्या असतात .. म्हणजे तिला जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या मनातली गोष्ट ... तिच्या अलौकिक सौंदर्याच्या वर्णन करणाऱ्या ओळी .... रेशमी केस , गोरे गाल , गुलाबी ओठा पासून ते तिची तुरु-तुरु चाल ह्या पर्यंत..सारच  अप्रतिम वर्णन ... पण ह्यासोबतच एक विचार मनात आला कि , जस मुल मुलींच्या प्रेमात पडतात तसच मुली हि पडत असतील न कुठल्यातरी  मुलाच्या प्रेमात...ते हि स्वताहून ...मग काय विचार करत असतील हो त्या वेळी ... त्या पण लिहित असतील का मुलांवर कविता ... ज्यात त्यांनी वर्णल असेल मुलाचं चित्र जस ... त्याच्या  दाट  भुवया , पिळदार मिशी , दाढी , त्याच्या चालण्याची स्टांईल वगैरे, जस मुलांना साडीतली मुलगी आवडते मग काय मुलीना धोतर आणि पगडीतला मुलगा तर आवडत नसेल ना  ?.... विचार करूनच तस भयानक वाटायला लागलय... पण खरच अस असेल तर .. कशी होत असेल प्रेमाची सुरुवात मुलींच्या बाजूने ... अशाच एका मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची प्रेम कहाणी तिच्या डायरीतून ...


दिनांक ०१-०७-२००८ 
आजचा दिवस वेगळाच होता ... वेगळा म्हणजे माझ्या स्वप्नातला तो दिवस ...आज सेकंड इअर  चा पहिला दिवस .... कॉलेज च्या पार्किंग मध्ये माझी स्कूटी पार्क करत होते ... तोच एक बाईक घेवून मुलगा पार्किंग एरिया मध्ये आला ... बाईक थांबवून त्याने डोक्यावरून हेल्मेट काढल .. बाईक च्या हैंडल वर ते अडकवून तो बाईक वरून उतरला तोच त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोर आला ... हेल्मेट मुले थोडे केस विस्कटले होते ... त्याने हातानेच त्याचा भांग पाडला ... चेहऱ्यावर हलकीशी दाढी , छान ट्रिम केलेली मिशी ... डोळ्यातला भाव तर प्रेमात पाडणाराच  ... अंगावर मुलांचा अघोषित गणवेश ... निळी जीन्स आणि त्यावर पांढरा शर्ट ... पण हे कॉम्बिनेशन त्याच्यावर जास्तच सूट होत होता ... उंच , मध्यम बांधा ... काहीवेळ तर मी त्याच्या कडे एकटक पाहतच राहिली ... काय झाल होत मला, माझ - मलाच कळाल नाही... बहुतेक त्याला कलाल  होत कि काय मी त्याच्या कडेच पाहतेय त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिलं ... मी लगेच नजर सावरून तिथून निघाली आणि माझ्या क्लास मध्ये जावून बसली ... पण त्याचा विचार माझ्या मनातून काही जाईना .. राहून राहून त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता ... क्लास मध्ये सर आले आणि मी बैगेतून  नोट बुक काढायला लागली तोच माझी नजर अचानक मुलांच्या बेंचवर गेली ... आणि पुन्हा नजरेसमोर तोच ... भास होता कि काय वाटल म्हणून परत एकदा पाहिलं ...खरच तोच होता तो ... माझ्या ओठांवर हसू उमटलं ... आता मात्र मी माझ भान विसरायला लागली होती ... दुपारच्या ब्रेक मध्ये सगळ्यांशी बोलता बोलता कलाल कि दुसर्या बैच मधली काही जन आमच्या क्लास मध्ये आली होती ... आणि तो हि त्यातलाच एक होता ... आजचा सारा दिवस त्याला आठवण्यात आणि त्याला हळूच चोरून पाहण्यात गेला 

दिनांक :- ०२-०९-२००८
आज पहिल्यांदा माझ आणि त्याच बोलन झाल ... असाइनमेंट ची बुक मागण्यासाठी तो माझ्याशी बोलला ... तो माझ्याशी बोलत होता आणि माझ त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हत मी त्याच्या कडेच बघत होती त्याने दोन वेळा मला विचारल तेव्हा कुठ माझ त्याच्या बोलण्याकडे लक्ष गेल ...

दिनांक :- २७ -१० -२००८
आता आमची बर्या पैकी मैत्री झाली होती ... त्याचा स्वभाव मला समजत होता ... कधी खोडकर ... कधी शांत पण मनातून तेवढाच समंजस ...  आज मीच त्याला त्याचा मोबाइल नंबर विचारला आणि कॉलेज मधून घरी आल्यावर त्याला एक मेसेज पाठवला ...  त्याच्या रिप्लाय ची मी वाट पहायला लागली होती  ... पण त्याचा रिप्लाय काही येयीना ... काय वाटल असेल त्याला हाच विचार मनात यायला लागला होता .... पण तासाभरा नंतर त्याच रिप्लाय आला तेव्हा जीवाला कुठ बर वाटल ... आणि मग सारखा त्याचा तो मेसेज उघडून पाहत होती मी  

दिनांक :- १६  -०१  -२००९
आज कॉलेज मध्ये साडी डे होता , मी हि साडी नेसून मध्ये गेले होते , कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिलं कि त्याचा शर्टचा आणि माझ्या साडीचा रंग एकच होता ... ह्याला तस काही लॉजिक नव्हत पण का माहित नाही मला हे जाम भारी वाटत होत . पण तो दुसर्या मुलींशी बोलत होता , त्यांच्या सोबत फोटो काढत होता ना तेव्हा मात्र मला त्याचा राग येत होता ...पण काही वेळानी तो माझ्यापाशी येवून बोलू लागला ... "छान दिसतेस " अस मला म्ह्ह्तल्यावर माझ मन थोड्या वेळ हवेतच उड्या मारायला लागल होत आणि त्यासोबतच त्याचावरचा राग पण कमी झाला ... किती विचित्र वागतेय ना मी ? पण हे सार मला फार आवडतय .  

दिनांक :- २३ -१२ -२००९
फार दिवसापासून मनात चालू होत कि त्याला माझ्या मनातल  त्याला सांगून टाकाव ... पण हिम्मत होत नव्हती ... आणि तो हि काही बोलत नव्हता ... त्याला माझ्या बद्दल काय वाटत होत ते मला स्पष्ट काही कळत नव्हत... पण आज त्याला सांगायचं अस ठरवलं होत ... लंच ब्रेक मध्ये त्याला म्हटल मला तुझ्याशी बोलायचं आहे ... आणि आम्ही कॉलेज च्या कॅम्पस मध्ये गेलो ... इकडचा तिकडचा विषय काढून बोलन सुरु केल आणि थोड्या वेळानी मी माझ्या मुद्द्यावर आली आणि मी त्याला माझ त्याच्यावर असलेल्या प्रेमा बद्दल स्पष्ट सांगितल ..आय लव्ह यु म्हणून प्रपोसे पण केल ... ते ऐकून तो गालात हसला .. थोडा वेळ तसाच गालात हसत  आणि लाजत राहिला ... त्याचा तो गुलाबी पडलेला चेहरा पाहून मला हि मनातून आनद होत होता ... आणि त्याने सुद्धा आधी नजरेने आणि मग बोलून माझ्यावरच प्रेम  व्यक्त केल ... त्यावेळची हूर हूर , आनंद शब्दात मांडताच येत नाहीये मला ...हा दिवस आणि डायरीतल हे पान माझ्या आयुष्यातल सगळ्यात महत्वाच होणार आहे कायमच. म्हणूनच ह्याच पानावर तुझ्यासाठीच्या या चार ओळी 

पहिल्याच भेटीत त्याच्या, मी  स्वताला हरवून गेले ,
नकळत कधी कसे ,त्याच्या प्रेमात बुडून गेले.
अर्थ प्रीतीचा मज, तुझ्यामुळेच उमगला,
असा तू राजकुमार, माझ्या मनी विसावला .

आणि आजही प्रत्येक दिवसागणिक तिच्या ह्या डायरीतली पान त्याच्या बद्दल , त्यांच्या प्रेमाबद्दल लिहिता लिहिता भरत चालली आहेत... पण काय नक्की दडलय असेल हो डायरीच्या ह्या पुढच्या पानांत ?  




-प्रफुल्ल शेंडगे

पुढील भाग वाचण्या साठी इथे क्लिक करा-- तिची डायरी- भाग 2

एक पत्र...




पत्र ... काही वर्षांपूर्वी संदेश पाठ्वाण्यासाठीच एकमात्र साधन म्हणून पत्रांकडे पाहिलं जात होत पण आजकाल मोबाईल , इंटरनेट अशी अनेक माध्यम उपलब्ध आहेत... ह्या पत्रांचा तसा उपयोग प्रेमी लोकांनाच जास्त झाला असावा .. मनातल्या भावना कागदावर उतरवून थेट समोरच्याच्या मनाला भिडवल्या जाव्या ती किमया फ़क़्त पत्रातच असेल किंवा अजूनही आहेच ... पहले प्यार कि पहली चिट्ठी म्हणजे सगळ्यांच्याच आठवणीचा विषय ... म्हणून विचार केला कि एक प्रेम पत्र लिहाव म्हणून ... कुणाला आणि कुठ पाठवायचं आहे ते सध्या तरी माहित नाही , तीच नाव , गाव कशाचीच कल्पना नाही तरी पण तिच्याशी बोलाव, तिला मनातल सार सांगाव म्हणून हा सारा खटाटोप...


 प्रिय अनोळखी (सध्या तरी अनोळखीच आहेस म्हणून ),

 पत्र लिहण्यास कारण कि , फार दिवस तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलायची इच्छा होती पण तू अजून पर्यंत काही मला भेटली नाहीस आणि मी हि सध्या आयुष्याच्या अश्या टप्प्यावर आहे जिथ भेटणारा प्रत्येक व्यक्ती माझ्याशी "काय मग लग्न कधी ?, कुणी भेटली कि नाही ?” असा प्रश्न विचारतोय आणि यासोबतच "लवकर दोनाचे चार हात होवू दे ” असे आशीर्वाद हि मला मिळायला लागलेत ... बहुतेक तुझ्या बाबतीत हि असच काहीस घडत असाव ... म्हणून तुला हे पत्र लिहून विचारायचं होत कि तू माझ्या आयुष्यात कधी दाखल होणार आहेस ? .. कधी आपली ओळख होईल ?.. तुला हि माझ्यासारखीच भेटायची ओढ लागली असेल ना ?... आजकल आजू बाजूला माणसांचा वेढा असला तरी मी तुझ्या विचारात गुंतलेला असतो , स्वप्नातही तूझा धूसर का होईना पण चेहरा दिसत राहतो ... आता हा धूसर चेहरा कधी स्पष्टपने माझ्या स्वप्नाबरोबरच माझ्या जीवनात हि येणार आहे ते माहित नाही ... पण तू भेटल्यावर तुझ्याशी काय बोलायचं , कस बोलेल, तुझ्यासमोर कसा व्यक्त होईल ह्याचे विचार मनात सारखे घोळत राहतात ... आणि माझी नजर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तुला शोधात राहते, त्यामुळे तुझा शोध घेता घेता मी दुसर्याच कुणाच्या प्रेमात पडलो तर मग काही खर नाही हा .... गम्मत केली... तस काही होणार नाही मला पूर्ण खात्री आहे ती तूच असशील जिची मी आतुरतेने वाट पाहतोय ... बोलायचं तर तुझ्याशी भरपूर आहे पण सार आत्ताच नको भेटशील तेव्हा नक्की बोलू ... वाट पाहतोय तुझी ....

 फ़्क़्त तुझाच
 मी


 -प्रफुल्ल शेंडगे

"ती" एक रात्र



                  रात्रीची २:३० - ३ ची वेळ होती , शहरातल्या एका चौकात एक ट्रेवल  बस येवून थांबली , एक जन त्या बस मधून खाली उतरला तशी बस निघून गेली , साधारण २५-३० वयातला एक तरुण होता , त्याने इकडे तिकडे पहिले , बहुतेक तो रिक्षा मिळते कि नाही याची चाचपणी करत होता , १० मिनिटे तो तिथेच थांबून रिक्षाची वाट पाहत होता पण त्या रस्त्यावर एकही रिक्षा येत नव्हती ... कंटाळून त्याने चालत जायचा निर्णय घेतला , सोबत फ़क़्त खांद्यावर अडकवलेली एक बैग होती , त्या निर्मनुष्य रस्त्यावरून त्याने चालायला सुरुवात केली .. चालताना हि तो एखादी रिक्षा भेटते कि नाही हे पाहत होता ... रस्त्यावरच्या दिव्यांमुळे उजेड पसरला होता .. पण ती निरव शांतात खायला उठत होती ... मधूनच दूरवरून कुठून तरी ऐकू येणाऱ्या कुत्रांच्या  भुंकण्याच्या आवाजाने  अणि गुरुखाच्या शीटटीच्या आवाजाने ती शांताता भंग पाहत होती पण ती हि फ़्क़्त काही सेकांदापुर्तीच ... त्या चालणारया त्याच्या पावलासोबत सोबत चालत होती ती फ़्क़्त त्याची सावली ... त्यावेळी त्याच्या  मनात थोडी अस्वस्थता वाढत चालली होती ..

                      चालत चालत तो एका चौकात येवून पोहचला … तेव्हा त्याला एका गाडीचा आवाज आला म्हणून तो तिथेच थांबला …. वर्तमान पत्राची गाडी होती ती … अगदी सुसाट निघून गेली ती त्याच्या समोरून .. पुन्हा हताश चेहऱ्याने तो परत चालू राहिला … सुमारे १० मिनीट चालल्या नंतर तो  रस्ता ओलांडन्यासाठी  निघाला … का कुणास ठावूक पण तो निर्मनुष्य रस्ता ओलांडताना हि त्याच्या मनात दोन्ही बाजूनी कोणत वाहन येत नाही न याची खात्री करावीशी वाटली …म्हणून त्याने डाव्या बाजूला पहिले आणि मग उजव्या बाजूच्या रस्त्यावरून नजर फिरवली …. दूर पर्यंत एक हि वाहन दृष्टीस पडत नव्हते … म्हणून त्याने पावूल पुढे टाकले … तोच कुणीतरी  ब्रेक दाबल्याचा आवाज आला.... त्याच्या पायाजवळ एका गाडीच चाक थांबल होत ... त्याने झटकन वर पहिले … डोक्यावर जुन्या काळातली टोपी , चेहऱ्यावर पसरलेली पांढरी  दाढी असलेला एक म्हतारा  माणूस एम. ८० गाडी चालवत होता … त्या म्हातार्याला  अचानक पाहून त्याच्या हृदयाची धड धड वाढायला लागली …. तोच त्या गाडीवरच्या म्हातार्याने त्याला विचारल "कुठ जायचं आहे ? सोडू का गाडी वरून ?” त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून तर भीती आणखीन वाढली …. आणि शहारत्या अंगाला थोडस सावरून त्याने उत्तर दिल " नको ” आणि इतकच बोलून त्यान लगबगीन रस्ता ओलांडला …

          त्याच्या मनात विचारांचं आणि प्रश्नाचं काहूर माजलं … कोण होता हा माणूस , आणि अचानक कुठून आला ? मगाशी तर रस्तावर एक हि गाडी नव्हती मग क्षणार्धात कुठून आला तो … परत मागे वळून पहायची त्याची हिम्मतच होईना … त्याने जसा रस्ता ला तोच रस्त्यावरचे दिवे बंद झाले … सगळी कडे कालाकुटट  अंधार पसरला … तो दचकला … आणि त्याने परत मागे वळून पाहिलं त्या माणसाकडे .. पण त्या तिथ कुणीच नव्हत … ना तो माणूस ना त्याची गाडी … गेला कुठे होता ? आणि गाडीच आवाज हि का नाही आला ? आता मात्र त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागला  … हात पायाचे तळवे गार पडले होते … काय कराव काहीच काळात नव्हत … उजेडासाठी त्याने खिशातला मोबाइल  काढला … पण तो हि स्वीच ऑफ झालेला … पुढच काहीच दिसेनास झाल  होत … ऐकू येत होता तो वाढलेला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज …. तो तिथेच थांबून राहिला … मन घट्ट करून …. काहीवेलातच कुत्र्यांचा आवाज शांत झाला … सगळ वातावर पुन्हा एकदा  सुन्न झाल होत … त्याचा श्वास वाढायला लागला होता … आणि त्याच क्षणी त्याच्या कानावर आली एक जोरदार किंचाळी …. फार विचित्र आवाज होता … त्याने कान बंद करून घेतले आणि तो तसाच त्या अंधारात धावत निघाला … काही अंतर पुढे गेल्यावर  पुन्हा रस्त्यावरचे दिवे चालू झाले होते … त्यासोबत त्याच्या पावलांची गती हि मंदावली … तो त्याच्या घराजवळ येवून पोहचला … त्याने लगबगीने खिशातून घराची चावी काढली .. आणि कुलूप उघडून तो घरात शिरला … आणि घरातले दिवे पेटवले … मग वाश बेसिन जवळ जावून तोंडावर पाण्याचा मारा केला … आणि तसाच विचारमग्न होवून बेड वर जावून बसला … बाहेरून येणारा प्रत्येक बारीक आवाज हि त्याच्या काळजाची धड-धड वाढवत होता … त्याने ती पूर्ण रात्र तशीच जागून कशी-बशी घालवली …

पण आज हि प्रत्येक रात्री त्याला ह्या रात्रीची भीती सतावत राहते  … काय आणि का घडल होत  ते त्याला अजूनहि उमजत नव्हत .  


- प्रफुल्ल शेंडगे 

थोड मुलांच्या मनातल

परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली , लिहल होत कि "स्त्री म्हणजे शक्ती ... तर पुरुष म्हणजे सहनशक्ती ” वाचून हसायला आल पण दुसर्याच क्षणी विचार आला कि काय चुकीच किंवा हसण्यासारख लिहल होत त्यात  ... खरच होत कि ते रोज आपण पुरुष किती गोष्टी सहन करतो ... सैंडविच  मधल्या टोमेटो सारखी आपली अवस्था असते रोज ... पण कुणाला सांगू हि शकत नाही... 

मनातून किती हि वाटत असेल रडावं तरी रडू शकत नाही ... बाजूचे बोलायला टपलेलेच असतात "काय रे पुरुष सारखा पुरुष  आणि रडतोस काय ?” आणि नाही व्यक्त झालो तरी "ह्याला काही भावनाच नाहीत ... दगडाच्या काळजाचा आहे का ?” अस दुसरी कडून हि बोलल जात ... कात्रीत सापडलेल्या कागदासारखी अवस्था होते ... काही न करता आपण फाटणार हे नक्की असत ...समोरच्यांना का काळत नाही कि आम्ही पण माणस आहोत .. आम्हाला पण भावना आहेत 
  तू मुलगा आहेस तू हे केलच पाहिजे ... हे तुला आलाच पाहिजे असा हट्ट का ? घरातहि तेच आणि बाहेर तर त्याहून बेक्कार परिस्थिती ... मोबाइल  मध्ये डोक घालून बसलो तरी लोक वेगळ्याच नजरेने बघतात ... सभोवाताली पाहत बसलो तरी तेच ... मित्रांच्या ग्रुप  मध्ये बसलो कि म्हणायचं “टवाळकी करतात ”, बाहेर फिरलो कि उनाड्ग्या करतो आणि  घरात बसल तरी “काय घर कोंबड्यासारखा घरात बसतोस ”... कराव तरी  काय आम्ही ?  आणि त्यात सारख मुला- मुलींची होणारी तुलना ...


            दहावी बारावी चे निकाल लागल्यानंतर बातम्या वाचल्यात किंवा पहिल्यात का ?... एकच ठरलेली बातमी ... ह्या वर्षी हि मुलीनी मारली बाजी ... खरच  असेल हि.. पण प्रश्न हा आहे कि त्यांनी आणि आम्ही काय स्पर्धा लावण्यासाठी परीक्षा दिलती का ?  मुली जास्त पास होतात कि मुल हे पाहण्यासठी ... नाही ना मग ? ते जावूद्या कधी कुठल्या परीक्षेत मुल आली अव्वल तर कुणी सांगत का "मुलांनी  मारली बाजी ” ? नाही .. का तर का सांगाव ... मुल आहेत ती, त्यांना यायलाच पाहिजे अव्वल ... म्हणजे आमच कौतुकच नाही ? आता मुलींशी स्वताहून बोललो  तरी वाईट ठरवायचं आणि नाही बोललो तर सरळ आखडू  ठरवून  टाकायचं... फेसबुक  वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण असो किंवा प्रेमाच प्रपोज  करण सगळ आम्हीच आधी कराव हा ह्यांचा हट्ट .. का त्या का नाही करत हे सगळ स्वतःहून ?  दोन तीन महिन्या पूर्वीचा दिल्लीतला एक प्रसंग किंवा मागच्या वर्षी दोन बहिणीचे कथित आरोप ऐकले का तुम्ही ... त्यांनी मुला विरुध्द केलेले आरोप ... मेडिया ने हि ह्या गोष्टीला खूप उचलल... अगदी झूम करून करून मुलाचे फोटो दाखवत होते ... जे तोंडात येयील ते बोलत होते ... कुठलीच शहानिशा न करता... तपासा अंती ते निर्दोष असल्याच सिद्धह हि झाल .. पण त्या नंतर एका हि माध्यमाने माफी मागितली नाही ... का आमची काहीच इज्जत नसते .. मान्य आहे सगळ्याच मुली अस करत नाहीत .. मग तुम्ही का विसरता कि सगळीच मुलहि अशी नसतील याचा ? 


   " स्त्री दाक्षिन्य " बद्दल माहिती आहे न तुम्हाला .. मग पुरुष दाक्शिन्य का नाही ? स्त्री-पुरुष समानता  आहे ना ? शालेच्या दिवसापासून ते कॉलेज च्या दिवसा पर्यंत आम्ही प्रत्येक शिक्षकांच्या टीकेचे धनि ... मुलिंच्या बऱ्याच चुकिना माफ़ी आणि आमची एक चुक ही घोड़चुक समजली जायची ... तेच ऑफिस मध्ये पण .. उशिरापर्यंत ऑफिस मध्ये थांबण आल की आमचच  मरण... मग कुणी आम्हाला विचारत पण नाही नेहमी आम्ही गृहीत धरलो  जातो... अणि कितीही मनापासून चांगल काम करूनही आम्हाला म्हनाव तेवढ कौतुक पदरात पडत नाहीच .... कौतुका वरुण आठवल ... सोशल नेटवर्क साइट्स वर कोणत्याही  मुलाने एखादी कितीही चांगली पोस्ट किंवा फोटो टाकला तरी कुणी ढून्कुन  ही पाहत नाही ... लाइक अणि कमेंट्स तर फारच दूरची गोष्ट ... पण त्याच जागी कुना एक मुलीने एखादा फोटो टाकला तरी साखरेला लागलेल्या मुंग्या सारखे प्रत्येक जन लाइक , कमेंट्स साठी धडपडत असतो ... अणि हे करणारे पण कोण आमच्या सारखीच मुल , जावुदया काय  बोलणार अजुन ह्यावर  ... काहीही असल तरी आम्ही आमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतोय ..जस काही घडलच नसल्या सारख ..बहुतेक हीच असेल आमच्या कड्ची सर्वात मोठी शक्ति...

       


-प्रफुल्ल शेंडगे 

नात विश्वासाच - भाग २

              मुग्धा आणि रोहनला आता मुंबईत येवून ३ महिने झाले होते , मुग्धा हि आता मुंबई च्या वातावरणाशी समरस झाली होती ... रोहनने त्या दिवसाची पुन्हा आठवण किंवा चुकून विषय हि मुग्धा समोर काढला नव्हता  आणि मुग्धा हि मागचा भूतकाळ विसरून संसारात रमली होती .. अगदी सुखी संसार चालला होता दोघांचा .. मुग्धा ने आता नोकरीसाठी सुद्धा धडपड सुरु केली होती , वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला जायला लागली होती , रोहन हि तिच्या ह्या नोकरी शोधण्याच्या कामात तिला मदत करत होता ...

                पुढच्या १० दिवसांनी मुग्धाच्या मावस बहिणीच लग्न होत नागपूरला त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला आणि रोहन ला ४-५ दिवस आधीच या अस निमंत्रण दिल होत ... पण रोहन ला ऑफिस मधून इतकी सुट्टी मिळण कठीण होत म्हणून त्याने मुग्धा च्या आई वडिलांना सांगितल कि त्याला लवकर यायला काही जमणार नाही , पण मुग्धाला आधी पाठवून देतो , माहेरी जायच्या विचाराने मुग्धा खुश झाली होती कारण मुंबई ला आल्यापासून ती अजून माहेरी गेली नव्हती .. दुसर्याच दिवशी रोहन ने मुग्धाच नागपूरला जायच रेल्वे आरक्षण केल ... ठरल्या दिवशी तो तिला रेल्वे स्टेशन वर सोडायला गेला ... नागपूरला घरी पोहचल्यावर माहेरवाशिनीचे लाड पुरवले जात होते .... नवर्याच्या घरी किती हि सुखी असली तरी आई-वडलाना मुलगी माहेरी आल्यावर तिच्या साठी काय करू नि काय नको असच होवून जात तसच मुग्धा च्या घरच्यांचं हि झाल होत ... ऑफिस मध्ये जाताना आणि रात्री जेव्हा रोहन चा फोन यायचा तेव्हा घरातले तिच्या कडे हसून पाहून तिला चिडवायला लागायचे , त्याचं हे चिडवण पाहून मुग्धा अगदी लाजून जायची ... तस मुग्धाच्या मावशीच घर तिच्या घरापाशीच होत त्यामुळे ह्यांच्या घरात हि लग्नाचा पसारा आणि काम चालू होती ... रात्री जेव्हा मुग्धा तिच्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिची आई हि तिच्या खोलीत आली ... दोघी जनी गप्पा मारायला लागल्या ... आई तिची विचारपूस करत होती "सगळ बर चाललाय ना मुग्धा , संसार काय म्हणतोय ? , आल्यापासून तुझ्याशी नीट बोलायलाच भेटल नाही बघ ” अस म्हणत ती मुग्धा च्या डोक्यावरून हात फिरवत होती , मुग्धा ने तिच्या प्रश्नाची उत्तर दिली आणि संसाराच्या , मुंबईच्या गोष्टी आईला सांगायला लागली ..पण आई फ़्क़्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होती ...

             लग्नाच्या ह्या गडबडीत एक एक दिवस सरत होता , फ़्क़्त दोन दिवसावर लग्न येवून ठेपल होत म्हणून सगळ्यांची लगबग सुरु झाली होती ... रोहन हि आज नागपूरला लग्नासाठी पोहचणार होता , आईला सांगून मुग्धा चार च्या सुमारास तिच्या एका मैत्रिणीबरोबर बाजारात शॉपिंग ला निघाली , रोहन यायच्या आधी बाजारात जावून येयील अशा हिशोबाने ती निघाली , ऑक्टोबर चे दिवस आणि त्यात नागपूरची गर्मी , अंगाला उन्हाच्या झळा लागत होत्या नुसत्या त्या चार च्या सुमारास ... एक दीड तासाच्या शॉपिंग करून घराजवळच्या चौकात मुग्धाला सोडून तिची मैत्रीण तिच्या घरी निघून गेली ... रस्ता ओलांडण्यासाठी मुग्धा दोन्ही बाजूनी वाहनांच्या येण्या जाण्याचा अंदाज घेत होती तेव्हाच तीच लक्ष गेल ते समोरून येणाऱ्या सुमित कडे ....
                 सुमितला  पाहताच मुग्धा चे चालणारे पाय थबकले ... काळजात धडधड वाढायला लागली होती आणि मनात एक वेगळीच परिस्थिती , ह्या स्थितीत काय कराव हे तिला कळेनास झाल ...
समोरून येणाऱ्या सुमितच हि लक्ष मुग्धा कडे गेल ... अचानक समोर आलेल्या ह्या परीस्थित काय कराव काहीच कळत नव्हत ..दोघांच्या हि नजरेसमोर भूतकाळातल्या गोष्टी एकामागून एक धावत होत्या ... सुमित मुग्धा च्या समोर येवून उभा राहिला ... दोघही फ़्क़्त एकमेकांकडे पाहत उभी होती काही क्षणासाठी , मग सुमितने च बोलायला सुरुवात केली ... “कशी आहेस मुग्धा ?” त्याचे शब्द ऐकून तिचा श्वास काहीसा जोरात सुरु झाला आणि स्वताला सावरत आणि थरारत्या ओठातून शब्द गोळा करून मुग्धा ने त्याला उत्तर दिल "मजेत आहे , तू कसा आहेस ?” त्यावर तो म्हणाला "मी पण मजेत... थोडासा ” फ़्क़्त तोंड ओळख असलेल्या लोकांसारख दोघांच बोलन चालल होत... आणि त्यातच सुमित ने एक प्रश्न विचारला "विसरलीस का मला ?” त्याचा हा प्रश्न ऐकून मुग्धा त्याचेकडे पाहायला लागली आणि तीन उत्तर दिल "हो , प्रयत्न करतेय विसरायचा तुला , माझ्या वर माझ्या पतीने टाकलेल्या विश्वास साठी , आणि त्याच्या प्रेमासाठी ” तीच हे बोलन ऐकून सुमित गालात हसला आणि म्हणाला "तुला पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडलेल पाहून छान वाटल मला , अशीच आनंदात राहा कायम , आता आपल्याला आपापल्या आयुष्यात पुढ गेल पाहिजे , जे नशिबात असत तेच होत असत कदाचित , आणि ते होऊन गेलय आपल्या बाबतीत ” त्याच्या ह्या बोलण्यावर तिने फ़्क़्त मान हलवून उत्तर दिल आणि म्हणाली "मी निघते ” अस म्हणून तीने रस्ता ओलांडला आणि तेव्हा मागून कुणीतरी आवाज दिला "मुग्धा”" .... ओळखीचा आवाज होता , आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला , तिने झटकन मागे वळून पाहिलं तर खरच रोहन आला होता , आत्ताच रिक्षातून उतरला होता .... त्याला पाहून मुग्धा त्याच्या कडे गेली आणि मग दोघेही गप्पा मारत घराच्या दिशेने निघाले .... सुमित हे सार तिथ उभ राहून पाहत होता ... मुग्धाला तिच्या संसारात खुश पाहून तो हि आनंदी झाला होता मनातून ...  
        खरच प्रेम हे असच असत किंवा असाव , समोरच्याच्या आनंदात स्वत आनंदी होण्यासारखं .... आज ती तिघही स्वतःच्या आयुष्यात पुढे चालली होती .. कुणाचा तरी विश्वास आणि प्रेम सांभाळत....

- प्रफुल्ल शेंडगे 

नात विश्वासाचं








मुग्धा , तशी मुळची नागपूरची , चार महिन्यापूर्वीच तीच रोहन सोबत लग्न झाल होत , तसा रोहन हि नागपूरचाच , एका बँकेत कामाला होता , पण दोन आठवड्यापूर्वीच नोकरीत झालेल्या बदलीमुळे मुंबईला आला होता , अर्थात मुंबई दोघांसाठी हि तशी नवीनच होती पण रोहनचा बराचसा वेळ ऑफिस मध्ये जायचा त्यामुळे त्या नवीन शहराच त्याला एवढ वेगळ वाटत नव्हत पण मुग्धा घरीच असायची , त्यात नवीन ठिकाण ,कुणाशी फारशी ओळख हि नव्हती , रोहन ऑफिस ला गेल्यावर थोडा वेळ रोजच्या कामात जायचा मात्र नंतर एकटीला घर खायला उठायच , तशी मुग्धा हि ग्रेजुएट होती , लग्नाच्या आधी ती नागपूर मध्ये एका खाजगी कार्यालयात काम करायची , त्यामुळे तिला त्या एकट्या घरात उदास व्हायला व्हायचं , पण सध्या तरी दुसरा पर्याय नव्हता . दुपारच्या जेवणा नंतर वामकुक्षी घ्यायची आणि रोहन ऑफिस मधून यायच्या वेळे पर्यंत घरातली काम करून घ्यायची म्हणजे तो आल्यावर त्याच्यासोबत बोलायला , फिरायला वेळ मिळायचा , असा जणू दिनक्रमच झाला होता तिचा .

असच एका दिवशी दुपारच्या जेवणानंतर मुग्धा झोपून गेली आणि सुमारे ४:३० च्या दरम्यान झोपेतून उठली , झोपण्याने मनावर थोडी मरगळ आली होती म्हणून तशीच उठून बाल्कनीत जावून बसली , उगाच एकटक पाहत राहिली , आणि ह्या निशब्द कातरवेळी "त्याचा" विचार तिच्या मनात फिरायला लागला , सुमित .... तिच्या कॉलेज चा मित्र , तस दोघांचहि एकमेकांवर प्रेम होत कॉलेज च्या दिवसात , त्याचा चेहरा , त्याच बोलन, त्याची एक-एक आठवण , आज सगळ दाटून आल होत तिच्या मनात , पहिलं प्रेम होत ना तीच ... कॉलेज मध्ये झालेली त्याची आणि तिची पहिली भेट , मग वाढत गेलेली मैत्री आणि फुलत गेलेलं प्रेम ... गुपचूप भेटन सुरु झाल , फिरायला जान , आयुष्यभराच्या शपथा हि घेतल्या जावू लागल्या .. अगदी नजर लागण्यासारखेच दिवस होते ... एक दिवशी मुग्धाच्या घरी तिच्या आणि सुमित च्या प्रेमाबद्दल कुठून तरी समजल आणि मुग्धा वर बंधने आली ... सुमित आणि तिच्या गाठीभेटी कमी होवू लागल्या ... कामाला जायचं हि बंद झाल तीच ... तशी सुमित ने मुग्धा च्या घरी येवून तिच्यासाठी मागणी घातली हि होती पण आपल्या इथल्या बर्याच ठिकाणी जे होत तेच झाल .... जात- धर्म वगैरे पाहन , समाज काय म्हणेल ह्याचा विचार .. ते इथ हि पाहिलं गेल आणि इथ पण त्याचं प्रेम हारल.... आता तर घरच्यांनी मुग्धा च्या लग्नासाठी मुलगा बघण्याची घाई सुरु केली .... मुग्धा तशी समंजस होती .... आई वडिलांचा मान राखण्यासाठी ... तिने सुमित शी बोलन, भेटन बंद केल पण मनातून त्याची आठवण जात नव्हती ... रोज एकांतात रडायची त्याच्या आठवणीने .... आणि एके दिवशी रोहन तिला बघायला आला होता ... त्याला मुग्धा पसंद पडली ... मुग्धा ह्या बघण्याच्या कार्यक्रमात जास्त रस घेत नव्हती ... तिने ठरवलंच होत आता घरचे जे ठरवतील तेच करायचं ...मुग्धा च्या घरच्याना रोहन आवडला होता ... लग्नाची बोलणी झाली आणि ३ महिन्यातच दोघांच लग्न हि झाल ... रोहन हि मनमिळावू , समंजस आणि प्रेमळ होता ... त्याच्या सोबतच्या संसारात मुग्धा रमायला लागली होती ... पण आजच्या ह्या सुमित च्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले होते ... तेव्हाच दारावरची बेल वाजली ... आणि मुग्धा तिच्या तंद्रीतून बाहेर आली ... दरवाजा उघडला तेव्हा रोहन आला होता ऑफिस मधून ... त्यान तिच्या कड पाहिलं ...तिच्या चेहर्यावरची उदासिनतात त्याने हेरली होती त्याच्या नजरेत ... पण त्यामागच कारण त्याला उमजल नव्हत ... तो तसाच जावून सोफ्यावर बसला .. तितक्यात मुग्धा ने पाण्याचा ग्लास आणून दिला तेव्हा त्याला तिच्या चेहर्या वर सुकून गेलेल्या अश्रुंचे ओघळ दिसले .. त्याने दोन घोट पाणी पिल आणि मुग्धाशी विचारपूस करायला लागला "काय झाल? अशी उदास का दिसतेस ? “ , मुग्धा ने "काही नाही " अस वरवरच उत्तर दिल पण ह्या उत्तराने त्याच काही समाधान झाल नाही , त्यान हळूच तिचा हात धरून तिला स्वतः शेजारी बसवलं आणि अगदी लाडक्या स्वरात तिच्याशी बोलायला लागला "ओह , रुसलीस कि काय माझ्यावर ? “ पण मुग्धा च्या चेहऱ्यावरचा भाव काही बदलत नव्हत , ती सगळ काही ठीक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तीच चेहरा मात्र तिची साथ देत नव्हता ... तीच मन तिला खात होत आतून ... एका क्षणी तिला वाटत होत कि सांगून टाकाव रोहन ला तिच्या उदासीच कारण पण मनात भीती पण वाटत होती ...
रोहन तिला खुश करण्याचा मनापासून प्रयत्न करत होता ... आता मात्र मुग्धा नि मनाशी ठामपने ठरवलं सार काही सांगायचं , ति रोहन ला म्हणाली "मला तुम्हाला काही सांगायचं आहे , पण तुम्ही रागावणर नाही ना ?” रोहन च्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडी उत्सुकता दिसायला लागली , तो म्हणाला "सांग ना , त्यात रागावन्यासारखा काय ”... आणि त्याच हे बोलन ऐकून मुग्धा ने सांगायला सुरवात केली ... तिच्या आणि सुमित च्या भूतकाला बद्दल ... प्रत्येक शब्द सांगताना ती मनातून मोकळी होत होती , इकडे रोहन च्या चेहऱ्यावरचे भाव कळेनासे झाले होते ... एका मागून एक मनातले सारे विचार ती त्याच्या समोर बोलू लागली आणि काही वेळानी सार काही सांगून ती शांत झाली आणि रोहन कडे पाहू लागली , त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याचा अंदाज भेण्याचा प्रयत्न करायला लागली ... रोहन ने स्वताला थोडस सावरून टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि एक घोट पाणी पिऊन , एक दीर्घ श्वास स्वतःत भरून हळूच मुग्धाचा हात स्वतःच्या हातात घेवून तिच्याशी बोलायला लागला "आज हि तुझ त्याच्या वर प्रेम आहे ? तुला जायच आहे का त्याच्याकडे ?” त्यावर मुग्धाने उत्तर दिले "नाही हो , मी आत्ता तुम्हालाच माझ सर्वस्व मानल आहे , मी त्याला कधीच मागे सोडून आली आहे , मी तुमच्या सोबत आनंदी आहे ” हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते .. रोहन ने एका हातात तिचा हात धरून दुसर्या हाताने तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि तिच्या केसांवरून हळूच हाथ फिरवत म्हणाला " मुग्धा , मला तू आवडतेस , आणि तुला हि मी आवडतोय अस तुझ म्हणन आहे मग का तू स्वताला दोषी मानतेस , जे घडल तो तुझा भूतकाळ होता , पण वर्तमान आणि भविष्यकाळ वेगळा आहे , मी तुझ्या मनाची स्थिती समजू शकतो , आपण आठवणीना तर थांबवू शकत नाही ना, तू स्वताला अपराधी मानन सोडून दे , तू जे आपुलकीने आणि हक्काने माझ्याशी सगळ शेअर केलस ह्यातच आपल नात किती घट्ट आहे ते कळत ” त्याचं ह्या अश्या आशादायी आणि प्रेमळ बोलण्याने तिच्या चेहर्यावरच काहीस टेंशन दूर गेल होत .... आणि आता दोघांच्याही चेहऱ्यावर पुन्हा एक नवी चमक आली होती ... दोघ ही काही क्षण तशीच एकमेकांकडे पाहत बसली आणि संध्याकाली दोघेही बाहेर फिरायला निघून गेली

- प्रफुल्ल शेंडगे .

प्रेम

   



           प्रेमात कोण पडत नाही ? सगळेच पडतात कधी ना कधी . प्रेम, हि अशी दरी आहे जिथ रोज किती जन तरी आनंदाने उड्या मारतात तर किती जन ह्या दरीत पडायला नव्याने तयार होत असतात .तुम्ही कधी पडलात प्रेमात ? काय होत असत हो प्रेमात पडल्यावर नक्की ?

      सिनेमात सांगतात तसच होत का अगदी म्हणजे "रातो कि निंद ओर दिन का चैन " हरवल्यासारख , नजर तिलाच शोधायला लागते , डोळ्यांच्या कोपर्यातून तिला सारख पाहत रहावस वाटत ,प्रेत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायला लगतो , उगाच येता जाता आरशात पाहत राहतो , केसात हात फिरवून स्वतःशीच हसायला लागतो .. झोप हि गायब होवून जाते तिचा विचार करताना , आणि आलीच जरी झोप तरी त्यात तिचीच स्वप्न आणि तिच्या विषयीची वाढत जाणारी ओढ ..अमीर खान सारख मन हि गायला लागत "पेहला नशा... ", प्रत्येक प्रेम गीत आपल्यासाठीच लिहल गेलय कि काय अस वाटून आपण प्रत्येक गान गुणगुणायला लागतो , तिच्या समोर आलो कि हृदयाची धड धड वाढायला लागते , हातपाय गार पडायला होतात , कपाळावर घाम फुटतो , आणि श्वास हि गरम व्हायला लागतो ... मग प्रेम व्यक्त करताना उडालेली तारांबळ आठवली तरी कित्येकांच्या चेहऱ्यावर आजही हसू उमटत , तर काही जन आज हि प्रेम व्यक्त करण्याच्या भीतीने गारठून जातात.. ...... त्याने -तिने दिलेलं पाहिलं गुलाबच फुल आजही कित्येकांच्या डायरीत प्रेमाची आठवण ताजी करत आहे , आज कल प्रेम पत्रांचे तसे दिवस निघूनच गेलेत , पत्रांची जागा आता मेसेज नि घेतलीय , मग काय दिवसभर कितीही बोललो तरी सारख बोलतच रहावस वाटत , रात्र-दिवस ह्यातला फरक च विसरायला होवून जात बोलताना,खरच प्रेमात पडण म्हणजे एक सुंदर स्वप्नच असत , कधीच ह्या स्वप्नातून बाहेर पडू नये अस वाटत राहत .... प्रेमाच कितीही वर्णन केल तरी कमीच आहे ... वाचून ऐकून थोड्या वेळासाठी प्रेमाची गंमत कळेल हि पण स्वतः प्रेमात पडल्याशिवाय प्रेमाची मजा अनुभवताच येणार नाही हे मात्र नक्की ...मग वाचून हे सार मनाच्या कप्प्यातून आला का कुणाचा चेहरा डोळ्यासमोर ? आलाय ना , अहो किती खुश होताय , बघा तरी किती गुलाबी पसरलीय चेहऱ्यावर तुमच्या त्याच्या / तिच्या फ़्क़्त आठवणीने ...


-प्रफुल्ल शेंड्गे

बदलय तरी काय ?


सायलेंट मोड बदलून फ्लाईट मोड वर गेलो , 
वेज नॉन -वेज च्या वादात आम्ही उपाशीच मेलो , 
काळा पैसा असतो काय अजून दिसला नाही , 
बॉर्डर वरती सैनिक माझा आजही मारला जाई , 
महागाई ने तर ठेवलाय आमच्या घशावारच पाय, 
मग जगण्यात आपल्या फरक पडलाय तरी काय ?


 इथल्या दुष्काळासाठी ह्यांचा परदेशात दौरा , 
मृगजळाच्या पाठी धावतोय आम्ही आजही सैरावैरा . 
दारिद्र्यात माझ्या होरपळून शेत हि गेल जळून , 
पैकेज च्या नावाखाली गेले ते पोकळ आश्वासन देवून. 
झाडाला लटकून मेलेल्या बापाला ,पाहत होती माय 
सांग तुझ्या माझ्या आयुष्यात बदलय तरी काय? 


गायी वरून आजकाल तापलय मोठ रान , 
पोरीच्या काळजीने तुटतोय आजही आई-बापाचा प्राण. 
आज ह्यावर उद्या त्यावर सुरु आहे बंदी , 
हीच आहे का ती चांगल्या दिवसांची नांदी ? 
चेहरे आणि नाव सोडून ,इथ काहीच बदलल न्हाय. 
आणि जगण्या-मरण्यात आज अंतर उरलय तरी काय ?


 -प्रफुल्ल शेंडगे .

म्हैसूर च्या वाटेवर ....

            काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , मी इंजिनीरिंग च्या अंतिम वर्षात असतानाची , कॉलेज च्या इंडस्ट्रियल विजिट कम पिकनिक साठी आम्ही बंगलोर, म्हैसूर अणि उटी ला गेलो होतो ... त्या विजिट मधल्या दिवसांच्या आठवणी तर खुप सार्या आहेत पण त्यातलीच विजिट च्या शेवटच्या दिवशीची आठवण थोड़ी जास्तच लक्षात राहण्या सारखी होती ...

          उटी वरून आम्ही म्हैसूर ला रात्री किमान ०९:०० च्या सुमारास हॉटेल वर पोहचलो , जेवणाला अवकाश असल्याने हॉटेल रूम वर जावून फ्रेश होवून आमचा ५ जणांचा ग्रुप एक रपेट मारण्यासाठी निघाला , हॉटेल च्या त्या रस्त्यावर त्या वेळी म्हणावी तेवढी वर्दळ नव्हती , मजा मस्ती करत आम्ही म्हैसूर च्या त्या अनोळखी रस्त्यावरून चालत निघालो , प्रवासा वरून आल्याने पोटात थोडी भूक वाढली होती म्हणून आम्ही खाण्यासाठी काही भेटत काय ह्याचा शोध घ्यायला लागलो , थोड पुढ गेल्यावर फुटपाथ वर भेल,पाणी-पुरीची एक गाडी दिसली , सगळ्यांनाच भूक लागल्याने आम्ही पटापट स्वतःसाठीच्या ऑर्डर्स दिल्या , मनात उत्सुकता होती कि म्हैसूर मधली हि पाणी-पुरी,भेल ची चव आपल्या इथल्या सारखीच असेल का ह्याची ... शेवटी जेव्हा त्या पाणी पुरी वाल्याने आमच्या आमच्या खाण्याच्या प्लेट्स आमच्या हातात दिल्या ती खावून मात्र थोडा हिरमोडच झाला .... अगदी जिभेवरची चवच गेल्याचा अनुभव आला ..सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते त्याक्षणी ... कशीबशी आम्ही ती संपवली आणि ह्या हरवलेल्या जिभेच्या चवीला परत आणण्यासाठी आणखी थोडी पायपीट सुरु केली , काही अंतरावर पिझ्झा स्टोर दिसला आणि आम्ही सार्यांनी आमचा मोर्चा तिकडे वळवला , एक पिझ्झा आणि त्या एका कोल्ड्रिंक च्या बाटलीवर आम्ही अगदी तुटण पडलो , पण आता टाइमपास साठी काय करायचं म्हणून त्या रिकाम्या बाटलीचा उपयोग करून ट्रूथ अणि डेअर खेळाला सुरुवात केली , ज्याच्याकडे बाटलीच तोंड असेल त्यांनी बाकीच्यांनी सांगितलेलं काम करायचं किंवा विचारलेल्या प्रश्नच खर खर उत्तर द्यायचं ,खरंच मनातल सार गुपित काढून घ्यायला तर हे सारे मित्र मंडळी आधीच टपलेले असतात आणि त्यात असल्या खेळामुळे तर त्यांना आयतीच संधी मिळत होती , तसही कुठल्या हि मित्रांचा ग्रुप जमला न कि त्यात्त होणारी मजा, मस्ती वेगळीच असते , आमच्या ह्या मस्तीने आणि हसण्याच्या आवाजाने ते पिझ्झा स्टोर दुमदुमत होत , पण आमच्यातला प्रत्येक जन एकच प्रार्थना करत होता कि त्या बाटलीच तोंड त्याच्या समोर येवू नये इतकच ... पण त्या बाटलीनेही सगळ्यांची गुपित फोडायचं ठरवलच होत कि काय अस वाटत होत ... त्या खेळात माझा प्रत्येक मित्र मला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळत होता , गुपितांचे रहस्य फोडताना त्या मागची त्याची किंवा तिची स्थिती , विचार काय होता ते कळत होत ... मनात साठवून ठेवलेल्या आठवणी, भाव अगदी नकळत ओठांवर येत होते कि काय अस वाटत होत , थोड इमोशनल करणारे तर कधी दिलखुलास हसवणारे किस्से ऐकून आणि सांगून मनातून फ्री झाल्यासारखं वाटत होत ... आणि समोरचे ऐकणारे हि तितक्याच मनपूर्वक ऐकून घेणारे असले ना तर स्वर्ग गाठावा असच भासत . सगळ्यांची गुपित फोडून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेल च्या दिशेने निघालो ..  

              पण येताना जे भाव विचार होते ना आमच्या मनात ते आता थोडे बदललेले होते , कॉलेज च हे आमच शेवटच वर्ष होत ह्यानंतर आही सारे वेगळ्या-वेगळ्या वाटेने जाणार होतो .. त्याची हूर-हूर मनात वाढायला लागली होती ... रोज भेटणारे चेहरे काही दिवसांनी धूसर होणार होते ह्याची जाणीव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली होती ... हळूच का होईना प्रत्येकजण डोळ्याचा काठ अलगदपणे पुसत होता ... अस वाटत होत कि आयुष्यभर ह्या रस्त्यावर असच चालत रहाव थांबूच नये कुठहि, बहुतेक हि माझ्या एकट्याच्या मनातली भावना नसेल, सगळ्यांच्या मनातहि हेच चालू असाव त्याक्षणी पण कुणी बोलून दाखवत नव्हत इतकच ...

         आजकल रोज जरी आमची गाठ भेट होत नसली तरी त्या म्हैसूर च्या रस्त्यावर माझ्या सोबत चालणारी ती मित्रांची फौज आणि आणि त्यांच्या आठवणी आजही मनात तितक्याच गडद आहे.

                                                                                                              - प्रफुल्ल शेंडगे 
 
 

नेत्रानी बेट


              तसा काय मी अगदी भटका वगैरे नाही पण दुर्गम किंवा नैसर्गिक ठिकाणी जायची संधी आली तर मी ती सोडत हि नाही  ...असाच एकदा एका बेटावर जायचा योग आला , भटकळ , कर्नाटक मधील पश्चिम किनार्यावरच एक शहर , नोकरी निम्मित्त मी तिथ वास्तव्याला होतो , जानेवारी महिन्यात माझ्या एका स्थानिक मित्राने बेटावर जाण्यासाठी बोलावल होत , प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात स्थानिक लोक त्या बेटावर जात असत  , हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची देवालये आहेत त्या बेटावर आणि त्या देवालयात वर्षातून एकदा पूजा केली जाते  हवामानाचा आणि बाकी सार्या भौगोलिक आणि नैसर्गिक गोष्टींचा अंदाज घेवून एक दिवस ठरवला जात असे , मित्राच्या ह्या निमंत्रणामुळे आणि त्याने केलेल्या बेटाच्या वर्णनाने माझी हि उत्सुकता वाढली आणि मी जराही विलंब न लावता होकार दिला .
             रविवार च्या दिवशी सकाळी 7 वाजता सागरी बंदरा वरून  जायचं ठरल होत त्या प्रमाणे मी आणि माझे एक सहकारी आम्ही ६-६:३० च्या सुमारास घरातून  बंदराच्या दिशेने गाडी वरून निघालो , जानेवारी चा महिना असल्याने हवेत चांगलाच गारवा सुटला होता आणि गाडीच्या वेगाने तो आणखीनच जास्त जाणवत होता , रस्तावर दाट धुक्यानी चादर ओढली होती , मन प्रफुल्लीत करून जाणार वातावरण होत ते सगळ ,  १० -१५ मिनिटांच्या  प्रवासानंतर मासळी चा एक उग्र वास जाणवायला लागला आणि त्या वासानेच कळल  कि आम्ही बंदरा जवळ पोहचलो होतो  ,आकाशात  सूर्य हलकासा उगवला होता आणि सगळीकडे निसर्गाने अगदी मुक्त पणे रंग पसरले होते, मासळी च्या तो उग्र वासाची आता जणू काही सवय झाल्यासारखी नाहीसा झाला होता. बंदरावर पोहचलो तेव्हा नौकांची जणू फौजच उभी होती एका बाजूला एक अशा अनेक नौका एका रांगेत उभ्या होत्या , त्यावेळी माणसांची गर्दी तशी विरळ होती पण जस जशी वेळ पुढे जात होती तशी माणसांची गर्दी वाढत गेली  , मी आणि माझे सहकारी आम्ही एका दुकानाच्या कट्ट्यावर जावून बसलो तिथे बसलले एक आजोबा आमची विचारपूस  करत होते पण ते कन्नड मध्ये बोलत असल्याने मला तेवढ काही उमजत नव्हत  पण माझ्या सहकार्यांना कन्नड माहित असल्याने ते त्याची उत्तर देत होत होते आणि मला हि ते काही गोष्टी ट्रान्सलेट करून सांगत होते ..... सुमारे ८:३० च्या सुमारास आम्ही बोटीवर चढलो , मित्राच्या घरचीच बोट असल्याने आम्ही एका चांगल्या जागी जावून बसलो अर्थात फोटो काढण्यासाठीच आम्ही मोक्याची जागा शोधली ,ज्या बोटीने आंम्ही प्रवास करणार होतो ती काही प्रवासी बोट नव्हती , मासेमारीची बोट होती पण आजच्या दिवशी ती स्वच्छ करून  सकाळीच तिची पूजा करून ती तयार ठेवली होती , जशी जशी माणस  चढली तशी एक एक नौका सुरु झाली , किमान १०-१२ नौकांची तोफ एका मागून एक निघायला लागली , का कुणास ठावूक पण माझ्या  मनात एक वेगळ्याच प्रकारची हूर हूर सुरु झाली होती , पण सभोवतालची दृश्याने माझ्या ह्या हूर-हुरीला थोडस बाजूला सारल , आणि मी त्या निसर्गाच्या अद्भुत  चमत्काराच्या जाळ्यात अडकून गेलो , सकाळची सूर्याची कोवळी किरणे समुद्राच्या पाण्यावर चमकू लागली होती , आणि जस जस आम्ही बंदरापासून दूर होत गेलो तसं चोहीकडे फ़्क़्त पाणीचपाणी, आणि त्या क्षणी मला ती बोट म्हणजेच एक बेटा समान भासू  लागली होती  ज्याच्या चोहीकडे फ़्क़्त पाण्यचा वेढा.

                 
               जस जसा सूर्य डोक्यावर येवू लागला तसं उन्हाच्या झळा नकोशा होवू लागल्या होत्या , सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर  आम्हाला त्या बेटाच सुस्पष्ट दर्शन व्हायला सुरुवात झाली , एखाद्या बुरुजाप्रमाणे हा बेट होता.. ”नेत्रानी ”  ह्या नावाने बेट ओळखला जात असे  ... ह्या बेटावर आधी नेव्ही च्या अण्वस्त्राच्या चाचण्या केल्या जात पण कालांतराने ह्या वर बंदी आणली गेली होती ....खरच नेत्रांना सुखावह होत त्या बेटाच बोटीतून होणार दर्शन , जस जशे आम्ही  बेटाच्या जवळ जात होतो तसं त्या समुद्राच्या पाण्याचा नीला रंग गडद होत जात होता जणू काहि सारा नीळा आकाश त्यात बुडला होता कि काय ह्याचीच प्रचीती येत होती  ..आणि मधूनच एखाद्या डॉल्फिन ने मारलेली उडी पाहायला मिळत होती ....अगदी विलोभनीय दृश्य होत ....आम्ही सारेच त्या डॉल्फिन ची उडी कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यात काही आम्हाला यश मिळाल नाही ... आता आमची नौका बेटाच्या जवळ येवून उभी राहिली तेव्हा मला कळाल कि आता त्या  बेटच्या पायथ्याशी छोट्या होडीने जायचे आहे , भुवया थोड्या उंचावल्याच  माझ्या ,कारण भर समुद्रात मोठ्या नौकेतून उडी मारून दुसर्या एका छोट्या होडीत जायचं होत ....हृदयाची धड धड वाढली होती , पण मन थोड घट्ट केल आणि बाकींच्या बरोबरीने मीही दुसर्या होडीत प्रवेश केला,  आणि त्या बेटाच्या पायथ्याशी पोहचलो ,बेटावर  इतकी गर्दी पाहून कुणाला  वाटणार नाही कि हे एक निर्जन बेट आहे , एखाद्या गावाप्रमाणे माणसांची गर्दी जमली होती .




                  आता आणखी एक दिव्य समोर होत ते म्हणजे ते बेट चढून जायचं .... पण ह्या गोष्टीला मी अगदी उतावळा होतो,  मोठे मोठे आणि काळेभोर पाषाना वरून चालायला  आम्ही सुरुवात केली एका हातात कॅमेरा घेवून सारे क्षण बंद करण्यासाठी चालेली खटाटोप , आणि मनात बेट चढण्याचा उत्साह , झाड्याच्या फांद्या , वेलींना पकडून आम्ही  चढत होतो, आधी मोठे मोठे पाषाण नंतर घसरणारी मातीची पायवाट तुडवत  कसाबस आम्ही एकदाचा तो बुरुज रुपी बेट सर करून बेटाच्या वरच्या भागात पोहचलो , आणि मंदिरात जावून दर्शन घेतल आणि पुन्हा  आम्ही आमच्या भटकंती ला सुरुवात केली , मंदिरात जायचे म्हणून चप्पल बाहेर काढून ठेवली होती आणि आम्ही तशाच उघड्या पायांनी बेटाची सफर करायला सुरुवात केली, पायाला खडे टोचायला लागले होते , बेटाच्या वरच्या भागातून समुद्राच होणार  दर्शन अगदीच अवर्णनीय होत  , त्या अथांग सागराला शांत राहून स्वतःच काम करताना पाहून  जगण्याचा एक नवा पैलू सापडत  होता , आपण पण हि शांत आणि चिकाटीने आपल  काम करून आपल आयुष्य आणि कीर्ती ह्या सागरा प्रमाणे वाढवली पाहिजे असा संदेशच जणू तो आपल्याला देत होता  ..... त्या बेटावरून सभोवाताली आणि त्या बेटावरची निसर्गाने केलेली अलौकिक किमया जणू पूर्ण आयुष्यभर पाहत राहिलो तरी पूर्ण न होण्यासारखीच होती , पण आपल्यालाही वाहतच रहाव लागत ना एखाद्या नदी सारख सागराच्या ओढीने .... तासाभराच्या विश्रांती नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला  .... पण जाताना त्या बेटाकडे परत परत वळून पाहून त्याचे सौंदर्या , त्याचा एकांतपणा आणि त्यावरची शांताता स्वतः सोबत नेता आली असती तर किती बर झाल असत असा विचार करत ...  आणि त्या सोबतच एक गान मात्र डोक्यात फिरत राहील ते म्हणजे  ....
परती च्या ह्या वाटेवरती असेच काही घडते 
निघता निघता वाटच अडते , पावलात घुटमळते    

पण काय करणार कितीही हव हवस वाटत असल तरी प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच ना !... पण जणू काही सर्वांनी त्या बेटाला पुन्हा पुढल्या वर्षी आवर्जून येवू अस न बोलता वचन दिल होत कि काय असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.....

-प्रफुल्ल शेंड्गे

आणखी काय हवं ?



प्रेमळ नजर  नि  लाजून  हसण
दूर जाताना फिरून बघण
हळूच चोरून  तुझ  पाहण
नि मुक्या शब्दांनी खूप काही  बोलुन जाण


गुलाबी हवेत , तुझ रुसून फुगण
मुसळधार पावसात चिंब भिजण
रोजचं  एकांतात  आपल  गुपचूप  भेटण
नि  खांद्यावर डोक ठेवून तुझ अलगद निजण


मनातली ओढ आणि शपथेतली साथ
निरागस डोळ्यातला अतूट विश्वास
पाहता तुला भासे नेहमी प्रेम नवं
सांग ,प्रेमात पडायला आणखी काय हवं ?


--प्रफुल्ल शेंडगे .

दूर जरी मी...

दूर जरी मी तुझ्या 
का तुझ्यातच मी रमतो 
अश्रुंचे होती पाट 
अन त्यात तुलाच पाहतो 

सांजवेळीचा सूर्य 
आठवण तुझी मज देतो 
विसरून तुला जरी मी 
का तुझ्यातच घुटमळतो ? 


गंध मोगरयाचा हा 
आजही कसा दरवळतो ?
 तुटून गेल्या कळ्या 
तरी मनी गुलाब का फुलतो ? 


सुटून गेले हात 
काळीज दुभंगले होते 
उरी माझ्या तू प्रेमाचा
का घाव घातला होता?


 -प्रफुल्ल शेंडगे .

प्रवास पहिल्या प्रेमाचा

     वैयक्तिक कारणानिमित्त बस नि प्रवास करत निघालो होतो .... आजूबाजूला छान हिरवाई पसरली होती .... पावसाच्या हलक्या हलक्या सारी कोसळत होत्या ... बसच्या खिडकीतून डोंगरावर उतरलेले ढग पाहून जणू साक्षात स्वर्ग च पृथ्वीवर उतरला आहे कि काय ह्याची प्रचीती येत होती .... सोबत होती हैडफ़ोन च्या गुहेतून येवून कानात गूंजनारी  एफ .एम . वरची गाणी.... आणि अशातच एक रोमांटिक गाण्याला  सुरुवात झाली ... मग काय गाण्यच्या शब्द्भोवती मन पिंगा घालायला लागल ... आणि गाडीच्या वेगानी वाढणारी ती मंद हवा बोचक होवून अंगावर शहारा उभी करायला लागली  ... तरीही तोंडावर आपटणारा तो मदहोश वारा हवा हवासा वाटत  होता .... डोळे अलगद बंद करून मी त्या गानाच्या शब्दात आणि संगीतात स्वताला अडकवून दिल ....  आणि बंद डोळ्ण्यासमोर आला तो तिचा चेहरा आला ...
मोकळे सोडलेले केसएखाद्या मोरपीस फिरवावा तसे चेहऱ्यावर फिरत  आणि त्यांना सावरताना तिची उडालेली धांदल , दोन  डोंगरांच्या मधून सूर्य उगवावा तसं भुवयांच्या मधोमध लावलेली छोटी टिकली , चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि सोबतीची  निरागसता ..तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीत घडलेलं हेच होत तीच रूप ... शेअर रिक्षा मध्ये घडलेली आमची हि पहली भेट... पहील्या नजरेतल प्रेम वगैरे अस काही घडलं नव्हत आमच्यात .... पण अधून मधून आमची भेट व्हायला सुरुवात झाली होती .. अगदी अनोळखी असणारे चेहरे आता  एकमेकांना पाहून स्मितहास्य करायला लागले होते ... बोलण्याच्या बाबतीत मात्र  "दिल्ली अभी दूर थी " अशीच परिस्थिति होती   ... पण कैलेंडर  मधल्या तारखेसोबत तिच्यातली आणि माझ्यातली ओळख गडद होत गेली ... हसण्या बोलण्या सोबत मैत्री वाढू लागली होती .... सोबतच वाढत होती ती माझ्या मनात तिच्याबद्दल ची अनामिक ओढ ... पण मन मात्र बोलायला घाबरत होत ... पहिलं प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सारखी  माझीही अवस्था झाली होती ... प्रत्येकवेळी बोलका वाटणारा तिचा चेहरा ह्या प्रश्नाच  उत्तर द्यायला तयार नव्हता अस वाटत होत ... दिवसामागून दिवस जात होते .... मावळत  जाणारा प्रत्येक दिवस  तिच्यातला समंजसपणा , जे आहे त्यात सुख मानणारी , जगण्याला खर्या अर्थाने जगणारी अशा अनेक रूपांच दर्शन मला घडवत  होता  ....  अखेर तो दिवस माझ्या आयुष्यात आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो ... माझ्या मनी पडलेल्या प्रश्नाच आणि मनात तिच्या विषयीचे प्रेम भाव मला तिच्या चेहऱ्यावर हि दिसायला लागले होते ... नजर मिळवून हळूच नजर झुकवण , माझ्यासोबत बोलताना चेहऱ्यावर येणारी गुलाबी हृदयाला भिडली जात होती ..आम्हा दोघांना हि एकमेकांना एकमेका प्रती असलेल प्रेम उमगल होत .... न सांगता न बोलता आम्ही दोघांनी नजरेने प्रेम व्यक्त करुण टाकल होत .... दिवसेन दिवस भेटी गाठी वाढायला लागल्या ....प्रत्येक प्रेमी युग्ला प्रमाणे आमचेहि  दिवस सुरु झाले  होते .... प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या ... पुढच आयुष्य एकत्र जगाव म्हणून आम्ही घरच्यांना आमच्या प्रेमाची कल्पना द्यायचा निर्णय घेतला पण मनात भितिनी घर करायला सुरुवात केलि होती , घरचे स्वीकारतील का आमच नात ? पण मन घट्ट करुण आम्ही आमचा सांगण्याचा  निर्णय घट्ट केला मनात एक सकारात्मक  आशा घेवुनच   ....    ठरवल्या प्रमाणे  तो दिवस उजाडला हि आणि आम्ही केल व्यक्त प्रेम घरच्यांसमोर  ... आणि जे घडायच होत ते घडल  ....

                                   आज त्या गोष्टीला दोन वर्ष होवून  गेले होते  ... पण तरीही रोज तिचा पहिल्या भेटीतला चेहरा आठवतो...  विचारांनी डोळ्यांचे काठ पाणवले होते, अंगावरचे शहारे विरून गेले होते .... कानात वाजणारे गाणी कधीच मुके झाले होते माझ्यासठी  ... ओघळणारे अश्रू थांबवण्यसाठी मी  विचारांच्या ह्या डोहातून हलकासा बाहेर आलो आणि डोळ्यांचे काठ अलगदपणे पुसली... भूतकाळातल्या गोष्टींना थोडस सारून वर्तमानात मी प्रवेश केला आणि बाजूच्या सिट  वर बसलेली , अलगद माझ्या खांद्यावर डोक ठेवून विश्वासाने झोपलेल्या माझ्या सौभाग्यवती  कडे अर्थात बायको कडे पाहिलं ...  तिला पाहून माझ्या चेहर्या वर स्मितहास्य उमटलं .... दोन-अडीच वर्षा  पूर्वी घेतलेल्या आणाभाका आम्ही रोज पूर्ण करत होतो... रिक्शा शेयरिंग ते संसारच गाड़ा असा प्रवास सुरु  झाला होता ... घरच्यांच्या संमतीने आम्ही सात फेरे घेतले होते  आणि आज  आमच्या लग्नाला आता दीड वर्ष झाला होता ... ह्या दीड वर्षांच्या संसारातहि मला तिच्यात तीच पहिल्या भेटीची क्षण दिसतात ... माझ्या प्रेमासोबत मी माझ आयुष्य जगत होतो हा विचारच सुखावह होता ... बहुतेक माझ्या सारखा नशीबवान मीच असेल असा विचार माझ्या मनात आज हि येतो  ....

                                                 - प्रफुल्ल शेंडगे