पाउस ...... आला बुवा एकदाचा पाउस ...गेले 4-5 महिने गरमिने आणि दुष्काळाने त्रासलेले आपण सारेच पावसासाठी आतुरलो होतो ... थोडासा उशीर झाला यायला पण "देर आये दुरुस्त आये " म्हणत सार्यांनीच वरुण राजाच स्वागत केलय ...आता पुढचे 4 महिने बेदुंध होत तो कोसळत राहणार, डोंगर माथ्यावरून कोसळत , नदी नाले तुडूंब भरून वाहु लागतील , सार्या धर्तीवर हिरवा शालू पांघरला जायील.... . हो हो माहिती आहे ....तुम्हाला हे सार माहिती आहे ते , लहानपणी तुम्ही निम्बंधात हेच सार किंवा असच वर्णन केलय..हो ना ? मि सुद्धा असच लिहित होतो ...लहानपणीचा पाउस होताच तसा खरच विलोभनीय आणि मनाला आनंद देणारा , पण आधीसारख आपण पावसाकड़े पाहतोय का? एन्जॉय करतोय का पाउस?...
पाउस आला कि होणारी कीच-कीच, तुंबणारे नाले , तुम्बणारी गटारी , रस्त्यावर साठणार पाणी असो किंवा रस्त्याच्या खड्ड्यात होणारी डबकी , रस्त्याच्या बाजूला पसरलेला कचरा , प्लास्टिक , रस्त्यावर पसरलेलं वाहनातल तेल , त्या सार्यातून दररोज च्या जगण्याची धडपड , पावसासोबत येणारा नेहमीचा ट्राफिक जाम असो किंवा रेल्वेची होणारी रखडगाडी , त्यामुळे होणारी गर्दी, गर्दीतले ओले-ओले स्पर्श , ओल्या कपड्यांचा सुटणारा कुमट वास , अगदी जीव नकोसा करायला लागतो ...तरी नाक दाबून जगन चालू असत ...
आधी पाउस म्हटला कि कागदांची होडी बनवायची स्पर्धा आता स्वताला सिद्ध करायच्या स्पर्धेत हरवत चालली आहे , चहा-भजी आणि भाजलेली कणस आता फ़्क़्त पोट भरण्यासाठी खाल्ली जातायेत , त्यातली मजा घ्यायला वेळ आहे कुठे ? , पहिल्या पावसात भिजण आता इतिहासजमा झालय , खिशातल पाकीट आणि मोबाईल पावसातल्या भिजण्याच्या आनंदापेक्षा महत्वाचा झालाय....साध खिडकीतून येणार्या पावसाच्या थेंबा ना ही आम्ही झटकन खिडकी बंद करून स्वता पासून दूर सारतोय...गेलोच जरी कधी पावसात फिरायला तरी आपण कुठे एन्जोय करतो मनमुराद , जातो ते फ़्क़्त कॅमेरात स्वताचे फोटो कैद करण्यासाठी आणि ते फोटो आणि स्टेटस सोशल मेडिया वर उपलोड करण्यासाठी इतकच ...प्रोफेशनल जगण्याच्या नादात आम्ही स्वताच कुठ तरी आम्ही आमच मनातलं बालपण मारून टाकलय सोबत मारलाय तो लहानपणीचा हवाहवासा वाटणारा पाउस .
काय म्हणता ? तुमचीही अवस्था अशीच आहे माझ्यासारखी ?...मग काय कराव बर ? एक होवू शकत ...बघा जमतंय का ? आपण सर्वांनी ह्या वर्षीचा पाउस पुन्हा लहानपणी सारखा जागून पाहूयात का ? दररोज नाही किमान एक दिवस तरी देता येयील ना आपल्या या लाडक्या पावसाला ... ही पावसाची 4 महिने सरून गेली तर पुढची 8 महिने त्याला फ़्क़्त आठवण्यातच काढावी लागतील आणि तेव्हा वाटत राहायला नको की पावसात भिजण राहून गेल म्हणून. सो लेट्स एन्जॉय .
-प्रफुल्ल शेंडगे
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-