पाण्याचं सीमोलंघन आणि तिसर महायुद्ध
शीर्षक वाचून मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील ना ? काय अर्थ आहे ह्या शीर्षकाचा ?हो पण हे खर आहे ! मागच्या काही दिवसातल्या घटना पाहता हेच म्हणण योग्य आहे . आज दसरा म्हणजे सीमोलंघन करायचा दिवस .ह्या वर्षी पाऊस म्हणावा तेवढा झाला नाही . धरण सुद्धा कोरडी पडायला लागली आहेत. आणि त्यामुळे भंडार दऱ्या तून पाणी जायकवाडी ला सोडायचा निर्णय घेण्यात आला .
दोन दिवसापूर्वी सोडलेले पाणी कदाचित दसऱ्याच्या शुभ दिनी सीमोलंघन करून जायकवाडी ला पोहचेल सुद्धा
आणि तिथल्या जनतेला थोडा तरी आधार मिळेल . पण वरून जरी पाण्याचा प्रश्न सुटला आहे अस वाटत असलं तरी ,प्रश्न आत्ता कुठ निर्माण झालेत हे मात्र तितकचं खर . भंडार दऱ्या तून पाणी सोडण्यावरून तेथील जनतेने केलेला विरोध पाहता पाण्याचा हा प्रश्न भलताच पेटणार आहे अस वाटायला लागलं आहे .
आत्ता पर्यंत ज्याची केवळ शक्यता वाटत होती ती गोष्ट म्हणजे - तिसर महायुद्ध पाण्यासाठी होईल अस वाटत होत , त्या गोष्टीची सुरवात बहुतेक सुरु झाली आहे महाराष्ट्रातल्या ह्या "पाणी "पतान . पण हि तर
सुरवात झाली आहे आणि त्याच्या झळा सुद्धा लागायला लागल्या आहेत .
आता हे झाले से प्रश्न . प्रश्न वाचून आणि भविष्यातल्या ह्या गोष्टीचा परिणाम ह्यांचा विचार करायला गेलं तर मेंदूच पाणी वव्हायला लागेल . इतका हा प्रस्न बिकट व्हायला सुरवात झली आहे .
पण जसे प्रश्न आहेत तशी उत्तरं पण आहेतच कि --त्यातला एक तात्पुरता विचार करायचा म्हटला तर एका दुष्काळी भागाला पाणी देण्या वरून जो विरोध होतो आहे तो कमी , कमी म्हणण्यापेक्षा बंद झाला पाहिजे .
पण काही झाल तरी स्वताची भरलेली घागर कुणी दुसर्याला दयायला कसा बारा तयार होईल (तहानलेल्याला पाणी द्यावं हि आता आपली जुनी संस्कृती झाली आहे , कोण करतच नाही तो विचार ). म्हणून काही तरी ठोस उपाय योजना करायला हवी आहे . आणि ह्यावर कायमचा ठोस उपाय म्हणजे "नद्या -जोड प्रकल्प ".
ज्या विषयावर वर्षानुवर्षे केवळ चर्चा झाल्या त्या विषयाची पूर्तता करण्याची वेळ सुरु झाली आहे . नाहीतर ह्यापुढे आणखी पाणी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण पण किती दिवस सरकारच्या नावानी बोट मोडत बसणार आहोत ,किती दिवस दुष्काळी package साठी आंदोलनं आणि पाण्यासाठी "हंडा " मोर्चा ह्यासारखे फ़क़्त मोर्चे काढत राहणार आहोत ? त्यापेक्षा ह्या "नद्या जोड प्रकल्पा " विषयी आवाज उठवणार आहोत? ह्या प्रकल्प मुळे देशातल्या साऱ्या नद्या एकमेकींशी जोडल्या जातील. आणि त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग एका विशिष्ट प्रांता साठी न होता सार्या देशाला किंबहुना दुष्काळी भागाला होऊ शकतो.तेव्हा ह्या अश्या प्रकल्पांना विरोध न करता त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे .
नाहीतर तो दिवस दूर नाही ज्यादिवशी पाण्यासाठी आपण एक्मेंकांच्या जीवावर उठू. म्हणून म्हणतो जागे व्हा
आणि पुन्हा बनवा आपल्या ह्या भारत भूमीला "सुजलाम -सुफलाम ". आणि सारी भांडण विसरून करूया पुन्हा एकदा "सीमोलंघन"
-----------------------------------------------------------------------------------प्रफुल्ल शेंडगे

No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-