२० मिनिट-भाग 1 २० मिनिट भाग-2
अखेर सोमवारचा तो दिवस उजाडलाच , शनिवार पासून वाट पाहत होतो , हे दोन दिवस कित्येक वर्षांसारखे भासत होते , आज लवकरच उठलो झोपेतून , रात्रीच एक छान शर्ट इस्त्री करून ठेवला होता , तिला आवडेल ह्या हिशोबाने , तयार होवून किती तरी वेळा मुद्दाम आरशात पाहत होतो , कसा दिसतोय ते , छानसा परफ्युम पण मारला , माझ हे अस वागण पाहून आतापर्यंत घरातल्यांच्या नजरा जरा जास्तच तीक्ष्ण व्हायला लागल्या होत्या म्हणून मी त्यांनी काही विचारण्याच्या आत घरातून स्टेशन ला जायला निघालो , मनात एक कमालीचा उत्साह घेवूनच, तिला भेटायला , तिच्याशी बोलायला मन उत्सुक होत . ८:४० ची लोकल पकडली, गाडी तिच्या स्टेशन वर येवून थांबली तशी माझी नजर त्या जालीपालीकडे तिलाच शोधायला लागली , पण ती काही दिसली नाही त्यात आज सोमवार ना गर्दी जरा जास्तच होती एका नजरेत स्पष्ट दिसेना , दोन तीन वेळा नजर भिरकावली तिकडे पण नाहीच , ती दिसलीच नाही आणि त्या बरोबर सुरु झाले माझ्या मनात विचार ," ती आज आलीच नसेल का ?" असे, इतका तयार झालो होतो तिच्या साठी पण तीच आली नाही म्हणून मन उदास झाल होत तोच मोबाईल वाजला , त्या गर्दीत कसाबसा खिशातून मी मोबाईल काढला आणि सरळ कानाला लावला , पलीकडून कोण काय बोलत होत ते निट कळत नव्हत नुसता गोंधळ ऐकू येत होता , म्हणून मोबाईल पुन्हा कानाशी घट्ट पकडून आवाज ऐकायचा प्रयत्न करायला लागलो तेव्हा कुठे काही पूसटशे शब्द ऐकायला मिळाले "समोर बघ , समोर " मला पहिल्यांदा काही कळलच नाही पण जेव्हा मी समोर बघितल तर थोडा धक्काच बसला , सुखद धक्का , त्या पलीकडच्या डब्ब्यातून ती मला पाहून माझ्याशी बोलत होती , हाय करत होती चेहऱ्यावर एक स्माईल देवून , त्यावेळेला माझी झालेली अवस्था काय सांगू , मी इतका खुश झालो होतो कि मी आता शम्मी कपूर सारख "याहू "म्हणून ओरडेल कि काय अस वाटत होत मला , "मन मे लड्डू फुटावा " अस काही वाटत होत , टक लावून मी आत्ता फ़्क़्त तिच्याकडे पाहायला लागलो होतो , गर्दीचा काहीएक विचार न करता , प्रत्येक स्टेशन वर उतरताना आणि चढताना गर्दी चे धक्के लागत होते काही जन तर अक्षरशः पाय तुडवत होते माझे पण मला त्याच काहीच भान आणि तमा नव्हती मी माझ्या अणि तिच्या स्वप्नात गुंग झालो होतो .
आमच स्टेशन यायची वेळ झाली म्हणून लोकल मधून खाली उतरल्यावर तिच्याशी काय बोलायचं अस मनाशी ठरवायला लागलो , गर्दीला लोटून स्टेशन वर उतरलो , ती हि माझीच वाट पाहत उभी होती , मी उतरून तिच्या पाशी गेलो तर ती मला पाहून गालातल्या गालात हसायला लागली . मला काही कलेच ना ती माझ्या कडे बघून का हसतेय ते , म्हणून मी स्वतावरच थोडीशी नजर फिरवली तेव्हा कळाल ती माझ्या झालेल्या अवतारावर हासत होती ,लोकल च्या गर्दीने माझ्या अवताराची वाट लावली होती , शर्टचा आर्धा इन निघाला होता , माझ्या काळ्या बुटांवर उमटलेले आणखी काही लोकांचे ठसे , कुणाच्या तरी टिफिन बॉक्स मधून निघालेला तेलाचा ओघोल माझ्या शर्टाच्या डाव्या बाजूला लागला होता , चेहऱ्याची काय अवस्था होती काय माहित नाही म्हणून झटकन खिशातून रुमाल काढला आणि चेहरा पुसला , तेव्हा मात्र तीच ते गालातल हसून जोराने बाहेर आल आणि ती थोड जोरानेच हसायला लागली , मग काय तिच्या ह्या हसण्या समोर मी अवघडूनच गेलो , आणि तिला विचारल "काय झाल ? एवढ हसायला ", तिने हि तीच हसन थोड कंट्रोल करून माझ्या विस्कटलेल्या केसंविषयी सांगितल , मी लगेच मोबाईल मध्ये स्वताचा चेहरा पाहिला खरच झोपेतून उठल्या सारखा अवतार झाला होता , सकाळी तिच्यासाठी उठून जो एवढा तयार झालो होतो त्याचा काही एक उपयोग झाला नाही , पण मला त्या गोष्टीच इतक काही वाटत नव्हत मी फ़्क़्त तिलाच पाहत होतो , त्यातच मी विस्कटलेले केस निट विंचरले , शर्टचा इन निट केला , तेवढ्यात ती म्हणाली "भेटूया संध्याकाळी , येणार आहेस ना इथे ?" मी हि लगेचच "हो , येणारच ना " अस अगदी धाडसाने उत्तर दिल आणि आम्ही दोघही आपापल्या ऑफिस च्या दिशेने निघालो .
आजकाल तशी आमची रोज भेट होते , फोन होतात , मेसेजेस तर ठरलेलेच , एक अनोळखी असणारी ती कधी बोलेल कि नाही ह्याची खात्री हि नव्हती , ह्या रोजच्या प्रवासात तिच्याविषयीच्या अनेक आठवणी मी मनात साठवत चाललो होतो तिने साडी नेसली होती त्या दिवशी तिला पाहून ह्रुदयातुन घायाळ झालेला मी , आणि त्या एका शनिवारी ट्रेन मध्ये चढताना झालेला तिचा तो स्पर्श तेव्हा अंगातून वीज धावून जावी अस वाटण , असे खुप काही क्षण जोडले जात होते , तिच्याशी बोलण्यात जी मजा आणि तो आनंद होता ना तो वेगळाच होता .पण माझ्या मनात तिच्या विषयी जे प्रेम होत ते तिच्या मनात माझ्याविषयी होत कि नाही ह्याचा काही अंदाज येत नव्हता तरीही जे चालल होत ते सगळं अगदी स्वप्नातल्या सारख अगदी छान चालल होत.
पण .... हो... हा "पण" इथेही आलाच , सगळ काही निट चालल होत माझ्या बाजूने पण जे काही घडल किंवा घडायला लागल होत ते सारच अनपेक्षित , हे सार अनपेक्षित होत की मी ह्याबद्दल विचारच केला नव्हत म्हणून अनपेक्षित वाटत होत , माहीत नाही . सांगेन ह्या अनपेक्षित गोष्टीबद्दल पुढच्या भागात .
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-