नात विश्वासाचं








मुग्धा , तशी मुळची नागपूरची , चार महिन्यापूर्वीच तीच रोहन सोबत लग्न झाल होत , तसा रोहन हि नागपूरचाच , एका बँकेत कामाला होता , पण दोन आठवड्यापूर्वीच नोकरीत झालेल्या बदलीमुळे मुंबईला आला होता , अर्थात मुंबई दोघांसाठी हि तशी नवीनच होती पण रोहनचा बराचसा वेळ ऑफिस मध्ये जायचा त्यामुळे त्या नवीन शहराच त्याला एवढ वेगळ वाटत नव्हत पण मुग्धा घरीच असायची , त्यात नवीन ठिकाण ,कुणाशी फारशी ओळख हि नव्हती , रोहन ऑफिस ला गेल्यावर थोडा वेळ रोजच्या कामात जायचा मात्र नंतर एकटीला घर खायला उठायच , तशी मुग्धा हि ग्रेजुएट होती , लग्नाच्या आधी ती नागपूर मध्ये एका खाजगी कार्यालयात काम करायची , त्यामुळे तिला त्या एकट्या घरात उदास व्हायला व्हायचं , पण सध्या तरी दुसरा पर्याय नव्हता . दुपारच्या जेवणा नंतर वामकुक्षी घ्यायची आणि रोहन ऑफिस मधून यायच्या वेळे पर्यंत घरातली काम करून घ्यायची म्हणजे तो आल्यावर त्याच्यासोबत बोलायला , फिरायला वेळ मिळायचा , असा जणू दिनक्रमच झाला होता तिचा .

असच एका दिवशी दुपारच्या जेवणानंतर मुग्धा झोपून गेली आणि सुमारे ४:३० च्या दरम्यान झोपेतून उठली , झोपण्याने मनावर थोडी मरगळ आली होती म्हणून तशीच उठून बाल्कनीत जावून बसली , उगाच एकटक पाहत राहिली , आणि ह्या निशब्द कातरवेळी "त्याचा" विचार तिच्या मनात फिरायला लागला , सुमित .... तिच्या कॉलेज चा मित्र , तस दोघांचहि एकमेकांवर प्रेम होत कॉलेज च्या दिवसात , त्याचा चेहरा , त्याच बोलन, त्याची एक-एक आठवण , आज सगळ दाटून आल होत तिच्या मनात , पहिलं प्रेम होत ना तीच ... कॉलेज मध्ये झालेली त्याची आणि तिची पहिली भेट , मग वाढत गेलेली मैत्री आणि फुलत गेलेलं प्रेम ... गुपचूप भेटन सुरु झाल , फिरायला जान , आयुष्यभराच्या शपथा हि घेतल्या जावू लागल्या .. अगदी नजर लागण्यासारखेच दिवस होते ... एक दिवशी मुग्धाच्या घरी तिच्या आणि सुमित च्या प्रेमाबद्दल कुठून तरी समजल आणि मुग्धा वर बंधने आली ... सुमित आणि तिच्या गाठीभेटी कमी होवू लागल्या ... कामाला जायचं हि बंद झाल तीच ... तशी सुमित ने मुग्धा च्या घरी येवून तिच्यासाठी मागणी घातली हि होती पण आपल्या इथल्या बर्याच ठिकाणी जे होत तेच झाल .... जात- धर्म वगैरे पाहन , समाज काय म्हणेल ह्याचा विचार .. ते इथ हि पाहिलं गेल आणि इथ पण त्याचं प्रेम हारल.... आता तर घरच्यांनी मुग्धा च्या लग्नासाठी मुलगा बघण्याची घाई सुरु केली .... मुग्धा तशी समंजस होती .... आई वडिलांचा मान राखण्यासाठी ... तिने सुमित शी बोलन, भेटन बंद केल पण मनातून त्याची आठवण जात नव्हती ... रोज एकांतात रडायची त्याच्या आठवणीने .... आणि एके दिवशी रोहन तिला बघायला आला होता ... त्याला मुग्धा पसंद पडली ... मुग्धा ह्या बघण्याच्या कार्यक्रमात जास्त रस घेत नव्हती ... तिने ठरवलंच होत आता घरचे जे ठरवतील तेच करायचं ...मुग्धा च्या घरच्याना रोहन आवडला होता ... लग्नाची बोलणी झाली आणि ३ महिन्यातच दोघांच लग्न हि झाल ... रोहन हि मनमिळावू , समंजस आणि प्रेमळ होता ... त्याच्या सोबतच्या संसारात मुग्धा रमायला लागली होती ... पण आजच्या ह्या सुमित च्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले होते ... तेव्हाच दारावरची बेल वाजली ... आणि मुग्धा तिच्या तंद्रीतून बाहेर आली ... दरवाजा उघडला तेव्हा रोहन आला होता ऑफिस मधून ... त्यान तिच्या कड पाहिलं ...तिच्या चेहर्यावरची उदासिनतात त्याने हेरली होती त्याच्या नजरेत ... पण त्यामागच कारण त्याला उमजल नव्हत ... तो तसाच जावून सोफ्यावर बसला .. तितक्यात मुग्धा ने पाण्याचा ग्लास आणून दिला तेव्हा त्याला तिच्या चेहर्या वर सुकून गेलेल्या अश्रुंचे ओघळ दिसले .. त्याने दोन घोट पाणी पिल आणि मुग्धाशी विचारपूस करायला लागला "काय झाल? अशी उदास का दिसतेस ? “ , मुग्धा ने "काही नाही " अस वरवरच उत्तर दिल पण ह्या उत्तराने त्याच काही समाधान झाल नाही , त्यान हळूच तिचा हात धरून तिला स्वतः शेजारी बसवलं आणि अगदी लाडक्या स्वरात तिच्याशी बोलायला लागला "ओह , रुसलीस कि काय माझ्यावर ? “ पण मुग्धा च्या चेहऱ्यावरचा भाव काही बदलत नव्हत , ती सगळ काही ठीक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तीच चेहरा मात्र तिची साथ देत नव्हता ... तीच मन तिला खात होत आतून ... एका क्षणी तिला वाटत होत कि सांगून टाकाव रोहन ला तिच्या उदासीच कारण पण मनात भीती पण वाटत होती ...
रोहन तिला खुश करण्याचा मनापासून प्रयत्न करत होता ... आता मात्र मुग्धा नि मनाशी ठामपने ठरवलं सार काही सांगायचं , ति रोहन ला म्हणाली "मला तुम्हाला काही सांगायचं आहे , पण तुम्ही रागावणर नाही ना ?” रोहन च्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडी उत्सुकता दिसायला लागली , तो म्हणाला "सांग ना , त्यात रागावन्यासारखा काय ”... आणि त्याच हे बोलन ऐकून मुग्धा ने सांगायला सुरवात केली ... तिच्या आणि सुमित च्या भूतकाला बद्दल ... प्रत्येक शब्द सांगताना ती मनातून मोकळी होत होती , इकडे रोहन च्या चेहऱ्यावरचे भाव कळेनासे झाले होते ... एका मागून एक मनातले सारे विचार ती त्याच्या समोर बोलू लागली आणि काही वेळानी सार काही सांगून ती शांत झाली आणि रोहन कडे पाहू लागली , त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याचा अंदाज भेण्याचा प्रयत्न करायला लागली ... रोहन ने स्वताला थोडस सावरून टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि एक घोट पाणी पिऊन , एक दीर्घ श्वास स्वतःत भरून हळूच मुग्धाचा हात स्वतःच्या हातात घेवून तिच्याशी बोलायला लागला "आज हि तुझ त्याच्या वर प्रेम आहे ? तुला जायच आहे का त्याच्याकडे ?” त्यावर मुग्धाने उत्तर दिले "नाही हो , मी आत्ता तुम्हालाच माझ सर्वस्व मानल आहे , मी त्याला कधीच मागे सोडून आली आहे , मी तुमच्या सोबत आनंदी आहे ” हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते .. रोहन ने एका हातात तिचा हात धरून दुसर्या हाताने तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि तिच्या केसांवरून हळूच हाथ फिरवत म्हणाला " मुग्धा , मला तू आवडतेस , आणि तुला हि मी आवडतोय अस तुझ म्हणन आहे मग का तू स्वताला दोषी मानतेस , जे घडल तो तुझा भूतकाळ होता , पण वर्तमान आणि भविष्यकाळ वेगळा आहे , मी तुझ्या मनाची स्थिती समजू शकतो , आपण आठवणीना तर थांबवू शकत नाही ना, तू स्वताला अपराधी मानन सोडून दे , तू जे आपुलकीने आणि हक्काने माझ्याशी सगळ शेअर केलस ह्यातच आपल नात किती घट्ट आहे ते कळत ” त्याचं ह्या अश्या आशादायी आणि प्रेमळ बोलण्याने तिच्या चेहर्यावरच काहीस टेंशन दूर गेल होत .... आणि आता दोघांच्याही चेहऱ्यावर पुन्हा एक नवी चमक आली होती ... दोघ ही काही क्षण तशीच एकमेकांकडे पाहत बसली आणि संध्याकाली दोघेही बाहेर फिरायला निघून गेली

- प्रफुल्ल शेंडगे .

4 comments:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-