रोजच वाहतात इथे पाट आमच्या रक्ताचे
दाही दिशी हि मिळत नाही पाणी दोन थेंबाचे
स्वतःच्या भाकरीसाठी करावा लागतो जागर
उपाशी पोटी द्यावी लागते पोट भर ढेकर
चार भिंती उभारल्या पण त्याला मिळेना छप्पर
असल्या फाटक्या नशिबाचे कुणावर फोडावे खापर
अर्धी नेली माणस आमची swine -flue च्या साथीन
शिंगरू मरतंय आमचं पाठीवरच्या ओझ्यान
आमचाच पैसा तो, धावतोय "त्या "गोऱ्यांच्या खिशात
आम्ही मात्र आजही जगतोय काळोखाच्या वेषात
विस्कटलेल्या आयुष्यात कशाचाच बसेना मेळ
तरी जो-तो म्हणतोय ALL IS WELL
-प्रफुल्ल शेंडगे .

No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-