"ती" एक रात्र



                  रात्रीची २:३० - ३ ची वेळ होती , शहरातल्या एका चौकात एक ट्रेवल  बस येवून थांबली , एक जन त्या बस मधून खाली उतरला तशी बस निघून गेली , साधारण २५-३० वयातला एक तरुण होता , त्याने इकडे तिकडे पहिले , बहुतेक तो रिक्षा मिळते कि नाही याची चाचपणी करत होता , १० मिनिटे तो तिथेच थांबून रिक्षाची वाट पाहत होता पण त्या रस्त्यावर एकही रिक्षा येत नव्हती ... कंटाळून त्याने चालत जायचा निर्णय घेतला , सोबत फ़क़्त खांद्यावर अडकवलेली एक बैग होती , त्या निर्मनुष्य रस्त्यावरून त्याने चालायला सुरुवात केली .. चालताना हि तो एखादी रिक्षा भेटते कि नाही हे पाहत होता ... रस्त्यावरच्या दिव्यांमुळे उजेड पसरला होता .. पण ती निरव शांतात खायला उठत होती ... मधूनच दूरवरून कुठून तरी ऐकू येणाऱ्या कुत्रांच्या  भुंकण्याच्या आवाजाने  अणि गुरुखाच्या शीटटीच्या आवाजाने ती शांताता भंग पाहत होती पण ती हि फ़्क़्त काही सेकांदापुर्तीच ... त्या चालणारया त्याच्या पावलासोबत सोबत चालत होती ती फ़्क़्त त्याची सावली ... त्यावेळी त्याच्या  मनात थोडी अस्वस्थता वाढत चालली होती ..

                      चालत चालत तो एका चौकात येवून पोहचला … तेव्हा त्याला एका गाडीचा आवाज आला म्हणून तो तिथेच थांबला …. वर्तमान पत्राची गाडी होती ती … अगदी सुसाट निघून गेली ती त्याच्या समोरून .. पुन्हा हताश चेहऱ्याने तो परत चालू राहिला … सुमारे १० मिनीट चालल्या नंतर तो  रस्ता ओलांडन्यासाठी  निघाला … का कुणास ठावूक पण तो निर्मनुष्य रस्ता ओलांडताना हि त्याच्या मनात दोन्ही बाजूनी कोणत वाहन येत नाही न याची खात्री करावीशी वाटली …म्हणून त्याने डाव्या बाजूला पहिले आणि मग उजव्या बाजूच्या रस्त्यावरून नजर फिरवली …. दूर पर्यंत एक हि वाहन दृष्टीस पडत नव्हते … म्हणून त्याने पावूल पुढे टाकले … तोच कुणीतरी  ब्रेक दाबल्याचा आवाज आला.... त्याच्या पायाजवळ एका गाडीच चाक थांबल होत ... त्याने झटकन वर पहिले … डोक्यावर जुन्या काळातली टोपी , चेहऱ्यावर पसरलेली पांढरी  दाढी असलेला एक म्हतारा  माणूस एम. ८० गाडी चालवत होता … त्या म्हातार्याला  अचानक पाहून त्याच्या हृदयाची धड धड वाढायला लागली …. तोच त्या गाडीवरच्या म्हातार्याने त्याला विचारल "कुठ जायचं आहे ? सोडू का गाडी वरून ?” त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून तर भीती आणखीन वाढली …. आणि शहारत्या अंगाला थोडस सावरून त्याने उत्तर दिल " नको ” आणि इतकच बोलून त्यान लगबगीन रस्ता ओलांडला …

          त्याच्या मनात विचारांचं आणि प्रश्नाचं काहूर माजलं … कोण होता हा माणूस , आणि अचानक कुठून आला ? मगाशी तर रस्तावर एक हि गाडी नव्हती मग क्षणार्धात कुठून आला तो … परत मागे वळून पहायची त्याची हिम्मतच होईना … त्याने जसा रस्ता ला तोच रस्त्यावरचे दिवे बंद झाले … सगळी कडे कालाकुटट  अंधार पसरला … तो दचकला … आणि त्याने परत मागे वळून पाहिलं त्या माणसाकडे .. पण त्या तिथ कुणीच नव्हत … ना तो माणूस ना त्याची गाडी … गेला कुठे होता ? आणि गाडीच आवाज हि का नाही आला ? आता मात्र त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागला  … हात पायाचे तळवे गार पडले होते … काय कराव काहीच काळात नव्हत … उजेडासाठी त्याने खिशातला मोबाइल  काढला … पण तो हि स्वीच ऑफ झालेला … पुढच काहीच दिसेनास झाल  होत … ऐकू येत होता तो वाढलेला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज …. तो तिथेच थांबून राहिला … मन घट्ट करून …. काहीवेलातच कुत्र्यांचा आवाज शांत झाला … सगळ वातावर पुन्हा एकदा  सुन्न झाल होत … त्याचा श्वास वाढायला लागला होता … आणि त्याच क्षणी त्याच्या कानावर आली एक जोरदार किंचाळी …. फार विचित्र आवाज होता … त्याने कान बंद करून घेतले आणि तो तसाच त्या अंधारात धावत निघाला … काही अंतर पुढे गेल्यावर  पुन्हा रस्त्यावरचे दिवे चालू झाले होते … त्यासोबत त्याच्या पावलांची गती हि मंदावली … तो त्याच्या घराजवळ येवून पोहचला … त्याने लगबगीने खिशातून घराची चावी काढली .. आणि कुलूप उघडून तो घरात शिरला … आणि घरातले दिवे पेटवले … मग वाश बेसिन जवळ जावून तोंडावर पाण्याचा मारा केला … आणि तसाच विचारमग्न होवून बेड वर जावून बसला … बाहेरून येणारा प्रत्येक बारीक आवाज हि त्याच्या काळजाची धड-धड वाढवत होता … त्याने ती पूर्ण रात्र तशीच जागून कशी-बशी घालवली …

पण आज हि प्रत्येक रात्री त्याला ह्या रात्रीची भीती सतावत राहते  … काय आणि का घडल होत  ते त्याला अजूनहि उमजत नव्हत .  


- प्रफुल्ल शेंडगे 

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-