गुंतले मन कधी सुटले ,
गुंफलेले ह्रदय हे कधी तुटले ,
कळाल तर हेही नाही मला ,
का सोडून गेलीस तू माझी साथ
आठवतो तो फक्त ,निसटत जाणारा , पावसातला तुझा ओला चिंब हात .......
विचारांच्या डोहात बुडालो ,
एकटेपणा च्या आहारी ही मिळालो ,
नैराश्याच्या ओलांडून खाच-खळगा
शोधायची होती मला ही नवी वाट
पण नजरेसमोर पसरलय चोहिकडे फक्त
तुझ्या आठवणीच धुकं दाट
रणरणत्या विचारात चालताना,
स्वतःच्याच सावलीशी तोंड झाकताना ,
तुझ्या आसवांचा पानवठा दिसला
तेव्हा उमजल मला ,
तुही माझ्याच शोधात होतीस...
येवढ होत प्रेम तर का मला सोडून गेली होतीस ??
सांग ना , का मला सोडून गेली होतीस ??
------प्रफुल्ल शेंडगे
गुंफलेले ह्रदय हे कधी तुटले ,
कळाल तर हेही नाही मला ,
का सोडून गेलीस तू माझी साथ
आठवतो तो फक्त ,निसटत जाणारा , पावसातला तुझा ओला चिंब हात .......
विचारांच्या डोहात बुडालो ,
एकटेपणा च्या आहारी ही मिळालो ,
नैराश्याच्या ओलांडून खाच-खळगा
शोधायची होती मला ही नवी वाट
पण नजरेसमोर पसरलय चोहिकडे फक्त
तुझ्या आठवणीच धुकं दाट
रणरणत्या विचारात चालताना,
स्वतःच्याच सावलीशी तोंड झाकताना ,
तुझ्या आसवांचा पानवठा दिसला
तेव्हा उमजल मला ,
तुही माझ्याच शोधात होतीस...
येवढ होत प्रेम तर का मला सोडून गेली होतीस ??
सांग ना , का मला सोडून गेली होतीस ??
------प्रफुल्ल शेंडगे
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-