थोड मुलांच्या मनातल

परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली , लिहल होत कि "स्त्री म्हणजे शक्ती ... तर पुरुष म्हणजे सहनशक्ती ” वाचून हसायला आल पण दुसर्याच क्षणी विचार आला कि काय चुकीच किंवा हसण्यासारख लिहल होत त्यात  ... खरच होत कि ते रोज आपण पुरुष किती गोष्टी सहन करतो ... सैंडविच  मधल्या टोमेटो सारखी आपली अवस्था असते रोज ... पण कुणाला सांगू हि शकत नाही... 

मनातून किती हि वाटत असेल रडावं तरी रडू शकत नाही ... बाजूचे बोलायला टपलेलेच असतात "काय रे पुरुष सारखा पुरुष  आणि रडतोस काय ?” आणि नाही व्यक्त झालो तरी "ह्याला काही भावनाच नाहीत ... दगडाच्या काळजाचा आहे का ?” अस दुसरी कडून हि बोलल जात ... कात्रीत सापडलेल्या कागदासारखी अवस्था होते ... काही न करता आपण फाटणार हे नक्की असत ...समोरच्यांना का काळत नाही कि आम्ही पण माणस आहोत .. आम्हाला पण भावना आहेत 
  तू मुलगा आहेस तू हे केलच पाहिजे ... हे तुला आलाच पाहिजे असा हट्ट का ? घरातहि तेच आणि बाहेर तर त्याहून बेक्कार परिस्थिती ... मोबाइल  मध्ये डोक घालून बसलो तरी लोक वेगळ्याच नजरेने बघतात ... सभोवाताली पाहत बसलो तरी तेच ... मित्रांच्या ग्रुप  मध्ये बसलो कि म्हणायचं “टवाळकी करतात ”, बाहेर फिरलो कि उनाड्ग्या करतो आणि  घरात बसल तरी “काय घर कोंबड्यासारखा घरात बसतोस ”... कराव तरी  काय आम्ही ?  आणि त्यात सारख मुला- मुलींची होणारी तुलना ...


            दहावी बारावी चे निकाल लागल्यानंतर बातम्या वाचल्यात किंवा पहिल्यात का ?... एकच ठरलेली बातमी ... ह्या वर्षी हि मुलीनी मारली बाजी ... खरच  असेल हि.. पण प्रश्न हा आहे कि त्यांनी आणि आम्ही काय स्पर्धा लावण्यासाठी परीक्षा दिलती का ?  मुली जास्त पास होतात कि मुल हे पाहण्यासठी ... नाही ना मग ? ते जावूद्या कधी कुठल्या परीक्षेत मुल आली अव्वल तर कुणी सांगत का "मुलांनी  मारली बाजी ” ? नाही .. का तर का सांगाव ... मुल आहेत ती, त्यांना यायलाच पाहिजे अव्वल ... म्हणजे आमच कौतुकच नाही ? आता मुलींशी स्वताहून बोललो  तरी वाईट ठरवायचं आणि नाही बोललो तर सरळ आखडू  ठरवून  टाकायचं... फेसबुक  वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण असो किंवा प्रेमाच प्रपोज  करण सगळ आम्हीच आधी कराव हा ह्यांचा हट्ट .. का त्या का नाही करत हे सगळ स्वतःहून ?  दोन तीन महिन्या पूर्वीचा दिल्लीतला एक प्रसंग किंवा मागच्या वर्षी दोन बहिणीचे कथित आरोप ऐकले का तुम्ही ... त्यांनी मुला विरुध्द केलेले आरोप ... मेडिया ने हि ह्या गोष्टीला खूप उचलल... अगदी झूम करून करून मुलाचे फोटो दाखवत होते ... जे तोंडात येयील ते बोलत होते ... कुठलीच शहानिशा न करता... तपासा अंती ते निर्दोष असल्याच सिद्धह हि झाल .. पण त्या नंतर एका हि माध्यमाने माफी मागितली नाही ... का आमची काहीच इज्जत नसते .. मान्य आहे सगळ्याच मुली अस करत नाहीत .. मग तुम्ही का विसरता कि सगळीच मुलहि अशी नसतील याचा ? 


   " स्त्री दाक्षिन्य " बद्दल माहिती आहे न तुम्हाला .. मग पुरुष दाक्शिन्य का नाही ? स्त्री-पुरुष समानता  आहे ना ? शालेच्या दिवसापासून ते कॉलेज च्या दिवसा पर्यंत आम्ही प्रत्येक शिक्षकांच्या टीकेचे धनि ... मुलिंच्या बऱ्याच चुकिना माफ़ी आणि आमची एक चुक ही घोड़चुक समजली जायची ... तेच ऑफिस मध्ये पण .. उशिरापर्यंत ऑफिस मध्ये थांबण आल की आमचच  मरण... मग कुणी आम्हाला विचारत पण नाही नेहमी आम्ही गृहीत धरलो  जातो... अणि कितीही मनापासून चांगल काम करूनही आम्हाला म्हनाव तेवढ कौतुक पदरात पडत नाहीच .... कौतुका वरुण आठवल ... सोशल नेटवर्क साइट्स वर कोणत्याही  मुलाने एखादी कितीही चांगली पोस्ट किंवा फोटो टाकला तरी कुणी ढून्कुन  ही पाहत नाही ... लाइक अणि कमेंट्स तर फारच दूरची गोष्ट ... पण त्याच जागी कुना एक मुलीने एखादा फोटो टाकला तरी साखरेला लागलेल्या मुंग्या सारखे प्रत्येक जन लाइक , कमेंट्स साठी धडपडत असतो ... अणि हे करणारे पण कोण आमच्या सारखीच मुल , जावुदया काय  बोलणार अजुन ह्यावर  ... काहीही असल तरी आम्ही आमचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतोय ..जस काही घडलच नसल्या सारख ..बहुतेक हीच असेल आमच्या कड्ची सर्वात मोठी शक्ति...

       


-प्रफुल्ल शेंडगे 

1 comment:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-