ऑफिस च्या कामानिमित्त दिल्लीला जायचा योग आला , मी आणि आणि आणखी ३ जन जायचं ठरल होत , तशी हि माझी पहिलीच दिल्ली वारी होती बाकीचे आधी जावून आले होते त्यामुळे माझ्या मनात दिल्ली विषयी अधिक कुतहूल होत ... शनिवारी मुंबई सेंट्रल वरून आम्ही मुबई राजधानी मधून आमचा प्रवास सुरु केला , माझ्यासाठी ते तिघे तसे नवीन होते कारण माझ ऑफिस आणि त्याचं ऑफिस वेगळ्या ठिकाणी होत , फोन वर तास बोलन व्हायचं पण प्रत्यक्षात जास्त बोलन झाल नव्हत , ट्रेन मध्ये आमच्या थोड्या बहुत गप्पा झाल्या , तशी ओळख वाढायला लागली , दुसर्या दिवशी सकळी ०८:३० च्या सुमारस आम्ही नवी दिल्ली स्टेशन वर पोहचलो ...
थंडीचा महिना असल्याने हवेत बराच गार वरा वाहत होता , घामाच्या थारोळ्यात जगणारे आपण मुंबईकर आपल्याला ह्या असल्या कडक थंडीची कधी सवयच नसते, तिथूनच टैक्सीने आम्ही हॉटेल च्या दिशेने प्रवास केला , स्टेशन ते हॉटेल मधल्या प्रवासाची कहाणी तशी रोचक आणि हसायला लावणारी असली तरी तीची आठवण आमच्या चौघातच दडून राहिलेली आहे , रविवार चा दिवस असल्याने आम्ही फ्रेश होवून बाहेर फिरायला जायचा बेत आखला आणि त्याप्रमाने तयारी करून सुमारे साडेबारा - एक च्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडलो , विचारपूस करत करत आम्ही एका छानश्या हॉटेल मध्ये जावून नॉन-वेज जेवानावर ताव मारला आणि तिथूनच कुतुबमिनार च्या दर्शनासाठी निघालो , दुपारची वेळ असली तरी सूर्यदेवांच दर्शन दुर्लभ होत , अर्ध्या तासात आम्ही कुतुब मिनार परिसरात पोहचलो , तिथ जावून एकदा त्या कुतुबमिनार ला डोळे भरून पाहिलं आणि आम्ही सगळेच फोटोग्राफर च्या आत्म्यात प्रवेश केल्यासारखं फोटो काढायला लागलो , कधी ह्या अंगेल ने तर कधी त्या , कधी ती पोज तर कधी सेल्फि, ना-ना पद्धतीने फोटो काढून आम्ही आमचा दौरा पुढे सरकवला , आणि तिथूनच जवळ असलेल्या "इंडिअन हेंडीक्राफ्ट इम्पोरीम ” मधील बनवलेल्या कलाकुसरी पाहण्यात मग्न झालो , तिथल्या सार्या बनवलेल्या कलाकृती पाहून इंडिया गेट ला जाण्यासाठी आम्ही ऑटो मध्ये बसलो , ऑटो वाला थोडा विचित्रच वागत होता , निट उत्तरच देत नव्हता मग रिक्षा मीटर चा दर विचारून आम्ही , आम्ही नाही मी त्याला जो त्रास (त्रास म्हणजे काही छळल नाही ) दिला त्यने तर तो आणखीनच खवळला , त्याला प्रत्यके किलोमीटर चा दर माहित होता कि नाही माहित नाही पण मीटर १४ हजारच आहे ते पक्क माहिती होत , तेच तो वारंवार सांगत होता , आणि त्याला विचारल कि इंडिया गेट किती लांब आहे तर त्याच उत्तर ठरलेल "मुझे नही पता ” त्याच्या ह्या उत्तराने आम्ही हैरान झालो आता मात्र आम्ही विचार केला तशी ही बाहेर थंडी कडाक्याची होती त्यामुळे इंडिया गेट ला जायचा प्लान रद्द करावा , आणि त्याप्रमाणे आम्ही रिक्षा मध्येच थांबवून आमचा मोर्चा पुन्हा हॉटेल कडे वळवला, हॉटेल वर पोहचलो आणि आम्ही आमच्या-आमच्या रूम मध्ये जावून हिटर लावून बसलो , रात्रीच जेवण रूम वरच मागवलं , दिवसभरचा थकवा आणि दुसर्या दिवशी ऑफिसला लवकर निघायचं म्हणून आम्ही लवकरच झोपून गेलो .
दुसर्या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास हॉटेल मधून निघून आम्ही आमच आयुष्य मेट्रो च्या त्या रंगीबेरंगी रंगात रंगवून घेतलं , निळ्या , लाल आणि पिवळ्या लाईन मधून प्रवास करून ऑफिस गाठल जावू लागल , संध्याकाळी ६ ला आम्ही ऑफिस मधून बाहेर पडायचो , त्यावेळी बराच अंधार झालेला असायचा आणि गारवा हि तितकाच त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही ऑफिस मधून थेट हॉटेल वर आलो आणि हॉटेल च्या कॅन्टीन मध्ये जावून बसलो , गरम गरम चहा आणि मिरची भजी ची आर्डर दिली , थोद्या वेळानी वेटर मिरची भजी घेवून आला तेव्हा मात्र आमचा असा हशा पिकला कि हॉटेल मधले सारेच आमच्या कडे पहायला लागले होते ,पण आमच हसू काही थांबायचं नाव घेयीना , कारण मिरची भाजी चा आम्ही बांधलेला अंदाज वेगळा होता आणि पुढ्यात आलेली ती मिरची भजी वेगळीच , सिमला मिरचीची त्यात भरलेला कांदा आणि कोबी , पण चव लाजवाब होती , चहा भजी संपली तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या , इकडच्या तिकडच्या , आमच्या मैडम ने सांगितलेले त्यांच्या आयुष्यातले अनुभव , गोष्टी , त्या वर होणारा आमचा हास्यकल्लोळ सगळच लय भारी, सुमारे १:३०- २ तास गप्पा चालू होत्या , हॉटेल मधले सगळे कर्मचारी आमच्या कडे पाहत होते , म्हणून तिथून उठून आम्ही जेवणाच्या हॉटेल मध्ये गेलो , तिथेही तोच धुमाकूळ , जेवण आटपून ११:३० ला आम्ही आपापल्या रूम वर गेलो , नंतर च्या दिवशी ऑफिस वरून काहीही झाल तरी फिरायला जायचा असा बेत आखला आणि ऑफिस वरून खरेदी करायला बेंगाली मार्केट गाठलं , तिथल्या एका स्वीट च्या दुकानात , एक-एक करत आम्ही कित्येक पदार्थ त्याच्या कडून मागून घेत होतो , आणि खात होतो , कधी मी , कधी दुसर कोणीतरी चव बघायला एक एक पदार्थ मागत होतो , आणि जो चांगला वाटला तो पदार्थ खरेदी पण केला , आता मात्र चैट खायचा होता , एका स्थानिकाणे सांगितल होत कि UPSC भवन जवळच्या प्रभू चैट वाल्याजवलचा चाट फेमस आहे म्हणून आम्ही ऑटो ने तिथे गेलो पण आम्ही पोहचेपर्यंत ते दुकान बंद झाल होत , पण त्या दिवशी आम्ही चाट खायचाच असा निश्चयच केला होता म्हणून तिथून पुन्हा आम्ही बेंगाली मार्केट मध्ये आलो आणि आमचा चाट खायचा निश्चय एकदाचा काय तो पूर्ण केला आणि तिथून पुन्हा हॉटेल च्या दिशेनी आमची स्वारी निघाली , टी थेट होटल रूम वर जावूनच थांबली .
पुन्हा सकाळी तेच ऑफिस ला जायच रूटीन , आज आमचा दिल्लीतला शेवटचा दिवस होता , रात्री च्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु करणार होतो , ऑफिस मधून सुटल्यावर आम्ही थोड शॉपिंग करायला गेलो ,शॉपिंग करून हॉटेल मध्ये जावून पुन्हा एकदा चहा आणि त्या मिरची भजी बरोबर उथप्पा चा आस्वाद घेउन ९ च्या सुमारास हॉटेल मधून नवी दिल्ली स्टेशन गाठलं , ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरु झाला , सकाळी उठून जे येयील त्या स्टेशन वर उतरून तिथला एखादा पदार्थ आणि चहा घेण सुरु झाल , गप्पा , मजा- मस्ती , आठवणी ह्या सार्यांसोबत प्रवास पुढे सरकत होता , जस जस आम्ही मुंबईच्या जवळ जवळ येत गेलो तस तस दिल्ली ची आठवण अधिक गडद होत जात होती , माहित नाही हि फ़्क़्त माझीच परिस्थिती होती कि बाकी सार्यांचीही , पण जो तो आपल्या परीने आठवणी मनात दाटवून ठेवत होता हे मात्र नक्की....दर वेळच्या प्रवासाप्राने ह्या प्रवासाने हि मला खूप काही दिल होत , आठवणींसोबत मला मिळाले होते २ मित्र ते हि माझ्या सारखेच वेडे , आणि आमच्या पेक्षा मोठ्या असून हि आमच्यात रमणाऱ्या आणि गोष्टी शेअर करणाऱ्या मैडम.
ह्या दिलवाल्या शहरात फिरून , दोस्ती हि मिळाली आणि एक अविस्मरणीय दिल्लीवारी हि घडली . बघुया पुन्हा कधी ह्या दिल्लीच दर्शन होतय ते.
प्रफुल्ल शेंड्गे
प्रफुल्ल शेंड्गे
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-