उंबरठा

नको न ग, नको न ग आये
पाठवू मला तू सासरला
नाय जायचं मला कुठ
सोडून तुझ्या पदराला

आंगणात पण कधी सोडली नव्हतीस
एकटी तुझ्या पोरीला
मग कशी बांधतेस आज मला
दुसऱ्याच्या गोठ्यातल्या दोरीला

त्या घरी ,कुणाला सांगू मनातल
असताना मी खुशीत
अन रडताना डोक ठेवू कुणाच्या ग कुशीत?

फिरवील का कुणी तिकड
तुझ्यावाणी मायेचा हात
देयील का कुणी बाबांवणी
पाठीवर ,शाबासकीची थाप

तुला बी दिस ना का
 माझ्या  डोळ्या मधलं  पाणी
भेटतील का उंबऱ्यात "त्या"
नाती आपल्या माणसावाणी ?

पोरे ,डोळ्यातल्या पाण्यान  तुझ्या
पापण्या माझ्या भिजल्यात
सुखात पाहण्या साठी तुला
म्हणून अजून नाय निजल्यात

चार दिवसात तू बी जाशील
तिकडल्या माणसात मिसळून
जाशील माझ्यावानी तू बी
स्वताच्या माहेराला विसरून
  

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-