तिच्या मनाच्या कप्प्यातुन...

             

          मला काही तशी वाचायची ख़ास सवय नाही पण मनात लिहिल्या गेलेल्या त्याच्या आठवणी आज हि मी रोज वाचत राहते ... इंजीनियरिंग च्या सेकंड इअर ला आमच्या क्लास मध्ये काही नवीन चेहरे दाखल झाले होते ... तो हि त्या नवीन चेहर्या मधला एक .... शांत , स्वतच्याच विचारात मग्न, पुस्तकी किडा असाच , मुलींशी तर फारच कमी बोलायचा ... असच पहिली सेमिस्टर संपली पण ह्या सहा महिन्यात कधीही त्याच्याशी थेट बोलता आल नाही , मी त्याच्या आणि माझ्या मित्रांच्या माध्यमातून त्याच्याशी असाइनमेंट आणि प्रोग्रामिंग बद्दल त्याच्याशी बोलायला सांगायचे... पण एक दिवस आला ज्या दिवशी त्याच्या बद्दल मला काही कलाल , आमच एक ट्रेनिंग चालू होत , त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीनी मला सांगितल कि तो तुझ्याकडेच पाहतो आहे सारखा ... मी तिला म्हटल "तो कशाला बघेल माझ्याकडे , तो तर किडा आहे , पुस्तकी किडा ” आणि मी हसायला लागले पण माझ मलाच राहवल नाही आणि मी खरच तर तो माझ्या कडे बघत नाही न म्हणून त्याच्या कडे हळूच पाहिलं ... बघून सौम्य धक्काच बसला , खरच तो माझ्या कडेच पाहत होता .. मी जाणूनबुजून न पहिल्यासारख करत होते , काय कराव मला हि काळात नव्हत ... एकदा असच ट्रेनिंग संपल्यावर पार्किंग एरिया मधून माझी स्कूटी काढत होती तेव्हा एक बाईक माझ्या अंगावर पडायला लागली ... कुणास ठावूक पण तो त्या वेळी कुठून आणि कसा आला आणि ती बाईक पडण्यापासून थांबवली ... मला काहीच समजल नाही एवढ सगळ एकदम अचानक घडल .. मी तशीच घाईघाई ने तिथून निघून गेले , नंतर लक्षात आल मी त्याला थैंक्स पण नाही म्हटल, काय विचार करत असेल तो माझ्या बद्दल असा विचार करतच मी झोपून गेले . 



            दुसर्या दिवशी ट्रेनिंग च्या वेळेला पुन्हा मी त्याच्या कडे पाहिलं , आज हि तो तसाच मग्न होवून माझ्या कडेच पाहत होता ...मनातून मलाच अवघडल्या सारख वाटत होत ..म्हणून त्याच्याशी बोलून थैंक्स बोलायची हिम्मत माझ्यात झाली नाही म्हणून मी माझ्या मैत्रिणीला माझ्याकडून थैंक्स म्हणायला सांगितल ...दिवसमागून असेच दिवस निघून जात होते ... आमच्या सेकंद इअर च्या पहिल्या सेमिस्टर चा रिजल्ट आला ... तो पूर्ण क्लास मध्ये पहिला आला होता ... म्हणून त्याला क्लास चा CR बनवला गेला ... कधी कधी टीचर त्याला क्लास मध्ये हजेरी घ्यायला सांगयचे आणि हा पट्ठा माझा रोल नंबर आला कि माज्याकडे बघून स्माईल द्यायचा , त्याच्या ह्या अश्या वागण्याने माझे सगळे मित्र-मैत्रिणी आता मला त्याच्या नावाने चिडवायला लागले होते , पण मला त्याच्या बद्दल अजून अस काही वाटत नव्हत... एकदा असच मी क्लास मध्ये असाइनमेंट लिहित बसले होते तो माझ्या जवळ आला अणि मला नम्बर विचारला मी पण लगेच माझा मोबाईल नंबर सांगायला सुरुवात केलि तोच त्याने मला थाम्बवल अणि म्हणाला मोबाईल नम्बर नाही रोल नंबर ....माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसायला लागल्या अणि तो तसाच माझ्याकडे बघत राहिला , मी अशी कशी वागले कुणास ठावुक ?...जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आमच्या क्लास ची पिकनिक गेली तेव्हा त्याच्याशी बोलायची पहिली संधी मिळाली ... आता अधून मधून त्याच्याशी बोलन सुरु झाल होत ... पण एवढ जास्त हि नाही फ़्क़्त हाय आणि बाय एवढच बोलायचा ... मी आमच्या ग्रुप मध्ये बसली असली तरी तो फ़्क़्त मलाच हाय आणि बाय करायचा , त्यामुळे सगळ्यांना अजूनच मला चिडवायची संधी मिळत होती , पण मला ह्या वर काय प्रतिक्रिया द्यावी ते मलाच कळत नव्हत... असच एके दिवशी त्याने माझ्या मैत्रिणीकडे एक निरोप सांगितला कि त्याला मला भेटायचं आहे एकांतात , थोड बोलायचं होत म्हणे त्याला ... त्याच्या ह्या निरोपाने माझा श्वास गरम झाला , आणि मनात थोडी भीती दाटली , मी जायला तयार नव्हती आणि म्हणून त्याला भेटन टाळल... माझ्या घरचे थोडे कडक होते अशा गोष्टीत बहुतेक ह्याच गोष्टीची भीती माझ्या मनात जास्त होती .... आणि त्यामुळे अधून मधून जे बोलायचो ते हि बंद झाल .... 




           अस महिनाभर आम्ही एकमेक्नाशी काहीच बोललो नाही , त्यामुले तो उदास रहायला लागायचा .असच आम्ही सगळेजन एकत्र बसलो होतो तोच तो तिथे आला , त्याच्या हातात लग्न पत्रिका होती ... ते पाहून माझ्या मनात घालमेल सुरु झाली ... पण ती त्याच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका आहे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला... त्याने मला लग्नाला ये असा खास आग्रह केला.. तेव्हाही मला जावू का नको अस वाटत होत ... पण सार्या मित्रांच्या आग्रहाखातर मी यायला तयार झाले... लग्नात जाण्यासठी मी तयार झाले ... मला तयार झालेलं पाहून सगळे मित्र-मैत्रिणी माझ्याकडे बघून हसायला लागले , मला काही कळल नाही का हसतायेत ते , तर एकाने सांगितल , तू एवढी सुंदर तयार होवून गेलीस तर त्याची तर वाट लागेल , तो तर वेडाच होईल तुला बघून... हे ऐकून पुन्हा सगळे माझ्या कड बघून जोर जोरात हसायला लागले . जेव्हा आम्ही लग्नात पोहचलो तेव्हा मला बघून तो खूप खुश झाला होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्याला झालेला आनंद .... त्याने त्याच्या बहिणीशी माझी ओळख करून दिली तेव्हा तिच्या नजरेत ही मला तीला माझ्या बद्दल खूप काही माहिती आहे अस वाटत होत , ति मला तिच्या आईजवळ घेवून गेली आणि तिच्या कानात काहीतरी सांगू लागली आणि त्यानंतर त्याची आई हि माझ्याशी जे काही खास वागत होती त्याने मी जास्तच अवघडली, पण मनातून ते मला छान वाटत होत मी हळुवारपणे त्याच्या आणि त्यांच्या कड़े ओढली जात होती, माझे सर्व मित्र मला त्याच्या प्रेमळ स्वभावा बरोबर त्याच्या चांगल्या गोष्टी सांगत होते आणि काही वेळासाठी माझ पण मन त्याच्या कडे ओढायला लागल होत .....


          पण त्याच बरोबर एक कटू सत्य माझ्या मनात घोळायला लागल होत ते म्हणजे आमच हे प्रेम शक्य नव्हत , समाजाच्या नियमात आमच प्रेम कधीच जिंकणार नव्हत.... बहुतेक त्याला हि ह्याची जाणीव असावी... प्रेमात पडून दुरावण्यापेक्षा प्रेमात न पडलेलच बर अस मला वाटल , आणि म्हणुनच मी जाणून बुजून त्याच्या प्रेमात पडण्यापासून स्वताला सांभाळत राहिली.... आज इतक्या वर्षात त्याच्याशी ना कधी भेटन झाल ना बोलन पण त्याच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत ..


छुपाना भी नहीं आता,
जताना भी नहीं आता,
हमें तुम्हसे महोब्बत है
बताना भी नहीं आता


माझी अवस्था ही ह्या गाण्यातल्या ओळी पेक्षा काही वेगळी नव्हती...पण आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात हे माझ्या बाबतीत तरी खर ठरल होत... पण आज हि तो माझ्या मनातल म्हणन ऐकत असेल ह्या आशेने मी माझ्या मनात त्याला त्याच्या वरच्या प्रेमाची कबुली देत असते ....

1 comment:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-