नावात
काय आहे ? अस
शेक्सपियर कधी काळी बोलून
गेला . पण
तेच वाक्य आजही आपण कधीतरी
उच्चार्तोच , पण
थोड गांभीर्याने विचार करायला
लागलो तर आपल्यालाही समजेल
कि , नावात
काय काय दडलेलं आहे . आता
हेच पहा न "नावात
काय आहे ?” हे
वाक्य बोलणारा हि आपल्याला
त्याच्या नावामुळेच कळला
नाहीतर कुणाला कधी कळाल असत
कोणी हे बोलून ठेवलं आहे ?
. प्रत्येकाची
प्रथम ओळख हि त्याच्या नावाने
होते , जन्म
दाखल्या पासून ते शाळेच्या
दाखल्या पर्यंत आणि सोशल साईटस
च्या प्रोफाईल नावापासून ते
मृत्यू च्या दाखल्या पर्यंत
सगळीकडे नाव म्हत्वाच आहेच
, आपल नाव
सगळ्यानाच प्रिय असत ,
कुणी तुमच नाव
चुकीच उच्चारलं किंवा लिहल
तर चढतो ना पार तुमचा काही
अंशी वरती , कुणी
घेतलं नाव ओठी अगदी प्रेमाने
तर वाटत न मन प्रसन्न हीच तर
गम्मत आहे ना नावाची .
पण
समजा जर नाव हि गोष्टच अस्तित्वात
नसती तर किती गोंधळ उडाला असता
, कुणाला-
कस ओळखायच,
संबोधायच फारच
कठीण होवून झालं असत ,
महत्वाच म्हणजे
"नाव
कमावण्याच्या ” ह्या शर्यतीत
कुणी उतरलच नसत , आणि
लग्नानंतरच्या "उखाण्यात
नाव " घेण्याची
गोंडस प्रथा हि अनुभवायला
मिळाली नसती ,मला
वाटतय जर "नाव"
हि संकल्पना
नसती तर ह्याचा जास्त फटका
बॉलीवुड वाल्यानाच बसला
असता ,नाहीतर
अमिताभ बच्चन - त्याच्या
हिरोईन ला "माय
नेम इस अंथोनी ” अशी ओळख करून
देवू शकला असता का? , शाहरुख च्या त्या "राहुल
,नाम
तो सुना हि होगा ” ह्या डायलॉग
वर शिट्ट्या वाजल्याच नसत्या,आणि "नाम बडे ओर दर्शन छोटे "ह्या गाण्यावर भगवान दादा थिरकलेले पाहता आले असते का ?
पण
एक मात्र बर झालं
'शेक्सपियर
च वाक्य जास्त मनावर न घेता
नावावर बंदी नाही आणली ते,
शेवटी नावात काय आहे ?
हे सांगता
येणार नसल तरी "नावात
खूप काही आहे ” हे मात्र नक्की
!
-- प्रफुल्ल शेंडगे .
-- प्रफुल्ल शेंडगे .
खरं आहे, आपण जे लिहिलात ते हि मला पटलं!
ReplyDelete