तसा काय मी अगदी भटका वगैरे नाही पण दुर्गम किंवा नैसर्गिक ठिकाणी जायची संधी आली तर मी ती सोडत हि नाही ...असाच एकदा एका बेटावर जायचा योग आला , भटकळ , कर्नाटक मधील पश्चिम किनार्यावरच एक शहर , नोकरी निम्मित्त मी तिथ वास्तव्याला होतो , जानेवारी महिन्यात माझ्या एका स्थानिक मित्राने बेटावर जाण्यासाठी बोलावल होत , प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात स्थानिक लोक त्या बेटावर जात असत , हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची देवालये आहेत त्या बेटावर आणि त्या देवालयात वर्षातून एकदा पूजा केली जाते हवामानाचा आणि बाकी सार्या भौगोलिक आणि नैसर्गिक गोष्टींचा अंदाज घेवून एक दिवस ठरवला जात असे , मित्राच्या ह्या निमंत्रणामुळे आणि त्याने केलेल्या बेटाच्या वर्णनाने माझी हि उत्सुकता वाढली आणि मी जराही विलंब न लावता होकार दिला .
रविवार च्या दिवशी सकाळी 7 वाजता सागरी बंदरा वरून जायचं ठरल होत त्या प्रमाणे मी आणि माझे एक सहकारी आम्ही ६-६:३० च्या सुमारास घरातून बंदराच्या दिशेने गाडी वरून निघालो , जानेवारी चा महिना असल्याने हवेत चांगलाच गारवा सुटला होता आणि गाडीच्या वेगाने तो आणखीनच जास्त जाणवत होता , रस्तावर दाट धुक्यानी चादर ओढली होती , मन प्रफुल्लीत करून जाणार वातावरण होत ते सगळ , १० -१५ मिनिटांच्या प्रवासानंतर मासळी चा एक उग्र वास जाणवायला लागला आणि त्या वासानेच कळल कि आम्ही बंदरा जवळ पोहचलो होतो ,आकाशात सूर्य हलकासा उगवला होता आणि सगळीकडे निसर्गाने अगदी मुक्त पणे रंग पसरले होते, मासळी च्या तो उग्र वासाची आता जणू काही सवय झाल्यासारखी नाहीसा झाला होता. बंदरावर पोहचलो तेव्हा नौकांची जणू फौजच उभी होती एका बाजूला एक अशा अनेक नौका एका रांगेत उभ्या होत्या , त्यावेळी माणसांची गर्दी तशी विरळ होती पण जस जशी वेळ पुढे जात होती तशी माणसांची गर्दी वाढत गेली , मी आणि माझे सहकारी आम्ही एका दुकानाच्या कट्ट्यावर जावून बसलो तिथे बसलले एक आजोबा आमची विचारपूस करत होते पण ते कन्नड मध्ये बोलत असल्याने मला तेवढ काही उमजत नव्हत पण माझ्या सहकार्यांना कन्नड माहित असल्याने ते त्याची उत्तर देत होत होते आणि मला हि ते काही गोष्टी ट्रान्सलेट करून सांगत होते ..... सुमारे ८:३० च्या सुमारास आम्ही बोटीवर चढलो , मित्राच्या घरचीच बोट असल्याने आम्ही एका चांगल्या जागी जावून बसलो अर्थात फोटो काढण्यासाठीच आम्ही मोक्याची जागा शोधली ,ज्या बोटीने आंम्ही प्रवास करणार होतो ती काही प्रवासी बोट नव्हती , मासेमारीची बोट होती पण आजच्या दिवशी ती स्वच्छ करून सकाळीच तिची पूजा करून ती तयार ठेवली होती , जशी जशी माणस चढली तशी एक एक नौका सुरु झाली , किमान १०-१२ नौकांची तोफ एका मागून एक निघायला लागली , का कुणास ठावूक पण माझ्या मनात एक वेगळ्याच प्रकारची हूर हूर सुरु झाली होती , पण सभोवतालची दृश्याने माझ्या ह्या हूर-हुरीला थोडस बाजूला सारल , आणि मी त्या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराच्या जाळ्यात अडकून गेलो , सकाळची सूर्याची कोवळी किरणे समुद्राच्या पाण्यावर चमकू लागली होती , आणि जस जस आम्ही बंदरापासून दूर होत गेलो तसं चोहीकडे फ़्क़्त पाणीचपाणी, आणि त्या क्षणी मला ती बोट म्हणजेच एक बेटा समान भासू लागली होती ज्याच्या चोहीकडे फ़्क़्त पाण्यचा वेढा.
जस जसा सूर्य डोक्यावर येवू लागला तसं उन्हाच्या झळा नकोशा होवू लागल्या होत्या , सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर आम्हाला त्या बेटाच सुस्पष्ट दर्शन व्हायला सुरुवात झाली , एखाद्या बुरुजाप्रमाणे हा बेट होता.. ”नेत्रानी ” ह्या नावाने बेट ओळखला जात असे ... ह्या बेटावर आधी नेव्ही च्या अण्वस्त्राच्या चाचण्या केल्या जात पण कालांतराने ह्या वर बंदी आणली गेली होती ....खरच नेत्रांना सुखावह होत त्या बेटाच बोटीतून होणार दर्शन , जस जशे आम्ही बेटाच्या जवळ जात होतो तसं त्या समुद्राच्या पाण्याचा नीला रंग गडद होत जात होता जणू काहि सारा नीळा आकाश त्यात बुडला होता कि काय ह्याचीच प्रचीती येत होती ..आणि मधूनच एखाद्या डॉल्फिन ने मारलेली उडी पाहायला मिळत होती ....अगदी विलोभनीय दृश्य होत ....आम्ही सारेच त्या डॉल्फिन ची उडी कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यात काही आम्हाला यश मिळाल नाही ... आता आमची नौका बेटाच्या जवळ येवून उभी राहिली तेव्हा मला कळाल कि आता त्या बेटच्या पायथ्याशी छोट्या होडीने जायचे आहे , भुवया थोड्या उंचावल्याच माझ्या ,कारण भर समुद्रात मोठ्या नौकेतून उडी मारून दुसर्या एका छोट्या होडीत जायचं होत ....हृदयाची धड धड वाढली होती , पण मन थोड घट्ट केल आणि बाकींच्या बरोबरीने मीही दुसर्या होडीत प्रवेश केला, आणि त्या बेटाच्या पायथ्याशी पोहचलो ,बेटावर इतकी गर्दी पाहून कुणाला वाटणार नाही कि हे एक निर्जन बेट आहे , एखाद्या गावाप्रमाणे माणसांची गर्दी जमली होती .

आता आणखी एक दिव्य समोर होत ते म्हणजे ते बेट चढून जायचं .... पण ह्या गोष्टीला मी अगदी उतावळा होतो, मोठे मोठे आणि काळेभोर पाषाना वरून चालायला आम्ही सुरुवात केली एका हातात कॅमेरा घेवून सारे क्षण बंद करण्यासाठी चालेली खटाटोप , आणि मनात बेट चढण्याचा उत्साह , झाड्याच्या फांद्या , वेलींना पकडून आम्ही चढत होतो, आधी मोठे मोठे पाषाण नंतर घसरणारी मातीची पायवाट तुडवत कसाबस आम्ही एकदाचा तो बुरुज रुपी बेट सर करून बेटाच्या वरच्या भागात पोहचलो , आणि मंदिरात जावून दर्शन घेतल आणि पुन्हा आम्ही आमच्या भटकंती ला सुरुवात केली , मंदिरात जायचे म्हणून चप्पल बाहेर काढून ठेवली होती आणि आम्ही तशाच उघड्या पायांनी बेटाची सफर करायला सुरुवात केली, पायाला खडे टोचायला लागले होते , बेटाच्या वरच्या भागातून समुद्राच होणार दर्शन अगदीच अवर्णनीय होत , त्या अथांग सागराला शांत राहून स्वतःच काम करताना पाहून जगण्याचा एक नवा पैलू सापडत होता , आपण पण हि शांत आणि चिकाटीने आपल काम करून आपल आयुष्य आणि कीर्ती ह्या सागरा प्रमाणे वाढवली पाहिजे असा संदेशच जणू तो आपल्याला देत होता ..... त्या बेटावरून सभोवाताली आणि त्या बेटावरची निसर्गाने केलेली अलौकिक किमया जणू पूर्ण आयुष्यभर पाहत राहिलो तरी पूर्ण न होण्यासारखीच होती , पण आपल्यालाही वाहतच रहाव लागत ना एखाद्या नदी सारख सागराच्या ओढीने .... तासाभराच्या विश्रांती नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला .... पण जाताना त्या बेटाकडे परत परत वळून पाहून त्याचे सौंदर्या , त्याचा एकांतपणा आणि त्यावरची शांताता स्वतः सोबत नेता आली असती तर किती बर झाल असत असा विचार करत ... आणि त्या सोबतच एक गान मात्र डोक्यात फिरत राहील ते म्हणजे ....
परती च्या ह्या वाटेवरती असेच काही घडते
निघता निघता वाटच अडते , पावलात घुटमळते
पण काय करणार कितीही हव हवस वाटत असल तरी प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच ना !... पण जणू काही सर्वांनी त्या बेटाला पुन्हा पुढल्या वर्षी आवर्जून येवू अस न बोलता वचन दिल होत कि काय असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.....
-प्रफुल्ल शेंड्गे
-प्रफुल्ल शेंड्गे
Nice..
ReplyDeleteThank u
Delete