आय.डी. -(भाग -3)

   
"आय.डी." इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१  भाग-2

तिच्या आई.डी. च्या मागच्या बाजूला प्रेम पत्र ठेवून मी पहिलं पाउल तर उचललं होत पण तीचं उत्तर काय असणार होत ह्या विचाराने त्या रात्री काही झोप लागेना. तिला ते पत्र मिळालय का ? किंवा तिने ते वाचलंय का हे तिला विचारायची हिम्मत हि होईना. दुसरा दिवस उजाडला. छातीत धडधड वाढायला लागली होती ... ट्रेन मध्ये बसून ऑफिस ला निघालो . मन थाऱ्यावर नव्हत आज . "आज भेटेल का ती ? काय विचार केला असेल तिने? मेसेज करुया का तिला कि फोन करून विचारुया ? कि वाट पाहुया ?" प्रश्न,प्रश्न आणि फ़्क़्त प्रश्न होते डोक्यात त्या वेळी. मनाशी ठरवून तिला मेसेज केला ,
"आज भेटूया का स्टेशन वर ?"
पुन्हा उत्तराची वाट पाहत बसलो ...तब्बल अर्ध्या तासाने तिचा रिप्लाय आला...
"नाही ".......
तिचा "नाही" असा रिप्लाय पाहून हातपाय अक्षरश: गळून गेले
"का ?"
"काय झाल ?"
असे एका मागून एक माझे मेसेज सुरु झाले समोरून उत्तर आलं..
"आरे थांब,थांब किती ते प्रश्न ?" "मी आज आमच्या दुसर्या ऑफिस मध्ये जाणारा आहे सो, आज नाही भेटता नाही येणार "
तिच्या ह्या उत्तरामुळे ट्रैक वरून खाली उतरलेल माझ हृदय पुन्हा ट्रैक वर आल. पण दुसऱ्याचं क्षणी वाटलं , ती एवढी नेहमीसारखी माझ्याशी बोलली म्हणजे तिने पत्र वाचलं नसावं कदाचित. म्हणजे अजून टेन्शन जसं च्या तसं होत . "कधी भेटूया, उद्या ?" मी विचारल.
"हो..काही अर्जंट आहे का ?" तिने विचारलं .
"नाही,नाही काही अर्जंट नाही " अजून एक दिवस वाढला होता आमच्यातला .तो दिवस काहीकाही केला लवकर जाईना... दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या नेहमीच्या चहाच्या हॉटेल मध्ये भेटलो ...वेळेपेक्षा आधी मी पोहचलो. ती ठरलेल्या वेळेवर. ती आल्या पासून मी तिचा चेहरा वाचायचा प्रयत्न करत होतो ....तिच्या चेहर्यावरच्या प्रत्येक रेषेवर मी लक्ष देत होत आणि अंदाज लावायचा प्रयत्न करत होतो तिच्या उत्तराचा ..पण त्या आधी एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे ते पत्र तिला मिळायल आहे कि नाही ते ? बोलता-बोलता तिचा आई.डी. हळूच उलटा करून पाहिला पत्र तिथेच आहे का नाही ते पहायला. नव्हत पत्र त्या जागी. म्हणजे कदाचित तिने वाचलं असाव ...पण तिच्या चेह्रावरून काहीच अंदाज येयीना ... ना ती रागावली होती ,ना खुश होती. नेहमी सारखीच ती माझ्याशी बोलत होती . विचारावं का तिला ? असं खुपदा वाटलं त्या वेळी , पण नाही विचारलं.

महिना झाला पत्र देवून , पण तिच्या कडून काहीच उत्तर येयीना. माझ्या मनाची घालमेल सुरु होत होती.... किती दिवस हे चालणार? "हो" किंवा "नाही" ह्यापैकी तिचा निर्णय मला ऐकायचा होता. मनाशी पक्क ठरवलं उद्या काही झालं तरी विचारायचचं तिला. त्यादिवशी नेहमीपेक्षा लवकर ऑफिस मधून बाहेर पडलो ...तीची ट्रेन यायच्या आधीच प्लैटफ़ार्म वर जावून थांबलो , थोड्यावेळाने ती आली, मला समोर पाहून तीने विचारल "आज ह्या प्लैटफ़ार्म वर , आणि इतक्या लवकर " .
"हो , तुझ्याशी बोलायचं होत थोडसं."
"मग सांगायचं ना आधी मेसेज करून भेटलो असतो ना आपण , जावूदे काय बोलायचं आहे ?".. तिथल्याच जवळच्या एका बाकड्या वर आम्ही बसलो. तिच्या डोळ्यात मी पाहिलं , तीचे डोळे एकटक माझ्या कडे पाहत होते ..माझ्या शब्दांची वाट पाहत होते . मी हि आज थेट मुद्द्यावरच आलो
"तुझ्या आई.डी. च्या मागे लावलेलं पत्र भेटलं का तुला ? वाचलंस का ते तू ?" दोघेही शांत होतो.... आता मी तिच्या शब्दांची वाट बघत होतो ...तीन उत्तर दिलं
"हो !, भेटलं तुझं पत्र मला ,वाचलं मी ते ."
माझ्या मानातल्या एका प्रश्नच उत्तर मला मिळाल होत.मन थोडफार हलकं झालं. "मग काही प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही दिलंस ? "

ह्या वेळी तिच्या उत्तरामध्ये खूप मोठा पौज होता ... मी तिला पुन्हा विचारलं
"काय झालं ?" "कसं सांगू आणि काय सांगू ? मीच द्विधा मनस्थित आहे " तीने सांगितलं
"द्विधा मनस्थिती ? म्हणजे ?" मी हि थोडा संभ्रमात पडलो . तीने सांगायला सुरुवात केली

"हो... तुझ पत्र वाचायच्या आधीपासूनच मला कळाल होत तुला मी आवडतेय ते..तुझ माझ्या वर प्रेम जडत चाललं आहे ते ...तुझ्या वागण्यातून मला जाणवत होत ते ...हॉटेल मध्ये माझ्या पर्स मधून पडलेल्या फोटोच्या पाकिटातून माझा फोटो काढून तुझ्या पाकिटात ठेवताना पाहिलं होत मी , पण मी काही नाही बोलले , कारण महित नाही पण माझ्या मनात पण तुझ्याविषयी काहीतरी वाटत होत...तुझ पत्र मिळाल तेव्हा तुझ माझ्यावार खरच प्रेम आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल. पण तेव्हा पासूनच मी द्विधा मनस्थित अडकलेय . कारण हि तसच आहे.. तुला कधी सांगितल नाही मी पण तुला भेटायच्या आधी पासून माझ एका मुलावर प्रेम आहे ..त्याच हि माझ्यावर प्रेम आहे . सगळ चांगल आहे आमच्यात . पण जेव्हापासून तू भेटलास ना मला , तेव्हा पासून तुझ्या विषयी माझी मानत ओढ निर्माण झालीय. प्रेम...प्रेम, नाही म्हणता येणार कदाचित पण काहीतरी आहे जे मला तुझ्याविषयी वाटत राहत. शब्दात सांगता नाही येणार... कदाचित हे सगळ वाईट असेल ..तू आत्ता माझ्याविषयी काय विचार करत असशील काही माहित नाही पण शेवटी मी हि माणूस आहे, माझ्या मनात एखाद्यीषयी ओढ निर्माण होण सहाजिकच आहे पण त्याला प्रेम म्हणन कितपत योग्य आहे माहित नाही...तू आवडतोस मला , नाही अस नाही ..पण फ़्क़्त तू मला आवडतोस म्हणून ..मी त्याला सोडून देन किंवा मी त्याच्या प्रेमाचा त्याग करावा का ?..मग तुला उत्तर काय द्यायचं हाच प्रश्न मनात सारखा घोळत राहतो , तुला नाही म्हणायला मन धजावत नाही आणि हो म्हणायला सुद्धा . "

ती एका मागून एक बोलत होती ..मी सुम्भा सारखा तिच्या कडे आणि तिच्या बोलण्याकडे पाहत होतो ...खरतर मी तिच्या "हो" आणि "नाही" ह्या पैकी एका उत्तराची वाट पाहत होतो .
ती बोलत होती "पण आज काय तो निर्णय घ्यायची वेळ आलीय..मी अस तुला उत्तर न देवून लटकवून नाही ठेवू शकत ... " मी माझे पूर्ण प्राण कानापाशी एकवटले होते .आणी तिने उत्तर दिलं

"नाही .... मी तुला "हो" नाही म्हणू शकत.. माझ त्याच्यावर प्रेम आहे "
तीचं "नाही" उत्तर ऐकून काचेला तडा जावा तेव्हा कसं वाटाव तसा काहीतरी माझ्या हृदयात झालं होत... पण तिला दाखवून न देता मी स्वताला सावरल... आतल्या आत मी रडत होतो पण मी तिच्यासमोर चेहऱ्यावर स्माईल घेवून होतो ... बेक्कार अवस्था होती त्यावेळी माझी. ती माझ्याकडे एकटक बघत होती.. आणि मी तिच्या कडे. डोळे काठोकाठ भरले होते...आणि तेवढ्यात तिने माझ्या गळयाभवती  हात टाकून "सॉरी" बोलत घट्ट मिठी मारली... काही कळायच्या आतचं माझ्या डोळ्यातलं पाणी काठ ओलांडून वाहायला लागल ... मी सावरू शकत नव्हतो स्वताला. तिच्या केसांवर हात फिरवत मी तिला सावरायचा फक्त प्रयत्न करत होतो ... गळयाभोवतीची मिठी तिने जरा ढिली केली त्या वेळी माझ्या आतून ती कायमची निघून जात असल्याचा फील येत होता. स्वतासोबत मी तिला सावरल. तिचा निर्णय मला मान्य होता. थोड्यावेळाने तिला तिच्या ट्रेन मध्ये बसवलं आणि मी पुन्हा त्याच बाकड्यावर येवून बसलो . ती तिथून गेल्यावर त्या बाकड्यावर एकटाच बसून खूप रडलो मी त्यादिवशी . अडीज-तीन तास तिथेच बसुन होतो . आतून काय वाटत होत ते मलाच माहिती होत ते नाही सांगू शकत मी. अगदी स्वताला सुद्धा नाही . घरी जावून झोपलो... झोप काही आलीच नाही त्या रात्री... नुसता कूस बदलत राहिलो . विचार करायला लागलो तेव्हा मला तिचा निर्णय योग्य वाटत होता ... तीच तिच्या प्रेमाबद्दल प्रामाणिक राहण योग्य होत , अस खरचं खूप कमी जणांना जमत असाव ...त्यातलीच ती एक होती . विचार करण्यात सारी रात्र सरली ..सकाळ झाली . थांबून कस चालेल ...सकाळी उठुन पुन्हा ऑफिस ला जायची तयारी सुरु झाली ॰ बैग उचलली ... बैगेच्या बाजूला बाटली ठेवायच्या जागी काहीतरी होत. "आई. डी." होता तिचा .. आई. डी. वरचा तिचा फोटो पाहून पुन्हा डोळे भरले आणि सारा फ़्लैशबैक डोळ्यांसमोरून धावून गेला. "इथे राहिला कसा आई.डी. ?, बहुतेक ती गळ्यात भेटताना . सांगाव का तिला ? " मोबाईल घेतला कॉल करायला तिला , लॉक स्क्रीन काढली समोर तिचाच मेसेज

"ठीक आहेस ना ?"
एक स्मायली रिप्लाय म्हणू सेंड केली आणि तिचा आई. डी. माझ्याकडे राहिलाय ते सांगितल .

          तिला पत्र देवून महिना उलटून गेला ..तो दिवस आणि आजचा दिवस खूप फरक होता पण तेच रोजचेच धक्के खात मी स्टेशन बाहेर पडत होतो...मेसेज वर बोलल्या प्रमाणे ती आई डी घ्यायला आली होती ... खिशात ठेवलेला आई डी बाहेर काढला आणि त्यासोबत पाकिटाच्या चोरकप्प्यात ठेवलेला तिचा फोटो हि काढून तिला देण्यासठी पुढे केला ..ती बघत होती माझ्या ह्या वागण्याकडे ..."आपण पहिल्या सारखं बोलू शकत नाही का ?" तिने विचारलं "तसं अजिबात नाहीये ... बोलू कि आपण..प्रेम जमल नाही आपल फक्त बाकी..." पुढ्च काही बोललोच नाही माझ्या हातातला आईडी आणि फोटो तिच्या हातात सुपूर्द केला आणि आम्ही आमच्या ऑफिस च्या दिशेने निघून गेलो .
-समाप्त

-प्रफुल्ल शेंडगे .

"आय.डी." इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१  भाग-2

आय.डी -(भाग -२)

आय.डी (भाग -१) वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१


फेसबुक मेसेंजर वरचा  तिच्या  मेसेज चा  नोटिफ़िकेशन माझ्या मोबाइल वर येवून धडकला. लगेच उघडायला नको मेसेज ...थोडी वाट बघुया. तिला काय वाटेल मी तिच्याच मेसेज ची वाट बघत होतो कि काय म्हणून थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला . पण मनाला धीर धरवेना २-३ मिनिटांच्या अंतराने मेसेज उघडला .

"Hiiiiiiii" आणि त्या सोबत एक छानशी स्माईली ...असा तिचा पहिला मेसेज.
 "Hi" मधल्या वाढत गेलेल्या "i" ची संख्या स्पष्ट दाखवत होती कि तिने मला ओळखलं असाव आणि तीही बोलण्यास उत्सुक असावी .
आता ह्या तिच्या Hi ला काय उत्तर देवू ...फ़्क़्त "hi,हेल्लो" उत्तर देवू कि आणखी काही ?.....
"hey hi....ओळखलंस का?" ..अस ,म्हणत मी माझ्या मेसेज ची सुरुवात केली.
त्यावर तिचा रिप्लाय "हो ओळखलं कि , आय डी रिटर्न करणारा ".
 तिच्या ह्या उत्तरावर आम्ही दोघेही हसलो.
मी गालातल्या गालात हसत हसतच पुढंच बोलन चालू ठेवलं .
त्यादिवशी चांगली १०-१५ मिनिट आम्ही चैट करत होतो ...
आता हा आमचा रोजचा दिनक्रम झाला होता ..रोज आम्ही फेसबुक वर बोलायचो.बोलताना तिच्याविषयीची ओढ वाढत जात होती .....खुपदा मनात वाटायचं तिला भेटाव म्हणून पण विचारायचं कसं हा यक्षप्रश्न होताच. एकदा बोलता बोलता तिनेच विषय काढला ,
"आपण एकाच स्टेशन वर येतो , पण आपण भेटत नाही, भेटूया का?"
 मी हि क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिल "चालतंय कि...तू सांग कुठे आणि कधी भेटूया ते. '
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच प्लेटफार्म नंबर २ च्या बाकड्याजवळ आम्ही भेटलो .
 आज मात्र माझ्या आधी ती पोहचली होती..बघून तिला पुन्हा माझ्या मनात तीच पहिल्या दिवसाची फिलिंग जागी झाली.
"काय मग इथेच बसुया कि ...." माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिने उत्तर दिल .."चहा प्यायला जावूया?" मी अचंबित नजेरेने तिच्या कडे पहायला लागलो ...तिने हि प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारल
"काय झालं ?" "तू चहा पितेस ?",
 "हो ,का ?' तिने विचारलं .....
"काही नाही , सुंदर मुली चहा पीत नाहीत अस वाचल होत कुठेतरी मी "
"म्हणजे मी सुंदर आहे ?" तिच्या ह्या प्रश्नावर मी थोडा गांगरलो काय उत्तर देवू ह्या बुचकळ्यात पडलो .. सुंदर नाही अस म्हणन तर साफ चुकीचं ठरेल , आणि थेट हो म्हटलं तर ती काय विचार करेल .
"विचार करूण सांगतो " अस उत्तर टाळण्यासाठी एक मधलं उत्तर मी शोधून काढलं .
हॉटेल मधल्या टेबलावर , चहा च्या संगतीने गप्पांचा ओघ सुरु होता ..ती तशी खूप बोलकी आणि तिच्या समोर मी मात्र थोडा गप्पच ..कधी तोंडातून मनातलं बाहेर यायचं ह्या भीतीने दबकत-दबकत शब्द उच्चारणारा.


                       त्या दिवसापासून दिवसाआड आमची भेट व्हायची, कधीतरी सोबत चहा पिण्या इतपत मोकळा वेळ तर कधी फक्त तिच्या माझ्या लोकल येण्याच्या मधला वेळ.. तोही आम्हाला पुरायचा आम्ही दोघही एकमेकांशी घट्ट बांधले जात होतो... एखाद्या बेस्ट फ्रेंड सारखं ...
त्या दिवशीचा एक किस्सा ...हॉटेल मध्ये चहा पीत आम्ही बसलो होतो आणि चहा पिल्यानंतर तिने पैसे देण्यासाठी तिची पर्स उघडली (एक दिवस मी आणि एक दिवस तिने पैसे द्यायचे हे आम्ही... सॉरी-सॉरी तिनेच ठरवलं होत. )तोच तिच्या हातून पर्स खाली पडली आणि त्यातल्या सार्या वस्तू फरशीवर इतरत्र पसरल्या ... त्याच गोळा करता-करता तिच्या पासपोर्ट साइज फ़ोटोंच पाकीट माझ्या हाती लागल...त्या क्षणी काय माझ्या मनाला वाटल खरंच मला माहित नाही ..पण मी त्यातला एक फोटो हळूच काढून घेतला ..आणि माझ्या पाकिटाच्या चोरकप्प्यात ठेवला.....सोशल साईटवर वगैरे तिचे खूप फोटो आहेत पण एखाद्या निवांत क्षणी चोरकप्प्यातून हळूच तिचा फोटो काढून बघण्यातली मजा काही औरच होती ... तिच्या फोटो समोर मी एकटाच बोलत बसायचो ,तिला प्रपोज करायचा सराव करायचो ... पण ती समोर आली कि सगळी हवा फुस्स ...काय कराव- कस तिला सांगाव, सांगण गरजेचंच आहे का ? नाही सागितलं तर ? अशा असंख्य प्रश्नात मी गुंतत जायचो .

                 आणि मग युक्ती सुचली...माझ्या मनातले सारे भाव मी एका कागदावर उतरवले ..अगदी पहिल्या दिवशी मनात तिच्या वर लिहलेली चारोळी हि त्यात लिहली ...ते लिहलेल पत्र मी १०-१२ वेळा वाचल , काही चुकलय का?..काही राहुन तर नाही ना गेलं ह्याची खातरजमा माझ्याकडून चालली होती .डोक्यात मुन्नाभाई सारखा केमिकल लोचा सुरु झाला होता ..सगळीकडे तीच दिसायला लागली होती ...आता आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे हे पत्र तिला द्यायचं कस ?
               २-३ दिवस सोबत पत्र घेवून फिरत होतो पण तिला द्यायची हिम्मत काही केल्या होईना ..एकदा मग असाच तिचा आय. डी . हातात घेतला आणि तिच्या नकळत आय.डी. च्या मागच्या बाजूला हळूच ते पत्र ठेवून दिल...तिला कधी ते पत्र भेटेल..कधी ते ती वाचेल ह्याचा त्या वेळेला विचार नाही केला मी ...फ़्क़्त ते पत्र तीच्यापाशी पोहचलंय ह्यातच मी थोडाफार खुश होतो ..ते हि फ़्क़्त काही मिनिटांसाठी कारण पुढं काय घडणार होत ते मलाही माहिती नव्हत ...तिने हे पत्र वाचल्यावर तिची प्रतिक्रिया काय असणार होती ..कुणास ठाऊक ? 


              आज महिना उलटून गेला ह्या गोष्टीला ... आज पण तेच रोजचेच धक्के खात मी स्टेशन बाहेर पडत होतो....काय घडल होत ह्या महिन्याभरात ? सांगेण पुढच्या भागात ...

 -प्रफुल्ल शेंडगे
भाग-१  

आय.डी.(भाग-१)

नेहमी सारखाच दिवस.... रोजचीच ऑफिस ला जायची घाई ...रोजचीच ट्रेन..रोजचीच गर्दी आणि तेच रोजचेच धक्के... ट्रेन फलाटाला लागली आणि घाई घाईत ट्रेन च्या बाहेर पडलो.... भराभर पावले टाकत स्टेशन च्या बाहेर निघायला लागलो तोच पायाखाली काही असल्यागत वाटल. थोडा थांबलो आणि पाहिलं. ओळखपत्रा सारख काहीतरी वाटत होत .... उचलून पाहिलं .... तर खरंच, एका कुणाच तरी ऑफिस मधल ओळखपत्र होत ... नाव वाचलं ...ओळखपत्रा वरच्या फोटो वर एक नजर टाकली आणि आजूबाजूला त्या फोटोशी साधर्म्य असलेली व्यक्ती दिसते का ते पाहिलं पण तस कुणीच दिसेना . ओळखपत्राच्या मागच्या बाजूला ऑफिस चा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक होता ... मनात म्हटल "आधी आपण आपल्या ऑफिस मध्ये जावू मग फोन करुया ". ते ओळखपत्र तसच खिशात टाकल आणि मी माझ्या ऑफिस कडे वळालो . ऑफिस मध्ये पोहचलो पण त्या ओळखपत्रावरच्या नंबर वर फोन लावायचा राहूनच गेला.....दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा खिशात ठेवलेल्या "त्या" ओळखपत्राची आठवण झाली आणि लगबगीन त्यावरचा नंबर डायल केला . समोरून कुणी तरी फोन उचलला ...बहुतेक रिसेप्शन वरचा नंबर होता ..त्याने कंपनीच नाव सांगितलं आणि काय हवं आहे ते विचारल... मग मी हि ,
" स्टेशन वर तुमच्या एका कर्मचाऱ्याचा आयडी मिळालाय त्या बद्दल सांगायचं होत " अस सांगितल ,
त्याने त्या ओळख पत्रावरच नाव विचारल ... २ मिनिट म्हणून त्याने माझा फोन आणि संदेश त्या आयडी वाल्या व्यक्ती कडे सुपूर्द केला ....
"हेल्लो , मी *****" अस म्हणत तिने तिची ओळख करून देत तो तिचाच आयडी असल्याच सांगितल .
मग "कधी आणि कुठे येताय आय डी घ्यायला " मी तिला प्रश्न केला 
त्यावर तिने म्हटल "तुम्ही सांगा मी येते "
"तुम्ही स्टेशन वर येणार असाल ना संध्याकाळी तेव्हा देतो चालेल ?" मी म्हटल . तिनेही होकार दिला ...
"माझा नंबर लिहून घ्या तुम्ही आलात कि एक फोन करा मी हि असेल स्टेशन वर त्या वेळी " ठीक आहे म्हणत मी माझा नंबर तिला दिला आणि बोलन संपवलं .
     संध्याकाळी सहा -साडे सहाच्या सुमारास मी स्टेशन वर पोहचलो अजून काही फोन आला नव्हता तिचा ...स्टेशन वरच्या एका बाकड्यावर बसून तिच्या फोन ची वाट पाहत थांबलो ..तोच एका अनोळखी नंबर वरून माझ्या मोबाईल वर रिंग आली ... बहुतेक तिचाच असावा ह्या हिशोबाने मी बोलायला सुरुवात केली ...
तिने हि "मी आली आहे स्टेशन वर...तुम्ही कुठे आहात ?" अस विचारल ...
" प्लैटफ़ार्म नंबर २, जिन्याच्या बाजूच्या बाकड्या जवळ " मी माझ लोकेशन सांगितल
"ठीक आहे आलेच " म्हणत तिने फोन ठेवला.
थोड्या वेळाने " इक्सक्यूज मी " असे दोन शब्द माझ्या कानावर आले आणि मी मान वर करून त्या आवाजाकडे पाहिलं.. आणि पाहतच राहिलो .....बास्स्स्स.....दोन मिनिट माझ्या मनात स्तब्ध शांतात पसरली ..... आणि तिच्या नजरेत पाहत-पाहतच मी उभा राहिले .... होतीच ती तशी .....
तीने तीच नाव सांगत शेकहंड्साठी हात पुढे केला ...मी हि माझी ओळख करून देत हात मिळवला तेव्हा विजेचा झटका लागल्यागत माझ्या कानात आणि पूर्ण शरीरात विज गेल्यागत एकदम झणझझणलं.. खिशातला आईडी बाहेर काढला आणि त्या आय.डी. वरचा आणि तिचा चेहरा मी पुन्हा पाहायला लागलो आणि सकाळी पाहिलेला फोटो हाच होता का ? ह्याचा विचार करायला लागलो .....
तिला काही कळण्याच्या आत मी स्वतःला सावरल आणी तिचा आय.डी. तिच्या हातात सोपावला.... तिने हि एक दिलखुलास स्मितहास्य करत आणी थैंक्स म्हणत माझा निरोप घेतला ....तिने जरी माझा निरोप घेतला होता तरी मी मात्र तिच्या मध्ये अडकून गेलो होतो ....रोजचाच दिवस पण तरीही काही विलक्षण घडल्यासारखं माझ्या मनात भाव होते... मनातल्या मनात तिच्यावर मी चार ओळींची एक कविता हि लिहून ठेवली ...
         एक एक दिवस निघून जात होता पण तिची माझी गाठ पुन्हा त्या स्टेशन वर कधी पडली नाही....तिचा नंबर माझ्या कॉल हिस्ट्री मध्ये तसाच होता....तिच्या नावाने सेव केलेला . असच एकदा फेसबूक वर सर्फिंग करताना तिचा फोटो दिसला .. फेसबूक ची टाइमलाइन पुन्हा वर केली "सजेस्टेड फ़्रेंड्स " मध्ये तीच नाव होत ....तिला पाहून पुन्हा काळजाचा ठोका चुकला ...
पाठवू का तीला फ्रेंड रिक्वेस्ट ? कि नको ? ह्या विचारात मी काही वेळ गुंतलों आणि एका निर्णायक क्षणी डोळे गच्च बंद करून केलं "एड़ फ्रेंड" च्या बटनावर क्लिक. मनात म्हटल बघू होइल ते...... तेव्हापासून दर १० मिनिटांनी मी फेसबूक चेक करत होतो... स्वीकारली का तिने माझी फ्रेंड रिक्वेस्ट  हे तपासण्यासाठी . सकाळची दुपार झाली ...दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळ ची रात्र..... पण नाहीच .... शेवटी वैतागून मीच स्वताहून फ्रेंड रिक्वेस्ट रद्द केली .... आणि झोपी गेलो .
        दुसर्या दिवशी पुन्हा माझ्या आतून आवाज आला...... " बहुतेक तिने पाहिलं नसेल...किंवा तिने मला ओळखलं नसेल ".... मेंदूने पुन्हा इशारा केला आणि पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा आदेश दिला .... चार-पाच दिवस होवून गेले पण अजून काहीच प्रतिसाद येत नव्हता ..आता तर मी नोटिफिकेशन बघण हि सोडून दिल होत ... अचानक त्या दिवशी फोन वाजला फेसबूक वरचा कसला तरी नोटिफ़िकेशन होता... मोबाईलची लॉक स्क्रीन उघडून पाहिलं तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याचा नोटिफ़िकेशन.... माझे हात-पाय एकदम गारआणि मनात आनंदाच्या उकाळ्या सुतु झाल्या.... हे थोडे कि काय म्हणून फेसबुक मेसेंजर वरच्या तिच्याच मेसेज चा आणखी एक नोटिफ़िकेशन माझ्या मोबाइल वर येवून धडकला ......माझ्या हृदयाने तर थेट टॉप गियर घेतला आणि उसेन बोल्ट पेक्षाही जास्त वेगाने माझी धकधक वाढायला लागली .
काय होत त्या "आय.डी."वाल्या मुलीच्या मेसेज मध्ये ....सांगेन  कि पुढच्या वेळी .
-प्रफुल्ल शेंडगे

आय.डी (भाग -२) वाचण्यासाठी इथे किल्क करा :- भाग-२  

साथ

आजूबाजूला मंद प्रकाश पडलेला , अंगावर येनारी वार्याची हळुवार झुळूक , दुर कुठेतरी वाजणारं एखाद गाणं,माणसांची गर्दी ,गोंधळ आणि ह्या सार्यात एका कोपर्यात बसलेली "ती" दोघं. त्याच्या खांद्यावर तीच अलगद डोक ठेवून, दोघांच बारीकश्या आवाजात एकमेकांशी बोलन चालू होत. थोड्यावेळा साठी तो बोलायचा थांबला , त्याने तिचा हात हातात घेतला आणि पुन्हा बोलन सुरु केल , येणारे-जाणारे वळून वळून त्यांच्या कडे पहायचे , आणि पुन्हा आपल्या रस्त्याने पुढे निघून जायचे . दोघेही भलत्याच दुनियेत गुंगलेली .दोघांच्या बोलण्याला गर्दीचा किंवा तिथल्या आवाजाचा परिणाम होत नसला तरी ते येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि पुन्हा आपल्या गप्पात अडकून जायचे , चेहऱ्यावर नैसर्गिक समाधान तरीही डोक्यात प्रश्नाचं काहूर माजाव असे भाव दोघांच्या हि चेहऱ्यावर उमटले होते. सूर्य बुडण्याची वेळ झाली आणि अंधार पडायला लागला,आजूबाजूचे दिवे लागायला लागले, तशी त्यांच्या चेहर्यावरची काळजी अधिकच गडद व्हायला लागली होती. एका क्षणी तो उठला ,
"आता जावून काय उपयोग ?" अस बोलून तीने त्याला अडवलं ,
"पण काहीतरी कराव लागेलच ना ?" त्याने उत्तर दिल.

"काय करणार आपण ?" तिने प्रतिप्रश्न केला ,
ह्या वेळी मात्र त्याच्या कडे काहीच उत्तर नव्हत , तो तसाच पुन्हा खाली बसला. स्वतावर चीड आणत तो स्वताशीच पुटपुटत होता , ती मात्र त्याला शांत कारायचा प्रयत्न करत होती.

वेळ पुढे जात होती ,रात्रीचे सुमारे १०-११ वाजले होते , तेवढ्यात समोरून कुणीतरी त्यांच्या दिशेने येतंय अस त्या दोघांच्या हि लक्षात आल , दोघ हि त्या येणाऱ्या व्यक्ती कडे आशावादी चेहऱ्याने एकटक पाहत होते. ती समोरची व्यक्ती त्यांच्या पाशी आली आणि एक पिशवी त्यांच्या समोर ठेवून तिथून निघून गेली. तिने पिशवी झटकन उचलली आणि उघडायला लागली, आत हाथ घालून तिने पिशवीतून काहीतरी बाहेर काढल. पाहून तिच्या जीवात जीव आला , मघापासून असलेली चिंता काहीशी दूर झाल्यागत तिने त्याच्या कडे पाहिलं. त्यानेही काहीश्या चिंता मुक्त नजरेने तिच्या कडे आणि त्या पिशवी कडे पाहिलं , पिशवीतून काढलेल्या एका चपाती कडे आणि त्यात गुंडाळलेल्या भाजी कडे दोघही बघत होती. लगबगीने तिने तिच्या कुशीत निजलेल्या मुलाला उठवल आणि चपातीचा एकेक तुकडा तोडून त्याला चरायला लागली , तो हि बाजूलाच असलेल्या नळातून पाणी आणायला धावला, मुलाच्या पोटात जेवण जाताना दोघांच्या हि पापण्या ओल्या होत होत्या...बहुतेक आनंद आश्रुने. भुकेल्या त्या जीवाने आर्धी चपाती संपवली आणि "बास झाल " अशा अर्थाने मान हलवली. ,.

"तुम्ही खावून घ्या , मला भूक नाहीये " अस म्हणत तिने अर्ध्या राहिलेल्या चपातीचा तुकडा त्याच्याकडे दिला, त्याने नको म्हणत मान हालवली , पण ती काही ऐकायला तयार नव्हती , त्याने मग तिच्या कडून ती अर्धी चपाती घेतली आणि दोन भाग करून एक तिला आणि दुसरा स्वताकडे ठेवला...

"आज नाही भेटल काम, पण उद्या नक्की भेटेल..हातावरच पोट ना आपल थोडे हाल काढावेच लागणार ना?", तिने हलकेच मान हालवून त्याच्या बोलण्याला हो दिला,

"तुम्ही कशाला काळजी करता, मी आहे ना तुमच्या सोबत, भेटेल उद्या आपल्या हाताला काम. " अस म्हणत तिने त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला . आपल्या मुलाकडे पाहत, पोटातली आणि दिवसाच्या दु:खाची आग शमवण्याचा प्रयत्न करत ते दोघेही उरलेल्या चपातीचा तुकडा गिळत होते .

एक मात्र नक्की ....एकमेकाना समजुन घेत,प्रत्येक परिस्थितीत आपल्या माणसांची साथ-सोबत आसणं हेचं सगळ्या गोष्टींवरच रामबाण औषध असत.

-प्रफुल्ल शेंडगे.