एक भेट अशीही

  

आज पहिल्यांदा आम्ही भेटणार होतो ... एका वधू-वर सूचक वेबसाईट (matrimony site) वर आम्ही एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं. पहिली रिक्वेस्ट मी तिला धाडली त्यानंतर तिने ती एक्सैप्ट केल्याचा समजल. आमच्या बद्दलची सारी माहिती तशी प्रोफाइल वर होतीच पण प्रत्यक्ष भेटल्या खेरीज पुढचा निर्णय शक्य नव्हता... त्यानुसार आम्ही दोघांनीही भेट्न्याच ठरवल. तसे आम्ही वेगवेगळ्या शहरातले... तिच शहर माझ्या साठी नवं तसच तिला माझ शहर नवं होत...घरच्यांच्या आधी आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्याव अशी आमची इच्छा होती... त्याप्रमाणे आम्ही प्लान केला..एका सुट्टीच्या दिवशी मी तिच्या शहरात तिला भेटण्यासाठी जायच ठरलं. कुठे भेटायचं हे तिथे पोहचल्यावरच कळणार होत... गुगल वर पाहिल तर तीच शहर माझ्या इथून साधारण ५-६ तासांच्या अंतरावर होत.

        सकाळी ८:३० ची एस.टी पकडली आणि मी तिला भेटण्यासाठी निघालो. निघायच्या आधी तिला मी निघण्याची कल्पना दिली. पुढे प्रवास झाला. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने एसटी मध्ये गर्दी जरा जास्तच होती , कशिबशी एक सीट मिळाली. आणि माझा प्रवास सुरु झाला आणि त्यासोबत माझ्या मनात आमच्या पहिल्या भेटीचे विचार सुद्धा सुरु झाले , मी तिला फोटोत पाहिलं होत आणि दोनदा फोन वर बोललो हि होतो पण ते हि अगदी मोजकच. पण प्रत्यक्षात भेटल्या वर नेमक कळणार होत ती कशी आहे ते ? मी तिच्या बद्दल एक चित्र मनात बनवायला लागलो होतो. मला जशी हवी आहे तशी ती असेल का ? आणि तशी नसेल तर ? असे एक न एक प्रश्न माझ्या मनाला पडायला लागले होते. त्यात एसटीतली गर्दी हि वाढायला लागली होती, निट पाय पसरायला देखील जागा होत नव्हती , प्रवास नको नको वाटायला लागला होता. 4 तास एका ठिकाणी बसून कंटाळा यायला लागला होता. वाटायला लागलं जावूदे उतरून जाव इथेच , नको मला हि मुलगी, एवढ्या लांब नाही जायचं मला तिला बघायला. पण तिला मी येण्याच सांगितल होत , ती वाट बघत बसली असणार ह्याची कल्पना मनाला होती म्हणून हा विचार बाजूला सारला आणि जायचं ठरवलं , एकदा बघून याव आणि पुढच पुढे बघू म्हणून तसाच बसून राहिलो , साधारण दुपारी 3:३० च्या दरम्यान तिच्या शहराचं एसटी स्टॅन्ड आलं. बसून-बसून ताटलेलं शरीर बस मधून उतरल्यावर हलक झाल. थोडा वेळ थांबून तिला कॉल केला , पहिल्या वेळी तिने उचललाच नाही ,
"हि येणार आहे कि नाही, फोन पण उचलेना " असा मनात विचार यायला तोच मोबाईल वर रिंग वाजली, तिचाच होता फोन. मी फोन उचलला , मी हैलो बोलायच्या आधीच तिने

"सोर्री , फोन उचलायच्या आधीच कट झाला , कुठपर्यंत आलात तुम्ही ?" अस ती सरळ बोलत गेली ,

"ठीक आहे , मी पोह्चलोय स्टॅन्ड वर " मी सांगितल,

"हो का ? ठीक आहे मी येतेच १० मिनिटात ",

"पण भेटायचं कुठे आहे? "मी विचारलं ,

"स्टॅन्ड पासून पाच मिनिट अंतरावर एक कॉफी शॉप आहे तिथेच " तिने सांगितल.

"ठिक हे मी तिथेच येतो , तुम्ही पण तिथेच या " मि म्हणालो , ठीक आहे म्हणत तिने फोन ठेवला.

आणि मी त्या कॉफी शॉप चा पत्ता तिथल्या रिक्शा वाल्याना विचारत पोहचलो . कॉफी शॉप च्या आत न जाता मी बाहेरच तिची वाट बघत थांबलो.

   साधारण पाच मिनिटांच्या अंतराने एक स्कूटी समोर येवून थांबली . पार्किंग मध्ये स्कूटी लावून ती मुलगी माझ्याच दिशेने येत होती , मनात म्हटल बहुतेक हीच असावी , जेव्हा चेहऱ्यावरचा स्कार्फ तिने दूर केला तेव्हा पाहिलं तर ती तीच होती . ती जशी समोर आली तसे आम्ही त्या कॉफी शॉप च्या आत शिरलो , आणि एक टेबला जवळ जावून बसलो. ती आणि मी पहिल्यांदा एकमेकांच्या समोर होतो, जसा विचार केला होता किंवा जशी फोटो मध्ये पाहिली होती त्यापेक्षा ती भलतीच वेगळी वाटत होती . गुलाबी रंगाची साडी , स्कार्फ मुळे थोडेसे विस्कटलेले केस , चेहर्यावर मेकअप असला तरी तो हि एकदमच साधा आणि थोडासा , तिचा साधेपना माझी विकेट पाडायला पुरेसा होता.  स्मितहास्य करत तिने बोलायला सुरुवात केली, नाव, शिक्षण अशा माहिती असलेल्या प्रश्नांनीच बोलायला सुरुवात झाली. तिच्या सोबत जितका वेळ पुढे सरकत जात होता तितकीच माझ्या मनात तिची जागा वाढत चालली होती. जे-जे मला माझ्या पार्टनर मध्ये हव होत ते सार तिच्यात होत, अगदी शिक्षण आणि जॉब ,तिचा स्वभाव ,पर्यंत थोडक्यात सांगायचं झालच तर मला ती पसंत होती. पण तिला लगेच सांगण काही योग्य वाटत नव्हत. अर्धा तास एकमेकांशी बोलल्यानंतर आम्ही कॉफी शॉप च्या बाहेर पडलो . तिथून आम्ही स्टॅन्ड वर आलो तिचा निरोप घेवून ,परतीच्या प्रवासासाठी मी माझ्या एसटीत जावून बसलो, ती तिची स्कूटी घेवून माझी एसटी सुटण्याची वाट बघत बाहेर उभी होती , एसटी निघाली आणि आम्ही एकमेकांना बाय करत पुन्हा एकदा निरोप घेतला. त्या वेळी तिच्या एकंदर देहबोलीतून वाटत होत कि तिला हि मी पसंत असावा .

      येताना जी नकार घंटा माझ्या मनात वाजत होती ती आता पूर्ण बंद झाली होती , मी जणू काही तिच्या प्रेमात पडलो होतो , परतीच्या पूर्ण प्रवासात मी तिच्या बद्दल , आणि आमच्या भविष्या बद्दलच विचार करत राहिलो. रात्री ११:३० च्या दरम्यान मी पुन्हा माझ्या घरी पोहचलो ,पण इतक्या रात्री तिला फोन करून सांगण्या पेक्षा सकाळीच सांगाव म्हणून तिला काही त्यावेळी फोन केला नाही. दुसर्या दिवशी सकाळी तिला फोन केला , आणि माझा होकार तिला कळवला . तिने मात्र तीच उत्तर अजून गुल्दास्तातच ठेवलं होत. एक आठवडा झाला तिचा काही फोन आला नाही इकडे माझी उत्कंठा शिगेला पोहचली होती न राहून मीच पुन्हा फोन केला ...पण तिने उचललाच नाही , त्याच्या दुसरी दिवशी तिच्या घरून फोन आला. मनात जरा उत्साह जागला , होकाराचाच फोन असणार म्हणून थोडासा आंनदी झालो मी , पण भलतच घडलं ,तिच्या घरच्यामार्फत तिने तिचा नकार कळवला होता . सुरुवातीला थोड वाईट वाटल , पण नकारच कारण काय असाव ह्याचा प्रश्न पडायला लागला. तिला विचारयला हव होत , काही गैरसमज असतील तर दूर करायला हवेत म्हणून तिच्याशी बोलाव अस वाटत होत , पण थेट फोन करून तिच्याशी बोलन मला काही रुचेना . मी तिला फेसबुक वर मेसेज केला , आणी फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठवली , पण 4 दिवस झाले काहीच उत्तर येयीना ना मेसेजचं ना फ्रेंड रिक्वेस्टचं . दररोज तीचा प्रोफाइल बघत राहायचो आणि तिच्या मेसेजचि वाट पाहत राहयचो , पण व्यर्थच . साधारण २ आठवड्यानी तिने माझी फ्रेंड रिक्वेस्ट कैन्सल केली ,आणि वधू-वर सूचक वेबसाईट वरून तिचा प्रोफाइल सुद्धा निघून गेला . मी मात्र अजूनहि तिचा फेसबुक  प्रोफाइल बघत राहायचो, ती रिप्लाय देईल ह्याची वाट बघायचो . काल पुन्हा प्रोफाइल उघडून पाहिला तेव्हा कळाल तीच लग्न झालय , त्याचे फोटो तिने पोस्ट केले होते. ती तिकडे तिच्या संसाराला लागली होती आणि मी मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत अजून बसलो होतो , तिला काय आवडल नसेल हा विचार करत.

चालायचं, आयुष्य हे असंच असतं , जे आपल्याला हवं असत ते कधीच भेटत नसत म्हणून जे येयील तेच आपलं आहे मानून समाधानी रहायच॰

काल्पनिक कथा.

-प्रफुल्ल शेंड्गे

3 comments:

  1. What's up colleagues, its enormous post on the topic of tutoringand completely defined, keep it up all the time.

    ReplyDelete
  2. Howdy! I could have sworn I've visited this blog before but after
    going through a few of the articles I realized it's new to me.
    Anyhow, I'm certainly delighted I discovered it
    and I'll be book-marking it and checking back frequently!

    ReplyDelete

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-