बरेच
दिवस झाले एक गोष्ट शोधण्याचा
मी खूप प्रयत्न करतोय ,
पण काही केल्या
ती काही भेटतच नाहीये ,
अगदी कुणीही
भेटल तरी प्रत्येकांना मी
त्या गोष्टी बद्दल विचारतोय
, पण
कुणालाही ती माहिती नाहीये
, काहींनी
तर मला अगदी प्रात्यक्षिक
देवूनच अनुभव दिला कि त्यांनी
आयुष्यात कधी ती गोष्ट पहिलीच
नसेल याचा , तर
काही जन भेटले त्याचं म्हणन
होत कि काही वर्षांपूर्वी
पाहिलं होत पण सध्या मात्र
कुठ दिसलीच नाही तुम्हाला
भेटली तर आम्हाला हि सांगा ,
म्हणून काय
कराव ह्याचा विचार केला आणि
बाबांची आठवण झाली , बाबा
म्हणजे ते भविष्य सांगणारे
नाहीत तर आपले गुगल बाबा ,
त्यांच्या
कडे सगळ्या प्रश्नाची उत्तर
भेटतात म्हणे म्हणून त्यांना
विचारून पाहिलं तर ते हि म्हणाले
“सर्च नॉट फाउंड ”,मग
दूरदर्शन च्या “आपण ह्यांना
पाहिलात का ?” मध्ये
जाहिरात द्यावीशी वाटली पण
इथेही एक अडचण माझ्याकडे तिचा
ना काही फोटो होता ना काही
वर्णन ,मग
शोधू कसा ?पण
इतक मात्र ठामपणे माहिती आहे
कि , हिरे-मोती
, सोन्या
चांदी एवढी मौल्यवान नसली
तरी , ती
जवळ असली तरी माणूस श्रीमंत
होतो अस ऐकिवात होत , नाही
कळाल ? मी
काय शोधतोय ते ?
अहो
माणसाची खरी ओळख असलेली आणि
आता अस्त पावत चाललेली "माणुसकी
” शोधतोय मी .
हो
ना ? आत्ता
तुम्हालाही वाटलं असेलच ना
खरच हि माणुसकी हरवत चाललेली
आहे ..आपल्या
सभोवताली एक नजर फिरवली तरी
ह्या माणुसकीचा अभाव जाणवायला
सुरुवात होते , आपण
सर्व जन आपापल्या कामात एवढे
गुंतत चाललो आहोत कि दुसर्यांचा
विचार करायची वृत्तीच हरवून
बसलो आहोत , सामाजिक
प्राण्याची ओळख
हरवून बसलो आहे , जिथ
आपण माणुसकीच नातच मानत
नाहीये तिथ बाकी नात्यांना
किंमत कशी देणार ?
भुकेल्याला
अन्न द्यावे
तहानलेल्या
पाणी द्यावे .....हि
साधी शिकवन हि विसरून गेलो
...फ़्क़्त
"मी"पणा
च्या गर्तेत उरलेला विचार
घेवून चालणारा एक जीव...
एवढीच ओळ्ख
बनत चालली आहे आपली
म्हणूनच
गरज आहे माणुसकीला पुन्हा
शोधण्याची, पुन्हा
एकदा वाढवण्याची आणि दुसर्याच्या
मनात हि तिला रुजवण्याची मग
माझ्यासोबत घ्या तुम्ही हि
तिचा शोध , पण
सुरुवात स्वतः पासून करा कुणास
ठावूक तुमच्या स्वतच्या
आतमधल्या माणुसकीने कुणाची
तरी हि शोध मोहीम पूर्ण होईल
....आणि जर
तुम्हाला भेटली हि माणुसकी
कुठे तर ह्या बाबतीत व्हा थोडस
स्वार्थी, ठेवा
तिचा काही भाग स्वतः जवळ आणि
पाठवत राहा पुढे जो पर्यंत
सर्वांना ह्या माणुसकीचा
चेहरा दिसत नाही तोपर्यंत
...
-प्रफुल्ल
शेंडगे
More human ,less humanity ....
ReplyDeleteती असते प्रत्येकात .. पण ती असते हेच लोक विसरतात .. जाणिवा वाढल्या पाहिजेत स्व च्या ..
ReplyDelete