असेच महिना अखेर चे दिवस होते , साधारण 6 -7 विला असेल मी , त्यादिवशी बाईनी शाळेत स्काउट चा कॅम्प आहे अस सांगितल . मी हि स्काउट मध्ये होतो . त्या कॅम्प मध्ये सहभागी व्हायची माझी इच्छा होती . मनात एक उत्साह दाटला होता , कधी शाळा सुटते आणि घरी जावून सांगतो अस झाल होत . शाळा सुटली आणि धावत-धावत घर गाठलं . एक कोपर्यात दप्तर फेकून दिल आणि आई-आई अशा हाका देत किचन मध्ये काम करत असलेल्या आई जवळ जावून उभा राहिलो . आईने केसांवरून हात फिरवत विचारल "काय झाल ? कसला गोंधळ चालू आहे ?" आईच वाक्य मध्येच तोडत मी सांगायला सुरुवात केली, "उद्या आणि परवा दोन दिवस आमच्या शाळेत स्काउट चा कॅम्प आहे , बाईनी उद्या सगळ्या स्काउट मध्ये असणार्यांना स्काउट चा गणवेश घालून बोलवल आहे , मला पण जायचं आहे ."अस एका श्वासात सार सांगून गेलो . "हो हो जा .. पण तो स्काउट चा गणवेश कुठय तुझ्याकडे ?"... मी लगेच उत्साहांत म्हटल "नाहीये माझ्याकड , आपण नवीन विकत घेवू ना "... आईच्या चेहऱ्यावर थोडस टेंशन आला होत त्यातच तिने मला समजावत म्हटल ... "ह्या वेळेस नको पुढच्या वेळेस नक्की जा , तेव्हा तुझ्यासाठी चांगला ड्रेस घेवू" ... आईच अस बोलन ऐकून माझा चेहरा उतरला पण त्याच बरोबर मी हट्टाला पेटलो ." पुढच्या वेळी नाही ह्याच वेळेला जायचं मला " डोळ्यातून आसव काढत , पाय आपटत ,हुंदके देत देत मी हट्ट धरून एक कोपर्यात जावून बसलो , आई समजावण्याचा मला खूप प्रयत्न करत होती पण मी काहीही ऐकायला तयार नव्हतो . आईने जेवण वाढल , "जेवून घे " अशा रागावन्याच्या स्वरात आईने आदेश दिला , "नाही जेवणार मी , मला तो स्काउट चा गणवेश घालून उद्या कॅम्प ला जायचच आहे " असा माझा पाढा सुरूच होता , त्यातच आईच्या हातचा एक जोरदार धपाटा हि खाल्ला पण हट्ट काही सोडत नव्हतो . "थांब बाबा ना येवू दे कामावरून मग तुझ्या कडे बघायला सांगते " आई मला बाबाची भीती दाखवत होती पण त्या सार्या गोष्टींचा त्या वेळी माझ्यावर काहीच फरक पडत नव्हता .
थोड्याच वेळात बाबा कामावरून घरी आले . मी एका कोपर्यात बसून रडत असलेंला पाहून विचारल "काय झाल ?" मी काहीच उत्तर दिल नाही , मग आईनेच बाबाना सारी कहाणी सांगितली , मग बाबा मला जवळ घेत समजावायला लागले "आत्ता महिना अखेर आहे ना , पुढच्या महिन्यात पगार झाला ना तुला तो गणवेश घेवू आपण , पुढच्या वेळेस जा कॅम्प ला ." बाबा समजावत होते पण मी समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतोच , एक- दीड तास तसाच मी एका कोपर्यात रडका चेहरा घेवून बसलो होतो . आता घरात कुणीच ह्या विषयावर बोलत नव्हत , पण माझा हट्ट काही संपत नव्हता , ते पाहून बाबानी त्यांच्या ऑफिस मधल्या कुणला तरी फोन लावला आणि काही रुपये उधार मागितले , त्याचं हे बोलन ऐकून मी मनोमन खुश झालो , मी तो स्काउट चा गणवेश घालून कॅम्प ला जाणार हा विचार मनात एक उत्साह भरत होता . बाबा नि आईला हाक मारली "ते एक जन रुपये देणार आहेत ते घेवून त्याचा गणवेश आन ", आईने हि तिच्याकडचे घरखर्चासाठी ठेवलेले पैसे घेतले, आणि मी आणि आई गणवेश खरेदीला बाहेर पडलो . सुमारे साडेनाऊ दहा वाजले असतील ... आम्ही दुकानात पोहचलो , दुकानदाराने माझ्या मापाचा गणवेश काढून दिला , गडद नील्या रंगाचा शर्ट , निळ्या रंगाची पैन्ट , स्काउट ची टोपी , खिशाच्या एका बाजूला शिट्टी असलेली दोरी , गळ्यात अडकवण्याचा गुलाबी आणि पांढर्या रंगाचा स्कार्फ , बेल्ट असा सारा गणवेश पाहून मी मनातून जाम आनंदी झालो होतो , डोळ्यातल पाणी आटून गेल होत ,डोळ्यात स्वप्नाची चमक वाढली होती . आईने विचारल "काय... आहे का बरोबर हाच गणवेश ?हाच पाहिजे ना ?" मी हो-हो करत मान डोलावली . दुकानदाराणे ड्रेस पैक केला आणि बिल दिल . त्यावेळी माझ त्या बिलाकड लक्ष नव्हतच , मला फ़्क़्त तो गणवेश दिसत होता .
दुसर्या दिवशी तो नवा कोरा गणवेश अंगावर चढवून मी कॅम्प ला निघायला लागलो , आईला - बाबाना माझा गणवेश अगदी रुबाबाने दाखवत होतो , ते हि अगदी डोळे भरून माझ्या कडे बघत होते . माझा चेहरा खुलला होता . दोन दिवसांचा कॅम्प पूर्ण झाला . तसा हा माझा नवा कोरा गणवेश कपाटातल्या एका बाजूला जावून धूळ खात पडला , त्या दिवसानंतर मात्र त्याचा कधीच उपयोग झाला नाही .
आज अचानक त्या गणवेशावर काढलेला फोटो दिसला , आणि तेव्हा जे माहित नव्हत ना ते आत्ता मला स्वानुभवातून कलाल होत . "महिना अखेर" म्हणजे नक्की काय असत . महिन्याच्या शेवटी खिशात मिळणारी १० रुपायची नोट हि किती महत्वाची असते ते आत्ता स्वत कमावताना कळतंय . फ़्क़्त स्वताच्या गरजा पूर्ण करताना हि नाकी नऊ येतायेत, तिथ आई वडिलांनी इथ्कुश्या पगारात आमच शिक्षन , आमच्या गरजा , आमचे हट्ट कसे पूर्ण केले असतील ह्याचा विचार आला ना तरी डोळ्यात चटकन पाणी येतंय , दोन दिवसांच्या माझ्या हट्टासाठी त्यांनी कुठे कुठे आणि कशी काटकसर केली असेल माहित नाही .हे तर फक्त एक उदाहरण होत असे किती हट्ट केले असतील आपन आपल्या आई वडिलांकडे आठवत ही नसतील आज आपल्याला . हो ना ?
(काल्पनिक कथा )
-प्रफुल्ल शेंडगे
Right ...
ReplyDelete