शाळेतल्या
दिवसात प्रार्थनेच्या वेळी
आपण एक प्रतिज्ञा बोलायचो,
आठवते का ती
प्रतिज्ञा ?, हो
! अगदी
बरोबर "भारत
माझा देश आहे.... ” , ह्याच
प्रतिज्ञे वर आधारित मराठी
मध्ये एक धडा होता "भारत
माझा देश आहे ” नावाचा ,
कितव्या इयत्तेत
होता ते मात्र मला काही नीटस
आठवत नाही , पण
त्यात लेखकाने एक छान विचार
मांडला होता , का
“भारत माझा देश आहे ” अस लिहल
आहे प्रतिज्ञेत का नाही लिहल
गेल कि "भारत
आपला देश आहे ”, कारण
आपण स्वतच्या गोष्टीना "माझा
/माझी ”
अस संबोधतो आणि सर्वांच्या
गोष्टीना "आपला
/ आपली ”
अस म्हणतो , आणि
स्वतच्या गोष्टीना जेवढ
आपुलकीने , प्रेमाने
, काळजीने
जपतो , सांभाळतो
तेवढ आपण "आपल्या
” गोष्टीना सांभाळत नाही,
कारण ती सर्वांची
असते ना , आपण
हा विचार करतो कि , 'मीच
का लक्ष देवू , देयील
न कुणीतरी लक्ष, घेयील
कुणीतरी काळजी ' मात्र
प्रत्येक जन हाच विचार करत
बसतो आणि सगळ्याचंच दुर्लक्ष
होत .....
पण
शाळा संपली तसं आपण हि "प्रतिज्ञा
” विसरलो आणि भारत माझा देश
आहे हे हि विसरून गेलो ,
आता आपल्या
इथला प्रत्येक जन दुसरा देश
आपल्या भारता पेक्षा कसा
चांगला ह्याबद्दलच बोलत असतो
, 'त्या
' देशातली
स्वच्छता पहिली ? , "काय
शिस्त आहे यार तकडे ",
"आपल्या
भारतात काहीच होवू शकणार नाही
", दुसर्या
देशात गेल्यावर तिथले नियम
, कायदे
अगदी बरोबर पाळता न तुम्ही
?, आपल्या
देशातही तेच आणि तसेच कायदे
-नियम
आहेत पण आपल्याला ते
गळ्यातला दोरखंड वाटायला
लागतात आणि येता- जाता
तो कापायचा आपला
प्रयत्न चालू असतो , दुसर
काही नाही?
माझ
म्हणन अस नाही कि ,तुम्ही
दुसर्या देशाबद्दल
चांगल बोलू नका अस ,
बोला ना दुसर्या
देशाबद्दल चांगल
, खरच असेल
तो देश आपल्या पेक्षा पुढे ,
पण विचार करा
"का आहे
तो देश आपल्या पुढे ?”
कारण तिथली
मानस , तिथले
नागरिक स्वतःच्या (फ़्क़्त
स्वतःच्या ) प्रगतीकडे
न पाहता देशाची प्रगती कशी
होईल ह्याचा विचार करतात ,
आणि आपण फ़्क़्त
नाव ठेवण्यात आपला वेळ घालवतो
, तसं कधी
आपण आपल्या देशाविषयी कधीच
चांगल बोलत नाही अस नाही ,
बोलतो कि आपण
हि आपल्या देशाबद्दल
चांगल , पण
कधी माहिती आहे का ?
वर्षातले फ़्क़्त
2 दिवस !
आपण आपल्या
देशाच गुणगान गातो ते म्हणजे
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ,
आणि वाटतो
अभिमान देशाचा जेव्हा "भारत
” जिंकतो एखादी क्रिकेट मैच
तेव्हा ....कुणी
एकाने मस्त वाक्य बोलून ठेवल
आहे
“आजकाल
देशभक्ती सिर्फ तारीखो पे
आती है , और
चली जाती है ”
आपण
का विसरतो , कि
आपण म्हणजेच "देश
” आहोत , देशातली
हि करोडो जनता म्हणजे भारत
आहे , का
वाट पाहतोय आपण आज हि कुणी तरी
सुरुवात करायची ?, उचला
ना तुम्ही पाहिलं पाऊल ,
करा ना
प्रतिनिधित्व , किती
दिवस गर्दीतला एक सामान्य
चेहरा बनून राहनार ? , करा
दुसर्या देशातल्या चांगल्या
गोष्टींच अनुकरण , ते
जी स्वच्छता , शिस्त,
देशप्रेम
बाळगतात , बाळगा
न ते हि तुमच्या अंगी ,
आणि घडवा आपला
हि देश त्यांच्या देशासारखा
, ज्याचा
तुम्हाला ,स्वताला
दरदिवशी अभिमान वाटेल ,
आणि बाकी सारया
जगाला हि आपल्या देशाच कौतुक
वाटाव असा ..... आणि
त्यासाठी सतत जागृत ठेवा एक
विचार कि "भारत
माझा देश आहे ”.
-- प्रफुल्ल शेंडगे .
-- प्रफुल्ल शेंडगे .
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-