रोज कातरवेळी तुझी खुप आठवण येते ,
माणसाच्या गर्दीतही मी माला एकटी पाहते.
आठवणीने तुझ्या मन ही येते दाटून,
नयनातले अश्रु ही जातात तुझ्यावरच प्रेम सांगुन.
वाटल नव्हत जाशील कधी सोडून माझी साथ,
आणि मी राहिल फक्त तुझ्या येण्याची वाट पाहत
तुझ ते रुसन,प्रेम करन सार आज आठवतय,
आठवणीवरच तर "त्या" दिवस पुढे पाठवतेय
खरच,तुझ्या विना सार जग वाटत आहे सुन ,
साऊलीत राहून ही आज मला लागतय ऊन.
please ,आणखी घेऊ नकोस माझ्या प्रेमाची कसोटी ,
ये ना रे लवकर, फक्त माझ्यासाठी ...!