नात विश्वासाच - भाग २

              मुग्धा आणि रोहनला आता मुंबईत येवून ३ महिने झाले होते , मुग्धा हि आता मुंबई च्या वातावरणाशी समरस झाली होती ... रोहनने त्या दिवसाची पुन्हा आठवण किंवा चुकून विषय हि मुग्धा समोर काढला नव्हता  आणि मुग्धा हि मागचा भूतकाळ विसरून संसारात रमली होती .. अगदी सुखी संसार चालला होता दोघांचा .. मुग्धा ने आता नोकरीसाठी सुद्धा धडपड सुरु केली होती , वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला जायला लागली होती , रोहन हि तिच्या ह्या नोकरी शोधण्याच्या कामात तिला मदत करत होता ...

                पुढच्या १० दिवसांनी मुग्धाच्या मावस बहिणीच लग्न होत नागपूरला त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला आणि रोहन ला ४-५ दिवस आधीच या अस निमंत्रण दिल होत ... पण रोहन ला ऑफिस मधून इतकी सुट्टी मिळण कठीण होत म्हणून त्याने मुग्धा च्या आई वडिलांना सांगितल कि त्याला लवकर यायला काही जमणार नाही , पण मुग्धाला आधी पाठवून देतो , माहेरी जायच्या विचाराने मुग्धा खुश झाली होती कारण मुंबई ला आल्यापासून ती अजून माहेरी गेली नव्हती .. दुसर्याच दिवशी रोहन ने मुग्धाच नागपूरला जायच रेल्वे आरक्षण केल ... ठरल्या दिवशी तो तिला रेल्वे स्टेशन वर सोडायला गेला ... नागपूरला घरी पोहचल्यावर माहेरवाशिनीचे लाड पुरवले जात होते .... नवर्याच्या घरी किती हि सुखी असली तरी आई-वडलाना मुलगी माहेरी आल्यावर तिच्या साठी काय करू नि काय नको असच होवून जात तसच मुग्धा च्या घरच्यांचं हि झाल होत ... ऑफिस मध्ये जाताना आणि रात्री जेव्हा रोहन चा फोन यायचा तेव्हा घरातले तिच्या कडे हसून पाहून तिला चिडवायला लागायचे , त्याचं हे चिडवण पाहून मुग्धा अगदी लाजून जायची ... तस मुग्धाच्या मावशीच घर तिच्या घरापाशीच होत त्यामुळे ह्यांच्या घरात हि लग्नाचा पसारा आणि काम चालू होती ... रात्री जेव्हा मुग्धा तिच्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिची आई हि तिच्या खोलीत आली ... दोघी जनी गप्पा मारायला लागल्या ... आई तिची विचारपूस करत होती "सगळ बर चाललाय ना मुग्धा , संसार काय म्हणतोय ? , आल्यापासून तुझ्याशी नीट बोलायलाच भेटल नाही बघ ” अस म्हणत ती मुग्धा च्या डोक्यावरून हात फिरवत होती , मुग्धा ने तिच्या प्रश्नाची उत्तर दिली आणि संसाराच्या , मुंबईच्या गोष्टी आईला सांगायला लागली ..पण आई फ़्क़्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होती ...

             लग्नाच्या ह्या गडबडीत एक एक दिवस सरत होता , फ़्क़्त दोन दिवसावर लग्न येवून ठेपल होत म्हणून सगळ्यांची लगबग सुरु झाली होती ... रोहन हि आज नागपूरला लग्नासाठी पोहचणार होता , आईला सांगून मुग्धा चार च्या सुमारास तिच्या एका मैत्रिणीबरोबर बाजारात शॉपिंग ला निघाली , रोहन यायच्या आधी बाजारात जावून येयील अशा हिशोबाने ती निघाली , ऑक्टोबर चे दिवस आणि त्यात नागपूरची गर्मी , अंगाला उन्हाच्या झळा लागत होत्या नुसत्या त्या चार च्या सुमारास ... एक दीड तासाच्या शॉपिंग करून घराजवळच्या चौकात मुग्धाला सोडून तिची मैत्रीण तिच्या घरी निघून गेली ... रस्ता ओलांडण्यासाठी मुग्धा दोन्ही बाजूनी वाहनांच्या येण्या जाण्याचा अंदाज घेत होती तेव्हाच तीच लक्ष गेल ते समोरून येणाऱ्या सुमित कडे ....
                 सुमितला  पाहताच मुग्धा चे चालणारे पाय थबकले ... काळजात धडधड वाढायला लागली होती आणि मनात एक वेगळीच परिस्थिती , ह्या स्थितीत काय कराव हे तिला कळेनास झाल ...
समोरून येणाऱ्या सुमितच हि लक्ष मुग्धा कडे गेल ... अचानक समोर आलेल्या ह्या परीस्थित काय कराव काहीच कळत नव्हत ..दोघांच्या हि नजरेसमोर भूतकाळातल्या गोष्टी एकामागून एक धावत होत्या ... सुमित मुग्धा च्या समोर येवून उभा राहिला ... दोघही फ़्क़्त एकमेकांकडे पाहत उभी होती काही क्षणासाठी , मग सुमितने च बोलायला सुरुवात केली ... “कशी आहेस मुग्धा ?” त्याचे शब्द ऐकून तिचा श्वास काहीसा जोरात सुरु झाला आणि स्वताला सावरत आणि थरारत्या ओठातून शब्द गोळा करून मुग्धा ने त्याला उत्तर दिल "मजेत आहे , तू कसा आहेस ?” त्यावर तो म्हणाला "मी पण मजेत... थोडासा ” फ़्क़्त तोंड ओळख असलेल्या लोकांसारख दोघांच बोलन चालल होत... आणि त्यातच सुमित ने एक प्रश्न विचारला "विसरलीस का मला ?” त्याचा हा प्रश्न ऐकून मुग्धा त्याचेकडे पाहायला लागली आणि तीन उत्तर दिल "हो , प्रयत्न करतेय विसरायचा तुला , माझ्या वर माझ्या पतीने टाकलेल्या विश्वास साठी , आणि त्याच्या प्रेमासाठी ” तीच हे बोलन ऐकून सुमित गालात हसला आणि म्हणाला "तुला पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडलेल पाहून छान वाटल मला , अशीच आनंदात राहा कायम , आता आपल्याला आपापल्या आयुष्यात पुढ गेल पाहिजे , जे नशिबात असत तेच होत असत कदाचित , आणि ते होऊन गेलय आपल्या बाबतीत ” त्याच्या ह्या बोलण्यावर तिने फ़्क़्त मान हलवून उत्तर दिल आणि म्हणाली "मी निघते ” अस म्हणून तीने रस्ता ओलांडला आणि तेव्हा मागून कुणीतरी आवाज दिला "मुग्धा”" .... ओळखीचा आवाज होता , आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला , तिने झटकन मागे वळून पाहिलं तर खरच रोहन आला होता , आत्ताच रिक्षातून उतरला होता .... त्याला पाहून मुग्धा त्याच्या कडे गेली आणि मग दोघेही गप्पा मारत घराच्या दिशेने निघाले .... सुमित हे सार तिथ उभ राहून पाहत होता ... मुग्धाला तिच्या संसारात खुश पाहून तो हि आनंदी झाला होता मनातून ...  
        खरच प्रेम हे असच असत किंवा असाव , समोरच्याच्या आनंदात स्वत आनंदी होण्यासारखं .... आज ती तिघही स्वतःच्या आयुष्यात पुढे चालली होती .. कुणाचा तरी विश्वास आणि प्रेम सांभाळत....

- प्रफुल्ल शेंडगे 

2 comments:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-