प्रेम

   



           प्रेमात कोण पडत नाही ? सगळेच पडतात कधी ना कधी . प्रेम, हि अशी दरी आहे जिथ रोज किती जन तरी आनंदाने उड्या मारतात तर किती जन ह्या दरीत पडायला नव्याने तयार होत असतात .तुम्ही कधी पडलात प्रेमात ? काय होत असत हो प्रेमात पडल्यावर नक्की ?

      सिनेमात सांगतात तसच होत का अगदी म्हणजे "रातो कि निंद ओर दिन का चैन " हरवल्यासारख , नजर तिलाच शोधायला लागते , डोळ्यांच्या कोपर्यातून तिला सारख पाहत रहावस वाटत ,प्रेत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायला लगतो , उगाच येता जाता आरशात पाहत राहतो , केसात हात फिरवून स्वतःशीच हसायला लागतो .. झोप हि गायब होवून जाते तिचा विचार करताना , आणि आलीच जरी झोप तरी त्यात तिचीच स्वप्न आणि तिच्या विषयीची वाढत जाणारी ओढ ..अमीर खान सारख मन हि गायला लागत "पेहला नशा... ", प्रत्येक प्रेम गीत आपल्यासाठीच लिहल गेलय कि काय अस वाटून आपण प्रत्येक गान गुणगुणायला लागतो , तिच्या समोर आलो कि हृदयाची धड धड वाढायला लागते , हातपाय गार पडायला होतात , कपाळावर घाम फुटतो , आणि श्वास हि गरम व्हायला लागतो ... मग प्रेम व्यक्त करताना उडालेली तारांबळ आठवली तरी कित्येकांच्या चेहऱ्यावर आजही हसू उमटत , तर काही जन आज हि प्रेम व्यक्त करण्याच्या भीतीने गारठून जातात.. ...... त्याने -तिने दिलेलं पाहिलं गुलाबच फुल आजही कित्येकांच्या डायरीत प्रेमाची आठवण ताजी करत आहे , आज कल प्रेम पत्रांचे तसे दिवस निघूनच गेलेत , पत्रांची जागा आता मेसेज नि घेतलीय , मग काय दिवसभर कितीही बोललो तरी सारख बोलतच रहावस वाटत , रात्र-दिवस ह्यातला फरक च विसरायला होवून जात बोलताना,खरच प्रेमात पडण म्हणजे एक सुंदर स्वप्नच असत , कधीच ह्या स्वप्नातून बाहेर पडू नये अस वाटत राहत .... प्रेमाच कितीही वर्णन केल तरी कमीच आहे ... वाचून ऐकून थोड्या वेळासाठी प्रेमाची गंमत कळेल हि पण स्वतः प्रेमात पडल्याशिवाय प्रेमाची मजा अनुभवताच येणार नाही हे मात्र नक्की ...मग वाचून हे सार मनाच्या कप्प्यातून आला का कुणाचा चेहरा डोळ्यासमोर ? आलाय ना , अहो किती खुश होताय , बघा तरी किती गुलाबी पसरलीय चेहऱ्यावर तुमच्या त्याच्या / तिच्या फ़्क़्त आठवणीने ...


-प्रफुल्ल शेंड्गे

2 comments:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-