सांग ना मला तू ग,
काहुन ठेवून गेलीस
आठवण तुझी माग
विसरु कसा,विचारांची तुझ्याच आहे दाटी
डोळ्यामधी चमक होती,हसू गोड ओठी
ओरडनारा आवाज होता
प्रेमळ होती हाक,
गोल चेहरा तुझा ग जणू
जात्याच ग चाक
हक्काच ते, बोलन तुझ घुमत कानामधि,
डोळ्यामधी चमक होती,हसू गोडओठी
भांडून होतो तुझ्याशी पण
राग ना तुझ्या मनी,
बोलू आता कुणाशी अन
सांगू कुण्या कानी
टेंशन मधी,बी नव्हती रेष तुझ्या माथी,
डोळ्यामधी चमक होती,हसू गोड ओठी
काळजिचा सुर तुजा
लाडात ते बोलण ,
सांगू आता तुझ्याविना
वाटत किती सुनं
भेटेल का रे,मला पुन्हा तीच माझी सखी,
डोळ्यामधी जिच्या चमक ,होत हसू ओठी
कुणी तरी ,शोधून आणा तिला माझ्यासाठी
पाहू दया रे डोळे भरून मरण्याच्या मी आधी...!
-PRAFULLA

This comment has been removed by the author.
ReplyDeleteaapan shodhu tila google varun
ReplyDelete