महिना अखेर आणि हट्ट





                          असेच  महिना अखेर  चे दिवस होते , साधारण 6 -7 विला असेल मी , त्यादिवशी बाईनी शाळेत स्काउट चा कॅम्प आहे अस सांगितल . मी हि स्काउट मध्ये होतो . त्या कॅम्प मध्ये सहभागी व्हायची माझी इच्छा होती . मनात एक उत्साह दाटला होता , कधी शाळा सुटते आणि घरी जावून सांगतो अस झाल होत . शाळा सुटली आणि धावत-धावत घर गाठलं . एक कोपर्यात दप्तर फेकून दिल आणि आई-आई अशा हाका देत किचन मध्ये काम करत असलेल्या आई जवळ जावून उभा राहिलो . आईने केसांवरून हात फिरवत विचारल "काय झाल ? कसला गोंधळ चालू आहे ?" आईच वाक्य मध्येच तोडत मी सांगायला सुरुवात केली, "उद्या आणि परवा दोन दिवस आमच्या शाळेत स्काउट चा कॅम्प आहे , बाईनी उद्या सगळ्या स्काउट मध्ये असणार्यांना  स्काउट चा गणवेश घालून बोलवल आहे , मला पण जायचं आहे ."अस एका श्वासात सार सांगून गेलो . "हो हो जा .. पण तो स्काउट चा गणवेश कुठय तुझ्याकडे  ?"... मी लगेच उत्साहांत म्हटल "नाहीये माझ्याकड , आपण नवीन विकत घेवू ना "... आईच्या चेहऱ्यावर थोडस टेंशन आला होत  त्यातच तिने मला समजावत म्हटल ... "ह्या वेळेस नको पुढच्या वेळेस नक्की जा , तेव्हा तुझ्यासाठी चांगला ड्रेस घेवू" ... आईच अस बोलन ऐकून माझा चेहरा उतरला पण त्याच बरोबर मी हट्टाला पेटलो ." पुढच्या वेळी नाही ह्याच वेळेला जायचं मला " डोळ्यातून आसव काढत , पाय आपटत ,हुंदके देत देत मी हट्ट धरून एक कोपर्यात जावून बसलो , आई समजावण्याचा मला खूप प्रयत्न करत होती पण मी काहीही ऐकायला तयार नव्हतो . आईने जेवण वाढल , "जेवून घे " अशा  रागावन्याच्या  स्वरात आईने आदेश दिला , "नाही जेवणार मी , मला तो स्काउट चा गणवेश घालून उद्या कॅम्प ला जायचच आहे  " असा माझा पाढा सुरूच होता , त्यातच आईच्या हातचा एक जोरदार धपाटा हि खाल्ला पण हट्ट  काही सोडत नव्हतो . "थांब बाबा ना येवू दे कामावरून मग तुझ्या कडे बघायला सांगते " आई मला बाबाची भीती दाखवत होती पण त्या सार्या गोष्टींचा त्या वेळी माझ्यावर काहीच फरक पडत नव्हता .
थोड्याच वेळात बाबा कामावरून घरी आले . मी एका कोपर्यात बसून रडत असलेंला पाहून विचारल "काय झाल ?" मी काहीच उत्तर दिल नाही , मग आईनेच बाबाना सारी कहाणी सांगितली , मग बाबा मला जवळ घेत समजावायला लागले "आत्ता महिना अखेर आहे ना , पुढच्या महिन्यात पगार झाला ना तुला तो गणवेश घेवू आपण , पुढच्या वेळेस जा कॅम्प ला ." बाबा समजावत होते पण मी समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतोच , एक- दीड तास तसाच मी एका कोपर्यात रडका चेहरा घेवून बसलो होतो . आता घरात कुणीच ह्या विषयावर बोलत नव्हत , पण माझा हट्ट  काही संपत नव्हता , ते पाहून बाबानी त्यांच्या ऑफिस  मधल्या कुणला तरी फोन लावला आणि काही रुपये उधार मागितले , त्याचं हे बोलन ऐकून मी मनोमन खुश झालो , मी तो स्काउट चा गणवेश घालून कॅम्प ला जाणार हा  विचार मनात एक उत्साह भरत होता   . बाबा नि आईला हाक मारली "ते एक जन  रुपये देणार आहेत ते घेवून त्याचा गणवेश आन ", आईने हि तिच्याकडचे  घरखर्चासाठी ठेवलेले पैसे घेतले, आणि मी आणि आई  गणवेश खरेदीला बाहेर पडलो . सुमारे साडेनाऊ दहा वाजले असतील ... आम्ही दुकानात पोहचलो , दुकानदाराने माझ्या मापाचा गणवेश काढून दिला , गडद नील्या  रंगाचा शर्ट , निळ्या रंगाची पैन्ट  , स्काउट ची टोपी , खिशाच्या एका बाजूला शिट्टी असलेली दोरी , गळ्यात अडकवण्याचा गुलाबी आणि पांढर्या रंगाचा स्कार्फ , बेल्ट असा सारा गणवेश पाहून मी मनातून जाम आनंदी झालो होतो , डोळ्यातल पाणी आटून गेल होत ,डोळ्यात स्वप्नाची चमक वाढली होती . आईने विचारल "काय... आहे का बरोबर हाच गणवेश ?हाच पाहिजे ना ?" मी हो-हो करत मान डोलावली . दुकानदाराणे ड्रेस पैक  केला आणि  बिल दिल . त्यावेळी माझ  त्या बिलाकड लक्ष नव्हतच  , मला फ़्क़्त तो गणवेश दिसत होता .

                              दुसर्या दिवशी तो नवा कोरा गणवेश अंगावर चढवून मी कॅम्प ला निघायला लागलो , आईला - बाबाना माझा गणवेश अगदी रुबाबाने दाखवत होतो , ते हि अगदी डोळे भरून माझ्या कडे बघत होते . माझा चेहरा खुलला होता . दोन दिवसांचा कॅम्प पूर्ण झाला . तसा हा माझा नवा कोरा गणवेश कपाटातल्या एका बाजूला जावून धूळ खात पडला , त्या दिवसानंतर मात्र त्याचा कधीच उपयोग झाला नाही .

                                आज अचानक त्या गणवेशावर काढलेला फोटो दिसला , आणि तेव्हा जे माहित नव्हत ना ते आत्ता मला स्वानुभवातून कलाल होत . "महिना अखेर" म्हणजे नक्की काय असत .  महिन्याच्या शेवटी खिशात मिळणारी १० रुपायची नोट हि किती महत्वाची असते ते आत्ता स्वत  कमावताना कळतंय . फ़्क़्त स्वताच्या गरजा पूर्ण करताना हि नाकी नऊ  येतायेत, तिथ आई वडिलांनी इथ्कुश्या पगारात आमच शिक्षन , आमच्या गरजा , आमचे हट्ट  कसे पूर्ण केले असतील ह्याचा विचार आला ना तरी डोळ्यात चटकन पाणी येतंय , दोन दिवसांच्या माझ्या हट्टासाठी त्यांनी कुठे कुठे आणि कशी काटकसर केली असेल माहित नाही .हे तर फक्त एक उदाहरण होत असे किती हट्ट केले असतील आपन आपल्या  आई वडिलांकडे आठवत ही नसतील आज  आपल्याला . हो ना ?
(काल्पनिक कथा )

-प्रफुल्ल शेंडगे
    

मळभ

काही गोष्टी कितीही वाटत असल्या तरी कागदावर उतरवता येत नाहीत .कुणाला सांगू वाटत असतना देखील सांगता येत नाहीत .त्या डोक्यात गोंधळ घालत राहतात , विचार करत करत डोक्याचा भुगा करायला लागतात . छातीत एक जळजळ होते , पोटात गोळा यायला लागतो . कपाळावर , ओठाच्या वरच्या भागात घामाचे थेंब जमा व्हायला लागतात , बाकी कुठल्यचं गोष्टीत मन रमत नाही , उगाच हातच्या मुठी घट्ट आवळून त्या समोरच्या गोष्टीवर आपटून स्वताचाच राग व्यक्त केला जातो. समोरच्याला मनात काय चाललंय ह्याचा थांग पत्ता लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न चालू असतात पण तरीही कुणीतरी चेहऱ्यावरचे भाव टिपून विचाराव अस वाटत राहत . कुणाशी तरी बोलत रहावस वाटत .पण काय बोलाव तेच कळेनास होत . वाटत माझ्याच बाबतीत अस होत्ताय का ? होत असेल तर का ? असे प्रश्न झुंडीने येत असतात पण उत्तर एकाच हि मिळत नाही , मग चिडचिड सुरु होते , काय कराव सुचेनास होत , मन बोलत शांत राहा पण डोक शांत राहू देत नाही . ह्या सार्या मागच्या कारणापासून कधीकधी तर आपनच अनभिज्ञ असतो मग दुसर्यांनी ओळखाव अशी अपेक्षा कशी ठेवायची ?

पण आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो हे समजून चुकत , कोणत्या गोष्टीत किती काळ अडकून राहायचं ते आपल्याच हातात असत , मनावर ताबा मिळवावाच लागतो .मनातले विचार एका दलदली सारखे आहेत ते आपल्याला आत खेचत जातात , मग त्यात अडकत जायचं कि धीर एकवटून त्यातून बाहेर पडायचं ? कमळ पण दलदलीत उगवत असल तरी ते त्यात बुडून जात नाही ते त्या दलदलीवर जिद्दीने उभ असत , आपल्याला हि ह्या नैराशेच्या दलदलीमध्ये अडकून न जाता त्या निराशेच्या विचाराणा तुडवून उभ राहता आल पाहिजे , वेळ लागेल पण अशक्य नाहीये , एका झटक्यात त्यात अडकून आनंदी जगण्याच अस्तित्व पुसून टाकण्यापेक्षा थोडा वेळ संघर्ष करून टिकून राहण्यात खर शहाणपण आहे आणि हेच पुढच्या अनेक संकटात एक प्रोत्साहन देत राहील.

मग कुठून तरी असा एखादा पोजिटिव विचार मनात अचानक येतो आणि मनावरच सार मळभ एक झटक्यात दूर सारून जातो .

-प्रफुल्ल शेंडगे .

ऑनलाइन

सकाळ होताच मोबाईल हातात घेवून पाहतो
तीचा मेसेज आलाय का म्हणून पाहत राहतो
पण अपेक्षेप्रमाणे अपेक्षाभंग होतो
कारण तिचा मेसेजच आलेला नसतो

तसाच तिचा प्रोफाईल उघडून पाहतो
ऑनलाइन पाहून तिला मी मुद्दाम ऑफलाईन जातो
ऑनलाइन चा तिच्या लास्ट सीन होतो
तरी मी , मेसेज येयील म्हणून वाट बघत राहतो

कोमेजलेल्या मनाने मग मीच मेसेज धाडतो
तेव्हा कुठे तिचा दोन शब्दातला रिप्लाय येतो
आनंदाने मग मनात मी नाचायला लागतो
पुन्हा एक नवीन मेसेज पाठवायला लागतो

कामाच्या नादात दिवस कसाबसा सरून जातो
संध्याकाळचा वारा पुन्हा तिच्यात मला झोकून देतो
हळूच चोरून मग तिचा प्रोफाईल पाहत राहतो
डीपी पाहून उगाच स्वतःशीच हसत राहतो

टिकटिक-टिकटिक करत घड्याळतले काटे धावत जातात
तिची रिंगटोन सोडून , बाकी साऱ्या वाजत राहतात
आता बोलेल , मग बोलेल पण ती बोलतच नाही
मला मात्र तिच्याशि बोलल्याशिवाय राहवतच नाही

आशा अपेक्षांचं गाठोड घेवून मी तिच्याशी बोलायला लागतो
मग पुन्हा नेहमीचा तिचा ठेवनितला दोन शब्दांचा रिप्लाय येतो
मनात तिच्या माझ्यशी बोलण्यासाठी काहीच का नसत?
आणि माझ्या प्रश्नासाठी ठरलेल फक्त हो -नाही मधल उत्तर का असत?

कसाबसा मी तिला बोलायला भाग पाडतो
ती नाही बोलली की मीच विषय काढत राहतो

जेवढ्यास तेवढ ती माझ्याशी बोलते
कधी तर मेसेज माझा न रीड करता ती तिथून निघून जाते

मनातल तिच्या माझ स्थान मग मी शोधत राहतो
प्रेमापासुन तिच्या मी स्वताला परका पाहतो
विचार करता करता तिचा रात्र निघून जाते
सकाळी पुन्हा नव्या उमेदीने माझी रूटीन कहानी सुरु होते

-प्रफुल्ल शेंड्गे

तिच्या शब्दातून ....अधांतरी(?)

त्याला कदाचित वाटत असेल मी त्याला इग्नोर करतेय , करतेय मी त्याला इग्नोर पण मुद्दाम. त्याने पुन्हा मनाने माझ्या आणखी जवळ याव म्हणून . मला हि आवडत नाही , मला हि त्रास होतो त्याच्याशी न बोलून पण मी नाही बोलली तर तो स्वताहून बोलायला येतो ना ते खूप आवडत मला , त्याच माझ्याबद्दल विचार करण , माझ्याबाबतीत पजेसीव होण एक वेगळच थ्रील देत मला .

दिवस दिवस गप्प राहून झाल्यावर तो जेव्हा स्वताहून बोलातो नां त्यावेळी मला जो आनंद होतो तो शब्दात न सांगण्यासारखा , पाउस पडून गेल्यावर घरट्यातली पाखर कशी पुन्हा आकाशात उंच भरारी घेतात ना तस माझ मन त्याच्या निखळ प्रेमाच्या आसमंतात उडायला लागत. तुम्हाला हा वेडेपणा वाटत असेल पण काय करू त्याच्यासोबतच्या प्रेमात मी पण वेडी झालीय . तो जे शब्दांच्या आडून प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करतो ना ते समजत मला पण तरीही मी गप्प राहते , काही रिप्लाय देत नाही. कधी कधी मुद्दाम वेगळा विषय पुढे करते , वाटत तो अजून खुलेपणाने बोलेल माझ्याशी , पण तो वेडा , मला त्याच बोलन आवडल नसेल , मी रागावली असेल असा विचार करत राहतो , आता प्रत्येक गोष्ट सांगावी का मी त्याला ? समजू नये का त्याला माझ्या मनातल ? वेडा कुठला ... आता त्यादिवशी त्याने असच शब्दांच्या आडून आडून मला प्रपोज केल ... , माझ मन आनंदाने हवेत गिरक्या घ्यायला लागल होत , माझ्या चेहर्यावरची स्माईल दुप्पट खुलली होती , पण मुद्दाम त्याला जळवण्यासाठी मी नकार दिला आणि थोड्या वेळासाठी बोलन टाळल. वाटल होत तो अजून स्पष्टपने व्यक्त होईल ... पण झाल उलटंच माझ गप्प राहण पाहून हा पठ्ठा म्हणतो कसा "सोर्री , मि असच म्हटल , मला अस नव्हत बोलायचं, तुला वाईट वाटल असेल नां ". त्याच हे बोलन ऐकून माझ हवेत गिरक्या घेणार स्वप्नांचं विमान धाड्कन जमिनीवर आपटल . काय सांगू तुम्हला त्या वेळी किती राग आला होता मला त्याचा .समोर असता ना मारच खाल्ला असता माझा , अरे थोडा वेळ तरी द्यायचा मला उत्तर देण्यासाठी , मी बोलले होते ना नंतर बोलते म्हणून , जरा धीर धरायचा ना ,अस म्हणत मी मनातल्या मनात राग व्यक्त करायला लागले , त्यात मला त्याच्यापेक्षा स्वतावर जास्त राग यायला लागला होता , माझ्याच अशा वागण्याने तो तसा म्हणाला असेल , माझी काळजी वाटली असेल ,मी त्याच्यापासून दूर होईल ह्याची भीती वाटली असेल कदाचित ...बिच्चारा .

अस म्हणत मी त्याच्या स्वभावात आणि स्वप्नात हरवून गेले , पण मनात ती प्रेम व्यक्त करण्याची हरवून गेलेली संधी मात्र टोचत होती, एकवेळ मनात विचार आला "मीच सांगू का त्याला " पण दुसर्याच क्षणी " मुली कधी स्वताहून सांगत नसतात" हा अलिखित नियम आठवला , आणि मी माझा सांगायचा निर्णय मागे घेतला .

कदाचित तुम्हाला वाटत असेल हा माझा इगो वगैरे आहे कि काय ... पण इगो अस काही नाही पण मला त्याच्या डोळ्यातल माझ्याविषयीच ओसंडून वाहणार प्रेम बघायचं होत , त्याच्या मनात साठलेले शब्द ओठांवर येताना पाहायचे होते . आता फ़्क़्त गरज आहे ती त्याने पुन्हा एकदा थेट माझ्यासाठी त्याचा हात पुढे करायची. मला सावरण्यासाठी ,हातात हात पकडून त्याच्या आयुष्यात घेवून जाण्यासाठी , मी तयार आहे माझ्या आयुष्य रेषा त्याच्या तळहातावर सोपवायला .

डोळे बंद करत त्याला आठवून आजकल मी नेहमी स्वतःशीच मनात बोलत राहते " देशील ना तुझा हात माझ्या हातात ? ह्यावेळी नकार नाही देणार मी तुला , प्रॉमिस ."

-प्रफुल्ल शेंड्गे

अधांतरी

मी तिच्याशी खुप काही बोलत असलो तरी जे तिला सांगायचं होत ते स्पष्ट सांगण्याची हिम्मत अजून पर्यंत माझ्यात आली नव्हती , कधी कधी शब्दांच्या आडून मी माझ प्रेम तिला दाखवून द्यायचो पण त्यावर तिची काही खास प्रतिक्रिया यायची नाही कधी कधी तर प्रतिक्रियाच नाही , मग पुन्हा मनात हुरहूर सुरु व्हायची , काय वाटल असेल तिला ? , काय विचार करत असेल ती ?, बोलन वगैरे बंद तर नाही ना करणार माझ्याशी ? असे एक ना एक प्रश्न वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे एका मागून एक मनातून बाहेर पडायचे .

ती स्वताहून कधीच माझ्याशी बोलायची नाही , एखाद फुलपाखरू कस फुलाकडे जाते , फुलाला त्याची कधी गरजच नसते .तसच माझ व्हायचं , मीच तिच्याशी बोलाव . कधी कधी ह्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा , वाटायचं बास आता हे सार . नसेल तिच्या मनात तुझ्याशी बोलन मग का पळतोस तिच्या मागे ? स्वाभिमान , अभिमान , इगो सारखे सगळे भाव मला कोसत राहायचे आणि मी त्या वेळेपुरता तिच्याशी दूर व्हायचो . मग मी गप्प ती हि गप्पच . माझ बोलन , माझ गप्प राहण ,माझ हसन , रुसन , माझ असण , नसन याचा तिला काही फरकच पडायचा नाही , तेव्हाची माझी परिस्थिती काय सांगू , डोळ्यात पाणी तरळायला लागायच माझ्या , विचार करून करून डोक्याच्या शिरा दुखायला लागायच्या , हाताच्या मुठी घट्ट आवळून मी स्वतावरचा राग कंट्रोल करायचो , दिवस-दिवस आम्ही बोलायचो नाही , पण पाखर कशी संध्याकाळ झाली कि स्वताहून परत घरट्याकडे फिरतात तसा मी तिच्या कडे वळला जायचो . "नसेल जमल तिला , कामात असेल ती , कदाचित तिला वाटत असेल मीच बोलाव " अस बोलून स्वतःशीच समजूत घालायचो आणि परत मीच तिच्याशी बोलन सुरु करायचो . मी बोलायला लागलो कि ती बोलायची ,बहुतेक फॉरम्यालिटी म्हणून असेल , काहीही असलं तरी मी तिच्या बोलण्याने खुश व्हायचो तिच्यावर असलेला राग विसरून जायचो , पुन्हा डोळ्यात तिची नि माझी स्वप्न घेवून जगात वावरायला लागायचो , पण ह्या स्वप्नाच्या खोल तळाशी एक शंका किंवा एक कटू सत्य कायम दडलेलं असायचं ते म्हणजे आमच्या एकतर्फी आणि अधांतरी आणि बहुतेक कधी हि पूर्ण न होणार्या नात्याचं किंवा प्रेमाच भविष्य .

एकांतात कधी मला हे माझ आणि तिच्या अधांतरी नात्याचं भविष्य आठवल कि मी स्वतशीच हसतो , आणि आत्ता तुम्हाला हि जे वाटतय ना तेच मला हि वाटत राहत ते म्हणजे "जर ती माझ्या आयुष्यात कायमची येण्याची खात्री नाहीये तर मग का तिच्या मागे मी वेळ घालवतोय ?, का तिचा विचार करतोय ? वेडा आहेस का तू, उचल ना एक पाउल पुढ आणि जा ह्या सुरु न झालेल्या नात्यापासून दूर "पण ह्या सार्या प्रश्नांवर माझ्याकडे एकच उत्तर असायचं "क्या करू भाई , उससे दिल जो लग गया है , ओर किसीने कहा भी तो है-

फासले नजरो का धोका भी तो हो सकती है ,
एक बार हाथ बढाकर तो देखो "

कुणास ठावूक ती माझ्या ह्या पुढे केलेल्या हातात तिचा हात देयील तो कधीही न सोडण्यासाठी .

-प्रफुल्ल शेंडगे
(काल्पनिक कथा )