वैयक्तिक कारणानिमित्त बस नि प्रवास करत
निघालो होतो .... आजूबाजूला छान हिरवाई पसरली होती .... पावसाच्या हलक्या हलक्या
सारी कोसळत होत्या ... बसच्या खिडकीतून डोंगरावर उतरलेले ढग पाहून जणू साक्षात
स्वर्ग च पृथ्वीवर उतरला आहे कि काय ह्याची प्रचीती येत होती .... सोबत होती हैडफ़ोन
च्या गुहेतून येवून कानात गूंजनारी एफ .एम
. वरची गाणी.... आणि अशातच एक रोमांटिक गाण्याला सुरुवात झाली ... मग काय गाण्यच्या शब्द्भोवती
मन पिंगा घालायला लागल ... आणि गाडीच्या वेगानी वाढणारी ती मंद हवा बोचक होवून
अंगावर शहारा उभी करायला लागली ... तरीही
तोंडावर आपटणारा तो मदहोश वारा हवा हवासा वाटत
होता .... डोळे अलगद बंद करून मी त्या गानाच्या शब्दात आणि संगीतात स्वताला
अडकवून दिल .... आणि बंद डोळ्ण्यासमोर आला
तो तिचा चेहरा आला ...
मोकळे सोडलेले केस, एखाद्या मोरपीस फिरवावा तसे चेहऱ्यावर फिरत आणि त्यांना सावरताना तिची उडालेली धांदल , दोन डोंगरांच्या
मधून सूर्य उगवावा तसं भुवयांच्या मधोमध लावलेली छोटी टिकली , चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि सोबतीची निरागसता ..तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीत
घडलेलं हेच होत तीच रूप ... शेअर रिक्षा मध्ये घडलेली आमची हि पहली भेट... पहील्या नजरेतल प्रेम
वगैरे अस काही घडलं नव्हत आमच्यात .... पण अधून मधून आमची भेट व्हायला सुरुवात
झाली होती .. अगदी अनोळखी असणारे चेहरे आता
एकमेकांना पाहून स्मितहास्य करायला लागले होते ... बोलण्याच्या बाबतीत
मात्र "दिल्ली अभी दूर थी "
अशीच परिस्थिति होती ... पण कैलेंडर मधल्या तारखेसोबत तिच्यातली आणि माझ्यातली ओळख
गडद होत गेली ... हसण्या बोलण्या सोबत मैत्री वाढू लागली होती .... सोबतच वाढत
होती ती माझ्या मनात तिच्याबद्दल ची अनामिक ओढ ... पण मन मात्र बोलायला घाबरत होत
... पहिलं प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सारखी माझीही अवस्था झाली होती ... प्रत्येकवेळी बोलका
वाटणारा तिचा चेहरा ह्या प्रश्नाच उत्तर
द्यायला तयार नव्हता अस वाटत होत ... दिवसामागून दिवस जात होते .... मावळत जाणारा प्रत्येक दिवस तिच्यातला समंजसपणा , जे आहे त्यात सुख मानणारी , जगण्याला खर्या अर्थाने जगणारी अशा अनेक रूपांच दर्शन मला घडवत होता
.... अखेर तो दिवस माझ्या आयुष्यात
आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो ... माझ्या मनी पडलेल्या प्रश्नाच आणि मनात
तिच्या विषयीचे प्रेम भाव मला तिच्या चेहऱ्यावर हि दिसायला लागले होते ... नजर
मिळवून हळूच नजर झुकवण , माझ्यासोबत
बोलताना चेहऱ्यावर येणारी गुलाबी हृदयाला भिडली जात होती ..आम्हा दोघांना हि
एकमेकांना एकमेका प्रती असलेल प्रेम उमगल होत .... न सांगता न बोलता आम्ही दोघांनी
नजरेने प्रेम व्यक्त करुण टाकल होत .... दिवसेन दिवस भेटी गाठी वाढायला लागल्या
....प्रत्येक प्रेमी युग्ला प्रमाणे आमचेहि
दिवस सुरु झाले होते .... प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात
होत्या ... पुढच आयुष्य एकत्र जगाव म्हणून आम्ही घरच्यांना आमच्या प्रेमाची कल्पना
द्यायचा निर्णय घेतला पण मनात भितिनी घर करायला सुरुवात केलि होती , घरचे स्वीकारतील
का आमच नात ? पण मन घट्ट करुण आम्ही आमचा सांगण्याचा निर्णय घट्ट केला मनात एक सकारात्मक आशा घेवुनच
.... ठरवल्या प्रमाणे तो दिवस उजाडला हि आणि आम्ही केल व्यक्त प्रेम
घरच्यांसमोर ... आणि जे घडायच होत ते
घडल ....
आज
त्या गोष्टीला दोन वर्ष होवून गेले
होते ... पण तरीही रोज तिचा पहिल्या
भेटीतला चेहरा आठवतो... विचारांनी
डोळ्यांचे काठ पाणवले होते, अंगावरचे शहारे
विरून गेले होते .... कानात वाजणारे गाणी कधीच मुके झाले होते माझ्यासठी ... ओघळणारे अश्रू थांबवण्यसाठी मी विचारांच्या ह्या डोहातून हलकासा बाहेर आलो आणि
डोळ्यांचे काठ अलगदपणे पुसली... भूतकाळातल्या गोष्टींना थोडस सारून वर्तमानात मी
प्रवेश केला आणि बाजूच्या सिट वर बसलेली , अलगद माझ्या खांद्यावर डोक ठेवून विश्वासाने झोपलेल्या
माझ्या सौभाग्यवती कडे अर्थात बायको कडे
पाहिलं ... तिला पाहून माझ्या चेहर्या वर
स्मितहास्य उमटलं .... दोन-अडीच वर्षा पूर्वी घेतलेल्या आणाभाका आम्ही रोज पूर्ण करत
होतो... रिक्शा शेयरिंग ते संसारच गाड़ा असा प्रवास सुरु झाला होता ... घरच्यांच्या संमतीने आम्ही सात
फेरे घेतले होते आणि आज आमच्या लग्नाला आता दीड वर्ष झाला होता ...
ह्या दीड वर्षांच्या संसारातहि मला तिच्यात तीच पहिल्या भेटीची क्षण दिसतात ... माझ्या
प्रेमासोबत मी माझ आयुष्य जगत होतो हा विचारच सुखावह होता ... बहुतेक माझ्या सारखा
नशीबवान मीच असेल असा विचार माझ्या मनात आज हि येतो ....
- प्रफुल्ल शेंडगे
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-