काही गोष्टी कितीही वाटत असल्या तरी कागदावर उतरवता येत नाहीत .कुणाला सांगू वाटत असतना देखील सांगता येत नाहीत .त्या डोक्यात गोंधळ घालत राहतात , विचार करत करत डोक्याचा भुगा करायला लागतात . छातीत एक जळजळ होते , पोटात गोळा यायला लागतो . कपाळावर , ओठाच्या वरच्या भागात घामाचे थेंब जमा व्हायला लागतात , बाकी कुठल्यचं गोष्टीत मन रमत नाही , उगाच हातच्या मुठी घट्ट आवळून त्या समोरच्या गोष्टीवर आपटून स्वताचाच राग व्यक्त केला जातो. समोरच्याला मनात काय चाललंय ह्याचा थांग पत्ता लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न चालू असतात पण तरीही कुणीतरी चेहऱ्यावरचे भाव टिपून विचाराव अस वाटत राहत . कुणाशी तरी बोलत रहावस वाटत .पण काय बोलाव तेच कळेनास होत . वाटत माझ्याच बाबतीत अस होत्ताय का ? होत असेल तर का ? असे प्रश्न झुंडीने येत असतात पण उत्तर एकाच हि मिळत नाही , मग चिडचिड सुरु होते , काय कराव सुचेनास होत , मन बोलत शांत राहा पण डोक शांत राहू देत नाही . ह्या सार्या मागच्या कारणापासून कधीकधी तर आपनच अनभिज्ञ असतो मग दुसर्यांनी ओळखाव अशी अपेक्षा कशी ठेवायची ?
पण आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो हे समजून चुकत , कोणत्या गोष्टीत किती काळ अडकून राहायचं ते आपल्याच हातात असत , मनावर ताबा मिळवावाच लागतो .मनातले विचार एका दलदली सारखे आहेत ते आपल्याला आत खेचत जातात , मग त्यात अडकत जायचं कि धीर एकवटून त्यातून बाहेर पडायचं ? कमळ पण दलदलीत उगवत असल तरी ते त्यात बुडून जात नाही ते त्या दलदलीवर जिद्दीने उभ असत , आपल्याला हि ह्या नैराशेच्या दलदलीमध्ये अडकून न जाता त्या निराशेच्या विचाराणा तुडवून उभ राहता आल पाहिजे , वेळ लागेल पण अशक्य नाहीये , एका झटक्यात त्यात अडकून आनंदी जगण्याच अस्तित्व पुसून टाकण्यापेक्षा थोडा वेळ संघर्ष करून टिकून राहण्यात खर शहाणपण आहे आणि हेच पुढच्या अनेक संकटात एक प्रोत्साहन देत राहील.
मग कुठून तरी असा एखादा पोजिटिव विचार मनात अचानक येतो आणि मनावरच सार मळभ एक झटक्यात दूर सारून जातो .
-प्रफुल्ल शेंडगे .
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-