एक पत्र...




पत्र ... काही वर्षांपूर्वी संदेश पाठ्वाण्यासाठीच एकमात्र साधन म्हणून पत्रांकडे पाहिलं जात होत पण आजकाल मोबाईल , इंटरनेट अशी अनेक माध्यम उपलब्ध आहेत... ह्या पत्रांचा तसा उपयोग प्रेमी लोकांनाच जास्त झाला असावा .. मनातल्या भावना कागदावर उतरवून थेट समोरच्याच्या मनाला भिडवल्या जाव्या ती किमया फ़क़्त पत्रातच असेल किंवा अजूनही आहेच ... पहले प्यार कि पहली चिट्ठी म्हणजे सगळ्यांच्याच आठवणीचा विषय ... म्हणून विचार केला कि एक प्रेम पत्र लिहाव म्हणून ... कुणाला आणि कुठ पाठवायचं आहे ते सध्या तरी माहित नाही , तीच नाव , गाव कशाचीच कल्पना नाही तरी पण तिच्याशी बोलाव, तिला मनातल सार सांगाव म्हणून हा सारा खटाटोप...


 प्रिय अनोळखी (सध्या तरी अनोळखीच आहेस म्हणून ),

 पत्र लिहण्यास कारण कि , फार दिवस तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलायची इच्छा होती पण तू अजून पर्यंत काही मला भेटली नाहीस आणि मी हि सध्या आयुष्याच्या अश्या टप्प्यावर आहे जिथ भेटणारा प्रत्येक व्यक्ती माझ्याशी "काय मग लग्न कधी ?, कुणी भेटली कि नाही ?” असा प्रश्न विचारतोय आणि यासोबतच "लवकर दोनाचे चार हात होवू दे ” असे आशीर्वाद हि मला मिळायला लागलेत ... बहुतेक तुझ्या बाबतीत हि असच काहीस घडत असाव ... म्हणून तुला हे पत्र लिहून विचारायचं होत कि तू माझ्या आयुष्यात कधी दाखल होणार आहेस ? .. कधी आपली ओळख होईल ?.. तुला हि माझ्यासारखीच भेटायची ओढ लागली असेल ना ?... आजकल आजू बाजूला माणसांचा वेढा असला तरी मी तुझ्या विचारात गुंतलेला असतो , स्वप्नातही तूझा धूसर का होईना पण चेहरा दिसत राहतो ... आता हा धूसर चेहरा कधी स्पष्टपने माझ्या स्वप्नाबरोबरच माझ्या जीवनात हि येणार आहे ते माहित नाही ... पण तू भेटल्यावर तुझ्याशी काय बोलायचं , कस बोलेल, तुझ्यासमोर कसा व्यक्त होईल ह्याचे विचार मनात सारखे घोळत राहतात ... आणि माझी नजर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तुला शोधात राहते, त्यामुळे तुझा शोध घेता घेता मी दुसर्याच कुणाच्या प्रेमात पडलो तर मग काही खर नाही हा .... गम्मत केली... तस काही होणार नाही मला पूर्ण खात्री आहे ती तूच असशील जिची मी आतुरतेने वाट पाहतोय ... बोलायचं तर तुझ्याशी भरपूर आहे पण सार आत्ताच नको भेटशील तेव्हा नक्की बोलू ... वाट पाहतोय तुझी ....

 फ़्क़्त तुझाच
 मी


 -प्रफुल्ल शेंडगे

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-