पुन्हा एकांत

कधी कधी वाटत उगाच तुझ्याशी भेटलो
छान सरळ होत आयुष्य,का स्वताला अडकवून घेतल?

भेटलो जरी आपन , तरी का तुझ्या प्रेमात पडलो?
मुक्त माझ्या मनाला,का तुझ्यात गुंतवून ठेवल?

गप्प राहून प्रेम करण का मला उमगल नाही ?
नकार तुझा ऐकन्याची ,खरच इतकी होती का मला घाई?

होते नव्हते  भाव-बंध सारे ,क्षणात निखळुन पडले
तरी आठवणीं शिवाय तुझ्या जगणे, मला आजही का नाही जमले?

-प्रफुल्ल शेंड्गे
prafulla21pan@gmail.com

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-