नेत्रानी बेट


              तसा काय मी अगदी भटका वगैरे नाही पण दुर्गम किंवा नैसर्गिक ठिकाणी जायची संधी आली तर मी ती सोडत हि नाही  ...असाच एकदा एका बेटावर जायचा योग आला , भटकळ , कर्नाटक मधील पश्चिम किनार्यावरच एक शहर , नोकरी निम्मित्त मी तिथ वास्तव्याला होतो , जानेवारी महिन्यात माझ्या एका स्थानिक मित्राने बेटावर जाण्यासाठी बोलावल होत , प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात स्थानिक लोक त्या बेटावर जात असत  , हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची देवालये आहेत त्या बेटावर आणि त्या देवालयात वर्षातून एकदा पूजा केली जाते  हवामानाचा आणि बाकी सार्या भौगोलिक आणि नैसर्गिक गोष्टींचा अंदाज घेवून एक दिवस ठरवला जात असे , मित्राच्या ह्या निमंत्रणामुळे आणि त्याने केलेल्या बेटाच्या वर्णनाने माझी हि उत्सुकता वाढली आणि मी जराही विलंब न लावता होकार दिला .
             रविवार च्या दिवशी सकाळी 7 वाजता सागरी बंदरा वरून  जायचं ठरल होत त्या प्रमाणे मी आणि माझे एक सहकारी आम्ही ६-६:३० च्या सुमारास घरातून  बंदराच्या दिशेने गाडी वरून निघालो , जानेवारी चा महिना असल्याने हवेत चांगलाच गारवा सुटला होता आणि गाडीच्या वेगाने तो आणखीनच जास्त जाणवत होता , रस्तावर दाट धुक्यानी चादर ओढली होती , मन प्रफुल्लीत करून जाणार वातावरण होत ते सगळ ,  १० -१५ मिनिटांच्या  प्रवासानंतर मासळी चा एक उग्र वास जाणवायला लागला आणि त्या वासानेच कळल  कि आम्ही बंदरा जवळ पोहचलो होतो  ,आकाशात  सूर्य हलकासा उगवला होता आणि सगळीकडे निसर्गाने अगदी मुक्त पणे रंग पसरले होते, मासळी च्या तो उग्र वासाची आता जणू काही सवय झाल्यासारखी नाहीसा झाला होता. बंदरावर पोहचलो तेव्हा नौकांची जणू फौजच उभी होती एका बाजूला एक अशा अनेक नौका एका रांगेत उभ्या होत्या , त्यावेळी माणसांची गर्दी तशी विरळ होती पण जस जशी वेळ पुढे जात होती तशी माणसांची गर्दी वाढत गेली  , मी आणि माझे सहकारी आम्ही एका दुकानाच्या कट्ट्यावर जावून बसलो तिथे बसलले एक आजोबा आमची विचारपूस  करत होते पण ते कन्नड मध्ये बोलत असल्याने मला तेवढ काही उमजत नव्हत  पण माझ्या सहकार्यांना कन्नड माहित असल्याने ते त्याची उत्तर देत होत होते आणि मला हि ते काही गोष्टी ट्रान्सलेट करून सांगत होते ..... सुमारे ८:३० च्या सुमारास आम्ही बोटीवर चढलो , मित्राच्या घरचीच बोट असल्याने आम्ही एका चांगल्या जागी जावून बसलो अर्थात फोटो काढण्यासाठीच आम्ही मोक्याची जागा शोधली ,ज्या बोटीने आंम्ही प्रवास करणार होतो ती काही प्रवासी बोट नव्हती , मासेमारीची बोट होती पण आजच्या दिवशी ती स्वच्छ करून  सकाळीच तिची पूजा करून ती तयार ठेवली होती , जशी जशी माणस  चढली तशी एक एक नौका सुरु झाली , किमान १०-१२ नौकांची तोफ एका मागून एक निघायला लागली , का कुणास ठावूक पण माझ्या  मनात एक वेगळ्याच प्रकारची हूर हूर सुरु झाली होती , पण सभोवतालची दृश्याने माझ्या ह्या हूर-हुरीला थोडस बाजूला सारल , आणि मी त्या निसर्गाच्या अद्भुत  चमत्काराच्या जाळ्यात अडकून गेलो , सकाळची सूर्याची कोवळी किरणे समुद्राच्या पाण्यावर चमकू लागली होती , आणि जस जस आम्ही बंदरापासून दूर होत गेलो तसं चोहीकडे फ़्क़्त पाणीचपाणी, आणि त्या क्षणी मला ती बोट म्हणजेच एक बेटा समान भासू  लागली होती  ज्याच्या चोहीकडे फ़्क़्त पाण्यचा वेढा.

                 
               जस जसा सूर्य डोक्यावर येवू लागला तसं उन्हाच्या झळा नकोशा होवू लागल्या होत्या , सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर  आम्हाला त्या बेटाच सुस्पष्ट दर्शन व्हायला सुरुवात झाली , एखाद्या बुरुजाप्रमाणे हा बेट होता.. ”नेत्रानी ”  ह्या नावाने बेट ओळखला जात असे  ... ह्या बेटावर आधी नेव्ही च्या अण्वस्त्राच्या चाचण्या केल्या जात पण कालांतराने ह्या वर बंदी आणली गेली होती ....खरच नेत्रांना सुखावह होत त्या बेटाच बोटीतून होणार दर्शन , जस जशे आम्ही  बेटाच्या जवळ जात होतो तसं त्या समुद्राच्या पाण्याचा नीला रंग गडद होत जात होता जणू काहि सारा नीळा आकाश त्यात बुडला होता कि काय ह्याचीच प्रचीती येत होती  ..आणि मधूनच एखाद्या डॉल्फिन ने मारलेली उडी पाहायला मिळत होती ....अगदी विलोभनीय दृश्य होत ....आम्ही सारेच त्या डॉल्फिन ची उडी कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यात काही आम्हाला यश मिळाल नाही ... आता आमची नौका बेटाच्या जवळ येवून उभी राहिली तेव्हा मला कळाल कि आता त्या  बेटच्या पायथ्याशी छोट्या होडीने जायचे आहे , भुवया थोड्या उंचावल्याच  माझ्या ,कारण भर समुद्रात मोठ्या नौकेतून उडी मारून दुसर्या एका छोट्या होडीत जायचं होत ....हृदयाची धड धड वाढली होती , पण मन थोड घट्ट केल आणि बाकींच्या बरोबरीने मीही दुसर्या होडीत प्रवेश केला,  आणि त्या बेटाच्या पायथ्याशी पोहचलो ,बेटावर  इतकी गर्दी पाहून कुणाला  वाटणार नाही कि हे एक निर्जन बेट आहे , एखाद्या गावाप्रमाणे माणसांची गर्दी जमली होती .




                  आता आणखी एक दिव्य समोर होत ते म्हणजे ते बेट चढून जायचं .... पण ह्या गोष्टीला मी अगदी उतावळा होतो,  मोठे मोठे आणि काळेभोर पाषाना वरून चालायला  आम्ही सुरुवात केली एका हातात कॅमेरा घेवून सारे क्षण बंद करण्यासाठी चालेली खटाटोप , आणि मनात बेट चढण्याचा उत्साह , झाड्याच्या फांद्या , वेलींना पकडून आम्ही  चढत होतो, आधी मोठे मोठे पाषाण नंतर घसरणारी मातीची पायवाट तुडवत  कसाबस आम्ही एकदाचा तो बुरुज रुपी बेट सर करून बेटाच्या वरच्या भागात पोहचलो , आणि मंदिरात जावून दर्शन घेतल आणि पुन्हा  आम्ही आमच्या भटकंती ला सुरुवात केली , मंदिरात जायचे म्हणून चप्पल बाहेर काढून ठेवली होती आणि आम्ही तशाच उघड्या पायांनी बेटाची सफर करायला सुरुवात केली, पायाला खडे टोचायला लागले होते , बेटाच्या वरच्या भागातून समुद्राच होणार  दर्शन अगदीच अवर्णनीय होत  , त्या अथांग सागराला शांत राहून स्वतःच काम करताना पाहून  जगण्याचा एक नवा पैलू सापडत  होता , आपण पण हि शांत आणि चिकाटीने आपल  काम करून आपल आयुष्य आणि कीर्ती ह्या सागरा प्रमाणे वाढवली पाहिजे असा संदेशच जणू तो आपल्याला देत होता  ..... त्या बेटावरून सभोवाताली आणि त्या बेटावरची निसर्गाने केलेली अलौकिक किमया जणू पूर्ण आयुष्यभर पाहत राहिलो तरी पूर्ण न होण्यासारखीच होती , पण आपल्यालाही वाहतच रहाव लागत ना एखाद्या नदी सारख सागराच्या ओढीने .... तासाभराच्या विश्रांती नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला  .... पण जाताना त्या बेटाकडे परत परत वळून पाहून त्याचे सौंदर्या , त्याचा एकांतपणा आणि त्यावरची शांताता स्वतः सोबत नेता आली असती तर किती बर झाल असत असा विचार करत ...  आणि त्या सोबतच एक गान मात्र डोक्यात फिरत राहील ते म्हणजे  ....
परती च्या ह्या वाटेवरती असेच काही घडते 
निघता निघता वाटच अडते , पावलात घुटमळते    

पण काय करणार कितीही हव हवस वाटत असल तरी प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच ना !... पण जणू काही सर्वांनी त्या बेटाला पुन्हा पुढल्या वर्षी आवर्जून येवू अस न बोलता वचन दिल होत कि काय असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.....

-प्रफुल्ल शेंड्गे

आणखी काय हवं ?



प्रेमळ नजर  नि  लाजून  हसण
दूर जाताना फिरून बघण
हळूच चोरून  तुझ  पाहण
नि मुक्या शब्दांनी खूप काही  बोलुन जाण


गुलाबी हवेत , तुझ रुसून फुगण
मुसळधार पावसात चिंब भिजण
रोजचं  एकांतात  आपल  गुपचूप  भेटण
नि  खांद्यावर डोक ठेवून तुझ अलगद निजण


मनातली ओढ आणि शपथेतली साथ
निरागस डोळ्यातला अतूट विश्वास
पाहता तुला भासे नेहमी प्रेम नवं
सांग ,प्रेमात पडायला आणखी काय हवं ?


--प्रफुल्ल शेंडगे .

दूर जरी मी...

दूर जरी मी तुझ्या 
का तुझ्यातच मी रमतो 
अश्रुंचे होती पाट 
अन त्यात तुलाच पाहतो 

सांजवेळीचा सूर्य 
आठवण तुझी मज देतो 
विसरून तुला जरी मी 
का तुझ्यातच घुटमळतो ? 


गंध मोगरयाचा हा 
आजही कसा दरवळतो ?
 तुटून गेल्या कळ्या 
तरी मनी गुलाब का फुलतो ? 


सुटून गेले हात 
काळीज दुभंगले होते 
उरी माझ्या तू प्रेमाचा
का घाव घातला होता?


 -प्रफुल्ल शेंडगे .

प्रवास पहिल्या प्रेमाचा

     वैयक्तिक कारणानिमित्त बस नि प्रवास करत निघालो होतो .... आजूबाजूला छान हिरवाई पसरली होती .... पावसाच्या हलक्या हलक्या सारी कोसळत होत्या ... बसच्या खिडकीतून डोंगरावर उतरलेले ढग पाहून जणू साक्षात स्वर्ग च पृथ्वीवर उतरला आहे कि काय ह्याची प्रचीती येत होती .... सोबत होती हैडफ़ोन च्या गुहेतून येवून कानात गूंजनारी  एफ .एम . वरची गाणी.... आणि अशातच एक रोमांटिक गाण्याला  सुरुवात झाली ... मग काय गाण्यच्या शब्द्भोवती मन पिंगा घालायला लागल ... आणि गाडीच्या वेगानी वाढणारी ती मंद हवा बोचक होवून अंगावर शहारा उभी करायला लागली  ... तरीही तोंडावर आपटणारा तो मदहोश वारा हवा हवासा वाटत  होता .... डोळे अलगद बंद करून मी त्या गानाच्या शब्दात आणि संगीतात स्वताला अडकवून दिल ....  आणि बंद डोळ्ण्यासमोर आला तो तिचा चेहरा आला ...
मोकळे सोडलेले केसएखाद्या मोरपीस फिरवावा तसे चेहऱ्यावर फिरत  आणि त्यांना सावरताना तिची उडालेली धांदल , दोन  डोंगरांच्या मधून सूर्य उगवावा तसं भुवयांच्या मधोमध लावलेली छोटी टिकली , चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि सोबतीची  निरागसता ..तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीत घडलेलं हेच होत तीच रूप ... शेअर रिक्षा मध्ये घडलेली आमची हि पहली भेट... पहील्या नजरेतल प्रेम वगैरे अस काही घडलं नव्हत आमच्यात .... पण अधून मधून आमची भेट व्हायला सुरुवात झाली होती .. अगदी अनोळखी असणारे चेहरे आता  एकमेकांना पाहून स्मितहास्य करायला लागले होते ... बोलण्याच्या बाबतीत मात्र  "दिल्ली अभी दूर थी " अशीच परिस्थिति होती   ... पण कैलेंडर  मधल्या तारखेसोबत तिच्यातली आणि माझ्यातली ओळख गडद होत गेली ... हसण्या बोलण्या सोबत मैत्री वाढू लागली होती .... सोबतच वाढत होती ती माझ्या मनात तिच्याबद्दल ची अनामिक ओढ ... पण मन मात्र बोलायला घाबरत होत ... पहिलं प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सारखी  माझीही अवस्था झाली होती ... प्रत्येकवेळी बोलका वाटणारा तिचा चेहरा ह्या प्रश्नाच  उत्तर द्यायला तयार नव्हता अस वाटत होत ... दिवसामागून दिवस जात होते .... मावळत  जाणारा प्रत्येक दिवस  तिच्यातला समंजसपणा , जे आहे त्यात सुख मानणारी , जगण्याला खर्या अर्थाने जगणारी अशा अनेक रूपांच दर्शन मला घडवत  होता  ....  अखेर तो दिवस माझ्या आयुष्यात आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो ... माझ्या मनी पडलेल्या प्रश्नाच आणि मनात तिच्या विषयीचे प्रेम भाव मला तिच्या चेहऱ्यावर हि दिसायला लागले होते ... नजर मिळवून हळूच नजर झुकवण , माझ्यासोबत बोलताना चेहऱ्यावर येणारी गुलाबी हृदयाला भिडली जात होती ..आम्हा दोघांना हि एकमेकांना एकमेका प्रती असलेल प्रेम उमगल होत .... न सांगता न बोलता आम्ही दोघांनी नजरेने प्रेम व्यक्त करुण टाकल होत .... दिवसेन दिवस भेटी गाठी वाढायला लागल्या ....प्रत्येक प्रेमी युग्ला प्रमाणे आमचेहि  दिवस सुरु झाले  होते .... प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या ... पुढच आयुष्य एकत्र जगाव म्हणून आम्ही घरच्यांना आमच्या प्रेमाची कल्पना द्यायचा निर्णय घेतला पण मनात भितिनी घर करायला सुरुवात केलि होती , घरचे स्वीकारतील का आमच नात ? पण मन घट्ट करुण आम्ही आमचा सांगण्याचा  निर्णय घट्ट केला मनात एक सकारात्मक  आशा घेवुनच   ....    ठरवल्या प्रमाणे  तो दिवस उजाडला हि आणि आम्ही केल व्यक्त प्रेम घरच्यांसमोर  ... आणि जे घडायच होत ते घडल  ....

                                   आज त्या गोष्टीला दोन वर्ष होवून  गेले होते  ... पण तरीही रोज तिचा पहिल्या भेटीतला चेहरा आठवतो...  विचारांनी डोळ्यांचे काठ पाणवले होते, अंगावरचे शहारे विरून गेले होते .... कानात वाजणारे गाणी कधीच मुके झाले होते माझ्यासठी  ... ओघळणारे अश्रू थांबवण्यसाठी मी  विचारांच्या ह्या डोहातून हलकासा बाहेर आलो आणि डोळ्यांचे काठ अलगदपणे पुसली... भूतकाळातल्या गोष्टींना थोडस सारून वर्तमानात मी प्रवेश केला आणि बाजूच्या सिट  वर बसलेली , अलगद माझ्या खांद्यावर डोक ठेवून विश्वासाने झोपलेल्या माझ्या सौभाग्यवती  कडे अर्थात बायको कडे पाहिलं ...  तिला पाहून माझ्या चेहर्या वर स्मितहास्य उमटलं .... दोन-अडीच वर्षा  पूर्वी घेतलेल्या आणाभाका आम्ही रोज पूर्ण करत होतो... रिक्शा शेयरिंग ते संसारच गाड़ा असा प्रवास सुरु  झाला होता ... घरच्यांच्या संमतीने आम्ही सात फेरे घेतले होते  आणि आज  आमच्या लग्नाला आता दीड वर्ष झाला होता ... ह्या दीड वर्षांच्या संसारातहि मला तिच्यात तीच पहिल्या भेटीची क्षण दिसतात ... माझ्या प्रेमासोबत मी माझ आयुष्य जगत होतो हा विचारच सुखावह होता ... बहुतेक माझ्या सारखा नशीबवान मीच असेल असा विचार माझ्या मनात आज हि येतो  ....

                                                 - प्रफुल्ल शेंडगे 


एक संध्याकाळ

                              संध्याकाळी ५:३० ची वेळ होती , नेहमी प्रमाणे मी ऑफिस मधून रूम वर जायला निघालो , पावसाचे दिवस होते , पण पाऊस नसला तरी हवेत मंद गारवा पसरला होता , ऑफिस मधून निघाल्या पासूनच मनात थोडस उदास उदास वाटत होत , ऑफिस मध्ये हि काहि विशेष घडलं नव्हत , रूमवर जावून तोंडावर सपासप पाण्याचा मारा केला , वाटल होत थकव्याने उदास वाटत असेल म्हणून पण त्या पाण्याचा फ़्क़्त चेहऱ्यावर तेवढा फरक पडला पण मनातली अस्वस्थता तशीच कायम होती ... थोडा बदल म्हणून बाहेर फिरायला निघालो , सूर्य मावळायला आला होता , आकाशात पिवळ्या रंगाची चादर पसरली होती , मधूनच एखादी वारयाची एक गारेगार झुळूक अंगाला स्पर्श करून जायची त्यामुळे अंगावर हलकासा शहरा येत होता , मी तसाच पुढे पुढे चालत होतो , त्यावेळी फ़्क़्त माझे पाय चालत होते मनातले विचार अगदी सिग्नल ला थांबलेल्या गाड्यांसारखे थांबून गेले होते , पण किती वेळासाठी ते काही माहित नव्हत

                                          चालत चालत एका चहा च्या कॅन्टीन पाशी येवून बसलो आणि चहा वाल्याला एक चहा मागितला , त्याने माझ्या कडे पाहिलं आणि म्हणाला "भजी देवू का दादा ? गरम गरम आहेत ” , मी होकारार्थी मान डोलावली , काय चालल होत माझ मलाच कळत नव्हत , समाधी लागल्यासारखा मी शून्यात पाहत बसलो होतो , चहाचा वाफाळणारा वास दरवळायला लागला होता आणि त्याच सोबत उकळत्या तेलात भजी तळायला सोडल्यावर येणारा तो आवाज जणू माझी ती समाधी तोडू पाहत होता , थोड्याच वेळात चहा आणि भजी टेबलावर ठेवून चहावाला निघून गेला , मी गुरफटलेल्या विचारातच चहाचा कप उचलला आणि तोंडाला लावला तसा गरम चहाने ओठांना जो चटका बसला त्याने थोडासा मी माझ्या समाधीतून बाहेर पडलो , आणि भजी सोबत चहाचा आस्वाद घ्यायला लागलो , त्याच दरम्याण त्या पिवळ्या नभांच्या चादरीवर काळे ढग पसरले होते , वारा थोडा जोरात वाहू लागला होता , पाऊस सुरु होणार ह्या शक्यतेने मी तो चहाचा शेवटचा घोट घेतला , चहावाल्याला पैसे दिले आणि मी निघणार तेवढ्यात पावसाच्या सरी धावत आल्या, जणू काही त्या मी निघण्याचीच वाट पाहत होत्या , आणि येताना मी सोबत छत्री हि आणली नसल्यामुळे तिथेच थांबन्या शिवाय दुसरा पर्याय हि नव्हता , मग परत जावून त्या टेबलाजवळ बसलो आणि रस्त्यावर नजर फिरवत पाहायला लागलो , अचानक आलेल्या पावसामुळे लोंकाची जी त्रेधातीरपीट उडालेली दिसत होती ती न्याहाळायला लागलो , जो तो मिळेल त्या आडोशाला उभा राहत होता , आत्ता पर्यंत माणसांनी गजबजलेला रस्ता जणू पावसाने गिळून नेला कि काय असा वाटायला लागल होत त्या निर्मनुष्य झालेल्या रस्त्याकडे पाहून .
                                           अशीच नजर फिरवताना माझ लक्ष गेल ते एका आडोश्याला उभ्या असलेल्या एका मुलीकडे , जेमतेम 6-7 वर्षांची असेल अंगावर पिवळा धमक फ्रोक , केस विस्कटलेले एका कडेवर एक मुलगा होता अगदी 1-2 वर्षांचा , अंगावर फ़्क़्त एक चड्डी आणि बाकी पूर्ण अंग उघड असलेला , धुळीने पूर्ण अंग मळकटल होत , आणि ती मुलगी कौलावरून पडणार्या पावसाच्या पाण्यने त्याच तोंड धुवत होती पण त्याची पावसात भिजण्याची धडपड अगदी दिसत होती आणि मग काय शेवटी त्याच्या हट्टा समोर तिला हि हार मानावीच लागली , दोघानिही चिंब भिजायला सुरुवात केली , आणि ह्या भावंडा कडे पाहून मनातले झोपलेले विचार खडबडून जागे झाले आणि सार्यांनी डोक्यात एकच गर्दी केली , थोडस सावरून स्वतच्या विचारात पुन्हा गुंतून गेलो , आणि पहिल्याच विचार बरोबर एक दृश्य डोळ्यासमोर उभ राहील ते म्हणजे .... लहानपणी पाऊस आल्यावर त्या पावसात भिजण्याची जी आपली सवय होती ती आठवली , पावसात ओल चिंब भिजायचं , साठलेल्या डबक्यात पाणी उडेपर्यंत जोराने मारलेल्या ड्या , कागदी होड्या बनवून मित्रांच्या होडीसोबत लावलेली पैज , किती बेफिकीर पणे आणि आनंदाने आपण आपल बालपण घालवल होत ह्याचा प्रत्येय यायला सुरुवात झाली होती त्यावेळी आपल्याला कशाचच टेन्सन नव्हत फ़्क़्त एन्जोय करायचो आपण आपला प्रत्येक क्षण , आई बाबांकडे खेळणी- चोकलेट साठी हट्ट करायचो ,वाढदिवसाला नवीन कपड्यांसाठी रुसून बसायचो , तरी पण आज आपण प्रत्येक सुखाच्या मागे धावत असतो , कितीही भेटल तरी आणखीची हाव आपल्या पासून काही सुटत नाही , आणि हि मुल अंगावर पुरेसे कपडे नाहीत, खायला अन्न भेटेल कि नाही ह्याची शास्वती नसताना हि आयुष्य कस जगत असतील हा प्रश्न मनाला चटका लावून जात होता ,ढगांच्या एका कडकडाटाने मी विचारांच्या ह्या तंद्रीतून बाहेर आलो .
                                           पावसाचा जोर काही अंशी कमी झाला होता आणि लोक आडोशा पासून लांब होवून स्वतच्या वाटेला निघाली होती.. ती भावंड हि तिथून निघून कॅन्टीन जवळ येतान मला दिसली , कॅन्टीन च्या शेड खाली आल्यावर त्या मुलीने आपल्या भिजलेल्याच फ्रोक ने आपल्या छोट्या भावच भिजलेले डोक आणि तोंड पुसायला सुरुवात केली त्यावेळी त्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या चेहर्या वरची माया पाहून भावा-बहिणीच नात किती गोंडस आहे ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला , अंग पुसून झाल्यावर तिने त्याला पुन्हा एकदा कडेवर घेतल आणि तिथून निघू लागली आणि मी पण त्यांच्या चेहर्या वरचा आनंद पाहून मनोमन खुश होवून गेलो होतो ,दर वेळेस च्या पावसासारख ह्या पावसाने हि मला काहीतरी दिल होत , माझ्या मनावरची मळभ दूर केली होती आणि मी काहीतरी नवीन मौल्यवान सापडल्याच्या अविर्भावात पुन्हा रूम कडे निघू लागलो ... 

                                                        -प्रफुल्ल शेंडगे 

भारत माझा देश आहे .

                   शाळेतल्या दिवसात प्रार्थनेच्या वेळी आपण एक प्रतिज्ञा बोलायचो, आठवते का ती प्रतिज्ञा ?, हो ! अगदी बरोबर "भारत माझा देश आहे.... ” , ह्याच प्रतिज्ञे वर आधारित मराठी मध्ये एक धडा होता "भारत माझा देश आहे ” नावाचा , कितव्या इयत्तेत होता ते मात्र मला काही नीटस आठवत नाही , पण त्यात लेखकाने एक छान विचार मांडला होता , का “भारत माझा देश आहे ” अस लिहल आहे प्रतिज्ञेत का नाही लिहल गेल कि "भारत आपला देश आहे ”, कारण आपण स्वतच्या गोष्टीना "माझा /माझी ” अस संबोधतो आणि सर्वांच्या गोष्टीना "आपला / आपली ” अस म्हणतो , आणि स्वतच्या गोष्टीना जेवढ आपुलकीने , प्रेमाने , काळजीने जपतो , सांभाळतो तेवढ आपण "आपल्या ” गोष्टीना सांभाळत नाही, कारण ती सर्वांची असते ना , आपण हा विचार करतो कि , 'मीच का लक्ष देवू , देयील न कुणीतरी लक्ष, घेयील कुणीतरी काळजी ' मात्र प्रत्येक जन हाच विचार करत बसतो आणि सगळ्याचंच दुर्लक्ष होत .....

                  पण शाळा संपली तसं आपण हि "प्रतिज्ञा ” विसरलो आणि भारत माझा देश आहे हे हि विसरून गेलो , आता आपल्या इथला प्रत्येक जन दुसरा देश आपल्या भारता पेक्षा कसा चांगला ह्याबद्दलच बोलत असतो , 'त्या ' देशातली स्वच्छता पहिली ? , "काय शिस्त आहे यार तकडे ", "आपल्या भारतात काहीच होवू शकणार नाही ", दुसर्या देशात गेल्यावर तिथले नियम , कायदे अगदी बरोबर पाळता न तुम्ही ?, आपल्या देशातही तेच आणि तसेच कायदे -नियम आहेत पण आपल्याला ते गळ्यातला दोरखंड वाटायला लागतात आणि येता- जाता तो कापायचा आपला प्रयत्न चालू असतो , दुसर काही नाही?
                 माझ म्हणन अस नाही कि ,तुम्ही दुसर्या देशाबद्दल चांगल बोलू नका अस , बोला ना दुसर्या देशाबद्दल चांगल , खरच असेल तो देश आपल्या पेक्षा पुढे , पण विचार करा "का आहे तो देश आपल्या पुढे ?” कारण तिथली मानस , तिथले नागरिक स्वतःच्या (फ़्क़्त स्वतःच्या ) प्रगतीकडे न पाहता देशाची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करतात , आणि आपण फ़्क़्त नाव ठेवण्यात आपला वेळ घालवतो , तसं कधी आपण आपल्या देशाविषयी कधीच चांगल बोलत नाही अस नाही , बोलतो कि आपण हि आपल्या देशाबद्दल चांगल , पण कधी माहिती आहे का ? वर्षातले फ़्क़्त 2 दिवस ! आपण आपल्या देशाच गुणगान गातो ते म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी , आणि वाटतो अभिमान देशाचा जेव्हा "भारत ” जिंकतो एखादी क्रिकेट मैच तेव्हा ....कुणी एकाने मस्त वाक्य बोलून ठेवल आहे
                      आजकाल देशभक्ती सिर्फ तारीखो पे आती है , और चली जाती है ”

आपण का विसरतो , कि आपण म्हणजेच "देश ” आहोत , देशातली हि करोडो जनता म्हणजे भारत आहे , का वाट पाहतोय आपण आज हि कुणी तरी सुरुवात करायची ?, उचला ना तुम्ही पाहिलं पाऊल , करा ना प्रतिनिधित्व , किती दिवस गर्दीतला एक सामान्य चेहरा बनून राहनार ? , करा दुसर्या देशातल्या चांगल्या गोष्टींच अनुकरण , ते जी स्वच्छता , शिस्त, देशप्रेम बाळगतात , बाळगा न ते हि तुमच्या अंगी , आणि घडवा आपला हि देश त्यांच्या देशासारखा , ज्याचा तुम्हाला ,स्वताला दरदिवशी अभिमान वाटेल , आणि बाकी सारया जगाला हि आपल्या देशाच कौतुक वाटाव असा ..... आणि त्यासाठी सतत जागृत ठेवा एक विचार कि "भारत माझा देश आहे  ”.

                                                                                                  -- प्रफुल्ल शेंडगे .

नावात काय आहे ?

                    नावात काय आहे ? अस शेक्सपियर कधी काळी बोलून गेला . पण तेच वाक्य आजही आपण कधीतरी उच्चार्तोच , पण थोड गांभीर्याने विचार करायला लागलो तर आपल्यालाही समजेल कि , नावात काय काय दडलेलं आहे . आता हेच पहा न "नावात काय आहे ?” हे वाक्य बोलणारा हि आपल्याला त्याच्या नावामुळेच कळला नाहीतर कुणाला कधी कळाल असत कोणी हे बोलून ठेवलं आहे ? . प्रत्येकाची प्रथम ओळख हि त्याच्या नावाने होते , जन्म दाखल्या पासून ते शाळेच्या दाखल्या पर्यंत आणि सोशल साईटस च्या प्रोफाईल नावापासून ते मृत्यू च्या दाखल्या पर्यंत सगळीकडे नाव म्हत्वाच आहेच , आपल नाव सगळ्यानाच प्रिय असत , कुणी तुमच नाव चुकीच उच्चारलं किंवा लिहल तर चढतो ना पार तुमचा काही अंशी वरती , कुणी घेतलं नाव ओठी अगदी प्रेमाने तर वाटत न मन प्रसन्न हीच तर गम्मत आहे ना नावाची .
                           पण समजा जर नाव हि गोष्टच अस्तित्वात नसती तर किती गोंधळ उडाला असता , कुणाला- कस ओळखायच, संबोधायच फारच कठीण होवून झालं असत , महत्वाच म्हणजे "नाव कमावण्याच्या ” ह्या शर्यतीत कुणी उतरलच नसत , आणि लग्नानंतरच्या "उखाण्यात नाव " घेण्याची गोंडस प्रथा हि अनुभवायला मिळाली नसती ,मला वाटतय जर "नाव" हि संकल्पना नसती तर ह्याचा जास्त फटका बॉलीवुड वाल्यानाबसला असता ,नाहीतर अमिताभ बच्चन - त्याच्या हिरोईन ला "माय नेम इस अंथोनी ” अशी ओळख करून देवू शकला असता का? , शाहरुख च्या त्या "राहुल ,नाम तो सुना हि होगा ” ह्या डायलॉग वर शिट्ट्या वाजल्याच नसत्या,आणि "नाम बडे ओर दर्शन छोटे "ह्या गाण्यावर भगवान दादा थिरकलेले पाहता आले असते का ? 
                          पण एक मात्र बर झालं 'शेक्सपियर च वाक्य जास्त मनावर न घेता नावावर बंदी नाही आणली ते, शेवटी नावात काय आहे ? हे सांगता येणार नसल तरी "नावात खूप काही आहे ” हे मात्र नक्की !
                                                                                                               -- प्रफुल्ल शेंडगे .

आपण ह्यांना पाहिलात का ?






         बरेच दिवस झाले एक गोष्ट शोधण्याचा मी खूप प्रयत्न करतोय , पण काही केल्या ती काही भेटतच नाहीये , अगदी कुणीही भेटल तरी प्रत्येकांना मी त्या गोष्टी बद्दल विचारतोय , पण कुणालाही ती माहिती नाहीये , काहींनी तर मला अगदी प्रात्यक्षिक देवूनच अनुभव दिला कि त्यांनी आयुष्यात कधी ती गोष्ट पहिलीच नसेल याचा , तर काही जन भेटले त्याचं म्हणन होत कि काही वर्षांपूर्वी पाहिलं होत पण सध्या मात्र कुठ दिसलीच नाही तुम्हाला भेटली तर आम्हाला हि सांगा , म्हणून काय कराव ह्याचा विचार केला आणि बाबांची आठवण झाली , बाबा म्हणजे ते भविष्य सांगणारे नाहीत तर आपले गुगल बाबा , त्यांच्या कडे सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटतात म्हणे म्हणून त्यांना विचारून पाहिलं तर ते हि म्हणाले “सर्च नॉट फाउंड ,मग दूरदर्शन च्या “आपण ह्यांना पाहिलात का ?” मध्ये जाहिरात द्यावीशी वाटली पण इथेही एक अडचण माझ्याकडे तिचा ना काही फोटो होता ना काही वर्णन ,मग शोधू कसा ?पण इतक मात्र ठामपणे माहिती आहे कि , हिरे-मोती , सोन्या चांदी एवढी मौल्यवान नसली तरी , ती जवळ असली तरी माणूस श्रीमंत होतो अस ऐकिवात होत , नाही कळाल ? मी काय शोधतोय ते ?
अहो माणसाची खरी ओळख असलेली आणि आता अस्त पावत चाललेली "माणुसकी ” शोधतोय मी .
                           हो ना ? आत्ता तुम्हालाही वाटलं असेलच ना खरच हि माणुसकी हरवत चाललेली आहे ..आपल्या सभोवताली एक नजर फिरवली तरी ह्या माणुसकीचा अभाव जाणवायला सुरुवात होते , आपण सर्व जन आपापल्या कामात एवढे गुंतत चाललो आहोत कि दुसर्यांचा विचार करायची वृत्तीच हरवून बसलो आहोत , सामाजिक प्राण्याची ओळख हरवून बसलो आहे , जिथ आपण माणुसकीच नातच मानत नाहीये तिथ बाकी नात्यांना किंमत कशी देणार ?
भुकेल्याला अन्न द्यावे
तहानलेल्या पाणी द्यावे .....हि साधी शिकवन हि विसरून गेलो ...फ़्क़्त "मी"पणा च्या गर्तेत उरलेला विचार घेवून चालणारा एक जीव... एवढीच ओळ्ख बनत चालली आहे आपली
म्हणूनच गरज आहे माणुसकीला पुन्हा शोधण्याची, पुन्हा एकदा वाढवण्याची आणि दुसर्याच्या मनात हि तिला रुजवण्याची मग माझ्यासोबत घ्या तुम्ही हि तिचा शोध , पण सुरुवात स्वतः पासून करा कुणास ठावूक तुमच्या स्वतच्या आतमधल्या माणुसकीने कुणाची तरी हि शोध मोहीम पूर्ण होईल ....आणि जर तुम्हाला भेटली हि माणुसकी कुठे तर ह्या बाबतीत व्हा थोडस स्वार्थी, ठेवा तिचा काही भाग स्वतः जवळ आणि पाठवत राहा पुढे जो पर्यंत सर्वांना ह्या माणुसकीचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत ...

                                                                                                                         -प्रफुल्ल शेंडगे
 

सुजाण (?) चौथा खांब

                    पत्रकारिता , लोकशाही चा चौथा आणि महत्वाचा खांब , सामान्य नागरिकाला देशात आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्यात , लोकांना सुजाण बनवण्यात पत्रकारितेचा मोठा हात आहे ,स्वातंत्र्य पूर्व काळात हि लोकांना जागृत करण्याच काम केसरी सारख्या वृत्तपत्रांनी केल होत , काळ बदलला तसं अनेक बदल घडत गेले , प्रिंट मेडिया च्या बरोबरीने इलेक्ट्रोनिक मेडिया हि आता आपल्या देशात आला होता , देशात- जगात काय घडलं असेल ह्याचा विचार करत करत सकाळी येणाऱ्या वृत्तापत्राची वाट पाहणारे आपण , इलेक्ट्रोनिक माध्यमांमुळे वृत्तपत्र विसरून गेलो आहोत , प्रत्येक बातमी आता आपल्याला याची देही याची डोळा पाहता यायला लागली तीही अगदी तत्क्षणी.
                         पण थोडा विचार करून सांगा , आज आपण खरच न्यूज पाहतो का ? पाहत असलो तरी देशात काय घडतंय ते जाणून घेन्या साठी तरी नक्कीच पाहत नाही ? पाहतो ते फ़्क़्त टीवी मालिकेत , सिनेमात काय चालू आहे ह्या साठीच . खर ना ? माहिती आहे तुमच उत्तर हि "हो"च असेल , कारण मीही काही त्याला अपवाद नाही , आणि ह्या सार्या गोष्टींचा विचार करायला लागलो कि ,का आपण फ़्क़्त ह्याच गोष्टींसाठी मेडिया कडे पाहतो आहे? , आणि एक कारण सापडत ते म्हणजे पत्रकरिते मध्ये सुरु झालेली स्पर्धा , आज आपल्यकडे एका दिवसात जेवढ्या घटना घडत नसतील तेवढी न्यूज चैनेल सुरु झाली आहेत , बाकी सगळ्या चैनेल पेक्षा आमच चैनेल कस पुढ ह्याचा दिखावा चालू असतो , प्रत्येकजण हेच म्हणतोय "आम्ही दाखवली हि बातमी सर्वात आधी ”, अरे पण आम्हाला बातमी कोण आधी दाखवतो त्या पेक्षा कोण त्या बातमी मागच गांभीर्य , सत्य पडताळून ती बातमी दाखवतो ते महतवाच आहे . कुठला बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो ह्यांची जखमी आणि मृत लोकांच्या संख्येची चालेली चढा ओढ , एक म्हणतो १० तर दुसरा म्हणतो १२ मग तिसरा लगेच २०-३० आकडा घेवून तयारच असतो ,एक्सक्लूसिव, स्टिंग ऑपरेशन च्या नावाखाली डॉन , गुंड लोकांशी पत्रकार घेत असलेली मुलाकात , निवडणुकांच्या आधी दाखवले जाणारे एग्जिट पोल पहिले कि वाटत हे खरच सर्वेक्षण आहे कि राजकीय पार्ट्यांची केलेली जाहिरात , जे त्यांना हव आहे तसं लोकांच्या मनावर बिम्बावण्याचा निव्वळ प्रयत्न , त्यावेळी वाटत खरच सगळी कडे बाजारीपणा चालला आहे .

                                २६/११ चा दहशतवादी हल्ला आठवतो का तुम्हाला ? हो आठवत असेलच ना तुम्हालाही , पाहिलं असेल ना तुम्ही हि न्यूज चैनेल वर तेही लाइव, NSG कमांडो , पोलिसांनी केलेले शर्थीचे प्रयत्न , अहो पण जे आपण टी.व्ही. वर पाहत होतो ते हल्ला करणरे हि पाहत असतीलच ना ?, आपले पोलीस, कमांडो कशापद्धतीने व्यूहरचना करत आहेत तेही पूर्ण विश्लेषणं सहित , आणि ते विश्लेषण करणारे आपलीच मानस , कुठल्या परिस्थितीत काय सांगाव - काय दाखवू नये ह्याच भान हि असू नये ? सुजान म्हणवता ना स्वतःला ? , कधी सकाळी ४-6 च्या दरम्यान न्यूज चैनेल पाहिलेत का कधी ? कुठल्या तरी (भोंदू)बाबांचं प्रवर्चन चालू असत , आणि मग दिवसभर तेच चैनेल आम्ही कसे अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असत . हि विसंगती नाही का ?

                            आता तर काय एक नवीन कार्यक्रम आखला आहे , चार पाच विश्लेषक, तज्ञ लोकांना बोलावून आणि चार-पाच चौकटी बनवून चर्चा सुरु करायची , चर्चा कसली ओ ती , नुसता गोंगाट , कोण कुणाच ऐकून घेत असत तिथ ? सगळे आपलच म्हणन मांडत असतात , आणि एखादा सांगत असतो महत्वाच तर त्याच क्षणी ब्रेंक ची वेळ होते ह्यांची , मग वाटायला लागत मनात कुठेतरी कि , ह्या चर्चा फक्त नावालाच आहेत ह्या चर्चांचा शेवट काय करायचा हे त्यांनी आधीच ठरवून ठेवलेलं असत फ़्क़्त दाखवण्य पुरती ती चर्चा , आणि चर्चा हि कसल्या कसल्या विषयावर तर "म्हणे ह्या दहशतवाद्याला / गुंडाला मिळालेली शिक्षा योग्य कि अयोग्य ” हे प्रश्न हि तेव्हा विचारतात जेव्हा न्यायालयने त्या गुंडाला त्याची हि बाजू समजून शिक्षा दिलेली असते तेव्हा..आणि कुणी काही बोलूही शकत नाही कारण शेवटी प्रश्न पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा आहे ना ?

                वाईट मात्र एकाच गोष्टीच वाटत ते म्हणजे सुक्या सोबत जळणाऱ्या ओल्याच कारण आजही ह्या "वातावरणात " काही माध्यम आहेत "खरया" सत्याचा शोध घेणारी , निपक्ष बाजू मांडणारी आणि स्वतची सामाजिक जबाबदारी ओळखून पत्रकारिता जोपासणारी ...एक सलाम अश्या पत्रकारितेला आणि ती जोपासणार्य पत्रकारांना ... कारण त्यांच्या मुळेच आपल्या लोकशाहीचा चौथा खांब आजही टिकून आहे आणि आपली लोकशाही ताठ मानेने उभी आहे .... 

                                                                                                                         -प्रफुल्ल शेंडगे .

नाविन्याचा शोध

"काय रोज रोज तीच भाजी ? काहीतरी वेगळ करत जा ना ? ", "वैताग आलाय रोजच्याच त्या रडक्या मालिका बघून ","रोज मरे त्याला कोण रडे ? नेहमीचाच आहे हे "....थोडे ओळखीचे वाटतयेत का हे शब्द ? , हो ना ? आपलेच शब्द आहेत हो हे , रोज रोज एकाच गोष्टीला कांटाळलेलो आपण , काहीतरी नवीन मागत असतो , हो ! मागत असतो कारण, आपण स्वतः मात्र बदल करायला सरसावत नाही , "चलता है यार " म्हणून आपण आपल जगण ढकलत राहतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर विचार करायला वेळ मिळतो , तेव्हा आपण विचार करत राहतो  कि "आयुष्यात काही तरी करायला हव होत , थोडस हटके ”, पण तोपर्यंत वेळ झालेला असतो , आणि इच्छा असून हि आपण काही हि करू शकत नाही

दररोज तेच ऑफिस आणि तेच काम करून डोक्याला मुंग्या यायला लागतात तरी पण पर्याय नाही म्हणून आपण गप्प मुकाट्याने daily routine मध्ये स्वताला अडकवून ठेवतो , पण कोणी स्वतः लाच किंवा आपल्या मनाला बोललात का कधी कि "काय यार रोज रोज तेच करतोस काही तरी बदल कर ” , नाही ना ? आता असा अर्थ काढू नका कि मी तुम्हाला रोज नवीन नवीन जॉब्स शोधायला आणि करायला सांगतोय , माझ म्हणन एवढच आहे कि जे काम तुम्ही रोज करता आहात त्यात हि काही नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करा, का त्या ओझ उचलणाऱ्या गाढवा सारख वागताय , फक्त जगण्यासाठी जगायचं आहे असा का विचार करताय ? , ठीक आहे , जर नाहीच शोधता येत आहे तुम्हाला रोज्च्याच कामात नाविण्यापणा , मग जोपासा ना एक छोटासा छंद , घ्या न त्याचा आनंद , जा कधीतरी एकट्याने फिरायला ह्या technical जगा पासून लांब थोड निसर्गाच्या सानिध्यात , बघा सभोवताली निसर्गानी काय काय वाढून ठेवलं आहे तुमच्यासाठी, लहान मुलासारख काढत राहा ना चित्र मुक्त मानाने , उमटू द्या ना मनातले सुंदर विचार तुमच्या एका कोर्या कागदावर , बघा मन कस प्रफुल्लीत होवून जाईल , बागडू द्या स्वतच्या विचारांना फुलपाखरा सारखं मुक्तपणे , अहो फुलपाखरू पण रोज एकाच फुलाकडे नाही जात तो हि शोधतो नवीन फुल , आणि आपण तर अगदी माणसा सारखी मानस , त्या छोट्याश्या जीवाला जे कळत ते आपल्याला का नाही कळत ? तर जागे व्हा मनातून आणि टाका एक पाऊल नाविन्याकडे आणि घ्या आनंद खर्या जीवनाचा .

ऑल द बेस्ट !!!