तिची डायरी-भाग 2

 

पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा...तिची डायरी- भाग 1

 मुलगी ,बहिन, मैत्रीण , बायको ,  आई अशा अनेक टप्प्यात स्त्रीच आयुष्य जरी विभागल असलं तर तीच प्रेम कुठल्याच टप्प्यावर कुणासाठीच विभागल जात नाही , प्रत्येकाला आनंदी , सुखी ठेवत तीच जगन चालू असत ... डायरीच्या ह्या पुढच्या पानात दडलंय असंच एक अनोख नात


दिनांक :- २९ -०१ -२०१२ 
कॉलेज पूर्ण झाल होत , आमच प्रेम आजही फुलत चालाल होत , मोबाइल  वर बोलन , मेसेज करण अस सारख चालू असायचं , घरातल्यांपासून लपून-छपून सार काही पुढे सरकत होत ... पण आज आईला कळालच ... मोबाइल वर त्याच्याबरोबर चैट करत होते तोच आई बोलली "फार दिवसापासून मी बघतेय तुझ काहीतरी वेगळच चालू आहे , सारख त्या मोबाइल वर असतेस , मोबाइल मध्ये बघून हसत असतेस , काय चाललय तुझ ?” आईच हे बोलन ऐकून मी घाबरले , आई आज थोडी जास्तच कडक वागत होती ... मग मलाही तिला त्याच्या बद्दल सांगाव लागल , मी आईला त्याच्या बद्दल , आमच्या प्रेम बद्दल सांगितल , माझ हे बोलन ऐकून आईच्या चेहऱ्यावर टेंशन आल होत ... पण मी तिला त्याच्या चांगुलपणाचे दाखले देवून पटवत होते कि तो किती चांगला आहे ... आईने माझ पूर्ण म्हणन ऐकून घेतल , पण ती त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नव्हती.. म्हणून मी तीच  त्याच्याशी मोबाइल वर बोलन करून दिल ... त्याच्या सोबत बोलल्यावर मात्र तिलाहि त्याच्या स्वभावाबद्दल थोडी फार कल्पना आली होती ... तिच्या चेहर्यावरच थोड टेंशन कमी झाल असल तरी बहुतेक बाबांना कस सांगायचं हाच विचार तिझ्या मनात चालला असावा ... पण आईशी सार काही शेअर करून मन हलक झाल होत ...


दिनांक :- ०८ -०३ -२०१२ 
आज रात्री जेवताना बाबांनी माझ्या लग्नाचा विषय काढला , ते आईला बोलत होते "आता मुल बघायला सुरु केल पाहिजे हिच्या लग्नासाठी ”, त्याचं हे बोलन ऐकून मी आणि आई आम्ही दोघी हि एकमेकींकडे बघत होतो .. पण दोघीनंही बाबाना सार काही सांगायची हिम्मत होत नव्हती ... तोच आईने मुद्दाम विषय काढून हसत मला म्हणाली "काय शोधू दे ना मुलगा  ?, का शोधलायस तूच आधी ?” आईच्या ह्या प्रश्नांवर काय उत्तर देवू मला कलाल नाही मी हळूच बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला लागले होते तर बाबा आधीच माझ्या कडे बघत माझ्या उत्तराची वाट पाहत होते ... त्यांच्या  नजरेला नजर भिडवण्याची माझी हिम्मत होत नव्हती मी तशीच नजर झुकवून जेवत राहिले ... थोडा वेळ पूर्ण शांतता पसरली ... तोच बाबांनीही तोच प्रश्न केला ... तस बाबांचं आणि माझ फार जमायचं , त्यांच्याशी मी दिलखुलास बोलायचे पण आज मात्र बाबांच्या आवजाने माझ्या हृदयाची धडधड वाढवली होती.... मी चोरून हळूच आईकडे पाहत होती आणि आई मला सांगून टाक अस नजरेने सांगत होती .... आणि मी मन घटत करून "हो ” एवढंच बोलले तोच बाबांनी दुसरा प्रश्न विचारला "हो चा अर्थ काय काढू ? मुल बघायची कि ....” बाबांचं बोलन मध्येच तोडत आई ने बोलायला सुरुवात केली ... तिने बाबांना माझ्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल सांगायला सुरुवात केली ... मी तशीच नजर झुकवून बसले होते ... आईच सांगून झाल तस मी नजर वर करून पाहिलं तर बाबांनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि परत जेवायला लागले पण बोलले काहीच नाहीत ... मी हि पटापटा माझ जेवण आटपून माझ्या खोलीत येवून बसले ... झोपायची वेळ झाली पण अजून पर्यंत बाबा ह्या विषयावर काहीच बोलले नाहीत .


दिनांक :- ०९ -०३ -२०१२
आज सकाळी पण बाबा माझ्याशी काहीच न बोलता ऑफिस ला निघून गेले ... आज पर्यंत कधी अस माझ्याशी न बोलता राहिले नव्हते .... माझ्या मनात हि वेगवेगळे विचार घोळत राहिले ... आईला विचारल "काही बोलले का बाबा तुझ्याशी ?”  आई ने नकारार्थी मान हलवली ... पण मला धीर देत म्हणाली "काळजी करू नकोस तू , मी बोलते त्यांच्याशी ऑफिस  मधून आल्यावर ”...माझा अख्खा दिवस काय होईल आणि बाबांच्या मनात काय चालू असेल ह्याच विचारात गेला ... संध्याकाळी बाबा घरी यायची वेळ झाली , मी मुद्दाम त्या वेळी माझ्या खोलीत जावून बसले होते ... फ्रेश झाल्यानंतर बाबा चहा पीत होते तोच आईने पुन्हा विषय काढून  त्यांना विचारल ... आईचा बोलण्याचा आवाज आला म्हणून मी माझ्या खोलीच्या दारात उभ राहून माझी बोट क्रॉस करून  त्याचं बोलन ऐकायला लागले .... आईने बाबांना विचारल :”काय झाल ? काल पासून काहीच बोलत नाही आहात ? ” बाबांनी उत्तर दिल "काय बोलू मी ? आणि बोलून काय उपयोग ”... “अहो , काय बोलू म्हणजे ? तुमच काय म्हणन आहे आपल्या मुलीने घेतलेल्या निर्णया वर ?”.... ह्यावेळी बाबांचा आवाज थोडा नरम आणि काळजीग्रस्त वाटायला लागला होता ... बाबा आईला सांगत होते "हि तीच आपली मुलगी आहे ना ... जी लहानपणी .... लहानपणी काय काल परवाचीच गोष्ट ... नर्स नि माझ्या हातात तिला सोपवली होती  ...तो गोंडस , निरागस चेहऱ्याची बाहुली पाहून मला झालेला आनंद आज हि मला आठवतोय ... तिनी टाकलेलं पाहिलं पाउल , उच्चारलेला पहिला शब्द आजही स्पष्ट आठवतोय ... मला घोडा बनवून त्यावर बसून रपेट मारणारी , तर रात्री माझ्या कुशीत डोक ठेवून निजणारी , बाहुली साठी हट्ट करणारी , शाळेत घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारी आपली मुलगी एवढी मोठी झाली ? स्वतःचा निर्णय स्वता घेण्याएवढी ? आता हिला ह्या बाबाची गरज नाही लागणार ना ?,  विसरेल ना आता हि मला नी तुला ? आता आपल्यापासून दूर जाणार ना ? ह्याच विचाराने मी शांत होतो , जर मी काही बोलायला गेलो असतो तर मी तिच्याशी काही बोलायला गेलो असतो तर मी माझ्या भावनांना आवरू शकलो नसतो म्हणून गप्प राहणंच पसंद केल , आणि जर तिचा हा निर्णय पण योग्य असेल तर मी नेहमी सारखा तिच्या सोबतच असणार आहे  ” त्यांच्या ह्या बोलण्याने मला माझे अश्रू अनावर झाले होते ... दरवाजाच्या आडून मी बाहेर निघून त्यांच्या समोर आले ... आई आणि बाबांचे दोघांचे हि डोळे अश्रुने ओले झाले होते ... त्यांच्या ह्या अश्रुना पाहून मी स्वताला थांबवू शकले नाही ... मी बाबांच्या जवळ जावून त्यांच्या मांडीवर डोक ठेवून मी हि रडायला लागले होते ... बाबांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला ... आणि आई आमच्या दोघांकडे पाहत होती ... मी माझा हुंदका आवरत त्यांना म्हणाली कि "मी तुम्हाला सोडून जाणार नाही कुठ ” तोच बाबा म्हणाले मग त्या मुलाला नाही म्हणून सांगू दे ना ? हे ऐकून मी झटकन वरती  त्यांच्या कड़े पाहिल तर आई-बाबा माझ्याकडे बघून हसत होते ...आणि मी माझ लाजन त्यांच्या पासून लपवायचा अयशस्वी प्रयत्न करत होते....

-प्रफुल्ल शेंड्गे

तुमच्या प्रतिक्रया फेसबुक किंवा prafulla21pan@gmail.com  ईमेल वर कळवा 

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-