इतर भाग वाचण्यासाठी :- २० मिनिट-भाग 1 २० मिनिट भाग-2 २० मिनिट -भाग 3
"कळत नाही का तुला ,माझी होणारी अवस्था ? कि कळतंय तुला पण दाखवत नाहीस ? राग येतोय मला तुझा त्यावेळी जेव्हा तू बोलत नाहीस तेव्हा , का अशी वागतेस नेहमी , बोल ना " असे काही संवाद चालू असतात माझेच माझ्या मनाशी आजकल . सार काही ठीक चालू होत , मला वाटल होत माझ्या प्रेमाची गाडी सुसाट जायील. तसे आम्ही रोज भेटायचो जाळी पलीकडून कधी नजरेने तर कधी फोन वरून बोलन व्हायचं , शनिवार तर माझ्यासाठी सोन्याचा दिवस असायचा , त्या दिवशी तिच्यात आणि माझ्यात ती जाळी हि नसायची , आम्ही दोघही थेट समोरासमोर . तत्वांशी , अगदी तत्व वगेरे म्हणता येणार नाही पण जे मी स्वतालाच जे नियम लावून ठेवले होते ते मी तिच्यासाठी खुशाल मोडत चाललो होतो , आतापर्यंत एखाद्याही मुलीला मी फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली नव्हती ती तिला पाठवली , किती हि जवळची मैत्रीण असली तरी कुणा मुलीला मी तिचा फोन नंबर विचारला नव्हता , तो हि मी तिला विचारून बसलो , रोमांटिक मधला र हि न उच्चारणारा मी तिच्याशी इतक्या लाडाने आणि रोमांटिकपने कसा बोलायचो हे तर माझ मलाच न सुटलेलं कोड . तिला प्रपोज करण वगेरे मला जमलच नव्हत कधी , शब्दांच्या आडून मी तिला दाखवून द्यायचो ते इतकच , पण मी ते थेट प्रपोज करण जाणून बुजून टाळत होत कारण मनात भीती होती टी तिच्या नकाराची, बहुतेक नकारची हि तितकीशी भीती नव्हती जितकी तिला हरवून बसायची होती माझ्या आयुष्यातून .
पण माझ्या ह्या प्रेमाच्या रस्त्यात एक स्पीड ब्रेंकर आलाच .... बहुतेक माझ्या ह्या गाडीला कायमचाच ब्रेक लावायला लागतो का अस वाटायला लावणारा .
दरोरज एकटी प्रवास करणारी ती , आता तिच्या रोजच्या प्रवासात तिच्या सोबत तिच्याच ऑफिस चा एक मुलगा असायचा , तो हि आमच्याच लोकल च्या रूट वर राहायचा , आधी मला इतक काही वाटायचं नाही पण नंतर नंतर माझ्या मनाचा तीळपापड व्हायचा, तिला तिच्या सोबत हसताना पाहायचो , तिला त्याच्याशी इतक मनमोकळेपणाने बोलताना , वावरताना पाहायचो तेव्हा त्या मुलाचा हेवा वाटायचं मला , मनात राग हि यायचा तिच्यावर पण त्या मुलावर कधीच राग असा म्हणून यायचा नाही बहुतेक तो माझ्या इतक्या क्लोज नव्हता जितकि ती मला क्लोज वाटायची म्हणून असाव कदाचित, तय दोघांच सोडा माझ स्वताच मन हि आता माझ्याशी निट वागेना अस वाटायला लागल होत , दुतोंडी झाल होत , कधी हे सांगायचं तर कधी ते , एकदा सांगायचं कि नाही ते दोघे फ़्क़्त मित्र असतील अस म्हणून समजूत घालायचं तर कधी "त्या दोघांच असेल प्रेम एकमेकांवर " अस बोलून मला पुन्हा घाव देवून टाकायचं . काय कराव काही कळायचं नाही मला त्या वेळी , मी खूप विचार करून ते सार टाळायचा प्रयत्न करायचो , लोकल मध्ये हि डोळे बंद करून घ्यायचो , पण आत मध्ये घुसमट चालूच असायची .स्वताचाच राग यायचा मला , कधी कधी वाटायचं विचाराव तिला डायरेक्ट ," तुला मी आवडतो का ?",वाटायच भांडाव तिच्याशी, बोलून टाकाव मनातल सार , पण पुन्हा स्वतालाच आवरायचो , उगाच वरवरच हसून टाकायचो , मुद्दाम तिला त्याच्या नावाने चिडवायचो , ती जेव्हा "तस काही नाही आहे आमच्यात " अस म्हणायची ना तेव्हा मनात कुठ बर वाटायचं पण परत विचार सुरु "ती मला खोट तर नसेल ना सांगत ?, ती का सांगेन मला तीच त्याच्या वर प्रेम आहे ते ?, आणि खरच नसेल तस त्यांच्यात काही ,पण तुझ्याविषयी तिला काय वाटत ते कुठ सांगितलय तिने " असे एका मागून एक प्रश्न गर्दी करायला लागायचे , वेड लागायचं बाकी होत फ़्क़्त मला . कधी कधी तिला माझ्या विषयी काही वाटत का हे जाणून घ्यावास वाटल तर ,मुद्दाम नाही जायचो तिच्या स्टेशन वर , भेटायचो नाही तिला , बोलायचो हि नाही . वाटायचं विचारेल मला ती स्वताहून "का नाही आलास आज , का बोलत नाहीयेस " पण ती हि हा सारा गुंता वाढवून ठेवायची , काहीच विचारायची नाही , स्वताहून बोलायची हि नाही , शेवटी मीच बोलन सुरु केल कि ती बोलणार अस नेहमीच झाल होत आजकल, तेव्हा तर पारा इतका चढायचा माझा कि , विचारानी डोक फुताय्ची वेळ यायची , डोळ्यातून पाणी येवून गालावरून ओघळेल अस वाटायचं , पण डोळे मिटून पुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचो , आणि पुन्हा नॉर्मल व्हायचो , रात्री झोपता झोपता "तीच आणि त्याच " नात कस खर आहे , ते दोघच कसे ठीक आहेत एकमेकांसाठी, आनी मी कसा नालायक , ती माझी कधीच होणार नाही अस मन सांगत राहायच आणि त्याच विचारात सकाळ व्हायची पण सकाळी पुन्हा नव्याने सुरुवात व्हायची , तिला पाहायचो आणि वाटायचं "नाही , ती होईल माझी , वेळ लागेल तिला मला समजून घ्यायला , आवडेल तिला मी पण , नसेल सांगत ती मला , तिला वाटत असेल मी सुरुवात करावी सांगायला "अस खूप काही.
इतक सार होवूनही कुठल्याच बाबतीत स्पष्टता येत नव्हती , दिवसांमागून दिवस जात होते , आणि त्यातच एक दिवस उजाडला , कंपनी कडून मला दोन महिन्यासाठी बाहेर गावी जायचं होत , अस कळाल , आणि माझ्या मनातल्या प्रश्नानीही सुटकेचा श्वास सोडला , दोन महिने मी बहुतेक ह्या रोजच्या तिच्या विचारातून दूर जाईल अस वाटल होत , ह्या दोन महिन्यात मी माझ एकतर्फी प्रेम विसरून जाव असा मनाने मला आदेश दिला , बहुतेक तिला हि माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असावा पण तिने बोलून दाखवला नसावा, तिला ही माझा पजेसिवनेस दिसला असावा , बहुतेक ती हि यातून सुटणार होती . त्यादिवशी त्या मुंबईच्या ऑफिस मध्ये माझा शेवटचा दिवस होता , त्या दुसर्या शहरात तर सोमवारी जायचं होत , आणि मी रविवारी निघणार होतो , पण मी शनिवारी मुद्दाम सुट्टी टाकली होती , शुक्रवारी सकाळी जेव्हा ती मला स्टेशन वर भेटली तेव्हा मी तिला "मी बाहेरगावी चाललोय , दोन महिन्यांसाठी " अस सांगितल , मला वाटल होत ती काहीतरी रियेक्ट होईल पण नाही ती काहीच बोलली नाही तस , फ़्क़्त अभिनंदन कल इतकच , जाता जात विचारल ," संध्याकाळी येशील ना इथे तेव्हा बोलू , मी निघते " , अस बोलून ती निघून गेली . तेव्हा वाटल, खरच तिच्या मनात माझ्या विषयी काहीच नाहीये , बहुतेक हेच नशिबात होत अस मानून मी मन खट्टू न करता ऑफिस ला गेलो , संध्याकाळी ऑफिस मध्ये ऑफिस च्या स्टाफ नि एक छोटीशी पार्टी ठेवली होती , रात्रीचे ९ वाजले ऑफिस मधून निघता निघता , ऑफिस सूटन्याच्या वेळेपासून ते आतापर्यंत माझा मोबाईल एकदाही वाजला नाही , त्यामुले मी ही त्याच्या कड़े दुर्लक्ष कल , ती निघून गेली असेल कधीच , शेवटची भेट हि नाही झाली अस मनात बोलत राहिलो , माझ्या ऑफिस च्या स्टेशन वर इतकी गर्दी नव्हती त्यावेळी पण मन म्हणत शेवटच जावून येवुया तिच्या स्टेशन वर , ती नसली म्हणून काय झाल , तिच्या आठवणी तरी आहेत , म्हणून गेलो मी तिच्या स्टेशन वर , उतरलो तेव्हा नजर फिरवली असेल का ती इथ अशी आशा मनात ठेवून ,पण नाही दिसली ती .
मग तसाच जावून एका खिन्न मनाने एका बाकड्यावर जावून बसलो लोकल ची वाट बघत , तोच माझ्या समोर येवून ती उभी राहिली . तिला तिथे पाहताच, माझ्या मनातले सारे विचार पळून गेले , मि स्तब्ध तिच्या समोर उभा राहिलो , काहीच न बोलता , तेवढ्यात तिने माझ्या एक कानशिलात जोरदार लगावली,तेव्हा कुठ मी माझ्या समाधीतून बाहेर आलो , काय झाल काही कलालच नव्हत मला, तोच दुसरा एक धक्का , ती मला बिलगून रडायला लागली , स्टेशन वरच्या २-३ जणांच्या नजरा माझ्याकडे बघायला लागल्या होत्या , मला अगदी अवघडल्यासारख झाल होत , पण तीच अस वागण हि तितकाच माझ्यासाठी धक्कादायक असल तरी मला आवडणार होत . तिला माझ्या मिठीतून बाहेर काढण्याचा मला जमत नव्हत , कदाचित मला ते जमवून घ्यायचाच नव्हत . तिने स्वतालाच सावरल आणि माझ्या कडे रागाने बघायला लागली , मी हि " काय झाल ? काय झाल रडायला ?" अस विचारयला लागलो , तिने हि मग रागारागतच उत्तर द्यायला सुरुवात केली , "आपल ठरल होत ना , संध्याकाळी भेटायचं म्हणून ,किती वाजले बघ , किती फोन करत होते , फोन पण स्वीच ऑफ ? नाहीये ना तुला माझी काळजी ? तुझ्या साठी थांबलीय मी इथ पण तुला काहीच नाही ना , वाटल होत बोलशील माझ्याशी , करशील मला प्रपोज , नाही मीच वेडी आहे तुझ्या प्रेमात , तुला काय? " अस एका मागून एक तीच बोलन सुरु होत नि तीच हे बोलन मला माझ स्वप्न , प्रेम पूर्ण होत असल्याची अनुभूती देत होत . त्यावेळी मी काय करू , मला काहीच सुचेना , मी फ़्क़्त तिच्याकडे मठठा सारखा बघत होतो , तीच माझ्या वरच प्रेम न्याहाळत होतो , आता माझी वेळ होती प्रेम व्यक्त करायची पण कस करू ? , मग मीही तिला रागाचा आव आणूनच विचारल "आत्ता सांगतेस प्रेम आहे ते , आधी सांगायचं ना , मला काय स्वप्न पडल होत का तुझ हि माझ्यावर प्रेम आहे ते कळायला ?" तीच ह्या सार्या वर उत्तर तयारच होत , ती म्हणाली "मुली नसतात सांगत कधी मुलांना त्यांच प्रेम आहे ते , नसतात करत त्या प्रपोज मुलांना , एवढ हि नाही कळत तुला ?, दिसत नवहत का तुला माझ्या डोळ्यात तुझ्यावरच प्रेम ? " अस आमच बोलन चालूच होत , तशातच आम्ही आमची ट्रेन पकडली .
मी आज जम खुश होतो , माझ पहिल वहिल प्रेम पूर्ण झाल होत , पण दोन महिने दुरावा सहन करायला लागणार होता त्याच थोड दुखः होतच पण तिच्या वरच्या प्रेमापुढे ते काहीच नव्हत . मोबाईल , मेसेज वगेरे सार असल तरी हे दोन महिने कसे सरनार होते माहित नाही .
- प्रफुल्ल शेंडगे .
इतर भाग वाचण्यासाठी :- २० मिनिट-भाग 1 २० मिनिट भाग-2 २० मिनिट -भाग 3
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-