नेहमी सारखाच दिवस.... रोजचीच ऑफिस ला जायची घाई ...रोजचीच ट्रेन..रोजचीच गर्दी आणि तेच रोजचेच धक्के... ट्रेन फलाटाला लागली आणि घाई घाईत ट्रेन च्या बाहेर पडलो.... भराभर पावले टाकत स्टेशन च्या बाहेर निघायला लागलो तोच पायाखाली काही असल्यागत वाटल. थोडा थांबलो आणि पाहिलं. ओळखपत्रा सारख काहीतरी वाटत होत .... उचलून पाहिलं .... तर खरंच, एका कुणाच तरी ऑफिस मधल ओळखपत्र होत ... नाव वाचलं ...ओळखपत्रा वरच्या फोटो वर एक नजर टाकली आणि आजूबाजूला त्या फोटोशी साधर्म्य असलेली व्यक्ती दिसते का ते पाहिलं पण तस कुणीच दिसेना . ओळखपत्राच्या मागच्या बाजूला ऑफिस चा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक होता ... मनात म्हटल "आधी आपण आपल्या ऑफिस मध्ये जावू मग फोन करुया ". ते ओळखपत्र तसच खिशात टाकल आणि मी माझ्या ऑफिस कडे वळालो . ऑफिस मध्ये पोहचलो पण त्या ओळखपत्रावरच्या नंबर वर फोन लावायचा राहूनच गेला.....दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा खिशात ठेवलेल्या "त्या" ओळखपत्राची आठवण झाली आणि लगबगीन त्यावरचा नंबर डायल केला . समोरून कुणी तरी फोन उचलला ...बहुतेक रिसेप्शन वरचा नंबर होता ..त्याने कंपनीच नाव सांगितलं आणि काय हवं आहे ते विचारल... मग मी हि ,
" स्टेशन वर तुमच्या एका कर्मचाऱ्याचा आयडी मिळालाय त्या बद्दल सांगायचं होत " अस सांगितल ,
त्याने त्या ओळख पत्रावरच नाव विचारल ... २ मिनिट म्हणून त्याने माझा फोन आणि संदेश त्या आयडी वाल्या व्यक्ती कडे सुपूर्द केला ....

"हेल्लो , मी *****" अस म्हणत तिने तिची ओळख करून देत तो तिचाच आयडी असल्याच सांगितल .
मग "कधी आणि कुठे येताय आय डी घ्यायला " मी तिला प्रश्न केला
त्यावर तिने म्हटल "तुम्ही सांगा मी येते "
"तुम्ही स्टेशन वर येणार असाल ना संध्याकाळी तेव्हा देतो चालेल ?" मी म्हटल . तिनेही होकार दिला ...
मग "कधी आणि कुठे येताय आय डी घ्यायला " मी तिला प्रश्न केला
त्यावर तिने म्हटल "तुम्ही सांगा मी येते "
"तुम्ही स्टेशन वर येणार असाल ना संध्याकाळी तेव्हा देतो चालेल ?" मी म्हटल . तिनेही होकार दिला ...
"माझा नंबर लिहून घ्या तुम्ही आलात कि एक फोन करा मी हि असेल स्टेशन वर त्या वेळी " ठीक आहे म्हणत मी माझा नंबर तिला दिला आणि बोलन संपवलं .
संध्याकाळी सहा -साडे सहाच्या सुमारास मी स्टेशन वर पोहचलो अजून काही फोन आला नव्हता तिचा ...स्टेशन वरच्या एका बाकड्यावर बसून तिच्या फोन ची वाट पाहत थांबलो ..तोच एका अनोळखी नंबर वरून माझ्या मोबाईल वर रिंग आली ... बहुतेक तिचाच असावा ह्या हिशोबाने मी बोलायला सुरुवात केली ...
तिने हि "मी आली आहे स्टेशन वर...तुम्ही कुठे आहात ?" अस विचारल ...
तिने हि "मी आली आहे स्टेशन वर...तुम्ही कुठे आहात ?" अस विचारल ...
" प्लैटफ़ार्म नंबर २, जिन्याच्या बाजूच्या बाकड्या जवळ " मी माझ लोकेशन सांगितल
"ठीक आहे आलेच " म्हणत तिने फोन ठेवला.
थोड्या वेळाने " इक्सक्यूज मी " असे दोन शब्द माझ्या कानावर आले आणि मी मान वर करून त्या आवाजाकडे पाहिलं.. आणि पाहतच राहिलो .....बास्स्स्स.....दोन मिनिट माझ्या मनात स्तब्ध शांतात पसरली ..... आणि तिच्या नजरेत पाहत-पाहतच मी उभा राहिले .... होतीच ती तशी .....
तीने तीच नाव सांगत शेकहंड्साठी हात पुढे केला ...मी हि माझी ओळख करून देत हात मिळवला तेव्हा विजेचा झटका लागल्यागत माझ्या कानात आणि पूर्ण शरीरात विज गेल्यागत एकदम झणझझणलं.. खिशातला आईडी बाहेर काढला आणि त्या आय.डी. वरचा आणि तिचा चेहरा मी पुन्हा पाहायला लागलो आणि सकाळी पाहिलेला फोटो हाच होता का ? ह्याचा विचार करायला लागलो .....
तिला काही कळण्याच्या आत मी स्वतःला सावरल आणी तिचा आय.डी. तिच्या हातात सोपावला.... तिने हि एक दिलखुलास स्मितहास्य करत आणी थैंक्स म्हणत माझा निरोप घेतला ....तिने जरी माझा निरोप घेतला होता तरी मी मात्र तिच्या मध्ये अडकून गेलो होतो ....रोजचाच दिवस पण तरीही काही विलक्षण घडल्यासारखं माझ्या मनात भाव होते... मनातल्या मनात तिच्यावर मी चार ओळींची एक कविता हि लिहून ठेवली ...

एक एक दिवस निघून जात होता पण तिची माझी गाठ पुन्हा त्या स्टेशन वर कधी पडली नाही....तिचा नंबर माझ्या कॉल हिस्ट्री मध्ये तसाच होता....तिच्या नावाने सेव केलेला . असच एकदा फेसबूक वर सर्फिंग करताना तिचा फोटो दिसला .. फेसबूक ची टाइमलाइन पुन्हा वर केली "सजेस्टेड फ़्रेंड्स " मध्ये तीच नाव होत ....तिला पाहून पुन्हा काळजाचा ठोका चुकला ...
पाठवू का तीला फ्रेंड रिक्वेस्ट ? कि नको ? ह्या विचारात मी काही वेळ गुंतलों आणि एका निर्णायक क्षणी डोळे गच्च बंद करून केलं "एड़ फ्रेंड" च्या बटनावर क्लिक. मनात म्हटल बघू होइल ते...... तेव्हापासून दर १० मिनिटांनी मी फेसबूक चेक करत होतो... स्वीकारली का तिने माझी फ्रेंड रिक्वेस्ट हे तपासण्यासाठी . सकाळची दुपार झाली ...दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळ ची रात्र..... पण नाहीच .... शेवटी वैतागून मीच स्वताहून फ्रेंड रिक्वेस्ट रद्द केली .... आणि झोपी गेलो .

दुसर्या दिवशी पुन्हा माझ्या आतून आवाज आला...... " बहुतेक तिने पाहिलं नसेल...किंवा तिने मला ओळखलं नसेल ".... मेंदूने पुन्हा इशारा केला आणि पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा आदेश दिला .... चार-पाच दिवस होवून गेले पण अजून काहीच प्रतिसाद येत नव्हता ..आता तर मी नोटिफिकेशन बघण हि सोडून दिल होत ... अचानक त्या दिवशी फोन वाजला फेसबूक वरचा कसला तरी नोटिफ़िकेशन होता... मोबाईलची लॉक स्क्रीन उघडून पाहिलं तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याचा नोटिफ़िकेशन.... माझे हात-पाय एकदम गारआणि मनात आनंदाच्या उकाळ्या सुतु झाल्या.... हे थोडे कि काय म्हणून फेसबुक मेसेंजर वरच्या तिच्याच मेसेज चा आणखी एक नोटिफ़िकेशन माझ्या मोबाइल वर येवून धडकला ......माझ्या हृदयाने तर थेट टॉप गियर घेतला आणि उसेन बोल्ट पेक्षाही जास्त वेगाने माझी धकधक वाढायला लागली .
काय होत त्या "आय.डी."वाल्या मुलीच्या मेसेज मध्ये ....सांगेन कि पुढच्या वेळी .
-प्रफुल्ल शेंडगे
आय.डी (भाग -२) वाचण्यासाठी इथे किल्क करा :- भाग-२
Nice1
ReplyDeleteThank u
ReplyDelete