रुसुनिया बसशील फुगुन माझ्याशी,
रागातच विचारशील "तुला उशीर का झाला ?"
वाट पाहते केव्हाची भेटायला तुला हातात हात घेवुन तुझा मी देईल स्पष्टीकरण
हात झटकून म्हणशील हे तुझ नेहमिचच कारन
"ठीक आहे "म्हणून बसेल दूर जावून तुझ्याशी
उठुनिया येशील मग हळूच माझ्यापाशी "तुझ्यावरचा राग कधी राहतच नाही "
हळूच हासेल मी पण पाहूनी वलून
मागेल माफ़ी तुझी दोन्ही कान पकडून गप्पांच्या गराड्यात जावू जग विसरुनी
पाहत एकमेकाना धुंद बेभान होवूनी
म्हनशील मला,एका-एकी होवून शांत
"किती छान बोलतोस रे तू ,असाच रहा बोलत अगदी निवांत "
ऐकता-ऐकता डोळया चा काठ करुण घेशील ओला
विचारल्या वर म्हणशील उगाचच"काही नाही डोळ्यात जरा कचरा गेला"
अलगद पापण्या उंचावुन मी ,डोळ्यात फुंकर मरीन
पानी सावरून ,त्यात माझाच चेहरा पाहीन
बोलताना लक्ष येईल घड्याल़ा पाशी
वेळ पाहून मग करशील घाई
घेशील माझ्याकडून उदया भेटण्याच वचन
पाहशील पलटून ,जाताना हसून
राहिल उभा मी ,पाहून तुझ्याकडे ,हात फैलावुनी
येशील मिठीत माझ्या परत धावुनी
लाजतच म्हणशील "I love you"तू
कानात म्हणेल तुझ्या मी "I Love you too".
Romantic playfulla.. Nice
ReplyDeleteAre prafulla re....
Delete