प्रेमाची दूसरी इनिंग ?





रविवारचा दिवस होता , आरामात उशिरा उठून खिडकीपाशी जावून उभा होतो , हातात चहाचा कप घेवून , रस्त्यावरच्या गर्दीला न्याहाळत , येणाऱ्या जाणार्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत , त्यावेळी घरात मी एकटाच होतो , बाहेर जरी गोंधळ असला तरी  घरात मात्र  एक विशेष  शांतात होती , जणू आज सार्यांचच मौन व्रत होत , त्या शांततेला मीच काय तो छेद देत होतो , माझ्या फुरक्या मारून चहा पिण्याच्या आवाजाने . चहा पिवून संपला होता तरी मी हातात कप घेवून तसाच उभा होतो विचारांच्या दुनियेत हरवून गेलेला . शून्यात काहीतरी विचार करायला लागलो पण त्या मनातल्या विचाराणा काही विशेष अर्थ होता ना कोणती गती , फ़्क़्त ओठांवर शब्द येत  नव्हते म्हणून त्यांना  विचार अस म्हणायला लागत होत .

         तितक्यात माझा फोन खणखणला , मी माझ्या धुंदीतून बाहेर आलो आणि मोबाईल च्या आवाजाच्या दिशेने  मोबाईल शोधायला लागलो , "कुठे ठेवला मी मोबाईल , पाहिजे तेव्हा मिळणार नाही " अस स्वताशीच बोलायला लागलो . पूर्ण घरात त्या फोनचा  आवाज घुमायला लागला ,झटकन बेड वरची चादर सरकावली तेव्हा कुठे एका कोपर्यातला तो मोबाईल दिसला , पण तोपर्यंत फोन डिसकनेक्ट  झाला होता . तसाच मोबाईल उचलला आणि कॉल  हिस्ट्री चेक  करायला लागलो , कुणाचा फोन आहे ते पहायला , मिस कॉल ची लिस्ट पाहिली आणि थोडा हबकलोच , कपाळावर आठ्या आणत  मनात स्वतशीच बोललो "खरच मला केला होता कॉल कि , चुकून लागला होता ? चुकून लागला असेल , मला कशाला करेल ?"  अस बोलून फोन पुन्हा बेड वर फेकला , तोच पुन्हा रिंग वाजली . दुरूनच मोबाईल च्या स्क्रीन वर नजर टाकली , पुन्हा तोच नंबर, तेच नाव आणि पुन्हा विचार
 "चुकून नव्हता केला म्हणजे ? पण का केला असेल ?, अरे आधी उचल ना त्या शिवाय कस कळेल ?" एक मन मला सांगत होत. तर दुसर म्हणत होत "नको उचलू ", ह्या दोघांच्या रस्सिखेचात मी अडकून गेलो आणि हा दुसरा कॉल पण मिस झाला . 
"उचलायला हवा होता फोन ", 
"नाही उचाललास तेच बरोबर केलस " 
पुन्हा दोन मनाची  रस्सीखेच सुरु झाली .  मी तसाच बेडच्या एका बाजूला  बसलो , फोन हातात घेतला आणि ते नाव बघत राहिलो , त्या नावात खूप काही होत , जे मला कधी नव्हत हव ते हि त्या नावाने दिल होत मला. त्या नावाच्या आठवणीत मी थोडा थोडा शिरायला लागलो होतो तोच तिसर्यांदा फोन वाजला , त्याच व्यक्तीचा . आता मात्र ठरवलं , उचलायचाच फोन , आणि थरथरत्या हाताने फोन रिसीव केला , पण दोन्हीकडून हि कुणी बोलेना , पुन्हा निरव शांतात , ऐकू येत होता तो फ़्क़्त फुललेल्या  श्वासांचा आवाज. काही सेकंद असेच गेले , मग पलीकडूनच आवाज आला 
"हेल्लो ", 
तोच आवाज , पुन्हा कानात घुमला तो थेट हृदयात जावून असा काही टोचला कि , डोळ्यांचे काठ पाणावले माझे  , सावरत  मी हि हेल्लो म्हटल , पण नाव न घेता , तोच तीकडून प्रश्न आला "कसा आहेस ? ओळखलस का ? ", 
मी एक दीर्घ श्वास स्वतामध्ये भरला आणि उत्तरलो "आहे ठीक ! , आणि ओळखायच म्हणशील तर तुझा नंबर आज हि सेव आहे , तुझ्या आठवनिन्प्रमाणे "   माझ्या ह्या उत्तरवार तिकडून काहीच आवाज आला नाही , आता मीच विचारल 
"मलाच फोन केला होतास कि चुकून लागला ?".
 "चुकून नाही , मुद्दामच केला , बोलायचं होत तुझ्याशी " , 
ह्या तिच्या उत्तरावर  भुवया उंचावून मी म्हणालो 
"माझ्याशी  बोलायचय ? तुला ? ". 
"हो" तिने उत्तर दिल, 
"ठीक आहे बोल "- मी , 
"फोन वर नाही , समोरा समोर बोलायचं आहे , भेटशील का ?"-तिने विचारल , 
"ठीक आहे , जर इतक महत्वाच असेल तर भेटेन " मी जास्त विचार न करता उत्तर दिवून टाकल . 
"चालेल मग , आज संध्याकाळी ६ वाजता  , शिवाजी चौकातल्या कॉफ्फी शोप मध्ये भेटूया ?", 
"चालेल , येयील मी " मी उत्तर दिल , 
"थैंक्स, भेटू, तेव्हा बोलेल सगळ  " अस म्हणत तिने फोन  ठेवला.  मी मात्र काही वेळ तसाच फोन कानाशी पकडून बसलो होतो , एखाद्या पुतळ्यासारखा . 

सहा कधी वाजतायेत म्हणून मी सारखा घड्याळात बघत होतो , आज घडाळ्यातले काटे चालतच नाही आहेत का ? अस वाटायला लागल होत . तर एक प्रश्न अजूनही मला भेडसावत होता तो म्हणजे "काय बोलायचं आहे आज एवढ तिला ?",. कसेबसे घड्याळात साडे पाच वाजले , आणि मी तयार होवून बाईक घेवून घराबाहेर पडलो शिवाजी चौकाच्या दिशेने . आज रविवार ना , रस्त्यावर एवढ ट्राफिक नव्हत , रोज २०-२५ मिनिट खाणारा हा प्रवास आज १५ मिनिटात पूर्ण झाला . मी कॉफी शोप जवळ जावून उभा राहिलो , ६ वाजायला अजून दहा मिनिटे बाकी होती , मी शोप मध्ये जावून एका टेबलापाशी जावून बसलो . मोबाईल मध्ये डोक खुपसून. १०-१५ मिनिटानंतर कुणी तरी माझ्या टेबलपाशी उभ असलेल मला जाणवलं आणि मी मोबाईल मध्ये खुपसलेल माझ डोक वर काढून पाहिलं . समोर "ती" उभी होती . तिला समोर पाहून मी थोडा गडबडलो , चेहर्यावर  हसू आणून तिच्या कड पाहिलं आणि हाय-हेल्लो केलं , खुर्चीवर बसता बसता तिने विचारल "उशीर झाला का मला ?", 
"नाही ग तुला उशीर नाही झाला , मलाच घाई असते ना नेहमी "- मी चटकन बोलुन गेलो .
माझ हे उत्तर तिच्या मनाला लागल होत , तिच्या चेह्रार्यावर दिसत होत ते . पण तीन ते दाखवून न देता विचारलं "किती दिवसांनी भेटतोय ना आपण , दीड वर्ष झाला असेल ना ?".  
"दोन "-मी , 
"काय ?"- ती , 
"दोन वर्ष , झाली . आपल्याला शेवटच    भेटून " मी तिला म्हणलो .
 त्यावर ती म्हणली "टोमणे देतोयस ? दे चालेल , चूक माझीच होती ना ", 
"नाही ग टोमणे नाही देतय , खरच नाही , फ़्क़्त जे तुझ्याशी  ह्या दोन वर्षात बोलायचं होत ते येतंय ओठांवर , बाकी काही नाही  "- मी . 
मला माहिती होत माझ हे अस बोलन तिला दुखवत असेल पण त्यावेळी मी जे बोलत  होतो त्यावर माझा कंट्रोल नव्हता आणि तीही आज सगळ ऐकून घेत होती . तितक्यात वेटर आला , त्याला कॉफी ची ऑर्डर दिली आणि मग मीच विषय बदलला "तुला काहितरी बोलायचं होत ना माझ्याशी ?  "

माझा हा प्रश्न ऐकून तिने मान खाली घातली आणि माझ्याशी बोलायला लागली "कस सांगू तुला ? मला माहिती आहे मी तुला फार हार्ट केल होत , तुला मी आवडायची , तुझ माझ्यावर प्रेम होत त्या प्रेमाला मी धुडकावल होत ", ती बोलत होती , मी तीच हे सार बोलन ऐकत होतो , वेटर ठेवून गेलेल्या टेबलावरच्या कॉफीच्या वाफाही थंड होत होत्या पण तीच एका मागून घडलेल्या गोष्टी  सांगण चालू होत . त्यातच मी तिला विचारल
 " पण इतक्या वर्षांनी का आठवतेस तू हे सगळ " माझा प्रश्न संपतो न संपतो तोच तिने उत्तर दिल 
"कारण मला आत्ता कळतंय खर प्रेम काय होत ते , जे तू माझ्या वर करत होतास , आणि मी ते समजू शकले नाही हे मला आत्ता कळतंय " बोलताना तिच्या डोळ्यात पाणी साठल होत ते पाहून ही मी तिला सावरायला मदत करत नव्हतो कारण मी स्वतालाच सावरत होतो तिच्या पासून दूर राहण्यासाठी . 
"पण आत्ता अस काय घडल कि तुला माझ प्रेम खर वाटल ?",- मी विचारल , 
"ह्या दोन वर्षात खूप काही घडल "-ती हळूच म्हणाली  . त्यातच तिने माझ्या  हातावर स्वताचा हात ठेवला , तिच्या स्पर्शाने माझ्या  अंगावर शहारे उभे राहिले होते , कपाळावर घाम फुटला, आणि डोळ्यांसमोर एक अंधारीशी आली  , ह्याच दरम्यान तिने विचारल "आज हि आहे का तुझ प्रेम माझ्यावर ? मला हवय तुझ प्रेम ", तिचा हा प्रश्न ऐकताच मी तिच्या हाताखालचा माझा हात झटकन  काढून घेतला आणि दोन्ही हात माझ्या छातीशी बांधून घडी घालून बसलो आणि थरथरत्या ओठांनी उत्तर दिल 
"नाही , नाही पडायचं मला तुझ्या प्रेमात परत ". 
"का ?"-तीने प्रतिप्रश्न केला  .  
"एकदा सावरलाय मी स्वताला , पुन्हा तू सोडून निघून गेलीस तर स्वतला सावरायची हिम्मत नाही माझ्यात , खरच नाहीये "  माझे डोळे लाल झाले होते सोबत होते ते डोळ्यात साठलेलं  गरम अश्रू , जे कधीही काठ ओलांडून बाहेर पडतील , मी हाताची घडी आणखी घट्ट  केली आणि उगाच चेहऱ्यावर हसू आणायला लागलो , माझ्या आसवांना कंट्रोल करायला  . ती माझ हे बोलन पापणी न लवता ऐकत होती , बहुतेक तिलाही जाणीव होती तिने दिलेल्या दुखाची . माझ बोलून पूर्ण ऐकून तिने शांतपने उत्तर दिल 
"नाही रे , परत नाही जाणार तुला सोडून , काधीच नाही , तुझी शपथ... ". 
मी कपाळावरचा घाम पुसला आणि म्हटल "पण माझ्या कड तुला देण्यासारख काहीच नाही . तेच फाटक नशीब आहे माझ्या पाशी , ज्या मुळे तू मला सोडून गेली होतीस दोन वर्षापूर्वी , किमान त्यावेळी माझ्या कडे तुला द्यायला प्रेम तरी होत , ते हि आता कमी झालाय , मग का हा हट्ट ? ". 
"कमीच झालाय ना ? संपल तर नाहीये ना तुझ प्रेम माझ्यावरच  ?" अस म्हणून तीने माझ कारण खोडून काढल , मी पण म्हटल , "तूच म्हणत होतीस ना कि फ़्क़्त प्रेमानी पोट भरत नाही ते , त्याच काय ? ", 
"हो खरय ! मी म्हणाले होते ते , पण मला माहित नव्हत तेव्हा प्रेमाची ताकद , जी पोटातल्या भुकेपेक्षा जास्त असते ते   ". आज ती माझ एक-एक म्हणन खोडून काढत तिच्या प्रेमात मला ओढायचा प्रयत्न करत होती , पण माझ मन गुंतल होत भूतकाळातल्या गोष्टीत , त्या वेळी कोणताही निर्णय घेन्याच्या स्थितीत  नव्हत माझ मन , मग मी तिला तस स्पष्टच सांगितल "खरच मला आता काही एक कळत नाहीये , मला वेळ हवाय विचार करायला  ". 
 "चालेल घे ना वेळ "- ती म्हणली .
 "निघूया का आपण ? " अस म्हटल  मी आणि निघायला लागलो तोच स्वताला थांबवत म्हटल "मी काय निर्णय घेयील माहित नाही , पण उगाच तू जास्त आशा घेवून नको ठेवुस , आपेक्षाभंगाच दुखः फार त्रास देत , अनुभव आहे मला म्हणून सांगतो ." माझ्या ह्या बोलण्यावर ती हसली आणि बोलली 
"तू काहीही निर्णय घे , मला चालेल , काय घडेल जास्तीत  जास्त ? एक तर मला माझ्या वागण्याची शिक्षा मिळेल नाही तर तुझ्या रूपाने एक प्रेम ". ह्या तिच्या बोलण्यावर माझ्याकडे काहीच उत्तर किंवा प्रतिप्रश्न हि नव्हता . मी विषय बदलला आणि तिला "तुला कुठ सोडू का ?"  अस विचारल . तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हटली "नाही ,जाईन माझी मी ".


मी आणि ती त्या कॉफी शॉप मधून बाहेर पडलो आणि आपापल्या दिशेने निघालो  , मी घरी पोहचलो ते विचारांचं , प्रश्नाचं आणि तिच्या चेह्रारयावरच्या भावांच आणि अपेक्षांचं भल मोठ गाठोड घेवूनच .   ते सार गाठोड मी  कस सोडवनार होतो  मलाच माहीत नव्ह्त .


-प्रफुल्ल शेंडगे .

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-