आज काय तो वैलेंटाइन डे आहे म्हणून मुलगा आणि सुनबाई बाहेर फिरायला गेले होते , मी वरांड्यातल्या आराम खुर्चीवर असाच विचार करत बसलो होतो तोच आमच्या सौ नि पाठीमागून आवाज दिला "हा घ्या तुमचा चहा , आणि ह्या गोळ्या , खावून घ्या गोळ्या त्या आधी गुडघा दुखतोय म्हणत होता ना सकाळी " अस म्हणत तिने गोळ्या टेबलावर ठेवल्या आणि चहाचा कप माझ्या हातात देवून ती पुन्हा जायला वळली , ती जशी वळली तोच मी तिचा हात पकडला .
ती थोडी दचकलीच आणि पुन्हा एका घाबर्या नजरेने माझ्या कडे पाहिलं "काय हो काय झाल ?" अस काळजीच्या स्वरात तीने मला विचारल , मी गप्प तिच्याकडे पाहत होतो आणि नजरेनेच "काही नाही" अस म्हणून टाकल , पण तिच्या मनातली माझ्याबद्दलची काळजी वाढली , तिने परत विचारल "काय झाल ?" , मग मी तिला म्हटल "बोलायचं आहे तुझ्याशी थोड , बस ना ", तर ति नेहमीच्या स्वरात म्हणाली "काय हो ,इथ बसायला वेळ नाही आता मला , त्या शेजारच्या कुलकर्णीकडे जायचय , त्यांच्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज , जे काय बोलायचं आहे ते बोला मी ऐकतेय उभ राहून , माझे कान शाबूत आहेत अजून म्हटल "तिच्या उत्तरावर मी काही बोललो नाही ... आणि तसाच खुर्चीचा दांडा पकडून तिच्यासमोर उभा राहिलो, आम्ही दोघ एकमेकांकडे पाहत उभे होते , तिच्या चेहऱ्यावर प्रश्न जमा व्हायला सुरुवात झाली होती आता ती एक एक प्रश्नांचा माझ्यावर मारा करणार हे मला ठावूक झाल आणि तिचे प्रश्न सुरु व्हायच्या आधीच मी माझा एक पाय मुडपून आणि दुसरा पायाचा गुडघा जमिनीवर टेकवून तिच्यासमोर बसलो... ते पाहून ती थोडी जोरातच ओरडली "अहो दुखतोय ना गुडघा " मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिल नाही आणि माझ्या सदर्याच्या खिशातून केळीच्या पानात गुंडाळलेला मोगर्याचा गजरा तिच्या समोर अलगद पेश केला ... ती माझ हे वागण एकटक पाहत होती , कुणाला एखादा धक्का बसावा असं . मी हि तिच्यासमोर तिने तो गजरा स्वीकारावा ह्या अर्थाने हात पुढे केला , ते बघून ती हसली , लाजलीही आणि ते लाजन गालात लपवतच मला म्हणली "अहो वेडे झालात का ...? काय चालू आहे हे तुमच , वय आहे का आपलं हे ?" मी माझा हात अजून थोडा पुढे केला आणि म्हटल "खरय तुझ , तू म्हातारी झालीस , मी पण म्हातारा झालोय ... पण आपलं प्रेम कुठ म्हातार झालय ? आता कुठ ३० वर्षाच झालय आपल प्रेम , ऐन तारुण्यात आहे तस... ३० वर्षापूर्वी घरच्यांनी आपल लग्न ठरवल , आपल लग्न झाल तेव्हापासून आत्तापर्यंत तुला स्पष्ट सांगायचं राहूनच गेल होत , माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ... सांगावस खुप वेळा वाटल पण जमतच नव्हत .. मागच्या वर्षी आपल्या मुलाच्या लग्नाचे जुने अल्बम मधले फोटो पाहत बसली होतीस तेव्हा त्याचा तो गुडघ्यावर टेकून त्याच्या बायकोला फुल देतानाचा फोटो पाहून म्हणाली होतीस , "काय हि आजकालची नवीन पद्धत ,आपल्यावेळी नव्हत असल काही , छान आहे पण " अस बोलून किती तरी वेळ तू तो फोटो बघत बसली होतीस , हो ना ? तेव्हाच मनात आल होत हे अस गुडघ्यावर बसून तुला फुल द्याव अस , पण संधीवाताने गुडघ्यावर बसताच येयीना , तुझ्या नकळत रोज गुडघ्यावर बसायचा सराव करत होतो .... आणि आज काय तो प्रेम दिवस आहे म्हणे म्हणून म्हटल बोलू या तुझ्याशी ...जमलय का मला ?" ती अजूनही माझ्या कड तसच टक लावून बघत होती ... डोळ्यात पाणी साठल होत तिच्या पण चेहऱ्यावर एक आनंदाची चमक सुद्धा पसरली होती.
२-३ मिनिट काहीच बोलली नाही आणि मग हळूच माझ्या हातातला तो गजरा उचलून म्हणाली "आधी उठा पाहू , खुर्चीत बसा , गुडघा दुखेल तुमचा आजून " आणि हळूच माझ्या खांद्यांना पकडून मला खुर्चीत बसवलं आणि ती हि शेजारच्या खुर्चीत येवून बसली ....हातातल्या गजर्याकडे पाहत म्हणाली "३० वर्ष झाली का हो ? आपल्या संसाराला ...लवकर सरली ना वर्ष ... मला तर अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट वाटतेय .... आजही आठवतंय तूमच्या नावाचा उखाणा घेवून मी घरात प्रवेश केलेला ...मग आपला सुरु झालेला संसार , मुल , त्यांची शिक्षण , त्यांची लग्न ...एकामागे एक इतक्या गोष्टी घडत गेल्या ना . आता आपल्या आयुष्याचा सूर्य बुडायला आलाय ह्याची जाणीव व्हायला आली ... पण ह्या सांजवेळीपन तुमची साथ आहे ह्याचच मला खुप समाधान आहे " हे सर बोलताना , आठवताना तिच्यासोबत माझे डोळेही भरून यायला लागले होते , आयुष्यातला तिच्यासोबतच एकएक दिवस आठवायला लागला होता... आम्ही दोघही पाहत होतो आमची सुर्कुत्यांमध्ये लपेटलेली एकमेकांची चेहेरे... त्यातच तिने पुन्हा बोलन सुरु केल "पण काय गरज होती हो हे गुडघ्यावर बसायची वगेरे , तुम्ही कधी माझ्यावरच प्रेम मला सांगितल नाही म्हणजे अस नाही ना कि मला ते कधी दिसलं नाही ते , अहो तुमच्या काळजीत , तुमच्या रोजच्या वागण्यात हि दिसतच कि प्रेम ... शब्दांपेक्षा तुमच्या डोळ्यातल प्रेम खूप आहे तस माझ्यासाठी " मी अलगद माझा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणालो "प्रेम तर आहेच ग तुझ्यावर , ते सार काही व्यक्त नाही करता येणार मला , इतकी वर्ष मला सांभाळून , आपल्या घराला सावरून ,माणसाना बांधून ठेवलस म्हणून वाटलं तुला रिटर्न गिफ्ट द्याव . एक सांगू ? तू आजही तशीच लाजतेस पहिल्यांदा तुला बघायला मी आलो होतो तेव्हासारखीच " तीने पुन्हा लाजणे मान खाली घातली आणि म्हणली "बास हा पुरे आता , मला तयार होवून जायचं आहे आणि गजरा पण माळायचा आहे आजून " अस तिने म्हटल्यावर आम्ही दोघ हि एकमेकांकडे पाहून पुन्हा हसायला लागलो .

"तो चहा पिवू नका आता ... थंड झाला असेल थांबा दुसरा गरम करू देते " असा रोजच्या आवाजातला आदेश देवून ती पुन्हा किचन मध्ये शिरली आणि मी पुन्हा खुर्चीवर बसून आमच्या ३० वर्षांच्या आठवणीत स्वताला झोकून दिल .
-प्रफुल्ल शेंडगे
Sundar ..
ReplyDelete