अज्ञानात सुख असत अस म्हणतात , खरंच !, खरच आहे ते. जेव्हा मला तिच्या विषयी काहीच माहित नव्हत तेव्हा हि मी तिच्या स्वप्नात रमायचो , तिचा विचार करत राहायचो , कधी भेटेल , कधी बोलोल ह्याचे तर्क लावत बसायचो , कधीतरी ती माझी होईल हि आशा सोबत घेवून फिरायचो , पण जेव्हा तिची नि माझी ओळख झाली , जेव्हा तीच मन माझ्या पुढ्यात उलगडत गेल तेव्हा मात्र थोडासा हिरमोडच झाला "सपना तुटा है तो दिल कभी जलता है , हा थोडा दर्द हुवा पर चलता है " अशीच काहीशी अवस्था झाली होती माझी , म्हणजे मी काही तिला प्रपोज करून तिच्या कडून मला नकार वगैरे मिळाला नव्हता , आणि विचारात काही विसंगती हि नव्हती आमच्या ,गुण-दोष , ग्रह -तारे अस काहीच नाही , तिला मी आवडलो कि नाही हा तर फार लांबचा विषय होता कारण तिच्या काळजात कुणा दुसर्याचाच चेहरा होता, स्पष्ट कधी सांगितल नाही तिने पण तिच्या बोलण्यात , वागण्यात आणि डोळ्यातही "तो" दिसत होता .. आणि ते काय म्हणतात ना पजेसिवनेस वगैरे , अगदी तसं वाटायचं मला त्या क्षणी पण तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने , स्माईल ने मि सारच विसरून जायचो , एकतर्फी का होईना पण प्रेम होत ना माझ तिच्यावर , आणि मला तिला खुश पाहायचं होत , माझ्यामुळे किंवा दुसर्या कुणामुळे काहीच फरक पडत नाही .
तू नसलीस जरी सोबत माझ्या , मी तुझ्या नेहमीच सोबत राहील
हसून एकदा आरशात पहा , ओठांवर तुझ्या मीच दिसत राहीन ,
वाटलच कधी बोलाव माझ्याशी, एक हाक फ़्क़्त मनातून दे
भासला एकांत कधी तर ,आपल मानून एकदा , हात माझा हातात घे.
-प्रफुल्ल शेंडगे
(काल्पनिक कथा )
blog address :- http://prafulla-s.blogspot.in
Nice .. manatal bolalas ..
ReplyDelete