तुझ्या सारखी मला ही येतेय ,
क्षणा-क्षणाला तुझी आठवण
डोळ्यातलं पाणी ठेवतोय आडवून
कोरून त्यात गोड दिवसांची साठवण
दररोज पत्र लिहिण्याचा तुला
मी प्रयत्न करत असतो
पण विरहातल्या ओल्या शब्दांनी
कागद तो नेहमीच भिजून फाटतो
डोंगराच्या आडून सूर्यही हळूच
पाहतो माझ्याकडे वाकून
किरणांसंगे पाठवून देतो
तुझ्या आठवणींची शिदोरी बांधून
दिवसाच्या भर उन्हात
तुझाच विचार करत बसतो
रात्रीच्या अंधारात ही तुलाच पाहत
ओल्या पापण्यांनी मी निजतो
बेचैन मन तुझ करून जातंय
बेचैन माझ्या सुध्धा मनाला
नको आणू डोळ्यातून आसू
आहे माझी शपथ तुला
माहितेय ,डोळे लावून बसली असशील
पाहत माझी वाट ,
येयील मी ,तुझ्याकडे लवकरच
सांगतो ,तुझ्या डोक्यावर ठेवून हात .
क्षणा-क्षणाला तुझी आठवण
डोळ्यातलं पाणी ठेवतोय आडवून
कोरून त्यात गोड दिवसांची साठवण
दररोज पत्र लिहिण्याचा तुला
मी प्रयत्न करत असतो
पण विरहातल्या ओल्या शब्दांनी
कागद तो नेहमीच भिजून फाटतो
डोंगराच्या आडून सूर्यही हळूच
पाहतो माझ्याकडे वाकून
किरणांसंगे पाठवून देतो
तुझ्या आठवणींची शिदोरी बांधून
दिवसाच्या भर उन्हात
तुझाच विचार करत बसतो
रात्रीच्या अंधारात ही तुलाच पाहत
ओल्या पापण्यांनी मी निजतो
बेचैन मन तुझ करून जातंय
बेचैन माझ्या सुध्धा मनाला
नको आणू डोळ्यातून आसू
आहे माझी शपथ तुला
माहितेय ,डोळे लावून बसली असशील
पाहत माझी वाट ,
येयील मी ,तुझ्याकडे लवकरच
सांगतो ,तुझ्या डोक्यावर ठेवून हात .
Hey very nice poem.... Dont be so worried,you will meet her shortly..... at the time of result!!!
ReplyDelete