संध्याकाळी
५:३० ची
वेळ होती , नेहमी
प्रमाणे मी ऑफिस मधून रूम वर
जायला निघालो , पावसाचे
दिवस होते , पण
पाऊस नसला तरी हवेत मंद गारवा
पसरला होता , ऑफिस
मधून निघाल्या पासूनच मनात
थोडस उदास उदास वाटत होत ,
ऑफिस मध्ये
हि काहि विशेष घडलं नव्हत ,
रूमवर जावून
तोंडावर सपासप पाण्याचा मारा
केला , वाटल
होत थकव्याने उदास वाटत असेल
म्हणून पण त्या पाण्याचा फ़्क़्त
चेहऱ्यावर तेवढा फरक पडला पण
मनातली अस्वस्थता तशीच कायम
होती ... थोडा
बदल म्हणून बाहेर फिरायला
निघालो , सूर्य
मावळायला आला होता ,
आकाशात पिवळ्या
रंगाची चादर पसरली होती ,
मधूनच एखादी
वारयाची एक गारेगार झुळूक
अंगाला स्पर्श करून जायची
त्यामुळे अंगावर हलकासा शहरा
येत होता , मी
तसाच पुढे पुढे चालत होतो ,
त्यावेळी फ़्क़्त
माझे पाय चालत होते मनातले
विचार अगदी सिग्नल ला थांबलेल्या
गाड्यांसारखे थांबून गेले
होते , पण
किती वेळासाठी ते काही माहित
नव्हत
चालत
चालत एका चहा च्या कॅन्टीन
पाशी येवून बसलो आणि चहा
वाल्याला एक चहा मागितला ,
त्याने माझ्या
कडे पाहिलं आणि म्हणाला "भजी
देवू का दादा ? गरम
गरम आहेत ” , मी
होकारार्थी मान डोलावली ,
काय चालल होत
माझ मलाच कळत नव्हत ,
समाधी लागल्यासारखा
मी शून्यात पाहत बसलो होतो ,
चहाचा वाफाळणारा
वास दरवळायला लागला होता आणि
त्याच सोबत उकळत्या तेलात
भजी तळायला सोडल्यावर येणारा
तो आवाज जणू माझी ती समाधी
तोडू पाहत होता , थोड्याच
वेळात चहा आणि भजी टेबलावर
ठेवून चहावाला निघून गेला ,
मी गुरफटलेल्या
विचारातच चहाचा कप उचलला आणि
तोंडाला लावला तसा गरम चहाने
ओठांना जो चटका बसला त्याने
थोडासा मी माझ्या समाधीतून
बाहेर पडलो , आणि
भजी सोबत चहाचा आस्वाद घ्यायला
लागलो , त्याच
दरम्याण त्या पिवळ्या नभांच्या
चादरीवर काळे ढग पसरले होते
, वारा
थोडा जोरात वाहू लागला होता
, पाऊस
सुरु होणार ह्या शक्यतेने मी
तो चहाचा शेवटचा घोट घेतला ,
चहावाल्याला
पैसे दिले आणि मी निघणार
तेवढ्यात पावसाच्या सरी धावत
आल्या, जणू
काही त्या मी निघण्याचीच वाट
पाहत होत्या , आणि
येताना मी सोबत छत्री हि आणली
नसल्यामुळे तिथेच थांबन्या
शिवाय दुसरा पर्याय हि नव्हता
, मग परत
जावून त्या टेबलाजवळ बसलो
आणि रस्त्यावर नजर फिरवत
पाहायला लागलो , अचानक
आलेल्या पावसामुळे लोंकाची
जी त्रेधातीरपीट
उडालेली दिसत होती
ती न्याहाळायला लागलो ,
जो तो मिळेल
त्या आडोशाला उभा राहत होता
, आत्ता
पर्यंत माणसांनी गजबजलेला
रस्ता जणू पावसाने गिळून नेला
कि काय असा वाटायला लागल होत
त्या निर्मनुष्य झालेल्या
रस्त्याकडे पाहून .
अशीच नजर
फिरवताना माझ लक्ष गेल ते एका
आडोश्याला उभ्या असलेल्या
एका मुलीकडे , जेमतेम
6-7 वर्षांची
असेल अंगावर पिवळा धमक फ्रोक
, केस
विस्कटलेले एका कडेवर एक
मुलगा होता अगदी 1-2 वर्षांचा
, अंगावर
फ़्क़्त एक चड्डी आणि बाकी पूर्ण
अंग उघड असलेला , धुळीने
पूर्ण अंग मळकटल होत ,
आणि ती मुलगी
कौलावरून पडणार्या पावसाच्या
पाण्यने त्याच तोंड धुवत होती
पण त्याची पावसात भिजण्याची
धडपड अगदी दिसत होती आणि मग
काय शेवटी त्याच्या हट्टा
समोर तिला हि हार
मानावीच लागली ,
दोघानिही चिंब
भिजायला सुरुवात केली ,
आणि ह्या भावंडा
कडे पाहून मनातले झोपलेले
विचार खडबडून जागे झाले आणि
सार्यांनी डोक्यात एकच गर्दी
केली , थोडस
सावरून स्वतच्या विचारात
पुन्हा
गुंतून गेलो , आणि
पहिल्याच विचार बरोबर एक दृश्य
डोळ्यासमोर उभ राहील ते म्हणजे
.... लहानपणी
पाऊस आल्यावर त्या पावसात
भिजण्याची जी आपली सवय होती
ती आठवली , पावसात
ओल चिंब भिजायचं , साठलेल्या
डबक्यात पाणी उडेपर्यंत जोराने
मारलेल्या उड्या
, कागदी
होड्या बनवून मित्रांच्या
होडीसोबत लावलेली पैज ,
किती बेफिकीर
पणे आणि आनंदाने आपण आपल बालपण
घालवल होत ह्याचा प्रत्येय
यायला सुरुवात झाली होती
त्यावेळी आपल्याला कशाचच
टेन्सन नव्हत फ़्क़्त एन्जोय
करायचो आपण आपला प्रत्येक
क्षण , आई
बाबांकडे खेळणी- चोकलेट
साठी हट्ट करायचो
,वाढदिवसाला
नवीन कपड्यांसाठी रुसून बसायचो
, तरी पण
आज आपण प्रत्येक सुखाच्या
मागे धावत असतो , कितीही
भेटल तरी आणखीची हाव आपल्या
पासून काही सुटत नाही ,
आणि हि मुल
अंगावर पुरेसे कपडे नाहीत,
खायला अन्न
भेटेल कि नाही ह्याची शास्वती
नसताना हि आयुष्य कस जगत असतील
हा प्रश्न मनाला चटका लावून
जात होता ,ढगांच्या
एका कडकडाटाने मी विचारांच्या
ह्या तंद्रीतून बाहेर आलो .
पावसाचा
जोर काही अंशी कमी झाला होता
आणि लोक आडोशा पासून लांब
होवून स्वतच्या वाटेला निघाली
होती.. ती
भावंड हि तिथून निघून कॅन्टीन
जवळ येतान मला दिसली ,
कॅन्टीन च्या
शेड खाली आल्यावर त्या मुलीने
आपल्या भिजलेल्याच फ्रोक ने
आपल्या छोट्या भावच भिजलेले
डोक आणि तोंड पुसायला सुरुवात
केली त्यावेळी त्या भावाच्या
चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या
चेहर्या वरची माया पाहून
भावा-बहिणीच
नात किती गोंडस आहे ह्याचा
पुन्हा एकदा अनुभव आला ,
अंग पुसून
झाल्यावर तिने त्याला पुन्हा
एकदा कडेवर घेतल आणि तिथून
निघू लागली आणि मी पण त्यांच्या
चेहर्या वरचा आनंद पाहून मनोमन
खुश होवून गेलो होतो ,दर
वेळेस च्या पावसासारख ह्या
पावसाने हि मला काहीतरी दिल
होत , माझ्या
मनावरची मळभ दूर केली होती
आणि मी काहीतरी नवीन मौल्यवान
सापडल्याच्या अविर्भावात
पुन्हा रूम कडे निघू लागलो
...
-प्रफुल्ल शेंडगे
तुझ्या या गोष्टीत वाचणाऱ्यानासुद्धा काहीतरी नक्की सापडेल ..
ReplyDeleteधन्यवाद...
Delete