अधांतरी

मी तिच्याशी खुप काही बोलत असलो तरी जे तिला सांगायचं होत ते स्पष्ट सांगण्याची हिम्मत अजून पर्यंत माझ्यात आली नव्हती , कधी कधी शब्दांच्या आडून मी माझ प्रेम तिला दाखवून द्यायचो पण त्यावर तिची काही खास प्रतिक्रिया यायची नाही कधी कधी तर प्रतिक्रियाच नाही , मग पुन्हा मनात हुरहूर सुरु व्हायची , काय वाटल असेल तिला ? , काय विचार करत असेल ती ?, बोलन वगैरे बंद तर नाही ना करणार माझ्याशी ? असे एक ना एक प्रश्न वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे एका मागून एक मनातून बाहेर पडायचे .

ती स्वताहून कधीच माझ्याशी बोलायची नाही , एखाद फुलपाखरू कस फुलाकडे जाते , फुलाला त्याची कधी गरजच नसते .तसच माझ व्हायचं , मीच तिच्याशी बोलाव . कधी कधी ह्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा , वाटायचं बास आता हे सार . नसेल तिच्या मनात तुझ्याशी बोलन मग का पळतोस तिच्या मागे ? स्वाभिमान , अभिमान , इगो सारखे सगळे भाव मला कोसत राहायचे आणि मी त्या वेळेपुरता तिच्याशी दूर व्हायचो . मग मी गप्प ती हि गप्पच . माझ बोलन , माझ गप्प राहण ,माझ हसन , रुसन , माझ असण , नसन याचा तिला काही फरकच पडायचा नाही , तेव्हाची माझी परिस्थिती काय सांगू , डोळ्यात पाणी तरळायला लागायच माझ्या , विचार करून करून डोक्याच्या शिरा दुखायला लागायच्या , हाताच्या मुठी घट्ट आवळून मी स्वतावरचा राग कंट्रोल करायचो , दिवस-दिवस आम्ही बोलायचो नाही , पण पाखर कशी संध्याकाळ झाली कि स्वताहून परत घरट्याकडे फिरतात तसा मी तिच्या कडे वळला जायचो . "नसेल जमल तिला , कामात असेल ती , कदाचित तिला वाटत असेल मीच बोलाव " अस बोलून स्वतःशीच समजूत घालायचो आणि परत मीच तिच्याशी बोलन सुरु करायचो . मी बोलायला लागलो कि ती बोलायची ,बहुतेक फॉरम्यालिटी म्हणून असेल , काहीही असलं तरी मी तिच्या बोलण्याने खुश व्हायचो तिच्यावर असलेला राग विसरून जायचो , पुन्हा डोळ्यात तिची नि माझी स्वप्न घेवून जगात वावरायला लागायचो , पण ह्या स्वप्नाच्या खोल तळाशी एक शंका किंवा एक कटू सत्य कायम दडलेलं असायचं ते म्हणजे आमच्या एकतर्फी आणि अधांतरी आणि बहुतेक कधी हि पूर्ण न होणार्या नात्याचं किंवा प्रेमाच भविष्य .

एकांतात कधी मला हे माझ आणि तिच्या अधांतरी नात्याचं भविष्य आठवल कि मी स्वतशीच हसतो , आणि आत्ता तुम्हाला हि जे वाटतय ना तेच मला हि वाटत राहत ते म्हणजे "जर ती माझ्या आयुष्यात कायमची येण्याची खात्री नाहीये तर मग का तिच्या मागे मी वेळ घालवतोय ?, का तिचा विचार करतोय ? वेडा आहेस का तू, उचल ना एक पाउल पुढ आणि जा ह्या सुरु न झालेल्या नात्यापासून दूर "पण ह्या सार्या प्रश्नांवर माझ्याकडे एकच उत्तर असायचं "क्या करू भाई , उससे दिल जो लग गया है , ओर किसीने कहा भी तो है-

फासले नजरो का धोका भी तो हो सकती है ,
एक बार हाथ बढाकर तो देखो "

कुणास ठावूक ती माझ्या ह्या पुढे केलेल्या हातात तिचा हात देयील तो कधीही न सोडण्यासाठी .

-प्रफुल्ल शेंडगे
(काल्पनिक कथा )

1 comment:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-