पत्रकारिता
, लोकशाही
चा चौथा आणि महत्वाचा खांब ,
सामान्य
नागरिकाला देशात आणि जगात
घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची
माहिती देण्यात , लोकांना
सुजाण बनवण्यात पत्रकारितेचा
मोठा हात आहे ,स्वातंत्र्य
पूर्व काळात हि लोकांना जागृत
करण्याच काम केसरी सारख्या वृत्तपत्रांनी केल
होत , काळ
बदलला तसं अनेक बदल घडत गेले
, प्रिंट
मेडिया च्या बरोबरीने इलेक्ट्रोनिक
मेडिया हि आता आपल्या देशात
आला होता , देशात-
जगात काय घडलं
असेल ह्याचा विचार करत करत
सकाळी येणाऱ्या वृत्तापत्राची
वाट पाहणारे आपण ,
इलेक्ट्रोनिक
माध्यमांमुळे वृत्तपत्र
विसरून गेलो आहोत , प्रत्येक
बातमी आता आपल्याला याची देही
याची डोळा पाहता यायला लागली
तीही अगदी तत्क्षणी.
पण
थोडा विचार करून सांगा ,
आज आपण खरच न्यूज पाहतो
का ? पाहत
असलो तरी देशात काय घडतंय ते
जाणून घेन्या साठी तरी नक्कीच
पाहत नाही ? पाहतो
ते फ़्क़्त टीवी मालिकेत ,
सिनेमात काय
चालू आहे ह्या साठीच .
खर ना ?
माहिती आहे
तुमच उत्तर हि "हो"च
असेल , कारण
मीही काही त्याला अपवाद नाही
, आणि ह्या
सार्या गोष्टींचा विचार करायला
लागलो कि ,का
आपण फ़्क़्त ह्याच गोष्टींसाठी
मेडिया कडे पाहतो आहे?
, आणि एक कारण
सापडत ते म्हणजे पत्रकरिते
मध्ये सुरु झालेली स्पर्धा
, आज
आपल्यकडे एका दिवसात जेवढ्या
घटना घडत नसतील तेवढी न्यूज चैनेल सुरु झाली
आहेत , बाकी
सगळ्या चैनेल पेक्षा
आमच चैनेल कस
पुढ ह्याचा दिखावा चालू असतो
, प्रत्येकजण
हेच म्हणतोय "आम्ही
दाखवली हि बातमी सर्वात आधी
”, अरे
पण आम्हाला बातमी कोण आधी
दाखवतो त्या पेक्षा कोण त्या
बातमी मागच गांभीर्य ,
सत्य पडताळून
ती बातमी दाखवतो ते महतवाच
आहे . कुठला
बॉम्बस्फोट असो किंवा अपघात
असो ह्यांची जखमी आणि मृत
लोकांच्या संख्येची चालेली
चढा ओढ , एक
म्हणतो १० तर दुसरा म्हणतो
१२ मग तिसरा लगेच २०-३०
आकडा घेवून तयारच असतो ,एक्सक्लूसिव, स्टिंग ऑपरेशन च्या नावाखाली
डॉन , गुंड
लोकांशी पत्रकार घेत असलेली
मुलाकात , निवडणुकांच्या
आधी दाखवले जाणारे एग्जिट पोल पहिले कि
वाटत हे खरच सर्वेक्षण आहे
कि राजकीय पार्ट्यांची केलेली
जाहिरात , जे
त्यांना हव आहे तसं लोकांच्या
मनावर बिम्बावण्याचा निव्वळ
प्रयत्न , त्यावेळी
वाटत खरच सगळी कडे बाजारीपणा
चालला आहे .
२६/११
चा दहशतवादी हल्ला आठवतो का
तुम्हाला ? हो
आठवत असेलच ना तुम्हालाही ,
पाहिलं असेल
ना तुम्ही हि न्यूज चैनेल वर तेही लाइव, NSG कमांडो ,
पोलिसांनी
केलेले शर्थीचे प्रयत्न ,
अहो पण जे आपण टी.व्ही. वर पाहत
होतो ते हल्ला करणरे हि पाहत
असतीलच ना ?, आपले
पोलीस, कमांडो
कशापद्धतीने व्यूहरचना करत
आहेत तेही पूर्ण विश्लेषणं
सहित , आणि
ते विश्लेषण करणारे आपलीच
मानस , कुठल्या
परिस्थितीत काय सांगाव -
काय दाखवू नये
ह्याच भान हि असू नये ?
सुजान म्हणवता
ना स्वतःला ? , कधी
सकाळी ४-6 च्या
दरम्यान न्यूज चैनेल पाहिलेत
का कधी ? कुठल्या
तरी (भोंदू)बाबांचं
प्रवर्चन चालू असत , आणि
मग दिवसभर तेच चैनेल आम्ही
कसे अंधश्रद्धेच्या विरुद्ध
आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न
करत असत . हि
विसंगती नाही का ?
आता
तर काय एक नवीन कार्यक्रम आखला
आहे , चार
पाच विश्लेषक, तज्ञ
लोकांना बोलावून आणि चार-पाच
चौकटी बनवून चर्चा सुरु करायची
, चर्चा
कसली ओ ती , नुसता
गोंगाट , कोण
कुणाच ऐकून घेत असत तिथ ?
सगळे आपलच
म्हणन मांडत असतात , आणि
एखादा सांगत असतो महत्वाच तर
त्याच क्षणी ब्रेंक ची वेळ
होते ह्यांची , मग
वाटायला लागत मनात कुठेतरी
कि , ह्या
चर्चा फक्त नावालाच आहेत ह्या
चर्चांचा शेवट काय करायचा हे
त्यांनी आधीच ठरवून ठेवलेलं
असत फ़्क़्त दाखवण्य पुरती ती
चर्चा , आणि
चर्चा हि कसल्या कसल्या विषयावर
तर "म्हणे
ह्या दहशतवाद्याला /
गुंडाला मिळालेली
शिक्षा योग्य कि अयोग्य ” हे
प्रश्न हि तेव्हा विचारतात
जेव्हा न्यायालयने त्या
गुंडाला त्याची हि बाजू समजून
शिक्षा दिलेली असते तेव्हा..आणि
कुणी काही बोलूही शकत नाही
कारण शेवटी प्रश्न पत्रकारितेच्या
स्वातंत्र्याचा आहे ना ?
वाईट
मात्र एकाच गोष्टीच वाटत ते
म्हणजे सुक्या सोबत जळणाऱ्या
ओल्याच कारण आजही ह्या "वातावरणात
" काही
माध्यम आहेत "खरया"
सत्याचा शोध
घेणारी , निपक्ष
बाजू मांडणारी आणि स्वतची
सामाजिक जबाबदारी ओळखून
पत्रकारिता जोपासणारी ...एक
सलाम अश्या पत्रकारितेला आणि
ती जोपासणार्य पत्रकारांना
... कारण
त्यांच्या मुळेच आपल्या
लोकशाहीचा चौथा खांब आजही
टिकून आहे आणि आपली लोकशाही
ताठ मानेने उभी आहे ....
-प्रफुल्ल शेंडगे .
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-