20 मिनिट





आज जरा घाईच झाली .... आधी उठायला उशीर झाला आणि मग ऑफिस ला जायची तयारी ... घाई-घाईत कस तरी रेल्वे स्टेशन गाठलं ... ८:४० ची लोकल पकडायचीच असा निर्धार करून पाऊले पुढे टाकत होतो .... त्यात सकाळीच एवढ उकडत होत कि स्टेशन वर पोहचेपर्यंत पूर्ण शर्ट घामाने ओलाचिंब भिजला होता ...जस स्टेशन च्या पायर्या उतरल्या तोच गाडीने निघण्याचा आवाज दिला .. मग काय... पुन्हा धावत-धावत कसाबसा डब्यात प्रवेश केला ... आधीच डब्बा मानसानि फुल झाला होता .. बसायला जागाच उरली नव्हती ... म्हणून दरवाजाच्या बाजूला जावून उभा राहिलो ... गाडीने वेग धरला होता ... मंद वाहणारा वारा गाडीच्या वेगाने सुसाट वहायला लागला होता होता .... आणि तो जेव्हा माझ्या ह्या भिजलेल्या शरीराला स्पर्श करत होता तेव्हा अगदी गारेगार वाटायला लागल .. पुढच्या स्टेशन वर आणखी माणस डब्ब्यात चढली ... माणसांच्या गर्दीतून दरवाज्यातून बाहेर पाहन मुश्कील झाल ... आणि मी डब्यातच इकडे तिकडे नजर फिरवायला लागलो. बाजूलाच लागून लेडीज डब्बा होता दोन्ही डब्ब्यानच्या  मध्ये फ़्क़्त एक जाळी होती ... अगदी कही सेकांदापुर्ती त्या जाळी  पलीकडे माझी नजर गेली होती तोच दरवाज्यात उभ्या असलेल्या एका चेहऱ्याकडे माझ लक्ष वेधलं गेल ... एका हाताने हैंडल पकडलेल , पोटावर अडकवलेली बैग तर दुसर्या हाताने वारयाने विस्कटनार्या केसांना सावरायचा प्रयत्न करणारी ती ... तो मदमस्त वाहणारा वारा तिची जणू छेड़च काढत होता कि काय असा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता ... ४-५ वेळा केसांना सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने केसांना लावलेली पिन काढून तोंडात पकडली , गाडीच्या वेगासोबत स्वताला सावरत तिने सारे विस्कटलेले केस गोळा केले आणि त्यांचा बुचका बांधून मागे घट्ट बांधून ठेवले ... मग पुन्हा बैगमध्ये  हात घालून इअरफोन्स काढून गाणी ऐकायला लागली ... मध्येच गाणी ऐकताना डोळे बंद करून गान गुणायला लागायची मग पुन्हा कुणी पाहत तर नाहीये ना ते पाहून पुन्हा गाण्यच्या धुंदीत अडकून जायची ... मी तिच्याकडे पाहतच राहिलो होतो ... पण कधी माणसाच्या चढण्या-उतरण्याच्या गर्दीत ती माझ्या नजरेसमोरून हरवून जायची पण फ़्क़्त काही सेकांदापुर्तीच ... एका मागून एक स्टेशन जात होते ... अशाच एका स्टेशन वर जाळीच्या पलीकडून तिने मला पाहिलं ... बहुतेक मी तिच्या कडे पाहतोय हे कलाल  कि काय ? ... मी न  पाहिल्यासारख नजर फिरवून घेतली तेव्हा कलाल गाडी माझ्या स्टेशन वरून निघाली होती ... मी घाईने उतरण्याचा प्रयत्न करायला लागलो पण गाडीने वेग धरला होता ... आता पुढच्या स्टेशन वर उतरून पुन्हा मागच्या स्टेशन ला जाण्यावाचून पर्याय नव्हता ... स्टेशन यायला थोडा वेळ होता म्हणून हळूच चोरून पुन्हा तिला पहायला लागलो .. पण ती तिच्या जागेवर दिशेनासी झाली ... बहुतेक तिला बसायला सीट  मिळाली असावी... पुढच्या स्टेशन वर मी उतरलो आणि दुसरी गाडी पकडायला निघलो तोच ती माझ्या समोर उभी होती ... काही क्षणांसाठी माझा श्वास थांबला ... तोच तिने मला विचारल "अंधेरी इस्ट कोणत्या बाजूला आहे  ?”... मी स्वप्नात तर नाही ना अस  मला वाटयला लागल होत आणि दुसर्याच क्षणी स्वताला सावरत मी तिच्या प्रश्नच उत्तर दिल ... मग तिने थैंक्स म्हणत दिलेली स्माइल ने तर मी अर्धा घायाळ झालो .... आणि मी तिथून निघालो ... मनात विचारांचं चक्र घेवुनच ... ह्या २० मिनिटांच्या प्रवासात मला ती आवडली होती ... प्रेम कि आकर्षण ? माहित नाही

पण आजकाल तिच्या साठी  रोज  मी मुद्दाम एक स्टेशन पुढे जातोय ...आणि ऑफिस  सुटल्यावर हि तिच्याच स्टेशन वरुण गाडी पकडतो ... दिसते रोज मला आजही ती, पण पुन्हा बोलन मात्र झाल नाही ...  मीच बोलेन म्हणतोय एकदा तिच्याशी पुन्हा ...  बोलू ना ?

-प्रफुल्ल शेंड्गे

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा    २० मिनिट भाग -2      २० मिनिट भाग -३         २० मिनिट -भाग 4

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-