"काय
रोज रोज तीच भाजी ? काहीतरी
वेगळ करत जा ना ? ", "वैताग
आलाय रोजच्याच त्या रडक्या
मालिका बघून ","रोज
मरे त्याला कोण रडे ?
नेहमीचाच आहे
हे "....थोडे
ओळखीचे वाटतयेत का हे शब्द
? , हो ना
? आपलेच
शब्द आहेत हो हे , रोज
रोज एकाच गोष्टीला कांटाळलेलो आपण , काहीतरी
नवीन मागत असतो , हो
! मागत
असतो कारण, आपण
स्वतः मात्र बदल करायला सरसावत
नाही , "चलता
है यार " म्हणून
आपण आपल जगण ढकलत राहतो आणि
आयुष्याच्या एका टप्प्यावर
विचार करायला वेळ मिळतो ,
तेव्हा आपण
विचार करत राहतो कि "आयुष्यात
काही तरी करायला हव होत ,
थोडस हटके ”,
पण तोपर्यंत
वेळ झालेला असतो , आणि
इच्छा असून हि आपण काही हि करू
शकत नाही
दररोज
तेच ऑफिस आणि तेच काम करून
डोक्याला मुंग्या यायला लागतात
तरी पण पर्याय नाही म्हणून
आपण गप्प मुकाट्याने daily
routine मध्ये
स्वताला अडकवून ठेवतो ,
पण कोणी स्वतः
लाच किंवा आपल्या मनाला बोललात
का कधी कि "काय
यार रोज रोज तेच करतोस काही
तरी बदल कर ” , नाही
ना ? आता
असा अर्थ काढू नका कि मी तुम्हाला
रोज नवीन नवीन जॉब्स शोधायला
आणि करायला सांगतोय ,
माझ म्हणन एवढच
आहे कि जे काम तुम्ही रोज करता
आहात त्यात हि काही नाविन्य
शोधण्याचा प्रयत्न करा,
का त्या ओझ
उचलणाऱ्या गाढवा सारख वागताय
, फक्त
जगण्यासाठी जगायचं आहे असा
का विचार करताय ? , ठीक
आहे , जर
नाहीच शोधता येत आहे तुम्हाला
रोज्च्याच कामात नाविण्यापणा
, मग जोपासा
ना एक छोटासा छंद , घ्या
न त्याचा आनंद , जा
कधीतरी एकट्याने फिरायला
ह्या technical जगा
पासून लांब थोड निसर्गाच्या
सानिध्यात , बघा
सभोवताली निसर्गानी काय काय
वाढून ठेवलं आहे तुमच्यासाठी,
लहान मुलासारख
काढत राहा ना चित्र मुक्त
मानाने , उमटू
द्या ना मनातले सुंदर विचार
तुमच्या एका कोर्या कागदावर
, बघा मन
कस प्रफुल्लीत होवून जाईल ,
बागडू द्या
स्वतच्या विचारांना फुलपाखरा
सारखं मुक्तपणे , अहो
फुलपाखरू पण रोज एकाच फुलाकडे
नाही जात तो हि शोधतो नवीन फुल
, आणि आपण
तर अगदी माणसा सारखी मानस ,
त्या छोट्याश्या
जीवाला जे कळत ते आपल्याला
का नाही कळत ? तर
जागे व्हा मनातून आणि टाका
एक पाऊल नाविन्याकडे आणि घ्या
आनंद खर्या जीवनाचा .
ऑल द बेस्ट !!!
Definitely do ...
ReplyDelete